Skip to main content

'विश्वरूपम' चा वाद काय आहे ? कोण सांगेल.

'विश्वरूपम' चा वाद काय आहे ? कोण सांगेल.

Published on 02/02/2013 - 01:02 प्रकाशित मुखपृष्ठ
हिन्दुस्थानातला विख्यात अभिनेता 'कमल हसन' याचा 'विश्वरूपम' चित्रपट अखेर काही ठिकाणी प्रदर्शित झाला येण्यापूर्वीच वादात अडकल्याने सर्वत्र त्याच्याबद्दल उत्सुकताही होती. अनेकदा हे वाद खरे मानायचे की प्रसिद्धीच्या क्लूप्त्या मानायच्या असा प्रश्न पडतो ? जमानाच तसा आलाय. एक नक्की हा चित्रपट २०१३ चा हिट्ट चित्रपट ठरणार असे दिसते त्याच्याबाबत जे वाद निर्माण झाले त्याबाबत सर्वांनी फक्त अंदाज व्यक्त केलेत नेमकं कुणीच काही बोलत नाही. 'विश्वरूपम' या नावामुळे काही वेगळ्याच कल्पना मनात येतात. पण ज्या लोकांनी विरोध केला आहे त्यावरून असे मानायला जागा आहे की विदेशी संस्कॄतीबद्दल काही भाष्य असावे ज्याच्याशी भारतीयांना काही घेणेदेणे असायची गरज नाही कमल हसन याच्या मुलाखतींवरूनही हेच ध्वनित होते की अफगाणिस्तानातील कुणावर किंवा अल कैदाशी संबंधित कथा असावी कुणाला या चित्रपटाबाबत नेमकी काही माहीती असेल तर सर्व मिपाकरांच्या ज्ञानात अवश्य भर घालावी ..(अज्ञानी) जोग
लेखनप्रकार

याद्या 9413
प्रतिक्रिया 39

कमल हासनबाबत वाईट वाटते. कोणत्याही समूहाची झुंडशाही चालू देणे लोकशाहीसाठी वाईट आहे. राज्यसरकाने हा विरोध मोडून काढायला हवा. चित्रपट बरा असावा असे परीक्षणे वाचून वाटले.

In reply to by आजानुकर्ण

आ.कर्णाशी, सहमत आहे. -दिलीप बिरुटे

जोगसाहेब - अज्ञानात सुख माना की, कशाला डोक्याला ताप करून घेताय?

In reply to by श्रीरंग_जोशी

लाख मोलाची गोष्ट बोललात श्रीरंगपंत . !! जोग साहेब सत्य कटु आहे , अज्ञानात मस्त सुख आहे ...एन्जोय !!

बोगस पिक्चर आहे.आजच पाहिला,हिंदी पिक्चरवाले एकच गोष्ट किती वेळा उगाळुन दाखवणार आहेत कुणास ठाउक.

कमल हासनने हा चित्रपट थिएटर मालकांचा अतिशय तिव्र विरोध पत्करुन डिटीएच वरुन "वर्ल्ड प्रिमिअर" केला, याचा वचपा काढायला थिएटर मालकांच्या लॉबिने राजकिय खेळी व पाठ्बळाचा वापर या भोवती धार्मीक वादाचा आभास निर्माण करायला केला व हासनचे आर्थिक नुकसान करायला सुरुवात केलि इतकचं.

कमल हसन अभिनेता म्हणून निर्विवाद श्रेष्ठ असेल पण हिंदुस्थानी पासून सध्याचे त्याचे चित्रपट तंत्राच्या अति आहारी गेलेले आहेत. दशावतार तर अगदी बोगस होता. तमिळमध्ये केले असतील मध्यंतरी काही प्रयोग पण बहुभाषिक चित्रपट म्हणजे ना धड साऊथ मसाला ना स्टोरी असला प्रयोग असणार. फ्री च्यानल वर लागल्यावर बघण्यात येईल.

