ह्या वेळेला थोडक्यात GoodFellas ह्या सिनेमा बद्दल. हा सिनेमा १९९० चा, "WiseGuys" ह्या सत्यकथेवरच्या पुस्तकावरचा सिनेमा. ही गोष्ट आहे Henry Hill नावाच्या एका Gangster ची. हा काही अगदी एखाद्या फॅमिलि मधला पण नाही आणि अगदी खालच्या स्तरातला पण नाही. हेन्री हिल च्या खर्याखुर्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे.
हेन्री हिल हा न्युयॉर्क मधल्या मध्यम्वर्गीय घरातला मुलगा, वडिल आयरिश आणि आई सिसिलिअन. लहानपणापासुनच ह्याला गँग्स्टर होयचे असते. सिनेमाची सुरवातच एकदम कॅची आहे. १९७० साली, एकाला गाडीच्या डिकी मधे घालुन पुरण्यासाठी नेत असतात, त्या शॉट च्या शेवटी कॅमेरा हेन्री हिल वर झूम होतो आणि फ्रीझ होतो आणि मागे naration सुरु होते. "As far back as I can remember, I always wanted to be a gangster,"
ह्या सिनेमाची ३ मुख्य पात्र म्हणजे हेन्री ( Ray Liotta ), जिमी कॉनवे ( Robert De Niro ) आणि टॉमी ( Joe Pesci ). सिनेमाची कथा पुढे सरकते ती हेन्री च्या आणि त्याच्या बायकोच्या ( कॅरन ) च्या निवेदनातुन. सुरुवात मी वर सांगीतल्या प्रमाणे १९७० मधे होते आणि मग flashback मधे १९५५ मधे नेले जाते जेंव्हा हेन्री शाळकरी मुलगा असतो. ह्या मुलाला फक्त त्याच्या भाषेत somebody बनायचे असते , बाकी सगळे लोक त्याच्या साठी nobody असतात.
थोड्या महिन्यांनी त्याला इथेच एकदम stylish जिमी "The Gent" भेटतो. जीमीचा मुख्य व्यवसाय ट्र्क्स ना लुटुन त्यातला माल स्वस्तात विकुन पैसे मिळवणे हा असतो. त्यानी कुठल्या ट्र्क मधे किमती माल आहे हे सांगण्यासाठी ड्रायवर पण पटवलेले असतात. हेन्री जिमी चा मदतनीस बनतो, तिथेच त्याला टॉमी पण भेटतो. टॉमी हा अत्यंत गरम डोक्याचा, माथेफिरु आणि हिंसक असतो ( कॅसिनो मधे पण जो पाशी ला असाच रोल होता ).
पुढे हे तिघे बर्याच चोर्या करतात, त्यातला फॅमिलीचा वाटा फॅमिलीला देतात पाउली ( Paulie ) च्या मार्फत.
पुढे पाउली, जिमी आणि हेन्री ला तुरुंगवास होतो, तेन्व्हा घरचे ( तो पर्यंत त्याने लग्न केलेले असते ) खर्च भागवण्यासाठी, तो तुरुंगातुन ड्रग्स चा धंदा करु लागतो. हे सर्व पाउली ला न सांगता.
तुरुंगातुन बाहेर आल्यावर पण त्यांच्या चोर्या चालुच असतात, हेंरी चा ड्रग चा धंदा पण चालू असतो. हेन्री च्या महिती वर जिमी एक मोठ हात मारतो ( Lufthansa heist ). पण जिमीचे साथीदार हे पैसे बघुन बहकतात आणि जिमी नी सांगुन सुद्धा उधळपट्टी करायला लागतात. हे जिमी ला पसंत नसते आणि हळु हळु सर्व साथीदारांचे खुन होतात. हेन्री ला पण जिमीची भीती वाटायला लागते. मधल्या काळात टॉमीनी एका "मेड मॅन" ( made man ) चा खुन केलेला असतो, त्याचेच प्रेत पुरायला नेण्याचा शॉट सिनेमाची सुरुवात आहे. Made Man म्हणजे फॅमिली चा माणुस. फक्त रक्तानी १००% सिसिलियन माणुसच made man होऊ शकतो. अश्या माणसाला कोणी हात लाउ शकत नाही. त्यामुळे टॉमी ला सुद्धा मारले जाते.
त्यातच हेन्री ड्रग्स च्या मुळे पकडला जातो आणि त्याची बायको सर्व ड्रग नष्ट करते. त्यामुळे हेन्री कफल्लक होतो. पाऊली ला हेन्री चे ड्रग्स विकणे पसंत नसते त्यामुळे तो त्याला हाकलवुन देतो. एका बाजुला जिमी कडुन जीवाला भीती आणि कफ्फलक असणे ह्यामुळे तो FBI च्या witness protection programme मधे जातो. जिमी, पाऊली विरुद्ध साक्ष देतो. हेन्री मुळे ५० लोक तुरुंगात जातात. हेन्री चे नाव बदलुन तो दुसरी कडे रहायला जातो, पण he is always missing his life as gangster.
कशा साठी बघावा
- stylish चित्रपट. चांगला वेग, खरी गोष्ट. सुंदर Story telling
- खराखुरा वाटावा असा अभिनय. जो पाशी ला ऑस्कर मिळाले.
- उत्तम screenplay.
- पुस्तकावरुन केला आहे, त्यामुळे मोठ्या पुस्तकातुन सिनेमा साठी काय निवडायचे ही मोठी कला आहे.
- मोठे शॉट्स, आणि फिरते कॅमेरा चे काम. त्या त्या काळातील रॉक संगीताचा उपयोग.
Martin Scorsese ने १२ वेळेला पटकथा लिहिली पुस्तकाच्या लेखका बरोबर.
ह्या तिन्ही अभिनेत्यांनी खर्या हेन्री हिल बरोबर फोनवरुन ( कारण प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते ) चर्चा करुन प्रत्येक पात्राची style समजुन घेतली. FBI च्या टेप ऐकुन कसे बोलतात ते समजुन घेतले. काही काही संवादांसाठी नटांना फक्त सीन सांगुन त्यांना जसे वाटेल तसे बोलायला सांगीतले. आणि त्यावरुन ते संवाद तयार केले.
जरी ऑस्कर मिळाले नाही तरी GoodFellas एक कल्ट म्हणुन मान्य झाला. crime genre मधली हा बेस्ट सिनेमा मानला जातो.
"No finer film has ever been made about organized crime - not even The Godfather."
This film is deemed "culturally significant" and selected for preservation in the National Film Registry by the United States Library of Congress.
वाचने
3369
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिक्शन वाचुन वाट्तय पिच्र्र
कठिण आहे.
बहुदा..
तुमच्या कडे असुन तुम्ही अजुन
In reply to बहुदा.. by मुक्त विहारि
हा चित्रपट मी १९९१ साली