Skip to main content

बापाने पोर कशी संभाळायची ?

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 24/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
धागा थोडा वादग्रस्त आहे पन माझ्यासारखे सगळेच बाप या भुमिकेतुन गेले असतील. १)पोरग १-२ तास संभाळणे सोप्पे आहे पन त्यानंतर काय ? २)आई जवळ नाही आणी भोकाड पसरले की बाबा हव ते घेउन देतो किंवा पाहिजे ते हट्ट पुरवुन घेणार्‍या अतिहुषार पोट्ट्यांच काय करायच. ३)आई माझ सगळ काम करते,असे केविलवाना चेहरा करुन बाबाला कामाला जुंपतात त्याच काय करावे. ४)इमोशन ब्लॅकमेलिंगच (आई आणी बाळ दोघांकडुन )त्याच काय ?

वाचने 15548
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

अजून वेळ आहे. ;) नंतर देतो प्रतिसाद.

जशी जमतील तशी! आपल्या बापाने आपण लहान असतांना आपल्याला संभाळताना काय काय चुका केल्या होत्या ते आठवायचं आणि मग अजिबात गिल्टी वाटून घ्यायचं नाय!!! मुख्य म्हणजे पोराच्या आईने दाखवून दिलेल्या आपल्या चुकांकडे (आणि त्यानंतरच्या अपरिहार्य लेक्चरकडे!!)फुल्ल दुर्लक्ष करायचं!!! :) माझा एक सदरा देणे आहे, इच्छुकांनी व्यनि करावा!!१ ;)

विनोद / गंमत / टीपी शी आपलं वावडं नाही आई च्या "ड्युटी" शी एरव्ही आपला काही संबंध नाही असा असंवेदनशील मेसेज जातोय. उत्तराबद्दल गंभीर असाल तर सिंगल मेल पॅरेंटसना हा प्रश्न विचारून पहा. घरचं बाहेरचं पाहून बाळाचं कसं काय पहायचं या कल्पनेनेच छाती दडपून जाते. तुमच्या बाबतीत एक करता येईल, जेव्हां जेव्हां घरी असाल तेव्हा नेट बाजूला ठेवून जास्तीत जास्त वेळ बाळाचं तुम्हीच पहायला सुरूवात करा. बाळ आणि पप्पा दोघांनाही काहीच दिवसात (चांगला) फरक दिसेल.

मुलाला सांभाळायला, सगळ्या गोष्टी एका फटक्यात जमतील.

In reply to by संजय क्षीरसागर

बाई ठेवा!
सहमत! मुलाचं माहीत नाही पण त्याची आई वठणीवर येइल.

बाई ठेवा.
वॉव मग तर किती धागे? आईचा धागा: या नवर्‍याला त्या बाईपासून कसे सांभाळू? बाईचा धागा : पोराला सांभाळेन बापाचे काय करु? पोराचा धागा: मला सांभाळायचे सोडून हे काय करतायत? बापाचा परत एक धागा: काय काय सांभाळू?

In reply to by अभ्या..

मग "एक धागा सुखाचा, बाकी धागे दु:खाचे, बिनतारी हे वस्त्र सदस्या, तुझिया लेखांचे" असेही म्हणता येईल =)) =)) =)) =))

In reply to by बॅटमॅन

@मग "एक धागा सुखाचा,>>> =)) ऑबजेक्षन मिलॉर्ड ! गाणं चुकलेलं आहे. धागा धागा अ-खंड उसवु या, सगळ्यांनीहि धिंगाणा घालू या. =)) हे गाणं हवं ! :-/

In reply to by अभ्या..

बापाचा परत एक धागा: काय काय सांभाळू? हह पु वा

कुणाला विचारत बसू नका. केलं की सगळं जमतं. पहिल्यांदा मुलांना वेळ द्या. ती झोपली की मगच नेटवर वावरा.

