Skip to main content

राष्ट्रपिता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 30/01/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली ! पण आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो . ह्या मुद्द्यावर अ‍ॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे . आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !

वाचने 67675
प्रतिक्रिया 283

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

तो मा पंचाक्षरी शिवीवाचक आहे असं तुमचं म्हणणं आहे का? उगाच सारवासारव करू नका. मा पासून सुरू होणारे पंचाक्षरी शब्द आणि त्यातले शिवी असणारे शब्द आम्हालाही माहित आहेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

उगाच सारवासारव करू नका >> अहो तो मा. माननीय ह्या अर्थाने असतो हे शेंबड्या पोरालाही माहीत आहे ...पण ते सारे लोक नक्कीच माननीय नसतात हे फार उशीरा कळते ...(रादर त्यातले बहुताशं मा. असतात असे म्हणायचे आहे मला ).

In reply to by प्रसाद गोडबोले

माननीय हा शब्द पंचाक्षरी आहे का? माननीय हा शब्द मराठी भाषेतील मान्यताप्राप्त शिवी म्हणून मानला जातो का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्ही फार गोधळ करताय राव समजुन घेताना . मा. = माननीय मा. = ***** हे दोन भिन्न शब्द आहेत आणि निव्व्रुत्त राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या पदामागे मा. लावुन त्याची पदवी करतात ते नक्कीच माननीय नाहीत .( म्हणजेच दुसरा अथ लावावा )

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमच्या मूळ वाक्यात 'मा. ही पंचाक्षरी शिवी' असा शब्दप्रयोग आहे. तो अश्लाघ्य आहे. त्याबद्दल आधी माफी मागा. मग पुढचं बोलू.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

स्वार्थासाठी स्वतःच्या पदवी मागे मा. लावणार्‍यांचा मा. ही शिवीच मानावी असे आमचे ठाम मत आहे . तरीही अश्लाघ्य भाषेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागते :(

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मित्रहो, का त्यांच्यावर असे सुटताहात? त्यांनी लिहिलंय ना, "हो तो मा. माननीय ह्या अर्थाने असतो हे शेंबड्या पोरालाही माहीत आहे". ते नीट वाचलंतर तर त्यांचे काही चुकत नाहीये, हे तुम्हाला कळेल. मग हे सारे वृथा प्रयत्न थांबवू शकाल. वाचा, परत.

In reply to by प्रसाद गोडबोले

इथं बिका, कर्ण, ब्याटमन, नीलकांत, गवि यासारख्यांनी प्रतिसाद दिलेले पाहून हे लिहितोय. निवृत्तीनंतरच्या 'मा.'चा अर्थ माननीय असा नाही. तो 'माजी' या अर्थानं असतो. जे कोणी त्याला माननीय मानत असतील त्यांच्यावर कायदेशीर पदाची खोटी प्रतिमा तयार केल्याची कारवाई होऊ शकते. तशी एक घटना घडल्याचे आठवते. त्यावेळी 'मा.'चा अर्थ माननीय असा नसून माजी असा आहे, असा युक्तिवाद केला गेला होता, हेही आठवते. अर्थात, तुम्हाला ते माहिती नसणार. तुमच्यासमोर ज्याने कोणी त्या 'मा.' चा अर्थ माननीय असा सांगितला असेल त्याच्यावर अशी कारवाई करता येते. ती तुम्ही करावी. बाकी चर्चा चालू राहील. एक कृती केल्याचे पुण्य तुमच्या पदरी (इथे तुमचा आयडी स्त्री आहे याचा काही संबंध नाही) पडेल. कारवाई करणार असाल तर मला येथे जरूर कळवा. अशा कारवाईला अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन.

In reply to by प्रसाद गोडबोले

एका वाक्यात उत्तरे द्या: लोकांची भावना महत्वाची की संविधानाचा फालतू कीस काढणे महत्वाचे? असंवैधानिकपणाच्या नावाने असे गळे काढून काय मिळणारे? मोरीला बोळा आणि दिल्लीदरवाजा मोकळा असे करणे किंवा साप, साप म्हणून भुई धोपटणे याला काय म्हणावे?

