Skip to main content

छायाचित्र क्र. ४ चे परिक्षण

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 29/08/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्र परिक्षण वाचण्याआधी मुळ चित्र येथे पहावे ============== ही नजर की बाण हा, घायाळ करते जीवा त्या मुठित लपविले, घायाळ माझ्या जीवा ते लटकलेले कानचे, की आशा माझ्या मनीची स्वत:संगे झुलविले, घायाळ माझ्या जीवा ती वक्रगती कटीका, की रस्ता माझ्या मनीचा त्या झटक्याने फसविले, घायाळ माझ्या जीवा ती कमरसाखळी हो, की इच्छा माझ्या मनीची त्या विळख्याने भुलविले, घायाळ माझ्या जीवा सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा -ऋषिकेश (रात्री १२ ची वेळ असल्याने छंदाच्या अपेक्षा माझ्यासारख्या स्वचंदी माणसाकडून तुर्तास नको ;) . सुचलं ते लिहिलं)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2473
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा मार डाला! ऋषिकेशा, तुझ्यातल्या शीघ्रकवीला आणि रसिकाला सलाम...! :) तात्या.

खल्लास्स्स्स्स..... सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा ऋषिवर, सादर प्रणाम स्वीकार असावा. मानलं.... बिपिन.

ऋषिकेश, मला छायाचित्राच्या पानापाशी पोहोचण्याची मुभा नाही. चित्र काढले आहे का? कवीता सुरेख आहे. छंद पण छान जमला आहे. अपेक्षा नको का म्हणतोस? महेश

मुळ छायाचित्र तुर्तास तात्यांच्या खरडवहीमधे आहे ते पहावे. अभिप्रायाबद्दल सार्‍यांचे अभिप्रायाबद्दल -('मिसळ'लेला) ऋषिकेश

काही अपरिहार्य कारणास्तव मूळ चित्र मिपावरून अप्रकाशित करावे लागले, ते सर्वांना आमच्या खरडवहीच्या सुरवातीलाच पहता येईल. ऋष्याने कविता छानच केली आहे. तिचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर इच्छुकांनी वर दिलेल्या दुव्यावर जाऊन ते चित्र अवश्य पहावे... गैरसोयीबद्दल दिलगीर आहे... तात्या.