Skip to main content

चुकवु नये असे चित्रपट - कॅसिनो

शनिवार, 09/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस ह्या सिनेमा बद्दल लिहायचे होते कारण oscar वगैरे मधे बाहुली न मिळाल्या मुळे भारतात तसा ह दुर्लक्षीत झालेला सिनेमा होता. कॅसिनो हा १९९५ सालचा सिनेमा, Martin Scorsese नी दिग्दर्शीत केलेला. हा दिग्दर्शक पण भारतात फारसा प्रसिद्ध नाही ( का ते कळत नाही ), पण आता त्याला जवळ्-जवळ Best Director of our time वगैरे नी गॉरवले जात आहे. मार्टीन ला ७ वेळेला ऑस्कर नोमिनेशन मिळाली पण एकदाच ऑस्कर मिळाले. त्याला AFI lifetime achievement award ही दिले. golden globe वगैरे बरीच मिळाली. त्याचे जुने सिनेमा कदाचीत माहिती नसतील, पण गेल्या दशकातील सिनेमा कदाचित भारतात जास्त माहिती असतील जसे Aviator, Departed आणी Hugho. पुन्हा कॅसिनो कडे वळुयात. ह्यात मार्टीन चा मित्र Robert de Nero, Sharon Stone आणि Joe Pesci आहेत. डी निरो आणि Joe Pesci ने मार्टीन बरोबर बरेच सिनेमा केले आहेत. ---------- थोडक्यात कथा.... हा सिनेमा सत्यकथे वर आधारीत आहे. कॅसिनो ही एक गेलेल्या काळाची गोष्ट आहे जी लास वेगास मधे घडते. सिनेमाची सुरुवात होते तो काळ म्हणजे वेगास जेन्व्हा Underworld Families नी चालवले जात होते तो. सिनेमा संपे पर्यंत काळ बदलतो आणि फॅमिलींना वेगास मधुन हाकलले जाते आणि कॅसिनो मोठ्या कंपन्या चालवायला घेतात. सिनेमाची मुख्य पात्र आहेत Sam "Ace" Rothstein ( एस रोथस्टाईन ) - डी निरो , Nicky Santoro - जो पाशी, जिंजर - शेरॉन स्टोन. सॅम हा "हात लावेल तिथे सोने" अश्या प्रकाराचा जुगारी आहे, म्हणुन त्याला एक फॅमिली वेगास ला टॅन्जीयर्स नावाचा एक मोठा कॅसिनो कम हॉटेल चालवायला पाठवते. त्याला मदत म्हणुन गरम डोक्याच्या निकी ला पाठवले जाते. निकी चे काम सॅम ला मदत लागली तर muscle power पुरवणे हे असते. सॅम ला टॅन्जीयर्स मधे जिंजर नावाची एक हुकर भेटते. जी पैश्यासाठी सॅम शी लग्न करते पण तिचा जीव तिच्या चरसी प्रियकरात गुंतलेला असतो. सॅम, जिंजर आणि निकी ह्यांचा समांतर रेषेवरुन प्रवास चालू होतो. तिघांच्या conficting interest मुळे त्यांच्या आयुष्यांचे काय होते ते दिड तासात दाखवले आहे. त्याला backdrop आहे तो फॅमिली आणि FBI मधल्या खेळाचा. मला गोष्ट सांगायला आवडत नाही त्यात सिनेमाची तर अजिबात नाही, त्यामुळे इतके बास., कशासाठी बघावा -- - प्रचंड Stylish ( मला मराठी शब्द सुचत नाहीये ) : सिनेमा आणि त्यातली पात्र कीती stylish होऊ शकतात ह्याचे उदाहरण आहे. - सिनेमाची गोष्ट उलगडते ती सॅम आणि निकी च्या निवेदनातुन जे सिनेमाभर चालू असते. त्यामुळे सिनेमात उगाचच कोण काय करतो असे सांगण्यासाठी संवाद नाहीयेत. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे जाते. लास वेगास पण एक पात्र बनुन येते ह्या सिनेमा मधे. - पटकथा ( Script ) तर सुरेख आहे, आणि मार्टीन स्टाईल चे सुंदर कॅमेराचे काम, मोठे शॉट्स, वेगास आणि त्याच्या आजुबाजुच्या वाळवंटाचे शॉट्स बघण्या सारखे आहेत. वेगास चा आकाशातुन घेतलेला शॉट्स मस्त च आहे. कथानकात नाट्यमयता असुन सुद्धा ते खरोखरीच जसे साधे सरळ घडले असतीत तसे दाखवले आहेत, त्यामुळे खोटी डायलॉग्बाजी नाही किंवा मागे नाट्यमयता निर्माण करण्यासाठी चे संगीत नाही. फॅमीलीच्या लोकांचे इटालियन पद्धतीने हातवारे करत बोलणे फार छान आहे. - संगीताचा वापर, रॉक आणि जॅज गाण्यांचा background ला मस्त वापर केला आहे. - Casting : कलाकारांचे ( अगदी छोट्या सुद्धा ) इतके परफेक्ट आहे की तुम्हाला ती सिनेमातली पात्र वाटतच नाहीत. मी १९९५ साली २१ वर्षांचा असताना राहुल ला बघितला होता, तो पर्यंत हिंदी आणि नेहमीचे गाजलेले english सिनेमा पण बरेच बघितले होते, पण हा बघितल्या वर मी एकदम फ्लॅट च झालो. सलग ३ दिवस हा सिनेमा बघितल्यावर बरे वाटले. सिनेमा असाही असु शकतो हे कॅसिनो नी मला सांगितले, त्यामुळे ह्या सिनेमाची माझ्या मनात वेगळीच जागा आहे. मार्टीन ची ओळख पण ह्याच सिनेमानी मला करुन दिली. त्याकाळी आंतरजाल वगैरे नसल्यामुळे जास्त माहिती काढणे शक्य नव्हते. नंतर मात्र संधी मिळाल्यावर त्याचे बरेसचे सिनेमा बघुन घेतली. हा सिनेमा बघणार असाल तर शक्यतो मोठ्या टीवी वर बघा, पीसी वर नका बघु, ती मजा येणार नाही. आवडला तर सांगा. मार्टीन च्या Goodfellas बद्दल पण लिहायचे आहे, पण नंतर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5098
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