गांधींना राष्ट्रपिता म्हणावेच असा आग्रह धरण्याइतका गांधीभक्त मी तरी नाही. नाही म्हटले राष्ट्रपिता तरी काही हरकत नाही. पंचाक्षरी शिवी सुद्धा द्या. कारण ती शिवी देणार्‍याच्या मतावर गांधींचे माहात्म्य अवलंबून नाही.

In reply to by नितिन थत्ते

अगदी अगदी! पूर्ण सहमत! तरीही जाहिर चर्चांमधे एक पातळी पाळली जावी म्हणून त्या पंचाक्षरीला आक्षेप आहे. उद्या हीच शिवी जाहिर फोरमवर नथुरामाला जरी दिली तरी ते आक्षेपार्हच असेल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>उद्या हीच शिवी जाहिर फोरमवर नथुरामाला जरी दिली तरी ते आक्षेपार्हच असेल +१

दंगा करण्यासाठी धागा काढला आहे का वाटावे असे प्रतिसाद येत आहेत. पण वाईटात चांगलं म्हणण्यासारख्या २ गोष्टी. एक म्हणजे नीलकांताचा समतोल. अप्रतिम प्रतिसाद आणि जुना बिका परत सापडला!!

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदी खरंय! माणासं कळतात हो या निमित्ताने! तुम्ही कळलातच की, बघा!

In reply to by पैसा

अच्रत! =))

माझी लॉयल्टी संविधानाला आहे . कोणा एका व्यक्तीला नाही मग ती कोणीही का असेना . इतके बोलुन मी थांबते

In reply to by बॅटमॅन

भारी आहे तुमचं . आधी संविधानाला विरोधी अशा पदव्या द्यायला समर्थन आता फ्रीडम ऑफ स्पीच ह्या मुलभुत संविधानिक अधिकाराच्या वापराला टोमणा !! भारी प्रगती आहे =))

In reply to by प्रसाद गोडबोले

संविधानाने अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अमुकतमुक व्यक्ती गांधींना राष्ट्रपती म्हणू शकते, किंवा इतरांनी ते म्हणावे असे आवाहन करु शकते. जर कोणाला पटले नाही तर त्याला ते म्हणण्याचे बंधन नाही. अर्थात संविधानाच्या आडून आपल्या अजेंड्यासाठी थोडासा धुरळा उडवणाऱ्या शब्दशिखंडींना काहीही स्पष्टीकरण दिले तरी कमीच.

In reply to by आजानुकर्ण

अर्थात संविधानाच्या आडून आपल्या अजेंड्यासाठी थोडासा धुरळा उडवणाऱ्या शब्दशिखंडींना काहीही स्पष्टीकरण दिले तरी कमीच. >>> कसलाही अजेंडा नाहीये . जे केन्द्रीय गृहमंत्रालयाने म्हनले तेच मी परत म्हणले आहे . "गांधीना संविधानानुसार राष्ट्रपिता म्हणता येणार नाही " ह्या हिशेबाने केन्द्रीय गृहमंत्रालय शब्दशिखंडी आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

केंद्रीय गृहमंत्रालयाने काय म्हटले आहे? तर, सरकारतर्फे अशी पदवी देण्याची परवानगी संविधान देत नाही. गांधींना ही पदवी यापूर्वीही सरकारने दिली नव्हती आणि आताही सरकार ती देऊ शकत नाही. इथे ही जनतेने किंवा जनतेतर्फे दुसऱ्या एका जननायकाने दिलेली पदवी हा गांधी आणि जनतेपुरता मामला आहे. संविधानाचा संबंध मध्ये येतो का? समजा अब्दुल ही व्यक्ती तिचे वडील कादीर यांना 'अब्बा' म्हणून पुकारतो. आता अब्बा ही पदवी त्यांना संविधानाने दिली आहे का? तर नाही. उद्या अब्दुलने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे गेला, आणि अशी पदवी देण्याची मागणी केली, तर तिथेही केंद्रीय गृहमंत्रालय अशी पदवी देता येत नाही हेच सांगणार. मग कादीर हे अब्दुलचे अब्बा असणे हे असंवैधानिक आहे का? कळतंय का काही?

