Skip to main content

वेदीवर या राही मी स्थिर

लेखक हिटलर यांनी बुधवार, 30/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत. देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई ` ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही ! समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll भू विभाजने कष्टी झाले त्या व्रणीतांचे करण्या सांत्वन फास घेतला गळ्याभोवती l परी नाही विचलित माझे मन दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन काया जरी हि वडिलोपार्जित l रक्षा कायेची माझे धन धन ते टाका सिंधूमध्ये अखंडत्व देशा आल्यावर वेदीवर या राही मी स्थिर ll ३ ll

वाचने 30428
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

नथुराम गोडसे किंवा कवितेचे प्रकाशक यांनी या संकेतस्थळावर ही कविता टाकण्यास परवानगी दिली आहे का? अन्यथा ते लेखनचौर्य ठरेल.

In reply to by आजानुकर्ण

-१ असहमत आहे. साहित्यिकाच्या मृत्यूनंतर केवळ ६०वर्षे प्रताधिकार कायदा लागु असतो. आता ही कविता प्रताधिकार मुक्त आहे. बाकी हा धागा आणि कविता अत्यंत हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे याबद्दल सहमती

In reply to by ऋषिकेश

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का? नथुरामचा कॉंटेक्स्ट काढून वाचता येइल का? तशी वाचल्यास कशी वाटते?

In reply to by मन१

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का?
कविता ज्या घटनेनंतर लिहिली गेली आहे त्यानंतर अशी कविता प्रत्यक्ष खुन्याने लिहिणे हे मलातरी हास्यास्पद, अनुचित आणि प्रसंगी खोडसाळ वाटते. (हा धागा तसा आहे याबद्दल दुमत नसावे)
नथुरामचा कॉंटेक्स्ट काढून वाचता येइल का?
नाही वाचता येणार
तशी वाचल्यास कशी वाटते?
गैरलागू

In reply to by मन१

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का? त्यात गांधीहत्येचे जस्टीफिकेशन असल्यास नक्कीच अनुचित आहे. कारण गांधीहत्येस एका अर्थी "देशभक्ती जर पाप असे तर..." असे त्यात म्हणलेले दिसते. जर गांधीहत्या हा कॉन्टेक्स्ट नसला तर ती कविता नथूरामची असली तरी गैर वाटणार नाही. पण मग तसे करण्यासाठी त्यातील काही ओळी बदलाव्या लागतील, उ.दा. न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही (कुठला न्याय? ) ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी, केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही ! (गांधीजी खल होते?) दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन (जर ५५ कोटी हाच मुद्दा त्याचा त्यावेळेस असला, तरी त्यावर उत्तर गोळ्या झाडणे?)

In reply to by ऋषिकेश

हापोथेटिकल केसः- नथुरामने ही कविता खुनापूर्वी कित्येक दिवस प्रकाशित केली असती, आणी तेव्हा तुम्ही ती वाचली असती तर तुम्हाला ठीक वाटली असती का? खरच इतकी वाईट ही कविता आहे का?

In reply to by मन१

हायपोथेटिकल उत्तरे:
नथुरामने ही कविता खुनापूर्वी कित्येक दिवस प्रकाशित केली असती, आणी तेव्हा तुम्ही ती वाचली असती तर तुम्हाला ठीक वाटली असती का?खरच इतकी वाईट ही कविता आहे का?
सांगता येत नाही. मुळात भारतीय इतिहासात नथुराम याचे अस्तित्त्वच फक्त एका क्षणाचे आहे. त्याच्या आधी तो काय होता त्याला फारसे महत्त्व नाहिच

In reply to by ऋषिकेश

नथुराम यांचे तुमच्या मते अस्तित्व एक क्षणाचे असले तरी माझ्या सारख्या अनेकांसाठी ते खुप महत्वाचे आहे. नथुरामांनी फक्त एक च चुक केली, ज्या माणसाला नंतर सगळ्या देशानीच अव्हेरला असता त्याला हुतात्मा केले.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम हा शिखंडीचीच आवृत्ती होय. त्याने पराक्रम तरी काय केला तर स्वतःच्या आजोबांच्या वयाच्या देवतुल्य निशस्त्र व्यक्तीमत्वावर गोळ्या झाडुन त्यांचा खुन केला,आणी अनुराधाबाई तुम्ही असल्याच समर्थन करता?

In reply to by बाबा पाटील

नथुरामाने गांधीहत्या करण्या अगोदर कोणते सामाजिक कार्य केले होते ह्याच्या बद्दल अनुराधा बाई काही माहिती देवु शकाल काय?

In reply to by वेताळ

वेताळ बाबा - मी कुठे म्हणले की नथुरामांनी सामाजीक कार्य केले होते. काहिच्या काही माझ्या नावावर खपवताय. मी वर लिहिले च ना की गांधीवध करुन पण चुक च केली. मेल्यामुळे सगळी पापे धुवुन निघाली आणि हुतात्मा पण मिळाले.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम यांचे तुमच्या मते अस्तित्व एक क्षणाचे असले तरी माझ्या सारख्या अनेकांसाठी ते खुप महत्वाचे आहे. ह्यावरुन मला वाटले नथुरामचे अस्तित्व समाजासाठी खुप महत्वाचे होते.त्याने एकच कार्य केले अन त्यात त्याने एका समाजाची पुर्ण वाट लावली.गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीला नथुराम जबाबदार नाही का?

In reply to by वेताळ

नथुराम ला कल्पना नव्हती की महाराष्ट्र इतका जातीयवादानी किडलेला असेल. दंगलीमुळे ज्या समाजाची वाट लागली त्या समाजाचे डोळे उघडले आणि तो फक्त स्वतापुरते बघायला लागला. हे तसे long term मधे चांगले च झाले.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम माथेफिरु नव्हता,त्याने साहित्यनिर्मिती केली.तो विचारवंत होता. खुप विचारांती त्याने निर्णय घेतला कि गांधी वधाशिवाय देशाला तरणोपाय नाही म्हणुन शेवटचे टोकाचे पाउल उचलुन गांधी हत्या केली. ह्याचे पुढे काय परिणाम होतील ह्याचा त्याने विचार केला असला पाहिजे.महाराष्ट्र जातियवादाने किडलेला आहे हे देखिल तुम्हा आम्हा सारख्या उच्चवर्णियानी म्हणावे हे आश्चर्यकारक आहे.जे आपण जोपासतो तेच उगवते. असो.एकाद्या नेत्याची हत्या होते तेव्हा त्याचे अनुयायी त्याला मारणार्‍या समाजाचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न करतो हे पुर्वी पासुन घडत आहे. ते काय गांधी हत्येनंतर चालु झाले हे म्हणणे सयुक्तिक नाही.

In reply to by वेताळ

अखंड हिंदुस्थान हीच त्याची मागणी होती म्हणून ? त्याने केलेल्या कृत्याचा जरूर निषेध करू शकता. लोकशाहीत हा अधिकार आहे आपल्याला. पण बिनबुडाचे आरोप करणं हे देखील गांधीवादात येत का ? छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे पथभ्रष्ट देशभक्त होते अस अहिंसावादी मिस्टर गांधीच मत होत. मग नथूरामच काय घेऊन बसलात गांधी भक्तांसाठी ती एक अतिशय क्षुद्र व्यक्ती आहे.

..पण गांधीजींच्या प्रसन्न छायाचित्राच्याच खाली, आणि या 'राष्ट्रनायकाला श्रध्दांजली' अशा शब्दांना लगटून असलेल्या या कवितेचं उद्धरण हे नक्कीच खटकलं (अगदी धागालेखकाचा तसाच हेतू नसणार याची जाणीव असूनही), तसंच -अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे वगैरे मान्य करूनही- आजच्याच दिवशी हा धागा टाकणं हे अनौचित्यपूर्ण आणि खोडसाळपणाचं वाटलं हेही नम्रपणे नमूद करू इच्छितो.

In reply to by बहुगुणी

१००% सहमत. असाच औचित्यपूर्ण निषेध अन्य ठीकाणी देखील होईल ही आशा.

In reply to by बहुगुणी

devil's advocate बनूनः- नथुरामला ज्या दिवशी फाशी दिली गेली त्या दिवशी त्याचा फोटो एखाद्या संस्थळावर लागेल काय? कारण त्याने वैयक्तिक फायद्यासाठी काही केलें नाही, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही आणि केले ते काही प्रमाणात मातीशी इमान राखण्याच्या भावनेतूनच केले असे मानणारा एक गट आहे. तर त्या गटातील लोकांनी संस्थळावर फोटो टाकला जावा अशी मागणी करावी काय? समजा ते झालं तर त्याच्या फोटोअच्या खाली कुणी "दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल" ह्या कवितेचं रसग्रहण टाकलं तर त्यास तुम्ही अनौचित्यपूर्ण म्हणाल का?

In reply to by मन१

>>नथुरामला ज्या दिवशी फाशी दिली गेली त्या दिवशी त्याचा फोटो एखाद्या संस्थळावर लागेल काय? फोटो नाही पण .....

