कृष्ण - १
कधी कधी वाटते......
कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे......
पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्या कदंब वृक्षाखाली..........
सुंदर मोरपिसांच्या........
मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली.....
उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी....
म्हणजे मग.....
द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना.......
साध्या सुती साडीच्या दोन हात.....
तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही.......
कृष्ण - २
पण मग नंतर वाटते......
राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे.........
कृष्णाच्या निळाईने भरलेल्या सहवासाची..........
स्मरणे आयुष्यभर वाहण्यापेक्षा.....
कधीतरी मी त्या गिरिधराला अर्पण होईन ही भावना.......
नाही.... ही "आशा" जास्त सुखदायी आहे.....
कृष्ण - ३
कधी कधी असही वाटते......
कृष्ण होण्यापेक्षाही अर्जुन व्हावे........
बृहन्नडा होऊन एखाद वर्ष नाचावे लागेल......
परंतु.........
घनघोर रणसंगर चालू असतांना........
काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन.......
नुसते बसून तर राहावे नाही लागणार........
कृष्ण - ४
कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही......
अहो,
अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्या......
सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते.......
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१५/०४/२०११)
वाचने
5936
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहिलि आहे... आवडली
आहो मि.का : तुम्हला साष्टांग
अव्वल नंबर..
छान!
>>त्यापेक्षा "घनघोर रणसंगर
In reply to छान! by नगरीनिरंजन
खरच मनापासून दाद, छान लिहील
अस्सल......
छान
मस्तच भाग १ खुपच आवडला .. भाग
छान .
मिका, जरी तुमचे त्याकाळातले
फार आवडले मुक्तक!
सुंदर....
छान.
चांगले आहे. कविते पेक्षा
पु का स्फू शु
मीरा, राधा
कळले नाही??
In reply to मीरा, राधा by डॉ अशोक कुलकर्णी
कदाचित, तुमच्या सुंदर काव्या
In reply to कळले नाही?? by मिसळलेला काव्यप्रेमी
सारेच शापित! एकमेकाच्या
अप्रतिम
+१०००० शब्दच नाहीत..
In reply to अप्रतिम by अभ्या..
कल्पना आवडली..!
सुंदर
सुंदर प्रस्तुति.
मस्त
चवथा भाग वाचला आणि डोळ्यात
छान !
४
जुळ्यातले एकटेच उरलेले ..
In reply to ४ by कवितानागेश
एक काव्य म्हणून मस्तच!