पिच्चरमधे आतंकवादी हल्ला करण्याअगोदर त्यांच्या देवाची प्रार्थना करतात यश दे म्हणुन. त्याने म्हणे लोकांमधे चुकीचा संदेश जाईल की त्यांचा देव वाईट प्रव्रुतींना मदत करतो म्हणुन.

साला नेहमीप्रमाणे "याचा जिवंत वा मृत ********************नाही" असा खुलासा टाकला की झाले हाय काय नाय काय?

जयललीता यांच्या मालकीच्या डि टी एच ला विश्वरुपम च्या शो साठी न विचारल्याने हा सगळा खेळ झाल्याची तमिळनाडुत कुजबुज आहे(करुण कमल)

तुम्हाला हा प्रश्न पडल्याने आदर वाटला. कारण आम्हालाही हाच प्रश्न पडला. (आम्हाला हे स्वतंबद्दलच्या आदराने नव्हे). चित्रपट वल्द सिनेमा रिलीज उर्फ प्रदर्शित होण्याअगोदर आम्हाला त्यातली हिरॉईन कोण हे सुद्धा माहीत नसतं. मग भावना दुखावणारे सीन्स उर्फ दृश्य नेमक्याच लोकांपर्यंत कशा जातात बरं ? जाईना का. आम्हाला काय त्याचं.भारतात अनेक लोक जिवंत राहण्याच्या हक्कासाठी झगडत असताना त्यांना कधी हा देश सोडून जावंसं वाटलं नाही हेच आमच्या दृष्टीनं महत्वाचं. (इथे आमच्या म्हणजे प्रथमपुरूषी समजावे). शंभर कोटी खर्च केल्यानंतर पैसा वसूल होऊन किमान दोनशे कोटींचा गल्ला जमवायचा असेल तर तसा विचार करणे चूक नाहीच. नाही का ? वास्तविक आम्ही कमल हसनचे डाय हार्ड फॅन आहोत हे नमूद करणे महत्वाचे समजत आहोत.

या चित्रपटा बद्धल उत्सुकता आहे,पण आता काही "आपत्तिजनक भाग " कापल्यावर दाखवला जाणार आहे म्हणे... "हे राम" या चित्रपटातले काही निवडग भाग खाली देतो आहे, जे आत्ताच पाहिले. https://www.youtube.com/watch?v=j2d9viYQpDI यात अतुल कुलकर्णी ने स्वतःची ओळख सांगितली आहे,तो श्लोक मला फार आवडला. :) => https://www.youtube.com/watch?v=Ux6PixEsc8Q https://www.youtube.com/watch?v=HusEA2yeGuc कमल हसनचे माझे आवडते गाणं :- https://www.youtube.com/watch?v=hcD0W8LNFpc

In reply to by मदनबाण

हे राम मधे ज्या पद्धतीने त्याने गांधीहत्या आणि गांधीजी उडी मारून मागे पडताना दाखवले आहेत, ते बघून किमान ते दृश्य तरी गांधीजींचा आदर राखत संपादन करायला हवे असे वाटते.

In reply to by विकास

ह्म्म, हो हे दॄष्य पाहिले होते आणि म्हणुनच याचा दुवा मी वरती दिलेला नाही. असो... चित्रपटाचे नाव जरी "हे राम" असले तरी या दॄष्यात गांधीजींच्या मुखातुन त्याचा उच्चार नाही हे विशेष, ते फक्त बेन किंगस्लेच्य मुखातुन आलेले दिसले. जरासे अवांतर :--- काही दुवे इथे देण्याचा मोह मला आवरता येत नाही. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातील काही संवाद खुपते गुप्ते तिथे या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या मुलाखतीत आलेला आहे,हा भाग पाहण्यासारखा आहे. https://www.youtube.com/watch?v=3qJ3QKirYJA https://www.youtube.com/watch?feature=endscreen&v=5t6b8jCarkg&NR=1 आणि Netaji Subhash Bose - Hidden Truth https://www.youtube.com/watch?v=lfsCzBfjTcM Till When Was Netaji Subhash Chandra Bose ALIVE ? https://www.youtube.com/watch?v=ZSwjwrefDpQ