In reply to by नितिन थत्ते

धन्यवाद या संदर्भाबद्दल. अनेक लोकांच ३ वर्षात मत-परिवर्तन zआलेल दिसताय. त्यावेळेस आडून आडून नथुराम च समर्थन करणारे अनेक लोक आज गांधीजी याना भाव-विभोर वैइगेरे श्रध्ांजली अर्पण करताना दिसत्यात आज ; )

In reply to by पिंपातला उंदीर

याच मन:परिवर्तन गांधीजींचा फार विश्वास होता. याच संस्थळावर क्लिंटन, ऋषिकेश इत्यादी लोकांनी आपलं गांधीसंदर्भात मतपरिवर्तन झाल्याचं नोंदवलं आहे. मी ही या दृष्टीने त्याच पंथातली. तर हे मनपरिवर्तन कधीही होऊ शकतं. त्याबद्दल उपरोध व्यक्त करणं योग्य वाटत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे. गांधीजींच्या तत्वज्ञानात ही एक फार चांगली सोय आहे. मी त्यांची पुस्तके वाचल्यावर मला कळलं की गांधीजी हे किती थोर राजकारणी होते ते.आजच्या औद्योगिक नागरसंस्कृतीस गांधीजींचे विचार अगदी पोषक आहेत. साध्या साध्या प्रसंगांमधून गांधीजींचे तत्वपालन दिसते. उदाहरणार्थ, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात त्यांनी सांगितलेला एक प्रसंग पाहा. गांधीजी प्रवासाला निघाले. त्यांनी रेल्वेचे थर्डक्लासचे तिकीट काढले (साधेपणा). तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून ते सेकंड क्लासमध्ये जाऊन बसले (सविनय कायदेभंग), अर्धा प्रवास झाल्यावर टीसीने त्यांना पकडले आणि पूर्ण प्रवासाच्या सेकंड क्लासच्या व थर्डक्लासच्या तिकीटाच्या किंमतीतला फरक दंड म्हणून आकारला. परंतु, केवळ अर्धाच प्रवास सेकंड क्लासने केला म्हणून अर्धाच दंड भरण्यावर अडून बसले (सत्याग्रह) आणि हे सगळे चालू असताना त्यांनी टीसीवर एकदाही हात उचलला नाही (अहिंसा). हे असे करायला फार धैर्य लागते. आज गांधीजींच्याच स्वतंत्र देशाचा नागरिक असूनही हे असे काही करण्याची माझी हिंमत नाही. ती यायला फार मोठी साधना लागेल. डेरिक जेन्सन नावाचा एक वाट चुकलेला पर्यावरणवादी लेखक आहे. त्याने 'एन्डगेम' नावाचे एक पुस्तक लिहीले आहे आणि त्यात त्याने सिव्हिलायझेशनची काही मूळ तत्वे मांडली आहेत. त्यातले एक तत्व असे आहे की नागरसंस्कृतीत खालच्या माणसाने केलेली हिंसा अक्षम्य असते पण वरच्या माणसाने खालच्या माणसाची हिंसा केली तर ती नुसती क्षम्यच नाही तर स्वीकारार्ह आहे. (उदाहरणांसाठी मूळ पुस्तक पाहावे). भारतामध्ये आधुनिक आणि औद्योगिक नागरसंस्कृतीचा विकास होण्यासाठी गांधीजींने शिकवलेल्या अहिंसेचा फार मोठा वाटा आहे. तरीही अजूनही अनेक माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधळे लोक हातात शस्त्र घेतात आणि आपल्यापेक्ष वरच्या वर्गातल्या लोकांविरुद्ध हिंसा करतात. त्यांचेही लवकरात लवकर मनःपरिवर्तन होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! तसे झाले तर ती बापूजींना एक खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by नगरीनिरंजन

'गांधीजींने' ही टंकनचूक आहे. ते 'गांधीजींनी' असे वाचावे. 'आपल्यापेक्ष' हे 'आपल्यापेक्षा' असे वाचावे. मिपावर प्रतिसाद स्वसंपादनाची सोय मिळेपर्यंत असहकार आंदोलन करण्याची मी हाक देत आहे. हा प्रतिसाद वाचणार्‍याने त्यानंतर स्वसंपादनाची सोय मिळेपर्यंत मिपावर एकही अक्षर लिहू नये असे मी आवाहन करतो. गांधीजींना श्रद्धांजली म्हणून हे आंदोलन यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.

In reply to by नगरीनिरंजन

गांधीजींचं सर्वच तत्त्वज्ञान मला ग्राह्य वाटत नाही. उदा: हा सेकंड क्लास-थर्ड क्लासचा प्रसंगही देता येईल. पण त्यापुढच्या काळात कायदेभंग केल्यानंतर तर जी शिक्षा होईल ती भोगायला ते तयार असत. याला मनःपरिवर्तन म्हणता येईल. एकंदर गांधींजींचे समाजातल्या हलक्या मानलेल्या लोकांकडे (दलित, स्त्रिया इ.) बघण्याचा दृष्टीकोन दया, अनुकंपा अशा प्रकारचा होता. मला तो ही पटत नाही.
अजूनही अनेक माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधळे लोक हातात शस्त्र घेतात आणि आपल्यापेक्ष वरच्या वर्गातल्या लोकांविरुद्ध हिंसा करतात. त्यांचेही लवकरात लवकर मनःपरिवर्तन होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! तसे झाले तर ती बापूजींना एक खरी श्रद्धांजली ठरेल.
उद्या राजकारणी आणि/किंवा सरकारी बाबूंनी आपल्याकडे नसलेली जादूची कांडी फिरवल्यामुळे माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधांचं खरोखरच मनःपरिवर्तन झालं तर त्यांच्याबद्दल उपरोध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं आपल्याहीसाठी शहाणपणाचं असेल. नाहीतर शिवाजीचा राज्याभिषेक का झाला या चर्चा आणि शिवजयंतीची सुट्टी खरोखरच वांझोटी म्हणावी लागेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधांचं खरोखरच मनःपरिवर्तन झालं तर त्यांच्याबद्दल उपरोध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं आपल्याहीसाठी शहाणपणाचं असेल.
अर्थातच. पण ती भविष्यातली शक्यता झाली. मुळात त्यांचं मनःपरिवर्तन होऊन साध्या माणसापासून शस्त्र हाती घ्यायची वेळ का आली याचा विचार आत्ता करणे आवश्यक आहे. गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.

In reply to by नगरीनिरंजन

मुळात त्यांचं मनःपरिवर्तन होऊन साध्या माणसापासून शस्त्र हाती घ्यायची वेळ का आली याचा विचार आत्ता करणे आवश्यक आहे.
सहमत आहे. ते समजल्याशिवाय मनःपरिवर्तन कसं होईल हे समजणंही कठीणच आहे.
गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.
या बाबतीत माझा पूर्ण पास. तुम्ही बोला, मी ऐकते आणि समजणार नाही तिथे प्रश्न विचारते. गांधीजींचं अहिंसा तत्त्व म्हणून मान्य असणार्‍यांना गांधीजींचं अर्थशास्त्र किंवा सनातनी हिंदू विचार न पटणं हे ही शक्य आहेच. गांधीसमर्थक गांधीभक्तच असतील असंही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गांधीसमर्थक गांधीभक्तच असतील असंही नाही
तेच. बहुतेकवेळा सोयीस्कर अशाच विचारांचाच अधिकृतपणे पुरस्कार केला जातो असा माझा समज झाला असल्याने उद्वेग वाटतो. बाकी काही नाही.

In reply to by नगरीनिरंजन

गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.
मला स्वतःला गांधीजींविषयी आदर असला तरी त्यांची काही मते--कुटीरोद्योग, ब्रम्हचर्य वगैरे पटत नाहीत. अर्थात त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आदरात काही कमी होत नाही.पण एखाद्या व्यक्तीविषयी आदर वाटत असला किंवा बरीचशी मते पटत असली तरी सगळी मते पटलीच पाहिजेत असे थोडीच आहे?

In reply to by क्लिंटन

मलाही त्यांचे बरेचसे विचार पटत नसले तरी आदर आहेच. त्याचप्रमाणे सावरकर, भगतसिंग आणि इतर सशस्त्र क्रांतिकारी लोकांबद्दलही आदर आहेच. पण दुर्दैवाने सहिष्णुतेचा दावा़ करत असलो तरी सगळ्यांना समान वागवणे होताना दिसत नाही. गांधींचे (आणि एकतर्फी अहिंसेचे) प्रस्थ अंमळ जास्तच झाले आहे.

In reply to by नगरीनिरंजन

+ १००, जे जे जिथुन चांगले वाटेल, पटेल आणि पचेल ते ते तिथुन तिथुन घ्यावं या माझ्या वैयक्तिक मताचा मला पुर्ण आदर आहे.

In reply to by बहुगुणी

आजच नव्हे तर सध्याच्या काळात कधीही ही कविता अनुचितच आहे. देशभक्तीच्या या कल्पना आता खुळचटपणात जमा होतात आणि कविता हास्यास्पद वाटते. एक माणूस म्हणून गोडसेंबद्दल मात्र वाईट वाटते, ज्या कल्पना आज खुळचट वाटतात (तेव्हाही बहुतेकांना वाटत असतील कदाचित) त्यावर प्राणपणाने निष्ठा ठेवून त्यांनी स्वतःचे आयुष्य वाया तर घालवलेच पण मृत्युनंतरही 'माथेफिरू' म्हणवून घेण्याची वेळ आणून ठेवली.

