पाणी पुरी
अ) या आधीच्या पाकृमध्ये मी गोड चटणीची(खजूराची चटणी)कृती दिली आहे आता पुढील भाग
ब)पाणी - पुऱीचे तिखट पाणी
साहित्य: -
१) १ कप पुदिना
२) १/२ कप कोथिंबिर
३) १ इंच आले
४) ४-५ हिरव्या मिरच्या
५)चिंच ( आंबट चवीच्या आवडी प्रमाणे कमी -जास्त टाकू शकता) - मी साधारण १/४ कप टाकते -नॉर्मल चवीसाठी
६) जिरे पावडर १ चमचा
७) साधे मीठ / काळे मीठ चवीप्रमाणे (दोन्ही अर्धे-अर्धे टाकू शकता )
कृती:-
१) चिंच जवळपास ४०-४५ minutes पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे चिंचेचा कोळ चांगला निघेल
२) चिंचेचा कोळ काढून त्यात उरलेले सर्व साहित्य टाकून मिकसर मधून एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्या (साधे मीठ आणि काळे मीठ सगळ्यात शेवटी घालायचे आहे पाण्याच्या अंदाजाप्रमाणे, ते या पेस्टच्या साहित्यात टाकू नका)
३) पेस्ट काढून त्यात पाणी टाका आणि चव पहा या मिश्रणाची,तिखट वाटले तर अजून पाणी घालू शकता
४) आता पाण्याच्या अंदाजाने साधे मीठ आणि काळे मीठ समप्रमाणात टाका
५) झाले पाणी तयार- refrigerator मध्ये थंड करून घ्या.
मी हे तिखट पाणी बनवते तेंव्हा वरील साहित्यात साधारण १/२ लिटर पाणी टाकते.
पाणी पुरीचे तिखट पाणी जास्त झाले तर refrigerator मध्ये राहू शकते .. ३-४ दिवसांनी परत बनवा पाणी पुरी
क ) पुऱ्या
साहित्य: -
१) बारीक रवा १ कप
२) मैदा १/४ कप
३) चिमुटभर खायचा सोडा
४) साधे मीठ
कृती
१) वरील साहित्य एकत्र करून चांगले मऊसर मळून घ्या आणि २०-२५ minutes ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा
२) आता पुऱ्या लाटून घ्या. पुऱ्या पातळ लाटा फार जाड नको. (पुऱ्या ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा म्हणजे सगळ्या पुऱ्या लाटून होईपर्यंत आधीच्या पुऱ्या सुकणार नाहीत)
३) अर्ध्या पुऱ्या लाटल्यानंतर कढईत तेल तापत ठेवा.
४) तेल तापले की पुऱ्या चांगल्या लालसर तळून घ्या. पेपरवर काढून थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा म्हणजे मऊ पडणार नाहीत.
पाणी पुरीच्या पुऱ्या बाजारात मिळतात मी त्याच आणते कारण ह्या पुऱ्या घरी बनवन्यात वेळ खूप जातो(खूप पुऱ्या लागतात :) )...आणि सोड्याचे प्रमाण कमी जास्त झाले तर तेलही जास्त राहत पुऱ्यामध्ये.
ड) काही ठिकाणी पाणी पुरीमध्ये पिवळ्या वाटण्याचे सारण किंवा उकडलेल्या बटाट्याचे सारण देखील घालतात
आवडत असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता .
वाटण्याचे सारण - भिजवलेले पिवळे वाटाणे+ हळद + मीठ एकत्र करून चांगले शिजवायचे
बटाट्याचे सारण - उकडलेल्या बटाट्याचा लगदा+चाट मसाला+ काळे/साधे मीठ
इ) इतर सजावट (किंवा महत्वाच साहित्य)
१) तिखट/खारी बुंदी
२) बारीक शेव
३) बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबिर
आता पाणी पुरी प्लेट बनवायची
१) पुऱ्या फोडून त्यात आधी खजुराची चटणी,कांदा टाका (बटाट्याचे किंवा वाटण्याचे सारण असेल तर ते देखील)
२) तिखट पाण्यात बुंदी टाका आणि ते पाणी या पुऱ्यामध्ये भरा
३) वरून शेव कोथिंबिर टाकून सर्व्ह करा ..
गरज असेल तर वरून मीठ - तिखट फिरवू शकता आवडी प्रमाणे
:)
सौ. स्मिता चौगुले
वाचने
12130
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोनदा
+१
In reply to दोनदा by नाना चेंगट
>>>घरी बोलावून मनसोक्त पाणी
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद.
In reply to >>>घरी बोलावून मनसोक्त पाणी by नाना चेंगट
डान्रावांना बोलवावे काय ?
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
हम्म
In reply to डान्रावांना बोलवावे काय ? by नाना चेंगट
सहमत आहे.
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
आमंत्रण मिळाले, धन्यवाद ...
In reply to सहमत आहे. by नाना चेंगट
माझे निमंत्रण आहे चालेल का?
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
वाह वाह !
In reply to माझे निमंत्रण आहे चालेल का? by रश्मि दाते
दैव देते आणि कर्म नेते
In reply to डान्रावांना बोलवावे काय ? by नाना चेंगट
अतिशय अनवट !!
फोटो असता तर खुप छान झाले
आयत्या वेळी फटू काढण लक्षात
आयत्यावेळी खायचं बरं लक्षात
In reply to आयत्या वेळी फटू काढण लक्षात by स्मिता चौगुले
अगं इंड्यात आली असशील तर
In reply to आयत्यावेळी खायचं बरं लक्षात by जेनी...
अय्या खरच ?
In reply to अगं इंड्यात आली असशील तर by सस्नेह
आमची पाणीपुरीची पाककृती
भलताच महाग आहे तुमचा मार्ग आमच्यासाठी..
In reply to आमची पाणीपुरीची पाककृती by प्रसाद गोडबोले
क्रुती :
In reply to भलताच महाग आहे तुमचा मार्ग आमच्यासाठी.. by केदार-मिसळपाव
लै भारी...
In reply to क्रुती : by जेनी...
कमाल आहे....
फोटू नाही. आता शिक्षा द्यायला
पाककृती आहे..पण फोटू नै,,हे
स्मिता मावश्ये पाणीपुरीच्या
फोटो नसल्याने निषेध नोंदवत