मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा
मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा
एक मॅटर ऑफ फॅक्ट वॄत्तांत.
इनिगोयने धागा टाकल्यापसून ते शनिवारपर्यंत धाग्यावर बरीच चर्चा झाली, बरेच प्रतिसाद पडले. त्यातले बहुसंख्य प्रतिसाद न येणार्या मंडळींचे असल्याने गवताच्या गंजीतून सुया शोधत बसण्यापेक्षा इनिगोयने येणार्या मंडळींना तिला व्य. नि. करायला सांगून यादी बनवली. १६ जणांनी होकार कळवला. पुष्कळ जणांनी 'येत नाही' हे सांगण्यासाठीही व्यनी केल्याने तिथेही गवताची गंजी झालीच.
हा कट्टा फिरता कट्टा असणार आहे हे कळल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या. आज फिरता कट्टा म्हणजे पुढचा कट्टा बैठकीचा होणार असे अनुमान बांधून आम्ही यायला होकार दिला. एक दिवस तरी कटकट नाही असं म्हणून बायकोनेही मोठ्या मनाने जायची परवानगी दिली. असा सगळा जंगी बेत जमून आला होता. वाट बघणं सुरू होतं.
शेवटी रविवार उजाडला. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी इनिगोय पोचली. ती पोचल्यावर पाचच मिनिटांत मी घरून निघालो. सुदैवाने तिरसिंगराव माणूसघाणे आणि स्टेडियम कॅफे वाला इराणी सोबत असल्याने मी पोहोचेपर्यंत त्यांचा वेळ मजेत गेला. बन-मस्का, पुडिंग, चहावर चहा इत्यादि गोष्टीही मजेत गेल्याचे मला नंतर कळले. स्टेशनवर आम्हाला कस्तुरी आणि प्रास भेटले. सु.झे. ने १५ मिनिटांत पोचतोय असे कळवल्याने आम्ही भेटायच्या ठिकाणाकडे कूच केले.
चालता चालता प्रास आणि कस्तुरीने त्यांना माझा ब्लॉग प्रचंड आवडल्याचे सांगितले, खूप कौतूक केलं, मला अगदी कसंसं होईपर्यंत. थोड्यावेळाने ते हीच वाक्य आधी इनियोग (हिचा ब्लॉग नाहीये) आणि नंतर ति.मा.ना सांगतानाही ऐकल्याचा मला भास झाला. आमच्या गप्पांवरून इनिगोय आमच्याजवळच राहत असल्याचा साक्षात्कार झाला. लगेच तिला कोणत्या कारणासाठी पार्टी मागता येईल हा विचारही सुरू झाला. परंतु लगेचच आम्ही बंगळूरी मुक्कामास असतान एका मैत्रीणीने चहासाठी घरी बोलावून चाहासोबत एक मारी बिस्किट देऊन 'माझ्या जन्माच्या पार्टीपासून ते नव्या जॉबच्या पार्टी पर्यंतच्या सगळ्या पार्ट्या फिट्टुस बरं का रे आड्या' अशी घोषणा केल्याचे स्मरले. ह्यावेळी पुन्हा अशी चूक न करण्याचे आणि प्लॅनिंग करून पावलं उचलण्याचे ठरवले आणि उचलेलेली जीभ पुन्हा खाली ठेवली.
हुतात्मा चौकात आम्हाला सेंट्रलची मंडळी भेटणार होती. ठरल्यावेळेपेक्षा तासभर जास्त होऊनही ती मंडळी न आल्याने मला उशिरा आल्याची नैतीक टोचणी नेहेमीप्रमाणे लागली नाही. तेव्हढ्यात समोरच्या रस्त्यावरून मोर्चा निघाल्यासारखा प्रचंड गलबला ऐकू आला आणि आम्ही हे ताडले की आले मि.पा.कर. आणि ते खरंच आले. तसे कैक जण एकमेकांना पहिल्यांदाच भेतत होते. पण उ. न. क. (उपेक्षीत नवरे कमिटी) चे आम्ही संस्थापक असल्याने त्यातल्या बहुसंख्य जणांना आम्ही सभासद म्हणून ओळखत होतो. पण चारचौघात पहिल्यांदाच भेटताना कॉम्रेड्सनी एकमेकांना ओळख द्यायची नाही असा कमिटीचा नियम असल्याने सगळ्यांनी एकमेकांशी पुन्हा अनौपचारीक ओळख करून घेतली.