In reply to by नगरीनिरंजन

आणि गांधी वध करणारा माणूस जर निळ्या किंवा हिरव्या झेंड्या खालचा असता तर त्यालाही समस्त देशाने असेच माथेफिरू म्हणून झिडकारले असते का हो?
ज्या कल्पना आज खुळचट वाटतात (तेव्हाही बहुतेकांना वाटत असतील कदाचित)
बाकी अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणे हे जर खुळचट पणाचे लक्षण असेल तर आजकाल बाहेरच्या देशात जाऊन चाकरी करणे अति शहाणपणाचे लक्षण आहे का?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

आणि गांधी वध करणारा माणूस जर निळ्या किंवा हिरव्या झेंड्या खालचा असता तर त्यालाही समस्त देशाने असेच माथेफिरू म्हणून झिडकारले असते का हो? >> +१०००००००००००००००००

In reply to by अनुराधा१९८०

मग भगवा दहशतवाद म्हटले कि तुमची का फाटते.गुन्हेगारी कृत्याला रंग द्यायचा का प्रयत्न करता? गांधी हत्येचे समर्थन करताच येत नाही.

In reply to by चेतनकुलकर्णी_85

आजकाल बाहेरच्या देशात जाऊन चाकरी करणे अति शहाणपणाचे लक्षण आहे का
अति नसले तरी शहाणपणाचे लक्षण आहे. आपले पंतप्रधानही नुकतेच म्हणाले की जास्तीत जास्त लोकांनी परदेशात जाऊन काम करावे म्हणजे देशाला परकीय चलन मिळेल. त्याचं काय आहे की देशातच राहणार्‍या देशभक्त लोकांना देश महासत्ता व्हावा म्हणून देशी/परदेशी गाड्या घेऊन चालवायच्या असतात आणि त्या गाड्यांना परदेशी तेल लागते आणि ते तेल मिळवायला परदेशी चलन लागते. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पाहण्यातच सगळा वेळ जात असल्याने देशांतर्गत देशभक्तांना निर्यात वाढवायला फुरसत मिळत नाही म्हणून मग आपल्या बिचार्‍या पंतप्रधानांवर काही नाही तर किमान माणसे तरी निर्यात करू असे म्हणायची वेळ येते.

नथुराम गोडसेंनी कधीही गांधीजींचा इतका द्वेष केला नसेल, जितका तथाकथित नथुरामभक्त करतात ! मरणान्तानि वैराणि.......|

In reply to by कवितानागेश

नथुराम गोडसेंनी कधीही गांधीजींचा इतका द्वेष केला नसेल, जितका तथाकथित नथुरामभक्त करतात ! पहीला मुद्दा किती वास्तव आहे अथवा नाही याची कल्पना नसली, तरी, या वाक्यातून व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत!

१) की "त्याने हिंदुधर्मीयांच्या रक्षणासाठी व त्यांच्यावर फाळणीकाळात झालेल्या अत्याचाराच्या बदल्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात सर्वोच्च स्थान असलेल्या नेत्याचा खुन केला" असं वाटतयं, हेच ? २) की त्याला गांधी कर्तुत्वात महान न्हवते, त्यांच्या आंदोलनात अजिबात ताकत न्हवती, इंग्रजांना त्यांचा धाक वाटावा असे सर्वोच्च नेतृत्व न्हवते, त्यांची विचारसरणी व वागणुक देशाला स्वातंत्र देण्यासाठी अतिशय कुचकामी होती, इंग्रजांना पराकोटीची मदत करणारी होती, थोडक्यात आज गांधि द्वेश्टे महात्मा गांधिची जी किंमत करतात तिच किंमत इंग्रज गांधिची करत होते ? किंबहुना महात्मा गांधी त्यांच्या खिजगणीतही न्हवते ? असं काही म्हणायचं आहे ? जर नथुरामला मुद्दा क्रमांक दोन बद्दल काही संदेश कवितेतुन द्यायचा नसेल तर आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी असताना त्यांनी स्वातंत्र्य मिळवायला काय केलं याचे गोडवे/पोवाडे गायले पाहिजेत. स्वातंत्र्याची पहाट दिसल्या नंतर भारतीय धर्मांधांकडुन कसं शेण खाल्ल गेलं, नेमके कोणते अत्याचार कोणावर कसे झाले यावर चर्चेचा आज नक्किच दिवस न्हवे. स्वातंत्र्यानंतर भारतियांनी जे शेण खाल्लं त्याची कारणमिमासां करण्याची नेमकी हि वेळही न्हवे. ज्यांनी परक्यांविरुध्द उत्कृष्ट लढा दिला त्यांचे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्याबद्दल पुण्यतिथी दिवशी फक्त कौतुकच झाले पाहिजे, अन्यथा तो भारत देशाचा अपमान होय, एक प्रकारे राष्ट्रद्रोहच. आणि त्यांच्या ज्या वर्तनाचा आपल्यांना जो काही त्रास झाला त्यावर विचारमंथनाला ३६५ दिवस आहेतच की अगदी मस्त कमानी उभारुन फ्लेक्स लावुन ही कविता भारतियांच्या समोर आणुया, पण ते उरलेले ३६५ दिवस. आजचा दिवस हा परकीयांना कशी माघार घ्यायला लावली त्याचं कौतुक करण्याचाच होयं. धागा खरं तर अप्रकाशित केला जावा.

In reply to by अग्निकोल्हा

आजचा दिवस हा परकीयांना कशी माघार घ्यायला लावली>>> कसली माघार आणि काय? भारतात एकावेळी १ लाख इंग्रज पण नसायचे ( हे खरे आहे अतिशयोक्ती नाही ). त्यांनी जे काही राज्य केले ते संपूर्ण पणे भारतीय सैन्य आणि भारतीय पोलिसांच्या बळावर. सैनिकांच्या मनात आले असते तर एका क्षणात इंग्रजांना राज्य सोडावे लागले असते. त्यामुळे जो काही so called लढा करावा लागला तो भारतीय लोकांविरुद्ध.

In reply to by अनुराधा१९८०

गांधींचेच विचार तुम्ही सांगताय असं नाही वाटत तुम्हाला? जसे भारतात एका वेळी १ लाखाहून अधिक इंग्रज नसायचे तशीच भारतीय सैन्य आणि भारतीय पोलीस यांची संख्याही फार नसायची (१० कोटी जनतेच्या तुलनेत). भारतीय इंग्रजांना 'सहकार्य' करतात म्हणून इंग्रज राज्य करू शकतात हेच तर गांधी सांगत होते. त्यासाठीच असहकार वगैरे चळवळी. भारतीयांनी सहकार्य न करण्याची अंतिम परिणतीच 'नाविकांच्या बंडाच्या' रूपाने पहायला मिळाली. नाविकांच्या बंडामुळे स्वातंत्र्य मिळाले असे नाही. कारण नाविकांचे बंड झाले तोवर स्वातंत्र्य हे अगोदरच 'जस्ट राउंड द कॉर्नर' होते. कदाचित त्या बंडाने प्रक्रियेला वेग आला असू शकेल.

In reply to by अनुराधा१९८०

जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक ह्यानी खरेतर जनतेचा ब्रेनवॉश करायला हवा होता व इंग्रजांविरोधात आघाडी उघडुन भारत स्वतंत्र्य करायला हवा होता. त्याच्या चुकीचे खापर तुम्ही गांधीजीच्या माथी का मारता आहात.गांधीजी नी दुसरा मार्ग निवडला आणि तो यशस्वी केला.

अतिशय अप्रस्तुत आणि खोडसाळ विकृत धागा. मरणानंतर वैर संपत / संपवावं असं आपली संस्कृती सांगते. संपादक महोदयांनी कृपया लक्ष द्यावे. हा धागा अप्रकाशित करण्यात यावा. जमल्यास हिटलर यांचे सदस्यत्व काढून घ्यावे हि विनंती.

गांधींशी माझ वैर नाहीय. पण नथूराम यांनी गांधीहत्या का केली हे देखील लोकांना कळल पाहिजे. तो कुणी माथेफिरू नव्हता. कवितेत गांधीना उद्देशून एकही अपशब्द नाहीय.ज्या दिवशी हि घटना घडली तो दिवस मला योग्य वाटला हा धागा प्रकाशित करण्यासाठी. गांधींचा अवमान करण्याचा हेतू नाही हे स्पष्ट करतो.

In reply to by हिटलर

कवितेत गांधीना उद्देशून एकही अपशब्द नाहीय. म्हणून अपकृत्य अर्थात गोळ्या झाडणे चालते का? तो माथेफिरू नसेल कदाचीत पण शस्त्रहीन व्यक्तीची आणि ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही) हत्या करणारा, म्हणूण खुनी नक्कीच होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन असमर्थनीय आहे.