'विश्वरूपम'वर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यामागे फक्त राजकारण आहे. त्याला २ पदर आहेत. कमल हासनने जयललिताच्या वाहिनीला या चित्रपटाचे हक्क न दिल्यामुळे संतापून जयललिताने बंदी घातली हा एक पदर व दुसरा पदर हा जयललिताच्या निवडणुकीच्या राजकारणाशी संबंधित आहे. २०१४ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत युपीए किंवा एनडीए या दोघांपैकी कोणीही बहुमताच्या जवळ जाणार नाही व उर्वरित प्रादेशिक पक्षांना एकत्रित २५० जागा मिळतील असा सध्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत १९९६ सारखी परिस्थिती निर्माण होऊन काँग्रेसच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर एखाद्या प्रादेशिक पक्षाचा नेता पंतप्रधान होऊ शकतो (१९९६ मध्ये आधी देवेगौडा व नंतर गुजराल असेच पंतप्रधान झाले होते). सद्यपरिस्थितीत काँग्रेस चंद्रबाबू नायडू, नवीन पटनाईक, मुलायम, पवार इ. नेत्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार नाही. त्यामुळे जयललिता व नितीशकुमार असे दोनच पर्यात काँग्रेससाठी शिल्लक राहतात. त्यामुळे देशपातळीवर आपली धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी जयललिताने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील हे निमित्त करून या चित्रपटावर बंदी आणली आहे. २००४ मध्ये जयललिताने अगदी असेच केले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकचा एकही खासदार निवडून आला नाही. आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आपला पराभव झाला अशी समजूत करून घेऊन जयललिताने प्रथम २००४ च्या दिवाळीत नरकचतुर्दशीच्या पहाटे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना अटक करून आपल्या तथाकथित निधर्मी भूमिकेचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर २००५ मध्ये तिनेच पूर्वी तामिळनाडूत आणलेला धर्मांतर बंदीचा कायदा रद्द करून अजून एक निधर्मी तीर मारला होता. पण त्याचा तिला काहीही फायदा न होता २००६ च्या निवडणुकीत अद्रमुकचा दणदणीत पराभव झाला होता.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी एक सांगा काँग्रेस आणी अण्णा द्रमुक मिळुन सरकार बनवु शकते का?तुम्ही म्हटल्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू, नवीन पटनाईक, मुलायम, पवार इ. नेत्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार नाही. मग त्यांनी का पाठींबा द्यावा ह्यांना,या उलट ते बी जे पी ला सपोर्ट का नाही करणार? इंडीया शायनिंग च्या वेळेस बी जे पी ला जर वीस पंचवीस जागांची कमरतरता भासली असती तर मुलायम एका पायावर तयार होते म्हणे. मुस्लीम लोक आता भावनेच्या भरात जाउन मतदान तरी नाही करीत्,त्यांचा पसंतीक्रम हा आपल्या लोकांच्या निवडुन येण्याच्या शक्यतेला धरुन असतो.(जसे की नांदेड मध्ये घडल)आणी आपण टाळ ठोकत बसतो

In reply to by श्रीगुरुजी

> आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आपला पराभव झाला अशी समजूत करून घेऊन जयललिताने प्रथम २००४ च्या दिवाळीत नरकचतुर्दशीच्या पहाटे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना अटक करून आपल्या तथाकथित निधर्मी भूमिकेचे प्रदर्शन केले होते ही नवीन माहिती मिळली. या घटनेमागे अशी काही हकीकत असेल हे माहीत नव्हते धन्यवाद गुरुजी !