हळू हळू चालत चालत आम्ही काला घोडा आर्ट फेस्टिव्हलच्या दिशेने निघालो. जाता जाता रामदास काका परिसरातल्या जवळ जवळ प्रत्येक इमारतीची बखर आमच्यापुढे उघडत होते. त्याबद्दल लिहायचं म्हणजे वेगळा लेखच लिहावा लागेल. जो मी लिहिणार नाही. कारण माझी इतकी स्मरणशक्ती नाही आणि रामदास काकांना बोलताना ऐकण्याची मजा ते वाचण्यात नाही. ही चालती बोलती एन्सायक्लोपिडीया प्रत्येकानी प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा आहे.
चालता फिरता कट्टा आणि मि. पा. कर
एक इमारत
का. घो. आ. फे.पाशी पोचल्यावर एकदाची औपचारीक ओळख परेड झाली आणि कॉम्रेड्स एकमेकांचा चारचौघात ओळख दाखवायला मोकळे झाले. तोवर सु.झे.ही पोचले होते.
ओळख परेड
ओळख परेड
ओळख परेड झाल्यावर प्रास आणि कस्तुरी ह्या २ विकेट पडल्या. प्रासने कालच खूप लांबचा प्रवास करून आलेला शिणवटा आणि कस्तुरीने घर ते चर्चगेट प्रवासाचा शिणवटा अशी कारणं दिली. ते गेले आणि देव काका अवतरले.
पोलिसांच्या गाडीच्या बॅकड्रॉपवर एक समुहचित्र काढून घेतल्यावर आत जाण्याचा निर्णय झाला आणि मंडळी पांगली. थोड्या वेळाने इथेच भेटायचं आणि जेवायला जायचं असं ठरलं. सगळे आत गेल्यावर सुझे, घा. को. आणि मी उसाचा रस प्यायला गेलो.
हाय-प्रोफाईल जत्रा असे आम्ही जिचे अनेक वर्ष वर्णन करत आलो आहोत तो काला घोडा आर्ट फेस्टिव्हल बघायला आम्ही आत शिरकाव केला. बरंच काही बघितलं, फोटू काढले. एकंदरीत वर्षभराचं एकदम चालून घेतलं.काही इंस्टॉलेशन्स खरंच अतिशय सुंदर आयडियाबाज होती. वेगवेगळ्या इंस्टॉलेशन सोबत अनेक गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असलेली अनेक छोटी छोटी दुकानंही दुतर्फा होती.
का. घो. आ. फे. - हा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी
का. घो. आ. फे.
का. घो. आ. फे. मधला काळा बैल - हा सुद्धा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी
आमच्यातल्या एकाने तिथे करू नये ती चूक केलीच. उ. न. क. चा एक महत्त्वाचा नियम त्याने मोडला. त्याने चक्क चक्क बायकोसाठी तिने न सांगता साडी घेतली. तो बाहेर आल्यावर आमच्या चेहेर्यावरचे प्रश्नचिन्ह बघून आपण हे काय करून बसलो ह्याचा त्याला साक्षात्कार झाला. आता एकदा हा पायंडा पडल्यावर दर वेळी चढत्या भाजणीत गिफ्ट खरेदी करावे लागणार हे त्याला उमगले आणि तो हताश झाला. तिथल्या तिथे मोबाईलवर उभ्या उभ्या हिमालयात जाणार्या गाड्या शोधू लागला. शेवटी सल्ला मसलतीनंतर 'लकी ड्रॉ मधे साडी लागली' असे सांगून त्याने वेळ मारून न्यायची ठरवली.
जत्रेत लोकं हरवतात हे माहिती होतं. पण ह्या जत्रेत आपले स.म. सदस्य हरवले. किसन शिंदे साहेब ह्यांनी केव्हा कलटी मारली हे आम्हाला कळलंच नाही.
आम्ही काही जण बाहेर पडलो आणि इतरांची वाट बघत गप्पा हाणायला लागलो. तेव्हढ्यात मकी ने 'तू बंगळूरूला डाण्याच्या घरात रहायचा का?' असा प्रश्नार्थक बाँब माझ्यावर टाकला. आणि इतकी वर्ष न उलगडलेलं एक कोडं मला सुटलं. बंगळूरूला आल्यावर केवळ वर्षभरातच डाण्याच्या नावावर ५ घरं आणि ७ मोटारी कशा जमल्या ह्याचा पत्ता मला लागला. आमचे परममित्र डान्राव आणि धमालपंत ह्यांचा अतीव आदराने उल्लेख करून आम्ही गप्पा पुढे सुरू ठेवल्या. बंगळूरास मुक्कामी असताना आम्ही सुरू केलेल्या २ महत्त्वाच्या संघटना 'उ. न. क. (उपेक्षीत नवरे कमिटी)' आणि 'सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' ह्यांच्या स्मॄतीस उजाळा मिळाला. जुन्या अनेक विषयांना हात घातला गेला. काही विषय नव्याने चघळले गेले.
ठरल्यावेळेपेक्षा बर्याच वेळाने मंडळी पुन्हा एकत्र आली. 'अरे मी त्या ठिकाणी थांबलो होतो, तुम्ही इथे होतात होय...' असं जवळ जवळ प्रत्येकजण दुसर्याला म्हणत होता. शेवटी एकदाचे सगळे पुन्हा जमल्यावर खिशाला ब्लेड न मारणार्या हॉटेलात जायचे ठरले. जेवण म्हटल्यावर पुन्हा सगळ्यांच्यात उत्साह संचारला. माँडेगारकडे जाणारी पावलं कशी बशी वळवून आम्ही सहकार रिफ्रेशमेंट्समधे स्थानापन्न झालो. इतकी जणं एका टेबलवर मावणं शक्य नसल्याने ३ टेबल्स पकडण्यात आली. जेवण येईपर्यंत तोंडाचा दुसरा उपयोग म्हणजे गप्पा असल्याने तीनही टेबल्स वर वेगवेगळे विषय पोस्टमॉर्टमला घेण्यात आले.
टेबल क्र. १ वर 'विपश्यना'वर चर्चा झडली. टेबल क्र. २ वर तिसरे महायुद्ध आणि अध्यात्म, तर टेबल क्र. ३, जिथे आम्ही होतो, तिथे स्पेस ट्रॅव्हल आणि रम हा अभिनव विषय चघळण्यात आला. सोबतच का. घो. आ. फे. मधल्या स्टॅटीक इंस्टॉलेशन्सपेक्षा तिथे फिरणार्या चालत्या बोलत्या कलाकॄतीच कशा भारी होत्या ह्यावर जबर खलबत झालं. ह्याचा परिणाम म्हणून जेवण झाल्यावर सु. झे. मित्राला भेटायचं कारण देऊन पुन्हा का. घो. आ. फे. मधे शिरला. तसंच, प्रथम साहेब इतक्या सटासट फोटो कसले काढत होते ह्याचाही उलगडा झाला.
कट्ट्याला फोनवरून हजेरी लावण्याचीही एक मि.पा.ची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही आमच्या एका पुणेकर कॉम्रेड मित्रास फोन लावला. जो त्यांच्या सौ ने उचलला. झालेला संवाद आम्ही इथे लिहू शकत नाही. उ.न.ची. आवश्यकता किती आणि का आहे ह्याची पुन्हा उजळणी झाली. (विनंतीवरून कॉम्रेडचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे.)
यथेच्छ जेवण झाल्यावर, सु. झे., प्रथम आणि मी दिल्ली दरबार समोरच्या पानवाल्याकडे पान आणायला निघालो. मकीच्या टेबलपाशी पोचल्यावर तिने ऑर्डर सोडली '४ पानं'. ती सगळ्यांसाठी असतील असं वाटलं पण तेव्हढ्यात तिने 'माझ्यासाठी' ही पुस्ती जोडल्याने तो गैरसमज वेळीच दूर झाला. पानवाल्यापाशी गेल्यावर आम्ही जेवलोय की नाही असं वाटावं इतक्या संख्येने पानं फस्त करून आम्ही अजून थोडी पार्सल घेऊन हॉटेलकडे रवाना झालो.
आहारलेले मि. पा. कर
पान खाता खाता पुन्हा गप्पांचा फड जमला. सगळ्यांनी आपापले पानाचे कागद जवळच्या एका कचर्याच्या डब्यात टाकल्याने त्या बिचार्या पानवाल्याचा डबा दुसर्याच पानवाल्याच्या कचर्याने भरून गेला. खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा बाराना.
गप्पांच्या ओघात कसं, कधी आणि कुणी हे माहिती नाही पण वृत्तांत टाकायची जबाबदारी आमच्या गळ्यात टाकण्यात आली. सगळ्यांसमोर मकीने 'तू डान्रावांचा मित्र असल्याने तू सुद्धा वायदे आझमच असणार' असा टोमणा मला मारला. मी त्यावर काही तरी बाणेदार उत्तर देण्यासाठी तोंड उघडले पण आमच्या उ. न. क.च्या एका कॉम्रेडने मला डोळ्यांनीच खूण करत 'भलतं साहस करू नकोस. मी सुद्धा करत नाही. जीवाला जप स्वतःच्या.' असे समजावले. जीवाल जीव देणारे मित्र म्हणतात ते हेच. (विनंतीवरून कॉम्रेडचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे.)
पुन्हा एकदा गप्पांकडे वळून बराच वेळ टिपी केल्यावर आम्ही निघायची घोषणा केली. एकूण ३ मंडळी घरी जायला निघाली आणि बाकीची मंडळी गप्पा कंटिन्यू करण्यासाठी दुसर्या ठिकाणी रवाना झाली.
येतो असे सांगून ऐनवेळी अभिनव कारणं देऊन टांग द्याची मि.पा. कट्ट्यांची परंपरा ह्या वेळीही जपली गेली. सुड, लीलाधर आणि पिंगु ह्यांनी मेगाब्लॉक आहे इथपासून ते दाट धुक्यामुळे रिक्षा बंद आहेत (डोंबिवलीत) इत्यादि कारणं देत सप्तरंगी टांग दिली. कट्टा उत्तरार्ध समाप्त. टांगा पलटी. घोडे फरार.
अशा प्रकारे मि.प. का. घो. आ. फे. कट्टा पंचनामा - पार्ट १ समाप्त झाला. पार्ट २ लवकरच पोहोचवण्यात येतील.
आपला नम्र,
आदि जोशी
हजर मिपाकर
घाशींराम कोतवाल
तीरशिंगराव माणूसघाणे
निखिल देशपांडे
मस्त कलंदर
निम
आनंद घारे
प्रथम फडणीस
मिसळलेला काव्यप्रेमी
रामदास काका
लिमाऊजेट
सुझे
सुर आणि तिचं पिल्लू आर्या
किसन
इनिगोय
मी
देवकाका
प्रास
कस्तुरी
विलासराव
टांग देण्याची परंपरा जपणारे मि. पा. कर
सुड
लीलाधर
पिंगु
धमालपंत
अभिज्ञ
सूचना १ - लवकर म्हणजे तुझ्या हिशोबाने की आमच्या, येतोय वॄत्तांत वाट बघतोय आम्ही, अरे दुसर्या कट्टाची तयारी झाली... अशा खवचट कॉमेंट्स टाकू नयेत.
सूचना २ - सगळे फोटो इथे
https://plus.google.com/photos/107365542060239942560/albums/5841121034947873905?banner=pwa आणि https://picasaweb.google.com/104688623505589346553/DropBox?authkey=Gv1sRgCOq82Ynh4qvHJA इथे बघता येतील.
चालता फिरता कट्टा आणि मि. पा. कर
ओळख परेड
याद्या
12749
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
मी पहिला. बाकी नंतर
फर्मास वॄत्तांत
(No subject)
In reply to फर्मास वॄत्तांत by श्रीरंग_जोशी
जेवण
In reply to फर्मास वॄत्तांत by श्रीरंग_जोशी
मी दुसरी ... बाकि माझ्या मागे
हाहाहा!
झकास
ऐसाच बोल्ता है अपुन
In reply to झकास by प्रचेतस
+१०
In reply to झकास by प्रचेतस
इतकुसाच?
यशो
In reply to इतकुसाच? by यशोधरा
अॅड्या, मेल्या नुसते आपले
In reply to यशो by आदिजोशी
.
In reply to अॅड्या, मेल्या नुसते आपले by यशोधरा
तेच की! इतकुस्सच.
In reply to . by आदिजोशी
नै तर काय इतकुस्सा वृत्तातं.
In reply to तेच की! इतकुस्सच. by यशोधरा
लै भारी..
वा, मस्त झाला कट्टा.
मजा आली वृत्तांत वाचायला.
+ मस्त झाला कट्टा
काळा बैल
दाढीवाले विलासराव वाटताहेत.
पुष्कळ जणांनी 'येत नाही' हे
वृत्तांत व फोटू आवडले. नावे
भन्नाट लिहिलयत आदिकाका .....
बरोब्बर
In reply to भन्नाट लिहिलयत आदिकाका ..... by जेनी...
अरे वा !!
भारी वृत्तांत
@स्नेहांकिता - ते काम मी करतो
मस्त मस्त
उ. न. क आणि त्याचा संस्थापक
ह्या कट्टा वृत्तांताच्या
फोटूमधले मिपाकर (डावीकडून
धन्स.
In reply to फोटूमधले मिपाकर (डावीकडून by नानबा
धन्यवाद, प्रथम, मित्र
In reply to फोटूमधले मिपाकर (डावीकडून by नानबा
पंचनामा
वावावावा मस्त कट्टा !!!!!
कमाले भौराया !
In reply to वावावावा मस्त कट्टा !!!!! by बॅटमॅन
@मेल्यावर दुसरेलोक घेवुन
In reply to कमाले भौराया ! by जेनी...
प्रमाण वाक्यरचनेचा आग्रह तू
In reply to कमाले भौराया ! by जेनी...
असूयेने मेल्या गेलो आहे.
In reply to वावावावा मस्त कट्टा !!!!! by बॅटमॅन
तेच ना
In reply to असूयेने मेल्या गेलो आहे. by मालोजीराव
व्हय रं...
In reply to वावावावा मस्त कट्टा !!!!! by बॅटमॅन
म्हंजी नक्की फिरता..
In reply to व्हय रं... by ह भ प
@फिरायचं त्ये बी कुटून भुसारी
In reply to म्हंजी नक्की फिरता.. by चौकटराजा
स्माईलीत फॉलट हाय
In reply to @फिरायचं त्ये बी कुटून भुसारी by अत्रुप्त आत्मा
तो झोंबी आहे हो
In reply to स्माईलीत फॉलट हाय by चौकटराजा
पुण्यात फिरता कट्टा...झालाच
In reply to व्हय रं... by ह भ प
+१
In reply to पुण्यात फिरता कट्टा...झालाच by बॅटमॅन
झालाच पाहिजे...झालाच पाहिजे
In reply to पुण्यात फिरता कट्टा...झालाच by बॅटमॅन
अत्रुप्त आत्माच्याशी सहमतीचा ठराव पास करण्यात येत आहे....
In reply to झालाच पाहिजे...झालाच पाहिजे by अत्रुप्त आत्मा
चला आता पुण्यात पांढरा बैल
In reply to अत्रुप्त आत्माच्याशी सहमतीचा ठराव पास करण्यात येत आहे.... by बाबा पाटील
प्रथम, तुमच्यामुळे जोशींच्या
नाही
कट्टा छान झाला
फोटो आवडले... मुंबईतली लोकं
खरंच गुणी हो पुणेकर..!
In reply to फोटो आवडले... मुंबईतली लोकं by ५० फक्त
ओ उगाच पुणेकरांबद्दल बोलायचं
In reply to खरंच गुणी हो पुणेकर..! by इनिगोय
चान चान
हा सगळा
वृत्तांत व फोटो दोन्ही छानच.
जे बात
+१
In reply to जे बात by स्पा
आयला मला भलत्याच वेळी
टांगा घेउन येता का काय
In reply to आयला मला भलत्याच वेळी by पिंगू
फोर्ट परिसरात गोथिक शैलीतल्या
झक्कास वृतांत. आवडला. पण
+१
In reply to झक्कास वृतांत. आवडला. पण by मृत्युन्जय
सहमत
In reply to +१ by छोटा डॉन
हॅ हॅ.. आपल्या सर्वांचे
In reply to सहमत by मिसळलेला काव्यप्रेमी
.
In reply to +१ by छोटा डॉन
वा खुसखुशीत वृतान्त.
+१
In reply to वा खुसखुशीत वृतान्त. by ऋषिकेश
चालता फिरता कट्टा ही कल्पना
आता मिपाचे महासंमेलन व्हावे
+ घंटा...
In reply to आता मिपाचे महासंमेलन व्हावे by नानबा
मस्त मस्त
अभिनन्दन...
काही खुलासे
ही पुरवणी पण मस्त!
In reply to काही खुलासे by तिमा
अंडर एस्टिमेशन
In reply to काही खुलासे by तिमा
असं झालं होतं काय? मला वाटले
In reply to अंडर एस्टिमेशन by आनंद घारे
होय. घारे काकांशी सहमत..
झक्कास वृतांत.
एकूण छान कट्टा झाला हे पाहून
+१
In reply to एकूण छान कट्टा झाला हे पाहून by विश्वनाथ मेहेंदळे
कट्टा आवडला.