In reply to by विकास

तो माथेफिरू नसेल कदाचीत पण शस्त्रहीन व्यक्तीची आणि ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही) हत्या करणारा, म्हणूण खुनी नक्कीच होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन असमर्थनीय आहे.
अधिकारहीन सदस्यांची मते, ही एखाद्या अधिकार्‍याला खोडसाळ वाटतात म्हणून अधिकाराचा वापर करून उडवली जातात तेंव्हा ते समर्थनीय असते काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

येथे म्हणल्याप्रमाणे : "येथे एक खुलासा करणे आवश्यक आहे की सल्लागार हे संपादक नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संपादकीय विषयावर चर्चा न करता अन्य विषयांबाबत त्यांचा सल्ला घेऊ शकता." :-)

In reply to by विकास

विकासशेठ माफी करा बरं का. तो प्रतिसाद तुम्हाला उद्देश्यून नाही, तर तुमच्या वाक्यांची मदत घेऊन अधिकारी लोकांना प्रश्न विचारायचा प्रयत्न होता. प्रतिसादाखाली खुलासा करण्याचाच राहून गेला. अर्थात हा प्रतिसाद लिहिताना तुम्ही 'सल्लागार' आहात हे बिलकूल देखील डोक्यात नव्हते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नो प्रॉब्लेमो! :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अधिकारहीन सदस्यांची मते, ही एखाद्या अधिकार्‍याला खोडसाळ वाटतात म्हणून अधिकाराचा वापर करून उडवली जातात तेंव्हा ते समर्थनीय असते काय?
एकदम बरोबर प.रा.शेठ :)...आपल्याकडे रिकामटेकडे कार्यकर्ते आहेतच अधिकाराचे गैरवापर करणारे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रिकामटेकडे कार्यकर्ते
ऑक्झिमोरॉन आवडून गेला ;) बाकी, "काश्मिर" होण्याचे पोटेन्शियल ह्या धाग्यात आहे. तेव्हा पॉपकॉर्न घेऊन बसावे, हे उत्तम!!

In reply to by अनुराधा१९८०

दिल को खुश करनेको गालिब ये खयाल अछा है. व्याकरणदृष्ट्या हे वाक्य ' दिल खुश करनेको गालिब ये खयाल अच्छा है' असं असायला हवं होतं बहुधा. अवांतर - तेच तेच वाद घालुन कंटाळा आल्यानं मराठी संस्थळांवरच्या हिंदित लिहिलेल्या उर्दुचं व्याकरण' या विषयावर वाद सुरु करावा ही इच्छा आहे म्हणुन हा प्रतिसाद.

In reply to by ५० फक्त

व्याकरणदृष्ट्या हे वाक्य ' दिल खुश करनेको गालिब ये खयाल अच्छा है' असं असायला हवं होतं बहुधा.
माझ्या ऐकण्यात हे "दिल को खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा हैं" असं आहे.. ( संदर्भ : "इक बराम्हण ने कहा हैं, के ये साल अच्छा हैं" ही जगजीतसिंगानी गायलेली गझल.. आणि त्यात "बराम्हण" असंच म्हटलंय.." ) बाकी कविता पटली नाही.. आणि वर ज्यांनी ज्यांनी "गांधीजींना देशाने अव्हेरले असते" असे म्हटले आहे, ते पटवून देऊ शकतील का? आणि "गांधीवाद्यांची" बिलं गांधींच्या नावाने फाडणं, म्हणजे "डार्विनच्या माकडांचा नंगानाच" टायपातलं होणार.. ;-)

एखाद्या माणसाची हत्या झाल्यावर, त्याच्या पुण्यतिथीला तुम्ही श्रद्धांजली वाहणार कि त्याचा खून करणाऱ्याच मनोगत लिहिणार? मनोगत लिहियाला ना नाही. पण आजच हा दिवस मात्र खचितच श्रद्धांजली वाहून स्मरण करण्याचा आहे. तो संकेत तुम्हाला पाळता आला नाही. तुम्ही एका सार्वजनिक संस्थळावर लिहित आहात हे भान सुटू द्यायला नको होते.

In reply to by बोलघेवडा

तो ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा प्रश्न नसावा का? एखाद्याला तो त्या मृत व्यक्तीच्या तथाकथित कर्तृत्वाला स्मरण्याचा दिन वाटेल तर एखाद्याला तो त्या व्यक्तीप्रमाणे कसे वागू नये हे स्मरण करण्याचा असेल. काय करायचे हे ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीवर अवलंबून. म्हणूनच बाळ ठाकरे गेल्यावर (आमच्या दृष्टीने) खोडसाळ)विधाने करणार्‍या फारूख ढोंडी या कन्येस आम्ही काही केले नाही. नंतर तथाकथित सर्वोच्च न्यायालय (का कुठले न्यायालय) यांनी पोलिसांना दोषी ठरवल्यावर तथाकथित अभिव्यक्ती वाल्यांनी जो काय जल्लोष केला त्यावरही आम्ही काही केले नाही. त्यामुळे इथेही काही करणार नाही. धागाप्रवर्तकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करून टंकुमटंकुम अन्यथाटंकुम याच न्यायाने धागाप्रवर्तकाचा त्याच्या दृष्टीने प्रबोधनाचा हक्क मान्य करून पुढे गेलो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आमच्या दृष्टीने) खोडसाळ)विधाने करणार्‍या फारूख ढोंडी या कन्येस आम्ही काही केले नाही.
असे काही करण्याचे काही विशेष अधिकार आपणाकडे आहेत काय की ते आपण जाणूनबुजून वापरले नाहीत?

सर्व सन्मानीय सदस्यांची आधी माफी मागून मग आपला विचार मांडत आहे.. गांधी, सावरकर, गोडसे आपल्या पचनी पडले आहेत असा गोड गैरसमज करून उगाच नको ते फाटे फोडण्यात काहीही हशील नाही. मुळात आपल्या कबुलीजबाबात गोडसे ह्यांनी "गांधी वधाची" कबुली दिली आहे, "गांधी हत्येची" नाही. गोडसे ह्यांनी महात्मा गांधीचे कर्तुत्व कमी लेखले नाही. हिंदू राष्ट्राच्या त्यांच्या संकल्पनेला गांधींचे फाळणी पुरस्कृत धोरणाने तडा गेला म्हणून हे अप्रिय कार्य त्यांनी केले अशी नोंद दिलेल्या जबानीत दिसून येते. गांधी हत्येची निंदा करून आणि गोडसे द्वेष करून गेल्या ५० वर्षात भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाने देशाचा किती उद्धार केला आहे हे जगजाहीर आहे. त्यात शब्दांची भर घालण्यात अर्थ नाही. पेशवे म्हणाले त्या पुढे जाऊन असे म्हणेन कि आपण कितीही मोठे लेखक झालो तरी गांधी, सावरकर, गोडसे आणि समकालीन legends बाबत आपण भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यांच्या विचारांचे रसग्रहण करता आले तरी आयुष्य सार्थकी लागेल. युध्य जिंकण्यासाठी अर्जुनाने स्वकीयांचा वध केला म्हणून तो नराधम ठरत नाही....... उगाच शब्दाला शब्द जोडून अर्थहीन तर्क करणे मला तरी चुकीचे वाटते. बन्या बापु. अवांतर: माझ्या छटाकभर वाचनात आलेले गांधी जेवढे मला प्रिय आहेत, तेवढाच आदर मला गोडसे आणि विशेषतः त्यांच्या सावरकर भक्ती बद्दल ही आहे.

In reply to by बन्या बापु

खिक् गांधी, सावरकर, गोडसे आणि समकालीन legends बाबत आपण भाष्य करणे योग्य ठरणार नाही गांधी, सावरकर समजू शकतो पण त्या महापुरूषांच्या जोडीला तो गोडसे!! वाचून डोळे पाणावले आणि कीव करावीशी वाटली.

In reply to by ऋषिकेश

आपल्या देशात व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे.. प्रत्येक नाण्याला दसरी बाजू असतेच.. आपण कितीही नाकारली तरीही...

In reply to by अप्रतिम

असणारच.. त्याशिवाय कोणीही उठून आत्मघात करणार नाही.. जसे गांधी आपल्याला प्रिय तसे कायदेआझम त्यांना.. आपल्या संसदभवनात कायदेअझामांचा फोटो आहे.. त्यांच्याकडे गांधींचा आहे का मी बघायला गेलो नाही.. पण कुतूहल जरूर आहे.

