Skip to main content

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे? गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically . म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते . सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती . आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान असो.... बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???

वाचने 99280
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

वयात चार इंचापेक्षा कमी अंतर कसे ठेवता येईल? मला वाटते 'प्रकाशवर्षे' प्रमाणे वय देखील अंतराचे एकक आहे असा तुमचा गैरसमज झाला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रतिसाद पुन्हा एकदा शांतपणे वाचला आणि लग्नही झाले आहे मात्र अर्थ काही कळत नाही. 'नवरा बायकोच्या वयात चार इंचापेक्षा कमी अंतर हवे' या वाक्यात काहीतरी फॉलसी आहे. एस-आय मापनांमध्ये इंच हे वय मोजण्याचे नवे एकक म्हणून अंतर्भूत केले आहे काय?

In reply to by संजय क्षीरसागर

'नवरा बायकोत किती अंतर असावे?' असा प्रश्न नसून 'नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे' असा प्रश्न आहे. उगाच ओढून ताणून जोक करायचा प्रयत्न का करताय !!

In reply to by प्रसाद गोडबोले

शिरेस लोकांना नाय कळणार भवतेक.

In reply to by संजय क्षीरसागर

कसे काय आयत्या वेळेचे जास्तीवाल्यांनी काय कराव ह्याच्यावर काही उपाय आहे तुमच्या कडे, जास्तीवाल्यांना तळाचा ठाक लागतो एव्हढे खरे.

In reply to by संजय क्षीरसागर

बर तुम्हाला साडेचार ,पाच वाल्यांबद्दल ही माहीत असेलच की(त्यांनी काय कराव)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

बाल मिपाकरांच्या मनावर विपरित परिणाम होतात की हो...

In reply to by बाबा पाटील

आताचे वय वर्ष १० वाले सुद्धा बालमनवाले नाहीयेत.

In reply to by संजय क्षीरसागर

खरं आहे संक्षी. असे काही प्रश्न झोपण्या पूर्वी पडतात तर काही उठल्यानंतर उभे रहातात. (एक तपापासून)अनुभवी.

In reply to by संजय क्षीरसागर

मला या प्रतिसादावर लय काहीबाही लिहायचे होते पण "आफ्रिकन" लोकांचा मान ठेवुन इथेच थांबतो... असो, चालु द्या...

बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???
हे ती झीनत अमान जाणे आणि तिचा नवरा जाणे. आपल्याला कोण विचारायला आले आहे आणि त्यांच्यात अगदी १०० वर्षांचे अंतर असले तरी आपल्याला करायचे तरी काय आहे? ता.क--- अकु नेहमीप्रमाणे धागा टाकून पलायन करणार का?

,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम
उगाच काहीबाही वदंता पसरवू नयेत असे नम्रपणे सुचवू इच्छिते. अजून एक मुद्दा- वय ही वृत्ती असते आकडा नाही.

In reply to by शुचि

आणि पुरुषाची बुद्धी कधी १२ वर्षा पेक्षा वाढत च नाही. तुम्हाला काय करायचे आहे हो कोणी कोणाशी लग्न केले आणि नवरा बायको च्या वयात कीती अंतर आहे ते? तुमचे लग्न करताना तुम्हाला पाहिजे तेव्हडे अंतर ठेवा

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पुरुषाची बुद्धी कधी १२ वर्षा पेक्षा वाढत च नाही ह्याचा पुरावा पाहिजे असेल तर कुंभमेळ्याचा लेख बघा. कदचित १२ वर्ष सुद्धा जास्त वाटतील तुम्हाला

In reply to by अनुराधा१९८०

म्हणजे स्त्रियांबद्दल 'शारिरीक' काही कमेंट आली की पुरुषांची 'बुद्धी' काढायची. कुठं गेले स्त्रिमुक्तीवाले आता?

एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम
माझ्या आईकडच्या आज्जीला ८ मुले. म्हणजे जर लग्नाच्या वेळी तिचं वय जर २० असेल आणि आजोबांचं वय जर ३० असेल, तर शेवटच्या मुला नंतर आजोबांचं वय ४०-४५ असेल तर तिचं वय ३०+(६*८) = ७८ ते ८३ असेल. अवघड आहे.

In reply to by काळा पहाड

माझ्या आजीला ११ मुले. आणि आता वय वर्षे ८०. या न्यायाने तिचे वय १४६ हवे.