In reply to by आजानुकर्ण

हो ! बरंच काही कळातय . एका शब्दात उत्तरे : उद्या अजुन "काही" जणांना "राष्ट्रपिता" ही पदवी दिली जनतेने तर स्ट्यॅन्ड बदलणार नाहीना तुमचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

अनेकांना राष्ट्रपिता पदवी देण्यास माझी तरी काहीच हरकत नाही. महात्मा ही पदवी अनेकांना मिळाली आहे. हिंदूहृदयसम्राटही दोन दोन आहेत. शिवाय या बाबतीत माझी हरकत किंवा माझा स्ट्यांड विचारायला कोणी येईल याचीही सुतराम शक्यता नाही.

In reply to by आजानुकर्ण

हिंदूहृदयसम्राटही दोन दोन आहेत बरोब्बर. सावरकर, तोगडिया हे दोन आणि मोदी, सेनाप्रमुख हे अजून दोन ह्या अर्थाने आपण "दोन दोन" म्हणाला असावात. तसे नसेल तर आधी अभ्यास वाढवा नि दोन दोन म्हणण्यापूर्वी हिंदु हृदयसम्राट कोण कोण हे जाणून घ्या. शिवाय एक भावी हिंदुहृदयसम्राट अचानक मराठीहृदयसम्राट झालेत नायतर त्यांनाही मोजलच असतं.

In reply to by प्रसाद गोडबोले

आणखी काही जणांना राष्ट्रपिता पदवी दिल्यावर असे अनेक 'पिते' असणे हे अंवैधानिक किंवा अवैद्यकीय आहे वगैरे धागा काढू नका इथे.

In reply to by आजानुकर्ण

पण अभिनंदनाचे धागे मात्र जरुर काढीन . ( परवाच आमचे एक मित्र बोलण्याच्या ओघात महात्मा फुलेंना "राष्ट्रपिता" म्हणत होते हे पाहुन मी त्यांचे अभिनंदन केले ...उद्या कोणी तुम्हाला राष्टपिता म्हणाले तरीही मला आवडेल .... जर तुमच्या लक्षात येत असेल तर हा माझा स्टॅन्ड परत एकदा पहा ..... माझा विरोध सिलेक्टीव्ह गव्हर्नन्स ला आहे.... "गांधीच फक्त राष्ट्रपिता , इतर कोणी नाही " असे म्हणणारे महाभाग पाहिलेत मी . संविधान मोडायचे तर सगळ्यांनी अन पाळायचे तर सगळ्यांनी सो सिम्पल )

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा स्टँड (असलाच तर) तुमच्या कोणत्याही विधानातून स्पष्ट होत नाहीये... त्यामुळे तुमचा हा युक्तिवादही स्टँड होऊ शकत नाही!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

संविधानापेक्षा कोणी मोठ्ठं नाही , अगदी राष्ट्रपती पदही पदवी म्हणुन वापरणे मला अयोग्य वाटते असे वर स्पष्ट म्हणले आहे मी . आता तुम्हीच म्हणायला लागलात की "लोकांनी दिली तर पदवी चालेल , संविधान वाकवा " म्हणुन मग मी म्हणलें की वाकवायचे तर सगळ्यांच्याच बाबतीत . एक तर शुन्य अफवाद नाहीतर सगळेच अफवाद . -- राष्ट्रकाकु गिरीजा =))

In reply to by बिपिन कार्यकर्ते

त्याचे कारण इतकेच की श्रद्धांजलीमध्ये पुरेसे सवंग लिहिण्यात तुम्हाला घोर अपयश आलेले आहे. इतकेच नव्हे, माझ्या तिथल्या प्रयत्नांनाही तुम्ही हाणून पाडले आहे. मिपावर नवीन दिसताय बिका.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पौडास्नं! कितीतरी दिवसांनी हा शब्द एकला, आणि पौडाच्या शेजारीच माझे गाव असल्यामुळे तो शब्द अधिक भावला.

