"ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला.
आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी.
"जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे"
मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी.
"जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन"
"दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा."
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जयविजय
डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार चोपदार म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. चार पाच रंगाने भरलेल्या वाट्या आन तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटायची. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर हा कलाकार सापडायचा तानाजी चौकात देशीच्या गुत्त्यावर.
"सकाळी येतो म्हणून सांग काकांना" एवढाच निरोप घेऊन आम्ही घरी परतायचो.
"येईल रे, कुठे जातोय पळून, बँकेचा थकबाकीदार आहे तो", वडीलांचा दांडगा विश्वास.
त्यामुळेच कदाचित दुसर्या दिवशी दारात बघावे तर त्याने रंग कालवायला सुरुवात केलेली असायची. पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे. सुरुवातीला फिकट गुलाबी रंगात थोडीशी पिवळी छटा असणारा त्वचेचा रंग, लगेच पिवळ्या शेंदरी रंगात पितांबर आणि दागिने, जांभळ्या रंगाचा शेला आणि लाल कटीवस्त्र. सुरुवातीला नुसतेच रंग दिसत. काळा रंग निषिध्द असे म्हणून गडद तपकिरी रंगाचा लहान ब्रश एकदा फिरायला लागला की पाहता पाहता चित्र सजीव होई. एक पाय गुडघ्यात वाकवून हाती तिरपा दंड घेतलेले, अगदी देवासारखे देखणे मुकुटधारी जयविजय. बार्शीत श्री भगवंताचे मंदिर असल्याने पहिल्यापासूनच दरवाजावर भालदार चोपदार नव्हेत तर जयविजयच. खाली लफ्फेदार सही ठोकेस्तोवर घरातून चहा आलेला असायचा. चहा आणि बिदागी घेऊन तो जायचा पण माझे निरिक्षण काही संपायचे नाही.
चाटे गल्लीतल्या त्याच्या दुकानासमोर उभारणे म्हणजे सुध्दा मौज असायची. शेजारी महाराष्ट्र ब्रास बँडवाल्यांची प्रॅक्टीस चालू आणि त्या तालावर इकडे दुकानाचे बोर्ड रंगवणे मी तासनतास बघत राहायचो. लस्सीचा ग्लास हातात घेतलेला अर्नोल्ड पासून चहा पिणार्या अमिताभ पर्यंत सगळे हुबेहुब उतरलेले असायचे. चित्रकलेच्या वहीत बर्याच प्रयत्नानंतर जमलेले जयविजय घेऊन एकदा त्याला दाखवावे वाटे पण त्याच्या तिरसटपणाची भितीही वाटायची
एक रविवारी मात्र सकाळी सकाळी तो दारात उभा होता, चेहर्यावर अत्यंत अजिजी आणि आपली रंगीबेरंगी सायकल घेऊन.
तासभर माझ्या वडीलांचे हप्ते न चुकवण्याचे आणि दारु न पिण्याचे उपदेश ऐकून तो निघणार इतक्यात मी माझे जयविजय त्याला दाखवले.
"चांगलं काढताव पण मोठं झाल्यावर सायब व्हा बँकेतलं, तुमच्या वडलासारखं."
एवढेच बोलून गेला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज पट्कन तेच जयविजय एका कागदावर काढून स्कॅन करुन पीसीवर त्यात रंग भरायला १५ मिनिटे खूप होती.
"आमचे वडील पण शेम आस्लंच जयविजय काढायचे बघा. बार्शीत पेंटर होते, गेले १० वर्शाखाली"
"आणि तुम्हाला नाही का येत मग पेंटींग?" बँकेतल्या साहेबाच्या मुलाचा निरर्थक प्रश्न
"नाही जमत, वडीलानी पतसंस्थेत लावलय नोकरीला. आता घरात आरजंट लग्न ठरलय. मोकळं दार कसं ठेवायचं म्हणून तर हे फ्लेक्स लावतो दारावर"
वाचने
24455
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहिलं आहे पण शेवट एकदम
एक नंबर! आवडलं!