In reply to by काळा पहाड

ओ काळा काका आज्जीच्या जमान्यात लग्न लवकर व्हायची . २० वर्षापर्यंत कुणी वाट पाहात असेल असं वाटत नाहि ... १२ /१३ वर्षात लग्न व्यायची तेव्हा .. तरि त्यातल्या त्यात आज्जी लग्नाच्या वेळी १६ वर्षे पकडुन चालु ... ह्म्म आता नरा हिशेब .

In reply to by जेनी...

तसं नाही पूजाक्का, मी फक्त उदाहरण घेतलं. आज्जीचं लग्न किती वयात झालं हे मला ठाऊक नाही. आणि बहुधा तिला ही ठाऊक नसावं. सध्या ती हयात नसल्याने तिला विचारायची सोयही नाही. बाकी एवढा मिनतवारीने केलेला हिशेब तू वाया घालवलास. गणितात भोपळा मिळायचा मला.

रोजचा रतिब . आवरा यांना तसहि स्वताहाचं मत द्यायची त्यांच्याकडे पद्धतच नैये ... असो ... चालुद्या .

In reply to by चिगो

अश्लील काय यात? पुरुषनामधारी आयडीची छाती अभिमानाने किती वाढेल असं विचारण्यात काय अश्लील? मावळ्यांनी छाती पुढे करून चालण्याची वर्णनं इतिहास म्हणून शिकवतात त्यांना अश्लील म्हणा हवंतर.

बॅट्या अस्ले प्रतिसाद देऊनच त्यांचा टीआरपी वाढवायचा तुझा गुप्त बेत कळला आहे. ;)

In reply to by बॅटमॅन

आता ह्याच्यापुढं प्रतिसाद देत बसणार्‍यालाच त्या द्याव्यात असं मला लै वाटून राह्यलय. ;) मालक पेट्रोल संपलेली गाडी सोडून निघून जातोय, आपण नेतोय ढकलत. :(

In reply to by अभ्या..

+१ टू अभ्या.. काय महान विषयावरनं धागे काढतो हा माणूस,http://www.sherv.net/cm/emo/angry/cursing.gifखरच हद्द झाली. हे असच ओढत न्या आणी........... http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw024.gif

केवळ एक नवरा आणि एक बायको अशी जोडीच अपेक्षित आहे काय? एकापेक्षा अधिक बायका (किंवा नवरे) असतील तर वयाचे अंतर कसे मोजायचे? उदा. द्रौपदी आणि पांडव यांच्या वयातील अंतर मोजायचे असल्यास पांडवांच्या वयाची सरासरी काढावी लागेल. ती सरासरी कोणत्या पद्धतीने काढावी, म्हणजे उत्तर अधिक शास्त्रशुद्ध येईल? मीन, मिडियन की मोड (नकुल आणि सहदेव हे जुळे होते हे ध्यान्यात घ्या!) अगदी असेच कृष्ण आणि त्याच्या सोळा हजार पत्नींबाबत करावे लागेल. धागा मोठा विचारप्रवर्तक आहे ;)

In reply to by ५० फक्त

कोण कुणाचा नवरा आणि कोण कुणाची बायको
हा प्रश्न धागाकर्त्याच्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा आहे असं वाटतं :P

हा प्रश्न एकाच घरात रहाणार्‍या नवरा बायको च्या वयातील अंतरावर आहे असे उदाहरणावरून दिसते . तसे नसेल तर ० ते इनफिनैटी काही अंतर चालेल ब्वॉ !

आजच्या दोन तीन पिढ्या ( साठ-सत्तर वर्षा) आधी मुलगी १३-१४ वर्षाची झाली म्हणजे उपवर झाली असे मानत आणि लग्ना नंतर तिने घर संभाळणे व मुलांना वाढवणे या पलीकडे तिच्याकडून अपेक्षा नसे. या उलट मुलाच्या बाबतीत त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अथवा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत साधारणपणे वीस वर्षाचा होत असावा. त्यामुळे दोघातील अंतर सहा वर्षाच्या आसपास असण्याचा प्रघात पडला असावा. बीजवर प्रथेत तर अंतर कितीही चालत असे. सध्या झी मराठीवर चालू असलेल्या ' राधा हि बावरी' या मालिकेत नायिका २८ वर्षाची आणि नायक २४ वर्षाचा असे दाखविले आहे. संजय क्षीरसागर यांना अंतर उंचीतले म्हणायचे आहे कि वयातले ?