In reply to by नितिन थत्ते

नितिन रावांशी सहमत! ( वास्तवीक या धाग्याला जर (माझ्या ह्या प्रतिसादासकट) सर्वांनी दुर्लक्षित केले असते तर बरे झाले असते. आता मी त्याचे प्रायश्चित्त म्हणून बिकाच्या धाग्यावर उरलेला प्रतिसाद देतो.) ;)

गिरिजा हा बिकाचा किंवा कर्णाचा डु आयडी आहे असा संशय येथे व्यक्त करतो. >>> कैच्याकै ...इतकं स्प्लिट परसन्यॅलिटी नसतं कोणी =))

राष्ट्रपिता काय, सरदार काय, नेताजी काय किंवा स्वातंत्र्यवीर काय या सार्‍या घटनात्मक / संवैधानिक पदव्या आहेत/असाव्यात असे समजता तुम्ही???? या मानसिकतेचा निषेध!

मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती. भारतीय राज्यघटनेच्या कलमाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. बाकी, म. गांधीना संविधानानुसार सरकार जरी अशी पदवी देत नसले तरी सामान्य जनतेला राष्ट्रपिता म्हणायला संविधानाने अडवलेले नाही, नाही का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामान्य जनतेला राष्ट्रपिता म्हणायला संविधानाने अडवलेले नाही आँ? अहो पण मी समजा सामान्य जनतेस राष्ट्रपिता म्हणू इच्छित नाही. आधीच गांधीजी राष्ट्रपिता आहे काय ह्यावर एक धागा निघालाय. आता पुन्हा "सामान्य जनता राष्ट्रपिता आहे काय" ह्यावर धागा निघायचा.

In reply to by मन१

>>> अहो पण मी समजा सामान्य जनतेस राष्ट्रपिता म्हणू इच्छित नाही. मनोबा, सामान्य जनतेला म.गांधींना राष्ट्रपिता म्हणायला संविधानाने अडवलेले नाही, असा त्या वाक्याचा अर्थ. -दिलीप बिरुटे

आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत
ओखय! आय विल किप दॅट इन मा माइंड! डाँ बॉदर योर्सेल्फ अनिमोर प्लिज. थॅंक्यु. तसेच माझ्या कडुन ह्या राष्ट्रपिता महात्मा गांधिना मनःपुर्वक श्रध्दांजली ! तुमच्या इतका जनाधार आधुनिक भारताच्या इतिहासात उघडपणे कोणालाही जोडता आला नाही. तुम्ही दाखवलेला सत्याग्रहाचा मार्ग आज भलेही तथकथित मेणबत्ति संप्रदायाचे स्वरुप घेउ पहात असेल पण आजही तो सुधारणेची कास धरायचा, जनशक्ति दाखवायचा एक उत्तम शातंतापुर्ण तरीही अतिशय प्रभावी मार्ग आहे. ह्या मार्गावर चालायला आम्हा भारतियांना अक्कल व क्षमता दिलीत म्हणून तुमचा अभिमान आहे. आज तुम्ही असतात तर मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेउन चालणारी स्वतंत्र भारतातील अंदोलने अतिशय प्रभावी उपयुक्त व जितकी आज आहेत तितकी दिशाहीन राहिली नसती. इंग्रजांविरुध्दचा जो व्याकप लढा सर्वात यशस्वी ठरला तो आपल्या प्रेरणेने सुरु झाला व फोफावला या बद्दल देश तुमचा अतिशय आभारी आहे.

शाळेत व लहान पणी ऐकलेल्या "गांधी जोक्स " मुले गांधी हा राष्ट्र पिता नसून "राष्टीय विनोद" आहे असेत वाटत होते व वाटत्येय....... संपादक मंडळीनी परवानगी दिल्यास त्यातले काही "गांधी" जोक्स शेअर करायला आवडतील. ह्या निमित्ताने...

राष्ट्रपिता या शब्दात संस्कृत आणि पर्यायाने हिंदुत्वाचा वास येतो. राष्ट्रपिता शब्दाचा पर्यायाने हिंदुत्वाचा agenda पुरस्कृत करणार्‍या विचार जंतांचा तीव्र निषेध

In reply to by प्रसाद गोडबोले

धर्मनिरपेक्षता म्हणुन आजपासुन "वालिद-ए-मुल्क " अशी पदवी द्या
धर्मनिरपेक्षतेची ही संविधानिक व्याख्या आहे का? आवडली!

