डाल रस्सम
साहित्यः
तुर डाळ - १/२ वाटी
मुग डाळ - १/२ वाटी
टोमॅटो - १
कडिपत्ता - ४-५ पाने
धणे - १/२ चमचा
जिरे - १/२ चमचा
काळी मिरी - १/२ चमचा
मोहरी - १ चमचा
हिंग - १/२ चमचा
चिंचेचा कोळ - १ चमचा
हळद - १/४ चमचा
लाल तिखट - १ चमचा
तेल / तुप - १ चमचा
कोथिंबीर सजावटीसाठी
मिठ चवीनुसार
पाकॄ:
१. तुर डाळ व मुग डाळ धुवुन, १/२ तास भिजवुन ठेवावी.
२. कुकर मधे भिजवलेली डाळ व चिरलेला टोमॅटो लावुन, ४-५ शिट्ट्या होऊ द्याव्या.
३. कुकर झाल्यावर, डाळ व टोमॅटो mash करावे. त्यात २ कप पाणी टाकुन mix करुन १/२ तास बाजुला ठेवावे. त्यामुळे डाळ खाली बसुन, रस्सम साठी डाळीचे पाणी मिळेल.
४. तव्यावर जिरे, धणे व काळे मिरे भाजुन, त्याची पुड करुन घ्यावी.
५. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट व भाजुन केलेली पुड टाकुन परतुन घ्यावे. त्यात डाळीचे पाणी ओतावे.
६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ व चवीनुसार मिठ टाकुन ३-४ मिनिटे उकळु द्यावे.
७. कोथिंबीरने सजवुन गरमा गरम रस्सम पिण्यासाठी तयार आहे.
८. रस्स्म तुम्ही साध्या भातासोबत खाऊ शकता किंवा सुप म्हणुनही पिऊ शकता.
९. आवडत असल्यास तुम्ही रस्समला वरुन परत मोहरी व कडिपत्त्याची फोडणी देऊ शकता.


याद्या
45223
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
हाय!
(No subject)
या असल्या थंडीत रस्सम हवेच!
आज्जे (ह.घे.)
In reply to या असल्या थंडीत रस्सम हवेच! by रेवती
अहो चिंतुकाका, आम्ही वर्षातले
In reply to आज्जे (ह.घे.) by चिंतामणी
आणी थंडीत भर
In reply to या असल्या थंडीत रस्सम हवेच! by रेवती
हो ना.... इथे स्लोवाकिया मधे
In reply to आणी थंडीत भर by खादाड_बोका
छान.
रस्सम ! रस्सम!!
छानच..
हाय हाय.. मार डाला.. रस्सम
रस्सम मध्ये मी डाळ तशीच ठेवत
नाही नाही
In reply to रस्सम मध्ये मी डाळ तशीच ठेवत by त्रिवेणी
फोटो आणि पाकॄ दोन्हि छान...
पाककृती आणि फोटो दोन्ही छान
स्वादिष्ट रस्सम!!
मस्त रस्सम..
छान आणि दोन शंका
धन्यवाद पाकृ आवडल्याबद्दल.
In reply to छान आणि दोन शंका by सुनील
एका दगडात ...
In reply to धन्यवाद पाकृ आवडल्याबद्दल. by Mrunalini
मोहरी ऐवजी धणे असे हवे होते का?
अरे हो... धन्स... चुकुन लिहले
In reply to मोहरी ऐवजी धणे असे हवे होते का? by अनन्न्या
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल
मस्त
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल by गणपा
पाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांचे
लई भारी धागा अन रस्सम, अशा
मस्त!
वॉव !
छान, मस्त
चान फोटो अहे. रेसिपि अव्ड्लि.