मला वाटत की चेश्टा खुप झाली. आपल्याला या विषया बद्द्ल काही अधिक माहीती असेल तर त्या बद्द्ल लिहिणे अपेक्षित आहे. जस की जर कोणाला माहीती असेल की वयातल्या अन्तराचा काय परिणाम होतो मानसशास्त्र,शरीरशास्त्र,आपण ज्या समाजात राहतो त्याच्या चौकटी,म्हजे सामाजीकशास्त्र द्रुश्टीने सुद्दा काय असायला पाहीजे. सध्याची मानसिकता व त्याचे भविष्यातील परिणाम,बदलती जीवनपधती त्याचा परिणाम. अस काही माहित असेल तर क्रुपया लिहा. ता.क. मला कोणाला दुखवायचे नाहीये फक्त अधिक माहिती येत राहावी हीच अपेक्षा. (वरील प्रतिक्रिया पण चिन्च घालून होत्या म्हणून मजा आली ;))

कालचा पोळ्यांचा काकु अगदीच "हा" असला तरी आजचा विषय ( महान धागाकार्त्याचा उद्देश नाही ) थोडा चर्चात्मक दिसतो आहे. ऑक्सिटोसिन आणि टेस्टेस्टेरॉन हया हॉर्मोन्स चे स्री पुरुषांमधील वायासंदर्भात महत्व लक्षात घेता , सर्वसाधारणपणे विवाहासाठी २-५ वर्षे अंतर योग्य आहे. पण त्या साठी विवाहाचे वय २२ - २९ हे आहे हे गृहीत धरलेले आहे. सैफ अली खान आणि झीनत अमान यांचा विवाह हा "कंपॅनियनशिप " साठी आहे , (प्रजोत्पादना+कंपॅनियनशिपसाठी नाही) त्यामुळे वयातील अन्तर किती असावे हा काकु सर्वार्थाने गैर लागू आहे. .

In reply to by तर्री

"सैफ अली खान आणि झीनत अमान यांचा विवाह हा "कंपॅनियनशिप " साठी आहे , (प्रजोत्पादना+कंपॅनियनशिपसाठी नाही)" असं म्हणताय.. बरं.. बघायला हवं मग..

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
१) हे तुम्हाला नक्की कशाला जाणून घ्यायचे आहे ? २) सध्या तुमचे वय काय अहे ? ३) तुम्ही अभिनेता किंवा गेला बाजार बिझनेसमन आहात काय ? ४) 'एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम' = ओक्के ! आणि नवरा लहान होतो, का मोठा होतो ? साधारण किती वर्षाने ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

४) 'एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम' = ओक्के ! आणि नवरा लहान होतो, का मोठा होतो ? साधारण किती वर्षाने ?
नवर्याची बुद्धी कणाकणाने लहान होते दर दिवशी. दुसरे मूल झाले की त्याची बुद्धी (आणि उपयुक्तता) संपते.

देतात. त्यांना मनात विचार आला की धागा टाकण्यात इंटरेस्ट आहे. चर्चा, प्रश्नोत्तर यात काही स्वारस्य नाही. ते पुन्हा पोस्टवर येत सुद्धा नाहीत. हे एकदा लक्षात आलं की संपलं!

In reply to by संजय क्षीरसागर

नवपरीणीत असल की उत्साह आणी कॅपेसीटी गणव असते बाकी असल्या वाक्याबद्दल जाहीर णीषेध

एक मूल झाल्यावर बाई ६ वर्षांनी लहान होत असेल तर विवाहोत्सुक तरुण तरुणींना लग्नाआधी एकत्र बसावे (फक्त बसावे म्हणतो आहे मी. आणि ते सुद्धा कॉफी, चहा, नीरा अशी कमी उत्तेजक द्रव्ये पीत) आणि चर्चा सुरु करावी" तुला किती हवीत?" "मला ३ हवीत " " मला ४ हवीत" "मला नकोच वगैरे. ( आकडे लग्नानंतर व्हायच्या मुलांचे आहेत). मग जर समजा १८ हा आकडा फायनल ठरला तर १८ वर्षांचे अंतर असायला हरकत नसावी. प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीनुसार अजुन काही वर्षांचे अंतर ठेवावे.

In reply to by मृत्युन्जय

वरील प्रतिसादात ३ हा आकडा फायनल ठरला तर असे वाचावे.. १८ हा आकडा फायनल ठरला तर पाळण्यातल्या किंवा गर्भातल्या मुलीशी लग्न केले तर चालेल काय हे कायदेतज्ञांना विचारुन घ्यावे. गरज पडल्यास सरकारला कायदा बदलण्यासही सुचवता येइल.

अकु, पुढच्या काळात पुरुष आणि स्त्री यांचा नवरा-बायको म्हणून रोल राहील की नाही, याची लोकांना काळजी लागून राहिलीय आणि तुम्ही कुठं वय, उंची, अंतराचा विचार करताय? :)

नेमकं किती अंतर असावं हे माहीत नाही पण ते अंतर "हळवे","सुंदर" आणि "शहाणे" अशा प्रकारच्या गुणांनी युक्त असावे असा दृष्टांत खालील रचनेतून मिळतो: कितीक हळवे कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी माझ्यानंतर. अर्थात पतीपत्नी, म्हणजे लग्न झालेल्या व्यक्ती असल्याने त्यांच्याबाबत हे तीनही गुण त्या अंतराला एनीमोअर लागू होतात का ते सांगणं कठीण आहे. पण धागाकर्त्याने लग्नाच्या वेळी काय अंतर असावं, म्हणजेच लग्नापूर्वीचा काळ अपेक्षून प्रश्न विचारलेला असल्याने सांगितलेलं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

ओह... मला ही लग्नापूर्वीच्या "शहाण्या" अंतराविषयी आहे असं वाटलं होतं. अपडेटबद्दल थँक्यू...

पब्लिकला ज्योक समजायला इतका वेळ लागल्यामुळे त्यांचा अनुभव कमी पडतोय का असा प्रश्न पडला होता.
हॅ हॅ.. तलवार, बंदूक, पिस्तुल आदि शस्त्रसाठा आठवला का :गवि
माणूस स्फोटक वाटत नाही, तस्मात भीती नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

:) मूळ मालिकेतून हा प्रतिसाद बाहेर घेऊन प्रतिसादांना "नळकांड्या" रोगापासून वाचवल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by संजय क्षीरसागर

पब्लिकला ज्योक अन तुम्हाला विषय समजायला इतका वेळ लागल्यामुळे त्यांचा अनुभव कमी पडतोय असंच कसं काय म्हणता येइल हो ?

In reply to by अग्निकोल्हा

कदाचित तुम्ही प्रतिसाद शांतपणे वाचला नसेल किंवा तुमचे लग्न झाले नसेल. अशी असल्यास काही विनोद कळत नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

लग्न झाले नसल्यास संजु भाउंचे "काही" विनोद लोकांना कळत नाहीत असं का असतं ?

In reply to by अग्निकोल्हा

या धाग्यातिल प्रतिसाद वाचुन इतकच म्हणायचं आहे कि तुमचा विनोद लोकांना कळला नसेल तर फक्त लोक समजुन घ्यायला चुकत आहेत असं न्हवे तर कदाचित तुमचं विनोदाचं टायमिंगही चुकलं असेल हि शक्यता प्रांजळपणे आपण का विचारात घेतली नाहीत ? एखाद्यावर त्याच्या चक्क विनोदावर स्पष्टिकरण द्यायची वेळ यावी म्हणजे जरा... :(

In reply to by संजय क्षीरसागर

नैयो संजय काका बाबा काका स्फोटक नैचेत ... फक्त त्यांच्याकडे एक चार वर्षे वयाचं .. जेमतेम अंदाजे अडीच ते तीन फूट उंचीचं एक क्षेपणास्त्र आहे ... ते सोडतिल तुमच्यावर ;) " बचके तु रेना रे , बचके तु रेना .. नहि दुजा मौका मिलेगा संभलना " =))

In reply to by संजय क्षीरसागर

माणस वाचवन्याचा आमचा धंदा,हा काही साइड बिजनेस आहेत पन जीव वाचवन खरा पोटपाण्याचा उद्योग्,सगळी स्पोटके एका इच्छाभेदीने आमच्याकडे रिकामी होतात कारण शेवटी बंदुकीच्या गोळीपेक्षा जुलाबाची गोळी जास्त खतरनाक आणी परिणामकारक असते.