In reply to by बन्या बापु

गांधी हत्येची निंदा करून आणि गोडसे द्वेष करून गेल्या ५० वर्षात भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाने देशाचा किती उद्धार केला आहे हे जगजाहीर आहे. त्यात शब्दांची भर घालण्यात अर्थ नाही.
गेल्या ५० वर्षात देशाचे नेमके काय वाईट झाले आहे ते जगजाहीर असूनही मला कळलेले नाही याचे आश्चर्य वाटले. निदान जगजाहीर असल्याचे तुम्ही सांगता म्हणजे तुम्हाला माहीत असेलच. तेव्हा हे नक्की काय वाईट झाले आहे ते कळेल काय? त्याच कालावधीच्या दरम्यान स्वातंत्र्य मिळालेली आफ्रिका व आशियातील इतर राष्ट्रे, व विशेषतः आपले शेजारी देश यांच्या तुलनेत भारत पुढे आहे की मागे? तुम्ही सावरकरांचा उल्लेख केला, व त्यांच्याबद्दल आदर वाटतो हेही लिहिले आहे. सावरकरांचे देशभक्तीव्यतिरिक्त एक दुसरे कार्य म्हणजे मराठीची भाषाशुद्धी. तुम्ही प्रतिसादात कर्तुत्व किंवा युध्य हे शब्द लिहिले आहेत, ते सावरकरांना निश्चितच खटकले असते असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

गेल्या ५० वर्षात देशाचे नेमके काय वाईट झाले आहे ते जगजाहीर असूनही मला कळलेले नाही याचे आश्चर्य वाटले.
डोळ्यांवरची कवचकुंडल काढली तर काय चाल्लय ते दिसेल की...सत्तेसाठी कसली कसली गणितं जमवतं आहेत हे तुम्हाला जर जगजाहीर असुन माहीत नसेल तर औघड आहे बघा. :)...!!

In reply to by आजानुकर्ण

शुद्धलेखनातील चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. संदर्भ गोडसेंना असलेल्या सावरकर भक्तीचा होता, माझ्या नाही.. राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला.. गेल्या ५० वर्षात न सुटलेली काही कोडी: - आजही भारतातील प्रत्येक गावात, घरात वीज नाही. - आजही भारतात लोकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. - महासत्ता असलेला भारत अजून "Infrastructure " मध्ये मागे आहे. - श्रीमंत अजून श्रीमंत आणि गरिबाने २६ रुपयात जेवावं असे महासत्तेच्या महामंत्रांना वाटता आणि ते जाहीरपणे त्याची समर्थने करतात. - आपल्या महासत्तेत ५५ Billionaires आहेत, ज्यांची प्रत्येकाची असेट व्हयालू ३.४ Billion $ आहे आणि तरीही ७५०,००० हून अधिक बांधव ह्या महासत्तेत दरदिवशी उपाशी झोपी जातात ( त्यांच्या कडे पर्याय नसतो). आणि हे सर्व घडत असताना आपण आपली बरोबरी आफ्रिका, इंडोनेशिया सारख्या देशांची करतो आणि म्हणतो कि बघा आमची महासत्ता किती पुढे गेली आहे. लहानपणी शिक्षक एक सुविचार सांगत त्याचा अर्थ तेवढा लक्ष्यात आहे " आपल्या प्रगतीचे मोजमाप आपल्याहून कमी असलेल्यांशी करू नये. त्याने गर्व वाढतो, आपल्याहून प्रगत असेल्यांशी तुलना करा, त्याने प्रगती करण्याची जिद्द नक्कीच वाढेल" असो.. शुद्धलेखनात प्रगती करण्याचे सर्व प्रयत्न करेन.. आणि ह्या प्रतिसादात इंग्रजी शब्द वापरल्या बद्दल क्षमस्व... बन्या बापु ताजा कलम : विषयांतर होते आहे तरीही महासत्तेचे प्रगती पुस्तक आणि त्यावर तज्ञ मंडळीचे विचार तूनळी (youtube ) वर "Many Securities + P sainath " असे शोधल्यावर उपलब्ध आहेत.

In reply to by बन्या बापु

आपल्या प्रगतीचे मोजमाप आपल्याहून कमी असलेल्यांशी करू नये. त्याने गर्व वाढतो, आपल्याहून प्रगत असेल्यांशी तुलना करा, त्याने प्रगती करण्याची जिद्द नक्कीच वाढेल" अहाहा सुंदर. बाकी........माझी उत्तरं - आजही भारतात लोकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. (चूक) - महासत्ता असलेला भारत अजून "Infrastructure " मध्ये मागे आहे. (चूक) - श्रीमंत अजून श्रीमंत आणि गरिबाने २६ रुपयात जेवावं असे महासत्तेच्या महामंत्रांना वाटता आणि ते जाहीरपणे त्याची समर्थने करतात. (चूक) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर अभ्यास वाढविण्यासाठी काही संदर्भ दिलेत तर चुका कमी होतील.. आपला नम्र बन्या बापु

In reply to by बन्या बापु

बन्या बापू, माझ्याकडे कोणतेही संदर्भ नाही. म्हणून माझं व्यक्तिगत मत असं म्हटलं. मला वाटतं वीज जवळ जवळ सर्व गावात वीज पोहचली आहे. आता ती चोवीस तास नसेल. एखाद्या गाव किंवा एवढ्या मोठ्या भारतात पाचेक टक्के अशी गावे असतील जिथे वीज पोहचत नाही. वीज न पोहचण्याची कारणं वगैरे ते वेगळं. आपण सरळसोट विधान करतो म्हणून आपल्याला तसं वाटतं अर्थात माझ्या विधानालाही कोणतेही संदर्भ नाही. राहीलं "Infrastructure " चं आपण म्हणालात तसं आपण तुलना कोणाशी करायची. एक दोन प्रगत राष्ट्रांची की आपण गेल्या पाच पन्नास वर्षात आपल्या सोबत असलेल्या राष्ट्रांची ? आपण तुलनेत बरे आहोत. [संदर्भ नाही] २६ रुपयात अगदी जेवणाची 'थाळी' मिळणार नाही. पण, पोटात काही ढकलण्यासाठी नक्कीच पुरे आहेत, असे वाटते. अर्थात हा विचारही तसा व्यक्तिसापेक्ष असा आहे. 'महासत्तेचे प्रगती पुस्तक आणि त्यावर तज्ञ मंडळीचे विचार काय आहेत, हे समजून घ्यायला नव्या धाग्यावर वाचायला नक्कीच आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर ह्याबाबत आपले दुमत.. वादासाठी वाद ना घालता फक्त एवढेच की वाचनात आलेले "World HRD report ", WHO ने केलेले सर्वेक्षण आणि त्याचे निकाल, तसेच काही जर्मन मित्रांनी एका NGO साठी केलेले सर्वेक्षण आणि Koln मध्ये त्यावर झालेला परिसंवाद ( ज्याला Planning comission चे काही माजी अधिकारी उपस्थित होते ह्यात कुठेही मी वर दिलेली माहिती चुकीची आहे असा संदर्भ मला मिळाला नाही. बाकी सर्वात सोपा आणि विचार करायला लावणारा संदर्भ तू नळी वर आहेच. आपला नम्र बन्या बापु

In reply to by बन्या बापु

युध्य जिंकण्यासाठी अर्जुनाने स्वकीयांचा वध केला म्हणून तो नराधम ठरत नाही....... उगाच शब्दाला शब्द जोडून अर्थहीन तर्क करणे मला तरी चुकीचे वाटते.
नथुराम गोडसे ला अर्जुन अन त्याने केलेल्या क्रुत्याला महाभारताच्या युद्धाची महान उपमा देण्याआधी हा विचार जरुर करा की नथुराम ज्या प्रकारच्या विचारसरणी चे प्रतिक आहे त्या लोकां ची संख्या टिचभर ही नव्हती.. याऊलट ज्या गांधींना त्याने भ्याडपणे मारले ते उरलेल्या सर्व देशासाठी (यात करोडो हिंदू अन मुसलमान दोन्ही येतात) एका देवापेक्षा कमी नव्हते.. प्रचंड मोठ्या समुदयाच्या भावनांना गांधींबरोबरच तिलांजली मिळत असेल तर तसं करणार्याने त्याला वध वगैरे सारखी कितीही सोज्वळ नाव दिली तरीही तो एक 'भ्याड खुन च' होता हे सत्य बदलणार नाही.. यात जर कोणी गोडसेप्रेमी त्याची देशभक्ती शोधत असेल तर सर्व भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात आणणार्या गांधींना देशभक्तांमधे सर्वात अग्रणी मानलं गेलंच पाहीजे. अन त्यांचा खून कधीही समर्थनीय होऊ शकणार नाही!!

In reply to by आनन्दिता

संख्या टिचभर
बरोबर आहे. ज्या लोकांच्या हत्येला अप्रत्यक्षपणे गांधी कारणीभूत ठरले, त्या लोकांमध्ये सुद्धा 'त्या' प्रकारच्या विचारसरणी चे लोक टिचभरच होते. त्यामुळे नथुराम ला त्यांची बाजू घेऊन आत्मघात करायची काहीच गरज नव्हती. किंबहुना हा धडा नथुराम नंतरच मिळाला आहे की अशा लोकांनी मेल्यास टिचभर लोकांचे काहीच जात नाही. त्या उरलेल्या करोडो लोकांनी खुशाल मरावं. नव्हे, त्यांनी मेलंच पाहीजे. कारण तीच त्यांची लायकी आहे.

हा हा हा ... आरं ते हिटलर पल्लं काड्या टाकुन ... नं आपु कनाला तरास करुन झयाचा? पौना भेटल्यावं बगु कि मंगशेक!

In reply to by वसईचे किल्लेदार

असं बर्‍याचदा होते आणि मग मला पुलंनी "म्हैस" लिहून कसा द्रष्टेपणा दाखवला हे जाणवते.