In reply to by आशु जोग

"ही नवीन माहिती मिळली." याला अजून काही पदर आहेत. जयललिता ही मनात डूख धरून सूडबुद्धीने वागणारी आहे. १९९६ ला करूणानिधी सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जयललिता काही दिवस तुरूंगात होती. त्यानंतर २००१ मध्ये जयललिता सत्तेवर आल्यावर तिने लगेचच करूणानिधी व स्टॅलिनला अटक करून, स्वत:ला मद्रासच्या तुरूंगाच्या ज्या खोलीत ठेवले होते त्याच खोलीत करूणानिधीला डांबले व स्वत:चा सूड उगविला. आपल्याचा पक्षाच्या आमदारांना सँडल फेकून मारल्याच्या बातम्याही वृत्तपत्रात आल्या होत्या. २००४ मध्ये लोकसभेच्या सर्व ३९ जागांवर दारूण पराभव झाल्यावर ती एकदा शंकराचार्यांच्या दर्शनाला गेली होती. त्यावेळी ते उच्चासनावर बसले होते व तिला त्यांच्या समोर खाली बसावे लागले याचा तिच्या मनात राग होता. "तुझ्या अहंकारी स्वभामामुळे तुझ्या पक्षाचा पराभव झाला" असे त्यांनी सांगितल्यामुळे ती त्यांच्यावर संतापली होती. मनातला हा राग व आपण निधर्मी आहोत हे दाखविण्याच्या खुमखुमीमुळे तिने ऐन दिवाळीत शंकराचार्यांना अटक करून एका दगडात अनेक पक्षी मारले. पण अर्थातच त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण मे २००६ मधल्या विधानसभेच्या निवडणुकीत अद्रमुकअचा दणदणीत पराभव होऊन द्रमुक सत्तेवर आली होती.

In reply to by श्रीगुरुजी

ही बाई ममतासारखीच आक्रस्ताळी आहे करुणानिधीच्या जातीय राजकारणाला उत्तर म्हणून हीला संधी मिळते पण स्वतःचे फार स्तोम माजवून ठेवले आहे

In reply to by आशु जोग

मद्रास कॅफे देखील याच प्रकारात मोडण्यासारखा चित्रपट आहे. पण असले बेबी, मद्रास कॅफे, विश्वरूपम चित्रपट धावत्या कॅमेर्‍याने किंवा फास्ट एडिटींगने का दाखवतात कळत नाही. उगाचच आदळणारे म्यूझिक, सतत छाया प्रकाशाचा खेळ, बहुतेकदा अंधारी दृश्ये, अर्धवट, ऐकू न येणारे किंवा तोंडातल्या तोंडात बोलले जाणारे संवाद. अशाच विशयावरचा सरफरोश चित्रपट या सर्वांपेक्षा खूपच सरस होता. विषय दहशतवाद असला तरी चित्रपट पाहणे ही दहशत ठरू नये याची सरफरोश मधे काळजी घेतलेली होती. चित्रपट नेत्रसुखद होता.