हे पिक्चर पुण्यात मिळतात कुठे हे कुणी सांगेल काय? बरेच क्लासिक पिक्चर बघायचे आहेत पण मिळतात कुठे तेच माहीत नाही. आंतर्जालावर बनावट लिंक्सच जास्त.

In reply to by काळा पहाड

हिन्दि मध्ये... १ http://www.torrentreactor.net/torrents/5143888/Casino-1995-BRRip-720p-x… २. http://thepiratebay.se/torrent/6369463 इंग्लिश मध्ये.. १. http://www.torrentreactor.net/torrents/1183025/Casino-1995-Eng-Dvdrip-f… आणि इंग्लिश सब टायटल्स सकट.. १. http://kat.ph/casino-1995-ws-xvid-multisub-wunseedee-t2707932.html

In reply to by काळा पहाड

पुण्यात बर्‍याच ठिकाणी डीव्हीडी रेंटल्स सेंटर्स दिसली. कोथरूड मधे शिवाजी पुतळ्याजवळच्या गल्लीत एक आहे, त्याच्याकडे बरेच इंग्रजी चित्रपट आहेत.

धन्यवाद प्रसाद एका चांगला चित्रपट सांगितल्यबद्दल... त्याच काळात आलेला (१९९४ मध्ये) "पल्प फिक्शन" हा जॉन ट्रॅव्होल्टा आणि सॅम्युएल्स जॅकसन चा असाच भन्नाट पिक्चर नुकताच बघितला. त्याच टेंपोमध्ये हासुद्धा बघेन... :)

In reply to by नानबा

मस्त चित्रपट..! इथे वाचल्यावर जाउन पाहिला लगेच. लाम्बलचक आहे पण कुठे थांबलाय असे नाही वाटत. खरेतर जोई पेस्कीचे काम बघून 'गुड फेला' ची आठवण झाली. अतिशय साम्य जाणवलं.

एक point blank नावाचा पण सिनेमा आहे जुना ७० च्या आसपास चा. Lee Mervin आहे. Film Noir Genre च्या सुरुवातीच्या काळातला आहे.

माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक. ह्या सिनेमात इतकं नाट्य, इतक्या फॅक्ट ऑफ द मॅटर पद्धतीने मांडलेलं आहे की ते कुठेही घडवून आणल्यासारखं वाटत नाही. एकही सिन घुसवल्यासारखा वाटत नाही. १ शॅरन स्टोनच्या 'अभिनयासाठी' बघावा असा सिनेमा. ह्या सिनेमासाठी शॅरन स्टोनला ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते. २ सिन १. Nicky Santoro एका माणसाला टेबलवर झोपवून त्याचे डोके एका लाकडी ट्रॅपमधे चेपतो. सिन २ Nicky Santoro आणि त्याच्या भावाला सिनेमाच्या शेवटी बेसबॉल बॅट ने ठोकून ठोकून मारतात आणि अर्धमेल्या अवस्थेतच गाडतात. हे दोन सिन सिनेमाच्या इतिहासातल्या सगळ्यात डिस्टर्बींग सिन्स पैकी मानले जातात.

हा चित्रपत काही दिवसांपूर्वीच केबलवर लागला होता. भारी वाटला. तरी शेवटापर्यंत पाहिलाच नाही. अवांतर:
मी १९९५ साली २१ वर्षांचा असताना
आपल्या आयडीमधले १९७१ नेमके काय दर्शविते? उत्तर देणे पूर्णपणे ऐच्छिक बरं का...

In reply to by श्रीरंग_जोशी

अत्रुप्त आत्म्यासारखे भटकत होते ते,(१९७१)मागच्या जन्माच आठवल असणार काही.