धुके, पाणी, हिरवाकंच निसर्ग, सहस्त्र हात पसरून उभं ठाकलेलं ते झाड, तो दाढीवाला म्हातारा मस्त!!!!
पावसाळी दिवस बघून असं वाटलं की इथे आमच्याकडेही काळोख भरून आलेला असावा आणि विजांचा लखलखाट सुरू व्हावा आणि मुसळधार पाऊस कोसळावा.
अगदी अगदी!! पावसाळा सुरू झाल्यापासून अगदी असंच वाटत होतं.. ढग येतात पण पाऊस काही पडत नाही..
मात्र परवा, रात्री ढगांचा गडगडाट , विजा चमकून पाऊस पडला तर मी दचकलेच! :) अर्थात दुसर्या दिवशी परत कोरडं ठक्क..!
असे फोटो पाहीले की पळत जावसं वाटतं तिथे! हिरवागार निसर्ग अप्रतिम आलाय ओंकार.. मला ते झाड, आणि धबधब्याची नक्षी खूप आवडली!!
काय फोटो आहेत..!! कोणतं सगळ्यात चांगलं चित्र आणि कोणतं नंतर हे सांगणं कठीण आहे.
१० नंबरचे चित्र :
हिरवाईचा पल्लव पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी ती सरीता तटावरी..
मस्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी भीमाशंकराच्या जत्रेला ठणठणीत कोरड्या हवामानात गेलो आहे. त्यावेळी हे लोभस हिरवेगार रूप मी बघितलेले नव्हते. धन्यवाद.
(पहिल्या तीन चित्रांत क्षितिजरेषा क्षितिजसमांतर [हॉरिझाँटल] असती तर चित्रे अधिक आवडली असती.)
फक्त क्र. ८ चे चित्र आधी पहा नि मग क्र. ७ चे चित्र पहा.
हिरवी हिरवी नेसून वस्त्रे
वाट जातसे कुठे ?
पसरूनी बाहू अधीरतेने
प्रियकर भेटे जिथे !
(प्राजुकडून स्फूर्ती घेऊन हा एक प्रयत्न ! ) :)
वाटाड्या आजोबाचा सगळ्यात क्लास !!!
भीमा शंकर ला भटकलोये पण फोटो च नव्हते घेतले...
आता काही क्षणासाठी मन जाउन आले !!!!
मन वढाय वढाय !! दुसर काय ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
ॐकार राव,
उत्तम छायाचित्रे दिल्याबद्दल धन्यवाद. इथे तिकडचा पाऊस लैच मिस करतोय.
असो, आता मियां मल्हार ऐकायलाच हवा...
http://www.esnips.com/doc/7a7d1ee0-f764-4592-8480-b29d78a40fac/Pt-Channulal-Mishra---Raag-Miya-Malhar
ऐका बनारसचे प्रसिद्ध गायक पं. छन्नुलाल मिश्र यांचा मियां मल्हार. त्यांची मध्यलय त्रितालातील खास फर्माईशी बंदिश जरूर ऐका. पावसाळ्यातल्या विविध नादांवर आधारित या चिजेचे शब्द असे आहेत...
आली उमड घन घुमड बरसे, बूंदनी पडत फुहारे
जो सनननननननन थररर कापें मनवा लरझे
झिंगूर बोलत झननन झननन, आली उमड घन.....
पपीहा करत अलाप दादुर देत थाप(?)
छत्रक(?) चकोर जन बाजत सितार
मोर नाचत सुनी पडत शोर
ततछुम ततछुम छुमछननननन
दारादिरदिरदारदारदिर दारादिरदिरदारदारदिर
दारदिरदिरदार तननननननन, आली उमड घन....
आणि पाऊस ओसरल्यानंतर ढगांमागून जे सोनेरी उन्हाचे कवडसे पडतात, त्याचा आनंद घेताना ऐका अभिषेकीबुवांचा सूर मल्हार...ही पण द्रुत त्रितालातली एक अत्यंत सुंदर बंदिश, नादांवरच आधरलेली
घघघत घननन घोरघोर घोरघोर गरजत आये बादरवा छाये
चमकत बिजुरी बरसत मेहा पवन चलत सननननननननन
आयी ऋत बरखा सोच समझ बिन पवन चलत पुरवैय्या
सननननननन सनननननननन, घघघत घननन घोर घोर
http://www.esnips.com/doc/75f55b4a-3cc8-4b81-806b-19b113edf1b9/Sur-Malhar
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
खरच भटकंतीसाठी खूप छान जागा आहे ती...
तिथला नागफणीचा डोंगर म्हणजे ट्रेक साठी पर्वणीच आहे..
आम्ही मागे गेलो होतो तेव्हा भीमाशंकर पासून अलीकडे ५-७ किमी एक 'ब्ल्यू मॉरमॉन' नावाचं एक रेसॉर्ट आहे..
छान आहे. तिथला एक फोटो इथे देत आहे..
फोटो मस्तच आहेत.
मला विशेष आवडलेले ६, १० आणि त्या वाटाड्या आजोबांच :)
ब्ल्यु मॉर्मन मध्ये जावुन राहय्च आहे.
रात्रीच जंगल अनुभवायच आहे. बघु कस जमेल ते.
पण तिकडे मार्च एप्रिल मध्ये जाण्यात मजा आहे. रात्री पाणी पिण्यास बाहेर पडलेले प्राणी पहायला मिळतील.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
अहाहा...ॐकार शेठ..
लहानपणीच्या आठवणींनी मन आज भरून आलं. भीमाशंकर आणि पायथ्याच्या डिंभे गावात आमचं बालपणं गेलं. वडिलांची बदली डिंभे गावात झालेली..आणि आमचं बालपण तिथेचं गेलं जवळ जवळ ५ वर्ष. ती आमची शाळा, ते खेळायचं मैदान..मनसोक्त डोंगर दर्या हुंदडणं ..आणि कधि कधी शाळेची गाडी आली नाही म्हणुन ५ कि.मी. जवळच्या शिनोली गावापासूनच्या आमच्या शाळेपासून तुम्हाला सगळ्यांना वर दिसलेल्या पावसात भिजत घरी 'चालत' येणं..सगळंच रम्य...
आता सालं पाऊस पडायला लागला की पोरं तोंड वाकडी करतात तेव्हा हसावं का रडावं तेच कळत नाही..
पुन्हा एकदा धन्यवाद...
आपलाच..
मुकुल
(आता किशोरीताईंचा मेघ मल्हार ऐकलाच पाहीजे..)
प्रतिक्रिया
सुरेख चित्रे
अगदी अगदी!!
आई...गं!!
मस्त चित्रे!
प्रयत्न...
अरे वा, मास्तुरे लई झ्याक!
मस्तच चित्रे रे ॐकारा!
मस्त
>> (पहिल्या
माझा चॉईस -- क्र. ७ आणि ८ ची चित्रं !
हिरवे
सर्व
मस्तच/
वाटाड्या
ॐकार
आ हा हा
मस्त..
सुरेख चित्रे....
तिथेच
ब्लू मॉर्मन?
फोटो मस्तच
सगळेच फोटो
सुं द र !
फोटो..
हेच म्हणतो
मस्त
अहाहा...ॐकार शेठ..
फोटो खूप
फोटो खूप