मी काय म्हणते पोरांची भरपूर म्हणजे सॉलीड आबाळ करुन पहा आपोआप आईचच "इमोशनल ब्लॅकमेलींग" होईल ;) आणि आई सुतासारखी सरळ होईल. हाकानाका :D

In reply to by शुचि

आई सुतासारखी सरळ होईल
आन बापाची भरपूर म्हणजे सॉलीड आबाळ सुरु होइल. होकीनै शुचितै? कशाला नवीन धाग्याचा कहार परत? ;)

दुसरी मोठी अडचण आली की पहिलीचा विसर पडतो असं म्हणतात म्हणून सल्ला दिला हो. नाहीतर आपल्याला काही त्यातलं कळत नाही. तेव्हा दुसरा किंवा तिसरा, स्वजबाबदारीवर निस्तरा..

In reply to by Nile

त्यापेक्षा तीन शिफ्टसाठी तीन बायका ठेवलेल्या परवडतील. आणि बाप आपल्याकडे लक्षच देत नाही म्हटल्यावर पोरगं काय बिशाद रडतंय.

बाबा काका तुमाला येतायेत ते सेम प्रोब्लेम माझ्या पप्पाना यायचे ! बिच्चारे :( व्हायचं काय कि पप्पांना सुट्टीच्या दिवशी बाहेर पडायचा कंटाळा यायचा . एकदा दोनदा( च. ) आईला म्हणले " तु जा मी बघतो पोरांकडे " . आम्हि तीन भावंडं , दादा आणी दी मोठे कळते होते थोडे मी शेंडेफळ ;) मी तर आईला म्हणायची तु जा बाबा छान सांभाळतात ...आई बाजारात गेली कि मी पप्पांना सॉल्लिड ब्लॅक्मेल करायची =)) ..... आई परत आली कि आई म्हणायची " फार त्रास नै नं दिला हिने ?? नै च देणार , शानं गं ते पिल्लु माझं " =)) बाबा फक्त एवढच म्हणायचे " नेक्स्ट टैम लिस्ट बनवुन देत जा मी जात जैन बाजारात " :( :-/

हे आनंदिताच्या पोस्टवर मी आता वाचलं :
बाबा पाटील - Wed, 23/01/2013 - 12:59 माझ्या लेकीला देखील असेच भयानक उद्योग पडलेले असतात त्यामुळे घरातली सगळी १० माणसे आणी दोन कुत्री तिच्यावर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवत असतात.....
आपले सगळे प्रतिसाद मागे. तुम्ही आपलं स्वतःला सांभाळा!

तुम्ही 'सांभाळायची' असे म्हटले आहे. आता येथे ती पोर म्हणजे स्रीलिंगी म्हणजे फक्त मुलगी. पोरं म्हटलं तर लिंगनिरपेक्ष अनेकवचनी. तुम्हाला नक्की बापाने आई नसताना मुलीला कसे सांभाळावे हा प्रश्न पडला आहे की बापाने आई नसताना मुलांना कसे सांभाळावे हा प्रश्न पडला आहे? अनेकांनी पोरगा वगैरे सुद्धा प्रतिसादात लिहिले आहे. त्यांना कसे कळले की पोरगा आहे? गेले एकदोन दिवस जाहिरातींतील अशुद्धलेखनाबाबत तावातावाने चर्चा झाल्याने मलाही शुद्धलेखनाबाबत हे विचारावे वाटले.

In reply to by आजानुकर्ण

लेखनातला अशुद्धपणा मला पहिल्या नजरेतच आढळला होता. पण मुद्दा महत्त्वाचा वाटला. शीर्षकात जरी (पोर = मुलगी) असलं तरी धाग्यातल्या मुद्दा क्र.१ मध्ये पोरग (पोरगं = मुलगा) असाही उल्लेख आहेच. घरातलं बाळ मुलगा असो वा मुलगी एका विशिष्ट अवधीनंतर त्याला सांभाळणे बहुतांश पुरुषांना आजही अवघडच जात असणार या मुद्द्याबद्दल कसलीही शंका वाटली नाही.