गांधीजींविषयी म्हणाले होते "गांधीजींचे नेतृत्व हे शहरी सुशिक्षितांच्या बौद्धिक चर्चांवर अवलंबून नसून खेडोपाडी पसरलेल्या जनतेतील लोकप्रियतेवर अवलंबून आहे." नेतृत्व हे लादले जाऊ शकत नाही तर ते जनतेने स्वीकारावे लागते. त्यासाठी शत्रूला उघडपणे आव्हान देण्याची हिम्मत दाखवावी लागते. ती हिम्मत ज्याच्याकडे असेल त्याच्या पाठी जनसमुदाय उभे राहतात. महत्व शस्त्रांना नसून लढण्याच्या धैर्याला असते. ब्रिटीशांच्या विरोधात देशव्यापी चळवळी कोणी उभ्या केल्या आणि वारंवार जनआंदोलने करून ब्रिटीश सरकारचा जनाधार कोणी कमकुवत केला याचे उत्तर हे ज्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात जाते त्यांनी गांधींचे महात्म्य नाकारावे ह्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गांधी ही केवळ एक व्यक्ती नसून सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे प्रतीक आहे. त्यांना "राष्ट्रपिता" म्हटले नाही तरी त्यांचे हे स्थान हिरावून घेणे कोणाच्याही आवाक्यातले नाही. जनतेच्या निष्ठा शब्दांच्या नाही तर कृतीच्या आधारावर जिंकल्या जातात. ज्यांना सर्वसामान्य जनतेचे स्वातंत्र्यच खुपत असेल त्यांनी शब्दांचा कितीही कीस पाडला तरी जनतेच्या निष्ठा जिंकणे त्यांना कदापिही शक्य नाही.

In reply to by अवतार

+१ आता इथे हा धागा वाचनमात्र व्हायला हरकत नाही. :-)

In reply to by अवतार

पण खरा प्रश्न वेगळाच आहे: "पंडीत" अथवा "चाचा" ह्या उपाधी संविधानाने मान्य केल्या आहेत का? ;)

In reply to by विकास

पंडित ही उपाधी नव्हती, प्रांतवाचक जात होती/आहे. काश्मिरी पंडित म्हणून पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय घटनेने जात कुठे लावावी, काय कसं याबद्दल काही विवेचन केलेलं आहे का नाही हे माहित नाही. संविधान हा शब्द बहुदा संस्कृत आणि हिंदीत वापरतात. घटना हा मराठी शब्द असावा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे काय मधेच? प्रसंगाचे काही गांभिर्य म्हणून नाही! ;) बाकी चर्चा, त्यावरील एकातून एक निघणारे प्रतिसाद वाचताना मला कधीकाळी ऐकलेले (राजकारण, इतिहास कशाशीही कुठल्याही अर्थाने संबंधीत नसलेले, आणि disclaimer: अर्थात तसा काही असल्यास मला न समजलेले) स्फूट/बडबडकाव्य आठवले... ए बी सी डी इ एफ जी, त्यातून निघाले गांधीजी गांधीजींनी खाल्ला पेरू, त्यातून निघाले नेहरू नेहरूंनी घेतली कात्री, त्यातून निघाले शास्त्री शास्त्रींनी मारली फोर, त्यातून निघाला चोर चोराने घेतला कॅच आणि संपली आमची मॅच. असो.

