Skip to main content

प्रत्येक श्वास माझा

लेखक श्रिया यांनी सोमवार, 11/02/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सखा माझा गं सावळा रूप भुलवी मनाला गाणी त्याची माझ्या गळां जीव तयाठायीच गुंतला. आभाळाचा रंग निळा भासे त्याचीच गं तनू भाळी केशरी तो टिळा हा उगवता सूर्य जणू. पाखरांची किलबिलाट मंद धुंद गं हि हवा येई जागवाया मला संगे नादमधूर तो पावा. मी माझेपण अर्पिले हृदयसख्याच्या चरणी लाभला जिवाला विसावा त्याच्या पावन शरणी. होऊ कशी मी उतराई सार्थ केले या जीवना हा प्रत्येक श्वास माझा त्याच्याकडून उसना....
लेखनविषय:

वाचने 1982
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

क्या बात है!!
होऊ कशी मी उतराई सार्थ केले या जीवना हा प्रत्येक श्वास माझा त्याच्याकडून उसना
सुंदर रचना.