छान झालय....पण लै लवकर संपलं
टचिंग!
छान लिहिले आहे.
वर्णन मस्तच!! शेवट बरेच काही
मस्तच!
आवडले
>>>जयविजयचे एखादे चित्र
In reply to आवडले by श्रीरंग_जोशी
सोप्पय
In reply to >>>जयविजयचे एखादे चित्र by प्रचेतस
अगागागागागा, मोदकाला आता
In reply to सोप्पय by अभ्या..
काहि कळलं नाही!
छान लिहिले आहे....
मस्त रे अभि.. पहिलंच लेखन
भौसाहेब,आवडला तुमचा लेख बरंका
अब्या ते जयविजय पहायची खुप
अब्या राव ! स्केच आवडलं !
चांगलंच लिहतोस कि रे. लेख
मस्त रे, जय विजय बार्शीचे आणि
मान गये अमिना
छान !
धन्यवाद
लेख आवडला.
असेच
In reply to लेख आवडला. by शुचि
भारी बे अभ्या. बार्शीचं कुठलं
In reply to असेच by अभ्या..
हे बघ रे लै जुने असलेले जय
In reply to भारी बे अभ्या. बार्शीचं कुठलं by बॅटमॅन
भारी रे. त्रिशुंड गणपतीच्या
In reply to हे बघ रे लै जुने असलेले जय by प्रचेतस
खी खी खी.
In reply to भारी रे. त्रिशुंड गणपतीच्या by बॅटमॅन
अर्र तेच्या. लै भारी बे पण.
In reply to खी खी खी. by प्रचेतस
मस्तच!
अभ्या अनुभवलेखन जमलय रे पण
वॉव..!!
मस्तं लेखन....
आवडले
छोटी पण मार्मिक कथा.
हे लेखन नजरेतून सुटलं होतं.
मस्त रे अब्या साॅरी अभ्या ..
छानच लिहेले आहे! अजून येऊ दे.
आवडलं
लै भारी बे अभ्या!
छानच लिहिलय. आवडलं.
@ मुलांना जयविजय म्हणायचे.>>>
In reply to छानच लिहिलय. आवडलं. by कवितानागेश
मुलींना
In reply to @ मुलांना जयविजय म्हणायचे.>>> by अत्रुप्त आत्मा
छान
वाह रे अभ्या,
ही हाटेलं म्हंजे मेहबुब आणि
In reply to वाह रे अभ्या, by नि३सोलपुरकर
करेक्ट
In reply to ही हाटेलं म्हंजे मेहबुब आणि by ५० फक्त
सोलापूरात या
In reply to करेक्ट by नि३सोलपुरकर
अनुमोदन
In reply to सोलापूरात या by अभ्या..
फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३
In reply to अनुमोदन by नि३सोलपुरकर
मीSSSSSSS
In reply to फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३ by ५० फक्त
अण्णा
In reply to फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३ by ५० फक्त
मी पण ट्राय करतो
In reply to फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३ by ५० फक्त
पुरेसे आधी न कळवल्याने येऊ
In reply to फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३ by ५० फक्त
एक जयविजयची जोडी पाठवून देण्यात येईल
मस्त रे..लहानपण आठवले.
बार्शीचा भगवंत
मस्त लेखन .
कंडका पाडलेला
आणि हे असे जयविजय
In reply to कंडका पाडलेला by विसुनाना
अगदी हेच.
In reply to कंडका पाडलेला by विसुनाना
मस्त लिहिले आहेस रे......
मस्त रे अभ्या.
.
व्वा सुंदर!!
लेखन आवडलं
मीच तो
In reply to लेखन आवडलं by पिवळा डांबिस
ए अब्या ... पिडाकाका नाहित ते
In reply to मीच तो by अभ्या..
डां डां लिहि ... डा वर
In reply to ए अब्या ... पिडाकाका नाहित ते by जेनी...
पिडाकाकाच