✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्री.शरद काळे यांचे अभिनंदन

आ
आनंद घारे यांनी
Sat, 01/26/2013 - 12:06  ·  लेख
लेख
माझे मित्र श्री.शरद पांडुरंग काळे यांना पद्मश्री हा बहुमान जाहीर झाला आहे. जैवशास्त्रावरील संशोधन आणि त्याचा उपयोग करून जैवी कच-यापासून (बायोमासमधून) ऊर्जेची निर्मिती या सध्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ते अखंड कार्यरत असतात. अशा अनेक प्रकल्पांच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला आहे. वसुंधरवरील पर्यावरणाची जपणूक या ध्येयाला त्यांनी वाहून घेतलेले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
2946 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

अभिनंदन.

नाना चेंगट
Sat, 01/26/2013 - 13:02 नवीन
अभिनंदन. :) त्यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांनी केलेल्या कार्याविषयी अधिक माहिती लेखामधे दिली असती तर बरे झाले असते असे वाटते.
  • Log in or register to post comments

+१ - पिंगू

पिंगू
Sat, 01/26/2013 - 17:02 नवीन
+१ - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

आय ए ओफिसतेहोते ना ते

नर्मदेतला गोटा
Sat, 01/26/2013 - 14:01 नवीन
आय ए ओफिसतेहोते ना ते
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Sat, 01/26/2013 - 17:29 नवीन
त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर लिहा.
  • Log in or register to post comments

श्री शरद काळे यांचे विचार

आनंद घारे
Sat, 01/26/2013 - 18:52 नवीन
श्री शरद काळे यांना पद्मश्री हा बहुमान मिळाल्याचे समजले तेंव्हा विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍या एका मराठी माणसाला तो मिळाला या आनंदाच्या भरात ती बातमी मी लगेच कळवली. ते आपल्या प्रयोगशाळेत कोणते संशोधन करतात आणि त्यांनी त्यात कोणते शोध लावले आहेत वगैरे माहिती जनतेला देण्याचा अधिकार फक्त त्या खात्याच्या अधिकृत प्रवक्त्याला असतो. यामुळे वसुंधरा, पर्यावरण, ऊर्जा वगैरे की वर्ड्समधून मी त्यांचा त्रोटक परिचय करून दिला होता. सवडीने त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि त्यांची अनुमती घेऊन यावर सविस्तर लेख लिहिण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्याबरोबर बोलतांना जे विचार ते मांडतात त्यातले मुद्दे असे आहेत. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचेकडून आपण सतत काही ना काही घेत असतो आणि यात सारखी वाढ होत आहे. आपण काढून घेतलेले पदार्थ तिला परत मिळाले नाहीत तर त्यांचे साठे संपून जातील. ते सगळे पदार्थ जसेच्या तसे पृथ्वीला परत करणे आपल्याला शक्य नसले तरी त्यांचा नाश न करणे आणि ते तिला परत मिळावेत यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपल्याच फायद्याचे आहे. वनस्पती, कृमी, कीटक वगैरे इतर जीवांच्या सहाय्याने हे करणे शक्य आहे. आपण जे जे काही घेतो ते सगळे परत करतो अशी परिस्थिती भविष्यकाळात कधीतरी आली तर त्यानंतर माणसाला अनंत काळपर्यंत चिंतामुक्त राहता येईल. बायोमासपासून इंधन तयार करणे, पावसाचे पाणी जमीनीत जिरवून त्याचा उपयोग करणे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कच-याला त्याज्य वस्तू न समजता भविष्यकाळातील संसाधन (रिसोर्स) या नजरेने पाहून त्याचे रिसायकलिंग कसे करता येईल याचा विचार करणे महत्वाचे आहे. हे विचार सगळ्यांनाच पटतात, पण ते आचरणात आणण्यासाठी काय करायला हवे किंवा करणे शक्य आहे यावर श्री.काळे मोलाचे काम करत आहेत.
  • Log in or register to post comments

अगदी मोघम

नर्मदेतला गोटा
Sun, 01/27/2013 - 13:46 नवीन
अगदी मोघम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

अभिनंदन

सुनील
Sat, 01/26/2013 - 19:42 नवीन
डॉ काळे यांचे अभिनंदन! घारे यांच्याकडून विस्तृत माहितीच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

डॉ. काळेंचे मनःपूर्वक अभिनंदन

नानबा
Sat, 01/26/2013 - 20:41 नवीन
डॉ. काळेंचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

डॉ. काळे यांचे अभिनंदन !

मदनबाण
Sun, 01/27/2013 - 08:20 नवीन
डॉ. काळे यांचे अभिनंदन ! :) त्यांच्या कार्या बद्धल माहिती जाणुन घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

>ते आपल्या प्रयोगशाळेत कोणते

नर्मदेतला गोटा
Sun, 01/27/2013 - 13:45 नवीन
>ते आपल्या प्रयोगशाळेत कोणते संशोधन करतात आणि त्यांनी त्यात कोणते शोध लावले आहेत वगैरे माहिती जनतेला देण्याचा अधिकार फक्त त्या खात्याच्या अधिकृत प्रवक्त्याला असतो. मिसळीवर खरडण्यापूर्वी हे लक्षात आलं नाही वाटतं
  • Log in or register to post comments

पुणेरी शेरा?

आनंद घारे
Sun, 01/27/2013 - 16:59 नवीन
मिसळीवर खरडण्यापूर्वी हे लक्षात आलं नाही वाटतं आलेलं होतं, तरीसुद्धा खरडलं, आता काय म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments

श्री.शरद काळे यांचे मनःपूर्वक

श्रिया
Sun, 01/27/2013 - 18:14 नवीन
श्री.शरद काळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ते एका महत्वाच्या विषयावर संशोधन करत आहेत, त्यामुळेच त्याबद्दल विस्तृत माहिती मिळण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

त्यांची काही वेबसाइट असेल तर

नर्मदेतला गोटा
Sun, 01/27/2013 - 22:14 नवीन
त्यांची काही वेबसाइट असेल तर ती द्या म्हणजे त्यांच्या कामासंबंधी जाणून घेता येइल
  • Log in or register to post comments

का?

Nile
Tue, 01/29/2013 - 09:07 नवीन
तुम्हाला शोध घेता येत नाहीत वाटतं. नर्मदेतले गोटे सुद्धा दिर्घ वास्तव्याने गुळगुळीत होतात, तुम्हाला मात्र फारसं पाणी लागलेलं दिसत नाही? असो. घारेकाका, चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद. श्री. काळे यांचे अभिनंदन. त्याच्या कार्यासंबंधी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

डॉ काळे यांचे अभिनंदन.

यशोधरा
Tue, 01/29/2013 - 09:23 नवीन
डॉ काळे यांचे अभिनंदन. त्यांच्या कार्याविषयी विस्तृत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा