Skip to main content

पाणी पुरी

लेखक स्मिता चौगुले यांनी बुधवार, 13/02/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पुरी अ) या आधीच्या पाकृमध्ये मी गोड चटणीची(खजूराची चटणी)कृती दिली आहे आता पुढील भाग ब)पाणी - पुऱीचे तिखट पाणी साहित्य: - १) १ कप पुदिना २) १/२ कप कोथिंबिर ३) १ इंच आले ४) ४-५ हिरव्या मिरच्या ५)चिंच ( आंबट चवीच्या आवडी प्रमाणे कमी -जास्त टाकू शकता) - मी साधारण १/४ कप टाकते -नॉर्मल चवीसाठी ६) जिरे पावडर १ चमचा ७) साधे मीठ / काळे मीठ चवीप्रमाणे (दोन्ही अर्धे-अर्धे टाकू शकता ) कृती:- १) चिंच जवळपास ४०-४५ minutes पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे चिंचेचा कोळ चांगला निघेल २) चिंचेचा कोळ काढून त्यात उरलेले सर्व साहित्य टाकून मिकसर मधून एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्या (साधे मीठ आणि काळे मीठ सगळ्यात शेवटी घालायचे आहे पाण्याच्या अंदाजाप्रमाणे, ते या पेस्टच्या साहित्यात टाकू नका) ३) पेस्ट काढून त्यात पाणी टाका आणि चव पहा या मिश्रणाची,तिखट वाटले तर अजून पाणी घालू शकता ४) आता पाण्याच्या अंदाजाने साधे मीठ आणि काळे मीठ समप्रमाणात टाका ५) झाले पाणी तयार- refrigerator मध्ये थंड करून घ्या. मी हे तिखट पाणी बनवते तेंव्हा वरील साहित्यात साधारण १/२ लिटर पाणी टाकते. पाणी पुरीचे तिखट पाणी जास्त झाले तर refrigerator मध्ये राहू शकते .. ३-४ दिवसांनी परत बनवा पाणी पुरी क ) पुऱ्या साहित्य: - १) बारीक रवा १ कप २) मैदा १/४ कप ३) चिमुटभर खायचा सोडा ४) साधे मीठ कृती १) वरील साहित्य एकत्र करून चांगले मऊसर मळून घ्या आणि २०-२५ minutes ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा २) आता पुऱ्या लाटून घ्या. पुऱ्या पातळ लाटा फार जाड नको. (पुऱ्या ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा म्हणजे सगळ्या पुऱ्या लाटून होईपर्यंत आधीच्या पुऱ्या सुकणार नाहीत) ३) अर्ध्या पुऱ्या लाटल्यानंतर कढईत तेल तापत ठेवा. ४) तेल तापले की पुऱ्या चांगल्या लालसर तळून घ्या. पेपरवर काढून थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा म्हणजे मऊ पडणार नाहीत. पाणी पुरीच्या पुऱ्या बाजारात मिळतात मी त्याच आणते कारण ह्या पुऱ्या घरी बनवन्यात वेळ खूप जातो(खूप पुऱ्या लागतात :) )...आणि सोड्याचे प्रमाण कमी जास्त झाले तर तेलही जास्त राहत पुऱ्यामध्ये. ड) काही ठिकाणी पाणी पुरीमध्ये पिवळ्या वाटण्याचे सारण किंवा उकडलेल्या बटाट्याचे सारण देखील घालतात आवडत असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता . वाटण्याचे सारण - भिजवलेले पिवळे वाटाणे+ हळद + मीठ एकत्र करून चांगले शिजवायचे बटाट्याचे सारण - उकडलेल्या बटाट्याचा लगदा+चाट मसाला+ काळे/साधे मीठ इ) इतर सजावट (किंवा महत्वाच साहित्य) १) तिखट/खारी बुंदी २) बारीक शेव ३) बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबिर आता पाणी पुरी प्लेट बनवायची १) पुऱ्या फोडून त्यात आधी खजुराची चटणी,कांदा टाका (बटाट्याचे किंवा वाटण्याचे सारण असेल तर ते देखील) २) तिखट पाण्यात बुंदी टाका आणि ते पाणी या पुऱ्यामध्ये भरा ३) वरून शेव कोथिंबिर टाकून सर्व्ह करा .. गरज असेल तर वरून मीठ - तिखट फिरवू शकता आवडी प्रमाणे :) सौ. स्मिता चौगुले

वाचने 12130
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

पाकृ टाकली तरी फटू नसल्याने बाद

In reply to by नाना चेंगट

शमत आहे. असल्या पाककृती बरोबर फटू कंपलसरी हवेतच. सदर लेखीकेस ताबडतोब समज देण्यात यावी, तसेच शिक्षा म्हणून माझ्या सारख्या चुक लक्षात आणून देणार्‍या मिपाकरास घरी बोलावून पाणी पुरी खायला घालण्याचे आदेश जारी करावेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>घरी बोलावून मनसोक्त पाणी पुरी मनसोक्त हा शब्द राहिला असल्याचा नमुद करतो.

In reply to by नाना चेंगट

इथे अवांतर नको रे. आपण काय संपादक नाही, आणि सल्लागार तर त्याहून नाही. उगाच कडक शब्दात ताकिद वैग्रे मिळायची. बाकी पाककृतीचे फोटो अजून आले कसे नाहीत ? माझे निमंत्रणपत्र देखील आलेले नाहीये.

In reply to by नाना चेंगट

'मनोसोक्त' चे आमंत्रण मिळाले, आभारी आहोत. बाकी फोटो हवाच होता ह्याच्याशी सहमत. - (नान्या आणि पराचा मित्र)छोटा डॉन

अतिशय अनवट अशा पाकृ बद्दल कवतिक करावं तितकं कमीच !! तेवढं फोटु टाकायचं बघा पाकृचा.

आयत्या वेळी फटू काढण लक्षात आले नाही,तसा फाटू नाहीये सध्यातरी .. (नवीन आहे संभाळून घ्या आणी फटू कसा टाकायचा हे माहित नाही)

In reply to by स्मिता चौगुले

आयत्यावेळी खायचं बरं लक्षात राहिलं .. :-/ जाऊदे मी आज संध्याकाळी जाऊन खाउनच येते :-/ उगा माझी जिभ चाळवतात हे दुष्ट लोक :-/

In reply to by जेनी...

अगं इंड्यात आली असशील तर डायरेक्ट माझ्या घरी ये पाणीपुरी खायला. दारच्या बागेतल्या पुदिन्याची चटणी तयार आहे..

साहित्य: - १) गाडी २) गाडीत पुरेसं पेट्रोल ३) पुरेसे पैसे ४) वेळ कृती १) गाडीला किक मारुन गाडी स्टार्ट करावी २) सुसाट चौपाटीवर जावं ३)पैसे पाणीपुरीवालयाला द्यावेत... निवांतपणे पाणीपुरी खावी ४) शिस्तीत घरी यावे इतर सजावट ; सोबत गर्लफ्रेन्ड / बॉयफ्रेन्ड असल्यास फिरवु शकता आवडी प्रमाणे ;) शिवाय पैसे वाचण्याची ही शक्यता असते =))

In reply to by प्रसाद गोडबोले

साहित्य: - १) सुट्टी २) विमानटिकीटासाठी पुरेसे पैसे ४) लवकर टिकीट मिळावे म्हणून ईंटरनेट ५) कुटुंबासाठी भेटवस्तू ६) गाडी ७) गाडीत पुरेसं पेट्रोल ८) पुरेसे रुपये आता कृती कोणीतरी लिहा बाबा...

In reply to by केदार-मिसळपाव

क्रुती : पाणिपूरीच्या गाडीवर पोहोचल्यानंतर .. तिथल्या गर्दिकडं अधाश्यासारखी एक नजर टाकावी . मग पाणिपूरीवाल्या भैय्याच्या अगदि बाजुला जाउन उभं रहावं . मग तो एक छोटी इश्टीलची प्लेट एका गढुळ पाणि असलेल्या बादलित जी गाडीला खालच्या बाजुस टांगलेली असेल , त्यात जस्ट बुडवुन बाहेर काढेल मग त्यातलं पाणि नितळुन आपल्या हातात देइल . आपण तिच्याकडे बारीक लक्ष देवुन पहाण्याचा प्रयत्न अजिबात ... इथे हा शब्द महत्वाचा आहे .. तर अजिबात प्रयत्नहि करायचा नाहि .. उलट वरवर प्लेट कडे बघुन " अरे वा ! चला खंगळुन तरी दीली ! :) " असे स्वगत व्यक्त करुन समाधानाने पाणिपूरी खाण्यासाठी तयार असल्याची एक हावरट खुन पाणिपूरीवाल्याला करावी ... " एक प्लेट ... तिखा ... मिठा ... " आपल्या जिभेच्या चवि व घरच्या सोयी प्रमाणे :) जे काय असेल ते त्यास सांगावे ... तो मग एक सात नमस्ते करत टोटल सात आठ जनांच्या पूर्‍या बनवत असतो ... त्यामुळे आपण आपली प्लेट त्याच्या डोळ्याना दिसेल इतकि त्याच्याजवळ धरावी . मग तो एक पूरी घेइल तिच्यामध्यभागी त्याच्या अंगठ्याचं वाढलेलं नख घुसवेल (नखाकडे बघणं टाळा ) त्या पूरीला मध्यभागी गरजेपूरतं फोडुन त्यात तो गाडीवरचे सगळे जिन्नस .. सांडुन सांडुन भरेल .. मग ती पूरी एक कपडा बाण्धलेल्या माठात ज्यात हिरवंगार पाणि असेल त्यात त्याचा अर्धा हात बुडेल इतका बुडवुन मग हवं असेल तर मिठ्या ( गोड ) पाण्यातहि बुडवेल आणि अश्या प्रकारे सजलेली , भिजलेली , रसरसलेली पूरी आपल्या प्लेटात तो टाकेल ... मग आपण एक प्रेमळ नजर तिच्यावर टाकत .. तिच्यातलं पाणि प्लेटात येण्या आधी तिला अलगद , हळुवार उचलुन ... मोट्ठा " आ " वासुन तोंडात ठेउन द्यायची ...आणि ओठ गच्च दाबुन धरुन ( सोताचेच बर्का ) तिला आतल्या आत शांतपणे चावत रहायचं ... हि क्रुती दुसरी पाणिपूरी प्लेटात पडेपर्यंत सतत सातत्याने चालु ठेवायची .. नैतर संयम सुटुन " ए भैया , जल्दी जल्दी देव ना :-/ " असं वाक्य तोंडातनं नकळत जाण्याची दाट शक्यता असते .. म्हणुन ताँड बिज्जी ठीवाचं .... वॉव .... त्यासोबत चेहेर्‍यावर हावभावहि ठेवु शकता ... पूरीतल्या पाण्याचे हातावर कोपर्‍यापर्यण्त आलेले ओघळ झटकु शकता ... म्म्म्म्म्म्म तिखा हय ... मिठा पाणि और डालो ... अश्या सुचनाहि गरजेप्रमाणे करु शकता :)

In reply to by जेनी...

आता कसा बसल्या जागी पाणीपुरी खाण्याचा आनंद मिळाला...

पाणीपुरीचा फोटो एकहि नाहि पण पाकॄ धागा डबल झाला!

फोटू नाही. आता शिक्षा द्यायला हवी तुम्हाला. ;) आम्हाला पाणीपुरी खायला बोलवा, बाकी काही नको. फोटू टाकण्याची कृती पुढीलप्रमाणे. मिपावरील गणपा, वल्ली, किस्ना यांसारख्या संपादकांस पकडावे व फोटू चढवण्याची रीत समजावून घ्यावी. ;) मला ती कृती माहित असली तरी समजावून सांगण्याच्या बाबतीत बोंब आहे.