"गुरुजी एक सांगा काँग्रेस आणी अण्णा द्रमुक मिळुन सरकार बनवु शकते का?" नाही. "तुम्ही म्हटल्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू, नवीन पटनाईक, मुलायम, पवार इ. नेत्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार नाही. मग त्यांनी का पाठींबा द्यावा ह्यांना,या उलट ते बी जे पी ला सपोर्ट का नाही करणार?" यापैकी फक्त पटनाईक आणि नायडू भाजपला पाठिंबा देऊ शकतील कारण त्यांचा मुख्य शत्रू काँग्रेस आहे. पवार, मुलायम, मायावती इ. कधीही भाजपला उघड पाठिंबा देणार नाहीत. १९९६ मध्ये १३ प्रादेशिक पक्ष एकत्र आले होते. त्यांचे एकत्रित संख्याबळ १५० च्या आसपास होते. त्यात जनता दल हा सगळ्यात मोठा पक्ष होता (एकूण ४४ खासदार). काँगेस (१४० खासदार) व डाव्या पक्षांनी (अंदाजे ४५ खासदार) बाहेरून पाठिंबा देऊन (या सरकारमध्ये उजवा कम्युनिस्ट पक्ष सहभागी होता. त्यांचे इंद्रजित गुप्ता व चतुरानन मिश्रा हे दोन खासदार केंद्रीय मंत्रीमंडळात होते) या पक्षाच्या आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यात जनता दलाचा देवेगौडा पंतप्रधान झाला. त्याच्याआधी ज्योती बसू व विश्वनाथ प्रताप सिंग यांचा पंतप्रधानपदासाठी विचार झाला होता. कम्युनिस्ट पॉलिट ब्यूरोने ज्योती बसूंना पंतप्रधान होण्यासाठी परवानगी नाकारली तर बोफोर्स प्रकरणामुळे काँग्रेसने वि.प्र.सिंगांना पाठिंबा द्यायला नकार दिला. त्यामुळे देवेगौडाला लॉटरी लागली. २०१४ मध्ये काय होण्याची शक्यता आहे? काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना अंदाजे १४०-१५० जागा मिळतील व युपीए व एनडीए या आघाड्यांना अंदाजे अनुक्रमे १७५ च्या आसपास व २०० च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. युपीएला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या अजून १०० जागा मिळणे खूप अवघड आहे कारण डावे पक्ष (ज्यांना ३५-४० च्या आसपास जागा मिळतील), तेलगू देसम, बिजू जनता दल इ. प्रादेशिक पक्ष काँग्रेसला पाठिंबा देणार नाहीत. त्याऐवजी १९९६ सारखी १३-१४ प्रादेशिक पक्षांची आघाडी होउ शकते ज्यात तेलगू देसम, अद्रमुक, निजद, बिजद, संजद, आगप, तृणमूल काँग्रेस, भारतीय लोक दल इ. प्रादेशिक पक्ष असू शकतील. या पक्षांच्या आघाडीला काँग्रेस व डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला तर तिसर्‍या आघाडीचे सरकार येऊ शकते. जर काँग्रेसने पाठिंबा नाही दिला तर यातले काही पक्ष एन्डीएच्या वळचणीला जाऊन भाजपचा पंतप्रधान होऊ शकेल. भाजपला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसला तिसर्‍या आघाडीला पाठिंबा द्यावाच लागेल. पण तो देताना काँग्रेस आपल्या अटींवर पाठिंबा देईल. वेगवेगळ्या राज्यात आपला मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या तेलगू देसम, बिजद, भालोद इ. पक्षाच्या प्रमुखांना कॉन्ग्रेस पंतप्रधान होऊ देणार नाही. आपल्याशी कायम दगाबाजी करणार्‍या पवार व मुलायमला काँग्रेस पाठिंबा देणार नाही. मग फक्त २ च पर्याय राहतात. जयललिता व नितीशकुमार. अद्रमुकशी काँग्रेसने भूतकाळात अनेकदा युती केली आहे. त्यामुळे यावेळी जयललिताला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा नकार नसेल व त्यामुळे तामिळनाडूत क्षीण झालेल्या द्रमुकपेक्षा एक तगडा सहकारी काँग्रेसला मिळेल. नाहीतर एनडीएतून नितीशकुमारला फोडून काँग्रेस बिहारमध्ये लालू व पास्वान ऐवजी आपल्याला एक तगडा पक्ष साथीदार म्हणून मिळवेल. यामुळे एनडीए दुर्बल होईल व काँग्रेसल भविष्यात बिहारमध्ये पुन्हा स्थान मिळविता येईल. म्हणून जयललिता किंवा नितीशकुमार असे दोनच पर्याय काँग्रेसकडे उरतात. कदाचित अजितसिंग हा गडद अश्व या स्वरूपात पंतप्रधान होऊ शकतो. "इंडीया शायनिंग च्या वेळेस बी जे पी ला जर वीस पंचवीस जागांची कमरतरता भासली असती तर मुलायम एका पायावर तयार होते म्हणे." ही माझ्यासाठी न्यूज आहे. असे कधी वाचल्याचे आठवत नाही. "मुस्लीम लोक आता भावनेच्या भरात जाउन मतदान तरी नाही करीत्,त्यांचा पसंतीक्रम हा आपल्या लोकांच्या निवडुन येण्याच्या शक्यतेला धरुन असतो.(जसे की नांदेड मध्ये घडल)आणी आपण टाळ ठोकत बसतो" बरोबर. बहुसंख्य मुस्लिम प्रथम स्वधर्मीय उमेदवाराला व नंतर भाजप सोडून इतर पक्षाच्या तगड्या उमेदवाराला मत देतात. "