सैतानाचे उदात्तीकरण कशासाठी ? आधीच देशात बाहेरचे हल्ले कमी होत आहेत म्हणुन अश्या प्रवृतींचे स्तोम माजवले जात आहे का ?

In reply to by बाबा पाटील

नथुरामांसारख्या प्रवृत्तीला वाईट ठरवण्याच्या राजकारणा मुळेच देशात बाहेरचे हल्ले होत आहेत.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम नुसता वाइट नाही तर एक विकृती आहे.आणी विकृतींकरिता उपचारांची गरज आहे

देश तरी नक्की एकच आहे ना ? मी तरी हिंदुस्थानातच राहतो, आनी देशविघातक कृत्य करणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठीतरी सैतानच......

आईचा घो त्या नथुरामी कवितेच्या. हा धागा पाहून आधी करमणूक झाली, नंतर मात्र किळस आली. असो. आमची उन्नती अजून झाली नसल्याचेच हे लक्षण आहे असे म्हंतो आणि इनो घेऊन गपगुमान बसतो तेच्यायला.

In reply to by बॅटमॅन

आईचा घो त्या नथुरामी कवितेच्या.
'मिपावरती लोकशाही नाही' असे म्हणणार्‍यांसाठी ही प्रतिक्रिया म्हणजे एक चपराक आहे.

काय झालयं आता स्वातंत्र्य मिळालय. ते ही तुम्हां आम्हाला झळ न पोहोचता. मग उरल काय? तर उचलली जीभ अन लावली टाळ्याला. ते करायला काही विषेश श्रम पडत नाहीत. असेल एव्हढी रग तर उतरा सक्रिय राजकारणात, सोडा तुमच्या ऐषोआरामाच्या एमएनसी नोकर्‍या अन करा थोडा फार प्रय्त्न त्या महात्म्याच्या अंगावरच्या पंचाच्या सुताशी तरी बरोबरी करण्याचा. मग बघु. उगा कुठेही काहिही घरबसल्या कॉपी पेस्ट करता येतं म्हणुन लिहायच आपलं. नुसता वाचाळ्पणा.

In reply to by स्पंदना

अगदी बरोबर अपर्णाताई ... पण काय गम्मत आहे न.. आपला मध्यमवर्ग ( पांढरपेशा समाज ) अश्या झगडणाऱ्या लोकांना वेड्यात काढतो हो.. आणि जी समाजव्यवस्था ( दुर्व्यवस्था म्हणायचे होते ) गांधीवादी सरकारने करून ठेवली आहे ना, त्यात ओवैसी सारखे निवडून येतात आणि तेच येऊ शकतात. लोकशाही मध्ये यथा प्रजा तथा राजा हा न्याय लागू होतो.

दे दि हमे आझादी बिन खड्ग ढाल ? असं असेल तर ज्यांनी देशासाठी बलिदान दिल ते व्यर्थ ठरेल. देश तोडून मागितला आपण दिला..... पण गांधी हट्टामुळे हा विषवृक्ष मुळासकट कापून न टाकता त्याला खतपाणी घातलं कॉंग्रेसने. द्रष्टेपणा नव्हता मिस्टर गांधींकडे. म्हणून हि अधोगती चाललीय. विश्वरूपम हा कमल हसन यांचा सिनेमा मी अद्याप पाहिलेला नाही पण censor boardne ज्या सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे त्याला विरोध करणारे हे कोण? उद्या हिंदुद्वेष्ट्या ओवेसीने केलेल्या भाषणासाठी हे लोक राष्ट्रपती परितोषीकाची पण मागणी करतील. हि अतिशयोक्ती नाहीय. हिंदुनी आता किती सहिष्णू असाव याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. आओ जाओ घर तुम्हारा हे बंद झालं पाहिजे. सर्वधर्मनिरपेक्ष असं काही असेल तर समान नागरी कायदा तरी व्हायलाच पाहिजे.

ह्म्म... रोचक चर्चा चालु आहे. मला व्यक्तीश:गांधींचे सर्वच विचार पटत नाही,त्यात अंहिंसा हा विचार ! आत्म संरक्षण हा प्रत्येक प्राण्याचा (मनुष्या सकट) अंगिभूत गुणधर्म आहे असे मला वाटते,आणि अश्या क्षणी ( आत्म संरक्षण करतना) हिंसा होउ शकते. समोरचा शस्त्र घेउन तुमचे मुंडके उडवायला आला आणि तुम्ही त्याचे मनःपरिवर्तन होईल असे विचार घेउन बसलात तर तुंमचे शिर धडावेगळे व्ह्यायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.(क्वचितच एखादा अपवाद असु शकतो.) जेव्हा मोठ्या प्रमाणात हिंदुंवर अत्याचार होत होते,हिंदु स्त्रीयांवर बलात्कार होत होते तेव्हा गांधींजींनी हिंदुंना सांगितले की तुम्ही विरोध करु नका,स्त्रीयांनी बलात्कार करणार्‍याला विरोध करु नये असे त्यांनी म्हंटले ! संदर्भ :- 6th July, 1926, edition of the Navajivan, Gandhi wrote: “He would kiss the feet of the (Muslim) violator of the modesty of a sister” (D Keer, Mahatma Gandhi, Popular Prakashan, p. 473). Just before the partition, when both the Hindu and Sikh women were being raped by Muslims in large numbers in West Punjab, Gandhi advised them that if a Muslim expressed his desire to rape a Hindu or a Sikh lady, she should never refuse him but cooperate with him. She should lie down like a dead with her tongue in between her teeth, advised Gandhi (Lapierre and Collins, p. 479). आज जेव्हा हिंदुस्थानात स्त्रीयांवर बलात्कार होत आहेत,तेव्हा बलात्कार्‍याला फाशी किंवा त्याचे लिंग कापुन टाकण्याची भाषा केली जाते,पण मग गांधींजींची तत्वे लागु करायची झाली तर्,पहिले त्याचे मनःपरिवर्तन केले पाहिजे आणि त्याला फाशी देता कामा नये,कारण ती हिंसा ठरेल. स्वामी श्रद्धानंद यांनी शुद्धी यज्ञा द्वारे मुसलामान झालेल्या हिंदुंना परत हिंदु करण्यासाठी शुद्धी यज्ञ सुरु केला होता,त्यांचा खुन अब्दुल रशीदने केला,त्याला गांधींजींनी हाक मारली "भाई अब्दुल रशीद" मग मला प्रश्न पडतो अशी हाक नथुराम गोडसेला गांधीवादी मारु शकतील का ? तसेच मीर आलम याने 10th February 1908 रोजी गांधींजींना मारले (लाथा बुक्यांनी / काठ्यांनी) आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या व्यक्ती बद्धल कुठेही विरोध झाल्याचे मला ठावुक नाही. आता गांधींजींच्या सत्याचे प्रयोगचा उल्लेख वरती एका प्रतिसादात आला म्हणुन काही इतर माहिती इथे देतो... Sarla devi (फोटो जालावरुन घेण्यात आलेला आहे.) गांधीजींचे अनेक स्त्रीयांशी संबंध असल्याचे म्हंटले जाते,त्यात एक नाव आहे सरला देवी.ही रविंद्रनाथ टागोरांच्या मोठ्या बहिणीची मुलगी. सरलादेवी शिवाय गांधीजींचे इतर काही स्त्रियांबरोबर संबंध असल्याचेही बोलले गेले. यात ब्रिटिश एडमिरलची मुलगी मेडेलीन स्लेड, सुशीला नायर आणि दोन मानसकन्या मनु तथा आभा गांधी यांचे नाव आहे. सत्याचे प्रयोग हे गांधींच्या कुटुंबियांना आणि आश्रमातल्या लोकांना आवडत नव्हते ! Satyache pryog या प्रयोगात त्यांच्या "मानस कन्या"सुशीला नायर आणि मनु यांच्या सोबत नग्न होउन अंघोळ करणे,झोपणे असे प्रयोग केले. आता मला एक प्रश्न पडतो की त्यांना "मानस कन्या" म्हणणे आणि आणि याच कन्यांबरोबर असे "सत्याचे" प्रयोग करणे हे कुठल्या तत्वात बसते ? शिवाय आधार घेण्यासाठी अनेक पुरुष मंडळी असताना त्यांना या दोघीच का लागायच्या ? ( हा खोडासाळपणे विचारलेला प्रश्न नाही याची कॄपया नोद घेतली जावी.) काही संदर्भ :- Bharat: An Untold Story Gandhi's Mindless Appeasement of Muslims and the Partition of India मुलाने विरोध केला नसता तर गांधीजींचे झाले असते दुसरे लग्न! *** माझ्या गांधींचा काही विचारांनाच विरोध आहे,आणि मी गांधी द्वेष्टा नाही. कुठल्याही व्यक्तीचा मग ते गांधींजी असोत वा नथुराम गोडसे यांच्या सर्व बाबी आणि विचार समजुन घेण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

In reply to by मदनबाण

आता मला एक प्रश्न पडतो की त्यांना "मानस कन्या" म्हणणे आणि आणि याच कन्यांबरोबर असे "सत्याचे" प्रयोग करणे हे कुठल्या तत्वात बसते ? शिवाय आधार घेण्यासाठी अनेक पुरुष मंडळी असताना त्यांना या दोघीच का लागायच्या ? कारण महिलांची सहनशक्ती हि पुरुषां पेक्ष्या जास्त असते असे गांधी ने म्हंटले होते असे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आठवते... त्यांही हे अनुमान ह्याच प्रयोगावरून काढले असावे असे वाटतेय.....!!!

