Skip to main content

घरपण

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 10/02/2013 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
घर चार कुडाच्या भिंती घरपण अमृत रसना नाती आकाश निळे झरणार्‍या चांदण राती ओंजळी भरूनी स्वातीचे मोती स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती आवेग कळांचे लाटेवर देहाच्या रुधिरातिल माया ममता लय ओघवती शरिरापलिकडले गोत सवे सांगाती दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती घरपण पण असते रेष रसिक रसरसती ....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1352
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

भिंती नाती राती मोती भरती ज्योती ओघवती सांगाती अनुप्रीती व्याप्ती रसरसती... हे शब्द शेवट प्रत्येक ओळिला शेवटी मस्त लागल्याने वाचनात एक वेगळिच मौज निर्माण झालिय.

सुरेख कविता. " घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती " आणि " घरपण पण असते रेष रसिक रसरसती" असते म्हणूनच, "घर चार कुडाच्या भिंती" कदाचित नसले तरीही फरक पडत नसावा असे कविला म्हणावयाचे आहे काय असा प्रश्न पडला.