In reply to by विकास

तुमच्यासारखे उच्चभ्रू मराठीद्वेष्टे अशाप्रकारे विषयांतर करणार याची मला अपेक्षा होतीच. विषयाचं गांभीर्य एक आपल्यालाच काय ते समजलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या हस्तिदंती मनोर्‍यातून बाहेर या आणि जग कुठे चाललं आहे हे पहा असं सुचवते.
ए बी सी डी इ एफ जी, त्यातून निघाले गांधीजी गांधीजींनी खाल्ला पेरू, त्यातून निघाले नेहरू नेहरूंनी घेतली कात्री, त्यातून निघाले शास्त्री शास्त्रींनी मारली फोर, त्यातून निघाला चोर चोराने घेतला कॅच आणि संपली आमची मॅच.
याला बडबडगीत म्हणण्याची घोडचूक करू नका. या काव्यातून प्रचंड प्रतिभेचा प्रवाह निघालेला आहे; फक्त हा प्रवाह डोंगरदर्‍यांतून वहात असल्यामुळे तुम्हाला तो उथळ आणि खळखळ करणारा वाटत असेल. पण या प्रवाहाची शक्ती किती हे समजून घ्या. या काव्यामधे भारतीय राजकारणाची आणि भारतीयांच्या भ्रष्टाचारी मानसिकतेची अतिशय योग्य शब्दांत दखल घेतलेली आहे. सुरूवातीला आलेल्या रोमन्/ल्याटीन अल्फाबेटांमधून भारतीयांवर असणारी ब्रिटीश सत्ता आणि सत्तेला अहिंसक मार्गाने विरोध करून मोठे झालेले गांधीजी यांच्याकडे लक्ष वेधून घेतलेलं आहे. पेरू हे सामान्य लोकांचं फळ, तुमच्यासारख्या उच्चभ्रू, हापूस आंबे खाणार्‍यांना ते काय माहित असणार. तर ऐका, सामान्यांचं फळ पेरू खाणारे गांधीजी आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणावेत असे नेहेरू यांचा एकत्र संबंध लावून या काव्यात नेहेरूंचे पाय गांधीजींमुळे जमिनीवर असणं सुचवलेलं आहे. नेहेरूंच्या लोकप्रियतेला उपासाची कात्री लावली की त्यातून शास्त्रीजी निघतात. आठवतं, भारतात खाद्यान्न आयात करण्याची वेळ आली आणि तुमच्या उच्चभ्रू अमेरिकेने नाही म्हटलं तेव्हा शास्त्रीजींनी अन्नसेवन कमी केलं? आणि शास्त्रीजींनी दिलेल्या अशा प्रकारच्या रचनात्मक कार्यक्रमाकडे काही नतद्रष्टांना बघवलं नाही, ही जी फोर त्यांनी मारली ती सहन न होऊन कोणी चोरून शास्त्रीजींना विष खिलवलं आणि ताश्कंतमधे ते गेले अशी बातमी अनेक वर्ष तरंगते आहे, अगदी तुकोबांच्या गाथेसारखी. या चोरांची चोरी अशी तरंगून वर आली, आणि माझ्यासारख्या सामान्यांपर्यंत पोहोचली, आणि हा गेम संपला असं हे काव्य आहे. याला स्फुट म्हणू शकता, पण हे बडबडगीत नव्हे. तुमच्यासारख्या बुद्धीवाद्यांनी थोडा विचार करून आशिष नंदींसारख्या अभ्यासकांच्या बोलण्याचा योग्य अर्थ लावला नाही तरी एकवेळ चालेल, पण लोकगीतांचा असा अपमान करू नये. शेवटी लोकांच्या हातात सत्ता आहे. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. लोकशाही जिंदाबाद.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे गीत लहानपणी मी पण ऐकले व म्हंटले होते आज प्रथमच त्याचे रसग्रहण वाचले. हे गीत इथे लिहिल्याबद्दल विकास यांचे व त्याचे रसग्रहण लिहिल्याबद्दल अदिती यांचे मनापासून आभार!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ चर्चेस योग्य मार्गावर आणणारी चर्चा चालू केल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही सांगितलेला अर्थ ऑलमोस्ट बरोबर आहे. फक्त त्यातील पेरूचा अर्थ केवळ सामान्यांचे फळ असा नसावा. त्याचा संबंध हा पेरू देशाशी असावा असे वाटते. तसे भारत आणि पेरू यांचे संबंध फार जुने आहेत. कदाचीत तुम्हाला ते माहीत नसेल. पण तो तुमचा दोष नाही. बाकी, माझ्यासारख्या अतिसामान्यास (गंमतीत / उपरोधात असेल कदाचीत पण) बुद्धीवादी आणि उच्चभ्रू म्हणल्याने माझ्या अंगावरील रंग विटलेल्या शर्टाची कॉलर इस्त्री न करताच टाईट झाली. आता मी चार चौघात फेरूच्या फोडी देखील (त्यातील लहान लहान बी दातांमध्ये अडकण्यापासून टाळत) हापूस आंब्याच्या फोडींसारख्या मिटक्या मारत खाईन. लोकशाही जिंदाबाद. सहमत. आपल्या भारताच्या चिरायु प्रजासत्ताकात, लोकशाहीस जिंदाच बाद करून टाकले आहे. :(