गदर पार्टीचा इतिहास,अभिनव भारत संघटना,अनेक क्रांतिकारकांची चरित्रे,बंगाल्यातली चळवळ,लाहोर,धाका,मेरठ इथली आंदोलने/कट याविषयीची माहिती,१८५७ च्या १००,१२५,१५० व्या स्मरण वर्षानिमित्त प्रसिद्ध झालेले अनेक विशेषांक मुद्दाम मिळवून वाचले आहेत.याशिवाय काँग्रेस प्रणीत चळवळीचे गोषवारे,मथितार्थ,इतिहास,अन्वयार्थही वाचले आहेत.हे सर्व आणि मी नथुराम,गांधीहत्या आणि मी,५५ कोटी,सहा सोनेरी पाने,वगैरे सर्व वाचल्यानंतर असे मत बनले आहे की सशस्त्र क्रांतिकारकांचे देशप्रेम जाज्ज्वल्य आणि वैय्यक्तिक चारित्र निष्कलंक होते याबद्दल शंकाच नाही आणि ते आदरणीय आहेतच.पण एकूणच त्यांची दूरदृष्टी कमी पडली.त्यांना या प्रश्नाची व्याप्ति समजली नाही असेही म्हणता येईल.तुरळक इथेतिथे एखाद्या इंग्रज अधिकार्‍याची हत्या करणे,तुरळक बाँबस्फोट करणे,एखादे जहाज मद्रास किनारपट्टीवर पाठवून त्यातून मद्रास किनारपट्टीवर मारा करून संपूर्ण मद्रास इलाका ताब्यात येईल अशी अपेक्षा करणे(वीणा गवाणकर यांच्या नाही चिरा नाही पणती या पुस्तकात या केविलवाण्या घटनेचे तपशीलवार वर्णन आहे.)हे सर्व प्रकार इंग्रज सत्तेला आव्हान देण्याइतपत पुरेसे नव्हते.हिटलर आणि जपानशी कॉमन कॉझ (हातमिळवणी?)करणे हे अदूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणाच्या अभावाचे ठळक उदाहरण आहे. शिवाय रक्तरंजित विरोधाला इंग्रज हिंसेने उत्तर देऊ शकत होते.गांधीजींच्या अहिंसात्मक विरोधाला सामोरे जाताना मात्र ते गडबडले.सशस्त्र क्रांतिकारक देशातल्या संपूर्ण जनतेची सहानुभूती अथवा पाठिंबा मिळवू शकले नाहीत.उलट गांधींची चळवळ कान्याकोपर्‍यातल्या माणसाला सामावून घेऊ शकली,त्याच्यापर्यंत पोचू शकली,त्याचा आत्मसन्मान जागृत करू शकली म्हणून ती स्वातंत्र्यासाठीची प्रमुख चळवळ मानली गेली.सशस्त्र क्रांतिकारक नेहमीच एकांडे राहिले. आर्थिक चणचण,गुप्तहेरांचा ससेमिरा दोघांनाही सोसावा लागला.पण गांधीजींसाठी सामान्य गृहिणीने गळ्यातले मंगळसूत्र,हातांतल्या बांगड्या काढून दिल्या.हे प्रेम, हा पाठिंबा सशस्त्र चळवळ मिळवू शकली नाही.व्यापक रणनीती आणि दूरदृष्टीचा अभाव तसेच जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा मिळवू न शकणे यामुळे हा लढा एकंदर स्वातंत्रचळवळीत प्रमुख स्थान मिळवू शकला नाही.देशभक्ती आणि शौर्य होते पण विवेक आणि धैर्य(पेशन्स्)कमी पडले (असे माझे मत आहे).

गांधीं बद्दल आदर आहेच पन गोडसे यान्चा तितका द्वेश हि नाहि वाटत. गांधीं एक व्यक्ति आनि त्यान्चे स्वातंत्र्य मिळन्यातिल योगदान या २ वेगळ्या बाबि आहेत. असहकार चळवळ किवा तत्सम मार्गाने स्वातंत्र्य मिळवुन दिले असते तर त्यान्च्या बद्दल अजुन जास्त आदर असता. बाकि कसाब नि गोडसे यान्चि तुलना अमान्य. कसाब १ पुर्न समाजाच्या विरुद्ध तर गोडसे १ व्यक्ति विरुद्ध. १९२२ मधे चौरी_चौरा नन्तर असहकार आन्दोलन का मागे घेतले? समाज स्वातंत्र्य उपभोग्न्यास योग्य नाहि म्हनुन? कि स्वताच्या तत्वा पेक्शा स्वातंत्र्य कामि किमतिचे वाटले?

In reply to by सुजित पवार

"स्वताच्या तत्वा पेक्शा" इथेच चूक.... ती तत्त्वं, स्ट्रिक्टली स्पिकिंग, त्यांनी शोधलेली नव्हती तर निरनिराळ्या विचारवंत आणि तत्त्वज्ञांच्या विचारांचा अभ्यास करून स्वीकारलेली होती... हे एक.... दुसरे म्हणजे ती तत्त्वे प्राणपणाने जपतच स्वातंत्र्य मिळवायचे आहे हा त्यांच्या लढ्याचा कॉर्नरस्टोन होता. स्वातंत्र्य थोडे उशिरा मिळाले तरी चालेल पण समाज अनुचित सवयी / अनाचार / अनैतिकता यांपासून दूर राहिला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. आणि आपल्याबरोबर लढणार्‍या प्रत्येकाने हे मान्य करूनच मग आपल्याबरोबर यावे असेच त्यांचे म्हणणे होते. चौरीचौरानंतर गांधीजींच्या निर्णयाशी विरोध दाखवत चालू ठेवायचे होते आंदोलन कोणीही! तसेही गांधीजींच्या विचारांना विरोध करून अथवा ते न स्वीकारता, आपापल्या मार्गाने लढणारे क्रांतिकारक व इतर पंथांचे लोक होतेच की... पण सत्य हेच आहे की जन-आंदोलनाच्या मार्गाने एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जो जनाधाराचा रेटा लागतो तो उभा करणे (त्या काळात) केवळ गांधींनाच जमले... असो... "स्वताच्या तत्वा पेक्शा" या शब्दांत गांधीजी स्वार्थी होते वगैरे अशा अर्थाने बोलल्यासारखे वाटले म्हणून लिहिले... (गांधीजी हट्टी होते वगैरे नेहमीचे आक्षेप खरेही आहेत.. पण चौरीचौर्‍याच्या वेळेसतरी त्यांचा हट्ट तत्त्वासाठी होता... आणि एका प्रमाणात हट्टीपणा असल्याशिवाय मोठे काही साध्यही करता येत नाही.)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समाज अता परिपक्व आहे? स्वतन्त्र्या मिळताना त्यान्च्या लढ्यातिल प्रत्येकाला त्यान्चि तत्वे मान्य होति? स्वातन्र्त्य हे आपनाला दुसर्या महायुध्या मुळे मिळाले असेच मला वाट्ते. या पेक्शा १९२० दरम्यान मिळले असते तर खुपच आदर वाढला असता... १९३९ मधे सुभाषचंद्र_बोस यान्च्या काँग्रेस अध्यक्श पदा साठि का विरोध केला? केला ते केला त्याताहि त्यान्चा उमेदवार ति निवड्नुक हारला सुद्धा.

अहिंसेने देशाच्या सीमा आखता येत नाहीत. त्या तलवारीनेच आखता येतात. नेहरू-गांधी यांच्या अहिंसेच्या प्रयोगांमुळे जन्नत ए काश्मीर चा जहन्नुम ए काश्मीर झालाय. मी गांधीद्वेष्टा नाहीय पण कोणतीही व्यक्ती राष्ट्रापेक्षा मोठी असूच शकत नाही. समोरचा गोळ्या झाडतोय आणि आपण त्याच्यावर पुष्पगुच्छ उधळायचे? हि अहिंसा? अश्या दुर्बलांच्या अहिंसेचा काडीमात्र उपयोग होत नाही. आज अमेरिका जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र आहे कारण सर्वात जास्त शस्त्रसाठा त्यांच्याकडे आहे. आज अमेरिकत शांतता आहे ( भारतापेक्षा तरी नक्कीच शांतता आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे) गांधीवध झाला नसता त्तर हैदराबाद आज स्वायत्त राष्ट्र झालं असत. हिंदुस्थानातच दुसरं पाकिस्तान.