In reply to by बाबा पाटील

शेवटी बंदुकीच्या गोळीपेक्षा जुलाबाची गोळी जास्त खतरनाक आणी परिणामकारक असते.
अतिशय जुलाबी आपलं प्रवाही विचार!!!! =)) =))

http://online2.esakal.com/esakal/20130206/5661294992875820736.htm झीनत अमान ह्यांनी मी पुन्हा लग्न करतेय ह्या बातमीत दम नस्ल्याचे सांगीतले आहे.त्या म्हणाल्या मिपा वर माझ्या नावाने लेख लिहीला आहे तो तद्दन खोडसाळ पणा आहे. बाकी अकु बहुत पहुची हुइ शक्सीयत लगती है.

आमच्या (वैयक्तिक) मते हा खुपच वैयक्तिक प्रश्न आहे .... ज्याचे त्याने (जिचे तिने ) ठरवावे . ( खूप जास्त ( २०-३० वर्षे वगैरे) असेल तर मज्जा येईल ;) असा एक खट्याळ विचार मनात डोकावुन गेला..."बघुया" )

In reply to by बॅटमॅन

आमाच्या अल्प ज्ञाना नुसार लग्नाच्या वेळेला मुलगी १८+ वर्षाची असावी आणि २१ = मुलाचे वय = इन्फिनिटी किम्वा मुलगा २१+ वर्षाचा असावा आणि १८ = मुलीचे वय = इन्फिनिटी अर्थात मुलगा मुलगा , मुलगी मुलगी , वगैरे वगैरे बाबतीत संविधानानुसार वयाची अट लादता येणार नाही असे केन्द्रीय गृहमंत्रालयाचे मत आहे ;) =))

In reply to by प्रसाद गोडबोले

मिपाने , गणितीय चिन्हे डीलीटली ... :( आमाच्या अल्प ज्ञाना नुसार संविधानाच्यामते लग्नाच्या वेळेला मुलगी १८+ वर्षाची असावी आणि मुलगा२१+ असावा , बाकी काही अती नाहीयेत ...किती का फरक असेना वयात

{स्वशच मोड} अकु यांनी वयाबद्दल प्रश्न विचारला आहे; कोणते वय ते स्पष्ट केलेले नाही (जसे शारिरीक, बौद्धिक इ. इ.){/स्वशच मोड}

संपादक मंडळाला विनंती आहे की मिपावर ,म्हातारचळ' नांवाचीही एक कॅटेगरी करावी आणि त्यातील शीर्षके नवीन लेखन या टिचकीवर दिसू नयेत. म्हणजे ज्या बालमनांना परिणाम करुन घ्यायचा आहे तेच फक्त वाचतील.

In reply to by आदूबाळ

मिपाचे काथ्थ्यायन आहेत ते, हा सगळा डेटा गोळा करुन कूटसूत्र लिहीत बसले असतील. लिहीता लिहीता शंका आली की मध्येच येईल काथ्याकूट. ;)

स्त्रिया पुरुषानच्यापेक्षा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या लवकर प्रगल्भ होतात त्यामुळे स्त्रिया साधारण १३ते १४ या वयापासून मुली प्रगल्भ होऊ लागतात हाच काळ त्यांच्या रजोदर्शनाचा असतो.या काळातच त्यांची स्त्री संप्रेरके(होर्मोन्स) वाढू लागलेली असतात त्यामानाने मुलगे मानसिक दृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी अजून ३ ते ४ वर्षे म्हणजे १७ ते १८ हे वय लागते.१६ वर्षांची मुलगी हि साधारण १९-२० वर्षाच्या मुलाच्या एवढी मानसिकदृष्ट्या प्रगल्भ आढळते. त्या वयाच्या मुलीना आपल्या वयाचे/वर्गातील मुलगे अपरिपक्व वाटतात आणि थोड्या मोठ्या मुलांबद्दल जास्त आकर्षण वाटते हि वस्तुस्थिती आहे तसेच स्त्री ची कामवासना रजोनिवृत्ती(मेनोपॉज) नंतर (संप्रेरकांचे प्रमाण कमी झाल्याने) कमी होते. स्त्रियांचे वयात येणे आणि रजोनिवृत्ती होणे या आकस्मिक होणाऱ्या घटना आहेत पण पुरुषांचे बाबतीत हि बर्याच कालावधीत होणारी घटना आहे. या कारणांमुळे नवरा आणि बायको यांच्या वयात साधारणपणे ३-५ वर्षे (पुरुष ३-५ वर्षांनी मोठा) अंतर असणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे.ज्या काळात रजोनिवृत्ती होते वय ४५ तेंव्हा नवरा ४८-५० असेल तर नवर्याची कामवासना तेवढी कमी झालेली असेल आणि त्यांच्या कामवासनेतील फरकामुळे होणारे तणाव तितके कमी होतील.आमच्या एका मित्राची पत्नी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे(प्रेमविवाह) त्यामुळे आत्ता तो ४७ वयाचा आहे आणि त्याची पत्नी ६० वर्षाची. सुमारे १५ वर्षांपूर्वी तिची रजो निवृत्ती झाली तेंव्हा त्याचे वय फक्त ३२ होते आणि त्यानंतर होणारी बारीक बारीक चिडचिड आणि भांडणे सुरळीत होईपर्यंत बरेच पाणी पुलाखालून जावे लागले. हे टोकाचे उदाहरण मी मुद्दा लक्षात आणण्यासाठी देत आहे परंतु रजो निवृत्तीच्या आसपास च्या स्त्रिया आणि त्यांच्या नवर्यांची आपसात होणारी तेढ हि डॉक्टरांना नेहमीच आढळणारी बाब आहे.

मानसिक वय का शारीरिक वय हे स्पष्ट झालेले नाही. मानसिक वय बद्दल बोलत असाल तर ते जितके कमी तितके चांगले.

मला तर आवडला असता २० वर्षानी मोठा ( ४२-४४ शाररिक वर्षाचा ) नवरा, जरा दुनिया बघितल्या मुळे शहाणपणा आणि अनुभव पण असेल. आणि सासरचे लोक खपले असतील किंवा खपायच्या तयारीत असतील त्यामुळे त्यांची कट्कट नाही. तसेच १० वर्ष नंतर दुसरा करायचा ऑप्शन पण राहिला असता ( पुन्हा ४२-४४ वर्षाचा ).

In reply to by अनुराधा१९८०

मला तर आवडला असता २० वर्षानी मोठा ( ४२-४४ शाररिक वर्षाचा ) नवरा, जरा दुनिया बघितल्या मुळे शहाणपणा आणि अनुभव पण असेल.
पण त्या अनुभवाचा वापर करण्याची वेळ निघून गेली असेल. :)
आणि सासरचे लोक खपले असतील किंवा खपायच्या तयारीत असतील त्यामुळे त्यांची कट्कट नाही.
_/\_

In reply to by दादा कोंडके

आणि सासरचे लोक खपले असतील किंवा खपायच्या तयारीत असतील त्यामुळे त्यांची कट्कट नाही.
मनातले बोलले तर असे होते. ९०% बायका कबुल करतील मी काय म्हणते ते

In reply to by अनुराधा१९८०

विचार कसेही असले तरी ते मांडण्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटले. मनातले विचार असे कळाले तर योग्य ती खबरदारी घेता येईल.

In reply to by अनुराधा१९८०

एक तर तुम्ही किंवा तुमच्या सासरची माणसे चांगली असती तर कळले असते. अशा एकांगी कमेंट्स मारणे अजूनच सोप्पे आहे.

In reply to by अनुराधा१९८०

पण तुम्हाला मुलगा असेल आणि त्याची बायको पण असाच विचार करु शकते आपल्याबद्दल हे जाणवेल तेव्हा काटा येईल अंगावर.. जे तुमच्यात आणि तुमच्या सासरच्या लोकांमध्ये नातं आहे तेच तुमच्या सुनेत आणि तुमच्यात असु शकतं.. आणि हो ह्या बाहेरुन मारलेल्या कॉमेन्ट्स नाहीयेत.. मी स्वतः एक सुन, एका मुलाची आई (भावी सासु) आहे!! सो हे उशीरा सुचलेलं शहाणपण आहे...

In reply to by अनुराधा१९८०

मनात एखाद्यावेळी विचार येणे यात काही चुक नाही. पण आपला विचार चुकीचा आहे हे न ओळखणे हे नक्कीच चुक आहे.

प्रश्नच चुकीचा विचारला आहे, मुद्द्याचं काम जमत असेल तर कीतीही अंतर चालावे. अगदी 1200 वर्षांचेसुद्धा. ;-)

सहमत