आज काल तर कुणी काही केले कि धार्मिक भावना दुखावली जाण्याची फ्याशानच निघाली आहे. विशेष करून काही विशिष्ठ लोकांच्या भावनाच दुखावतात. मला हेच समजत नाही सिनेमा जो पर्यंत प्रदर्शित होत नाही तो पर्यंत आम्हाला कशाचा सुधाच पत्ता लागत नाही म्हणजे हिरो हिरवीण श्टोरी पण ह्या लोकांना सगळा चित्रपट मिळतो वरून सगळे डयालोग सुधा डिटेल मध्ये कसे मिळतात देवास ठावूक .... मी म्हणतो कमाल हसन ने उलटी केस केली पाहिजे प्रदर्शनाच्या आगोदर चित्रपट इललिगल मार्गांनी बघितला म्हणून (मी समजतो तो काही कायदेशीर मार्गाने विकत वेगेरे घेतला नसणार या लोकांनी )असाच एक तुक्का , मला ह्यातले ज्यास्त काही कळत नाही);-)

तामिळनाडूत चित्रपट प्रदर्शीत झाला म्हणे पण 'बैठकीतून' असा काय तोडगा निघाला त्याचा कै खूलासा वाचायला नै मिळाला. कोणी सांगेल का काय तडजोडी झाल्या त्या ? -दिलीप बिरुटे

कमल हसन देश सोडून जायला तयार झाला होता.. .अखेर रिलीज झाला हा सिनेमा ... पण आता असला सिनेमा काढला म्हणून प्रेक्षक त्याच्या मागे, हा देश सोडून जा, म्हणून लागले आहेत

In reply to by खबो जाप

काहिशी वेगवान कथा, फक्त ९८ कोटी कुठं उधळले आणी,क्लायमॅक्स इतका सहज सोपा का ठेवला आहे हेच प्रश्न मनात राहतात शेवटमात्र एकदम स्पेक्टॅक्युलर अपेक्षित होता त्या बाबतित थोडं निराशा. तालिबान राजवटीच चित्रणं भेदक तरिही कमालिचं संयमीत. कमलची अ‍ॅक्टिंग तर लाजबाब . मी ३/५ रेटिंग देइन. कशाबद्दल बंदी आलि होती हा तर प्रश्नच निर्माण होत नाही.

कसला वाद आणि कसलं काय? आजकाल दहापैकी पाच दहशतवादविरोधी चित्रपटात जिहाद असतोच. त्यात काय विशेष? चित्रपट मात्र फसलाय. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सीझोफ्रेनिया आणि अ‍ॅम्नेशिया दोन्ही एकदम झाल्यासारखे वाटले.

एवढ्यातच हा पिच्चर पाहीला. कमल हसनचे अ‍ॅक्टींग चांगले आहे. मात्र एकूण चित्रपट अजिबात प्रभावी वाटत नाही. नेमके काय मांडायचे आहे हे कळत नाही. पण काही प्रसंग वास्तवाच्या जवळ जाणारे असावेत.

कमलहासन या शब्दाचा अर्थ कमळासारखे हास्य असणारा असा आहे. त्याच्या चारुहासन नावाच्या नावाच्या भावानेही काही सिनेमात काम केले आहे. बरीच मंडळी त्या नावाचा उच्च्चार हसन असा करतात.ह्या उच्चारामुळे कमल एकदा चांगलाच अडचणीत आला होता. 'विश्वरूपम' मधील भुमिके च्या खास make up साठी त्याला टोरोन्टोहून लॉस एंजेलिस ला जायचे होते तेंवा त्याला त्याच्या नावाच्या हसन अशा उच्चारामुळे चौकशी साठी विमानतळावर ५ तास थांबवले होते असे वाचनात आले.