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. सुरेश भट

गांधीजीही महत्त्वाचे नाहीत आणि नथुरामही नाही.... खरं महत्त्व याचं आहे की आपण काय शिकतो त्यांच्याकडून... कोणाकडून सकारात्मक अर्थाने शिकता येतं कोणाकडून नकारात्मक अर्थाने... शिकणं महत्त्वाचं... बाकी मूळ कवितेवर आमचा हा उतारा.... ;) वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे ।2। पर दुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे ।। सकल लोक मां सहुने वन्दे, निन्दा न करे केनी रे ।। वाच काछ मन निश्चल राखे, धन-धन जननी तेरी रे ।। वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे ।2। समदृष्टि ने तृष्णा त्यागी, पर स्त्री जेने मात रे ।। जिहृवा थकी असत्य न बोले, पर धन नव झाले हाथ रे ।। मोह माया व्यापे नहि जेने, दृढ वैराग्य जेना तन मा रे ।। राम नामशुं ताली लागी, सकल तीरथ तेना तन मा रे ।। वण लोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे ।। भणे नर सैयों तेनु दरसन करता, कुळ एको तेर तार्या रे ।। वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे ।2।

मिस्टर गांधीना इतरांच्याच वेदना, भावना समजत होत्या. हिंदुंवर अत्याचार झाले तरी हिंदुनी प्रतिकार करू नका अस सांगून समाजाला षंढ बनवल. अन्यायावर प्रतिकार हेच उत्तर असत मग तो हिंदुवर होवो किंवा मुसलमानांवर पण नाही आम्हाला महात्मा बनायचं होत आपण किती सहिष्णू, धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवायचं होत. गांधीवाद हा फक्त कागदावरच ठीक आहे. पण ह्या कॉंग्रेसने तो लोकांच्या रक्तात भिनवला आणि त्याच जोरावर त्याचं दुकान चाललय. आणि देश कुठे चाललाय हे तर आपण उघड्या डोळ्यांनी बघतोच आहोत.

In reply to by हिटलर

हिटलरचे विचार मला आवडत नाहीत म्हणुन ,मी पण नथुरामाचाच मार्ग स्विकारु का ? मज्जा येईल ना !

In reply to by बाबा पाटील

बाबा पाटील आपण खरे गांधीभक्त शोभता... गांधीवध झाल्यानंतर अहिंसक गांधीभाक्तानी केलेली हिंसाच सांगते कि गांधीवाद तेव्हाच संपला.

In reply to by बाबा पाटील

हिटलर आपली पाटीलकी आहे.आमच्या भाषेत अशीच उत्तरे मिळतात....
बंर्र, ओबीसी मध्ये जायला बघणारे पाटील की आत्महत्या वाले पाटील?

In reply to by काळा पहाड

आम्ही आमच मुळ कधीच सोडत नाही,आणी काळ्या आईला सोडुन आत्महत्या तर कधीच नाय,नांगर आणी औत आमचा पिढीजात वारसा आहे आणी वेळ आली की त्याच्या तलावरीपन बनवता येतात्.....

नथुराम गोडसेंचा विरोध गांधीजींच्या विचारांना होता. विचारांची लढाई विचारांनीच लढावी ह्या सूत्राचे महत्व भारतीय समाजालाही समजले होते. पण गोडसेंनी हे सूत्र नाकारून विचार करणार्‍या व्यक्तीची हत्या केली, ह्याचे समर्थन कसे होऊ शकते? व्यक्तिद्वेषातून हत्येचा आधार घेत विचार संपविण्याचा प्रयत्न त्यानी केला पण गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत.तसेच ह्या हत्येचे समर्थन करणारे गांधीजींचा फाळणीला पाठिंबा व पाकिस्तानला दिलेले काही कोटी ही कारणे सांगतात, पण गोडसेंनी १९३५ साली सुद्धा असाच प्रयत्न केला होता. त्यामागे गांधीजींचा वाढता करिश्मा व सर्व समाज स्तरातून मिळणारा पाठिंबा हेही कारण असु शकते.

In reply to by श्रिया

पण गोडसेंनी हे सूत्र नाकारून विचार करणार्‍या व्यक्तीची हत्या केली, ह्याचे समर्थन कसे होऊ शकते?
विचार अव्यक्त नसतात. ते व्यक्ती पासूनच जन्मतात. गेलाबाजार पुढचं नुकसान तर टळलं गेलं! काय माहिती या माणसाने पुढे आणि कशा कशा बाबतीत इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं. या हत्येने उलट काँग्रेस ने व त्या वेळच्या सरकारने निश्बासच सोडला असेल. साप भी गया, लाठी भी नही टूटी. त्यांना आता एक महात्मा नावाचं चलनी नाणं मिळालं आणि विरोध करणार्‍यांचा पण बंदोबस्त करता आला.
गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत
ते काम काँग्रेस ला करण्यासाठी राखून ठेवलं आहे.
त्यामागे गांधीजींचा वाढता करिश्मा व सर्व समाज स्तरातून मिळणारा पाठिंबा हेही कारण असु शकते
"टिचभर लोक सोडून" हे लिहायला विसर्लात वाटतं.

In reply to by काळा पहाड

विचार अव्यक्त नसतात. ते व्यक्ती पासूनच जन्मतात. गेलाबाजार पुढचं नुकसान तर टळलं गेलं! काय माहिती या माणसाने पुढे आणि कशा कशा बाबतीत इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं.
तुमचा मुद्दा गांधीहत्येचे समर्थन करणारा वाटला, म्हणून एक प्रश्न, आत्ताच्या राजकारण्यांना आणि सो कॉल्ड समाजकारण्यांना कस रोखायला पाहिजे तुमच्यामते?. यातल्या काहींचे विचार आणि कृती ही तर गांधीजींच्या विचारांपेक्षा देशासाठी कितीतरी भयानक आणि विध्वंसक आहे.

In reply to by श्रिया

यात समर्थन वगैरे काही प्रकार नाही. त्या वेळच्या सरकारने गांधीजींच्या मनमानी पणाला रोखण्याचं काम केलं नाही. मानवतावाद आणि प्रांतवाद या कायम एकमेकांच्या विरूद्धच उभ्या असणार. कारण दुसर्‍या प्रांताचे लोक पण मानव या कॅटेगेरीत येतात. एका ठराविक मर्यादे पर्यंत मानवता ठीक आहे, पण त्या पुढे सगळे उपाय वापरावे लागतात. गांधीजींचा मानवतावाद हा अतिरेकी प्रकारचा व राष्ट्रधर्माच्या आड येणारा वाटतो. त्यांचा हेकेखोरपणा, अहिंसे वर तत्वाचा मुलामा देऊन ते तत्व कटाक्षाने पाळणे, भारत सरकार वर पैसे देण्यासाठी दबाव आणणे हे महत्म्याला चालतात, पण ज्याला देश चालवायचा आहे, त्याल नाही. असा कोणीही अडथळा पोलादी पंज्याने दूर करणे ही शासनाची जबाबदारी असते. अमेरिका व इस्रायल या देशात हे तत्व कटाक्षाने पाळले जाते. कुणीही देशापेक्षा मोठा असू शकत नाही. परकीय तर नाहीच, पण कोणताही नागरिक सुद्धा नाही. देशांना आपल्या शत्रूंच्या नेत्यांच्या हत्या घडवाव्या लागतात आणि ते मुळीच चुकीचे नाही. विचार करा. गांधीजींनी जर सरकार वर दबाव आणला असता की सियाचीन ग्लेशीयर पाकिस्तान ला द्या नाही तर आमरण उपोषण करतो. तर? तर भारत सरकार ला झुकावं लागलं असतं. गांधीजी एककल्ली तर होतेच, पण अतिशय पॉवरफूल सुद्धा होते. या माणसाने सुभाषचंद्र बोस नावाच्या अतिशय हुशार माणसाला काँग्रेस अध्यक्षपणाचा राजीनामा द्यायला लावला होता. कारण? एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणून. जवाहर्लाल तडजोडीला तयार होते, सुभाष नव्हते. त्यामुळे पुढे आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्यावर काय माहिती गांधीजींनी काय भूमिका घेतली असती? महात्म्यांची गरज लोकांना असते, देशाला नसते.

विचार अव्यक्त नसतात. ते व्यक्ती पासूनच जन्मतात. गेलाबाजार पुढचं नुकसान तर टळलं गेलं! काय माहिती या माणसाने पुढे आणि कशा कशा बाबतीत इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं. तुमचा मुद्दा गांधीहत्येचे समर्थन करणारा वाटला, म्हणून एक प्रश्न, आत्ताच्या राजकारण्यांना आणि सो कॉल्ड समाजकारण्यांना कस रोखायला पाहिजे तुमच्यामते?. यातल्या काहींचे विचार आणि कृती ही तर गांधीजींच्या विचारांपेक्षा देशासाठी कितीतरी भयानक आणि विध्वंसक आहे.

समजा नथुरामने गांधीजींना मारले नसते व गांधीजी अजून ६-७ वर्षे जगले असते, तर भारतात नक्की काय फरक पडले असते? म्हणजे भारतात त्यामुळे नक्की काय वाईट्/चांगले झाले असते? माझ्या मते १९४८ ची ब्राह्मणांविरूद्धची दंगल नक्की झाली नसती. पण त्याव्यतिरिक्त अजून कोणत्या घटना घडल्या असत्या/नसत्या?