तेच म्हणतो .. बापाने पोर कशी संभाळायची ? हा सद्य परिस्थितील सिरियस धागा वाटला एक अनुस्वार आपका वाक्य बदल सकता है :-)

In reply to by जोशी 'ले'

"डॅडी इश्यु" कसा एव्हॉइड करायचा, यासंबंधि काही आहे का काय असचं वाटलं प्रथम! नंतर अर्थातच पॉपकॉर्न हाति घेतले

पोर किती वयाचं आहे? थोडक्यात सांगतो. पोराच्या आयुष्याची फार थोडी सुरुवातीची वर्षं ती आपल्या जवळ येतात, बालहट्ट म्हणता येईल असे हट्ट करतात, झळंबतात, कुशीत शिरतात, मारामारी करतात, दात घासायला आ करतात, ..झालीSSS असं खच्चून ओरडतात, आपल्या हातात घास बनण्याआधी चोच वासतात, मनापासून रडतात आणि मनापासून प्रेम करतात. नंतर वर्षावर्षागणिक हे सगळं मागे पडणार, करतो म्हणालात तरी ती त्यांचं काही करु देणार नाहीत, गाडीच्या चाव्या मागण्यापुरते येतील, त्यांचे अगदी कितीही मित्र बनलात तरी नंतर हे होणारच आहे. या सर्वात आपल्याला त्याच्याइतक्या वयाचं होऊन पुन्हा वाढण्याची संधी हात पसरुन उभी असते. तेव्हा पोराला पोर म्हणून भेटायची ही अतिशय लिमिटेड पीरियड ऑफर आहे. एखादं चॉकलेट पोरासाठी आणणारे आणि त्याला शी लागताक्षणी "ए याला घेऊन जा गं..", असं पडल्याजागी म्हणण्यात सुख मानणारे नवरे हे पुरुषप्रधान संस्कृतीचे लाभार्थी दिसत असले तरी प्रत्यक्षात ते दुर्दैवी असतात. धागा फक्त विनोदी असल्यास हा प्रतिसाद ग्राह्य समजू नये..

In reply to by गवि

या धाग्यामुळे मधे एकदा कुठल्याश्या टीवी चॅनलवर, आई घरी नसताना वडीलांनी मुलाना सांभळायचा चॅलेंज दिलेला आठवतोय.

In reply to by गवि

या सर्वात आपल्याला त्याच्याइतक्या वयाचं होऊन पुन्हा वाढण्याची संधी हात पसरुन उभी असते.
खरं तर त्यांच्यामुळे आपल्याला आपलं बालपण पुन्हा जगायला मिळतं. मुलगा लहान असताना काय मस्त जगलोय आम्ही. त्याला फिरायला नेणं, त्याची आंघोळ, त्याच्याबरोबर म्हटलेली गाणी, त्याचा अभ्यास, कपडे आणि खेळण्यांच्या खरेद्या, ट्रिपा, फोटोसेशन्स... आणि सगळ्यात महत्त्वाचा मिळाला तो जगाकडे पाहण्याचा नवा नजरीया! आज सुद्धा कितीही मतभेद झाले तरी ती गाठ इतकी पक्की आहे की पुन्हा त्याला मिठीत घेऊन नव्यानं सर्व सुरू होतं. लेखकानं असा प्रश्न विचारला तेंव्हा मजा म्हणून उत्तरं दिली पण संगोपन हा अत्यंत रमणीय विषय आहे. आणि त्यांना तर मुलगी आहे. मुलीसाठी वडील म्हणजे जगातला सर्वात ग्रेट माणूस. बाबा पाटील दृष्टीकोन बदला, संधीच सोनं करा. मस्त आयुष्य घडवा लेकीचं. तुम्ही शेवटापर्यंत आनंदी रहाल. व्यक्तिगत मत आहे पण एक मूल असणं सुखाचय, पसारा वाढवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय, एक मूल असणं सुखाचय, या तुमच्या मताशी किंचित सहमत. सुखाचीच मोजपट्टी लावायची असेल तर पसारा न मांडणेच सर्वात उत्तम. सिंगल राहूनही पैशाच्या जोरावर हवी ती सुखे विकत घेतात. जे एका वेळी सुख वाटते, ते कालांतराने कटकट ठरु शकते. एक मूल सुखाचे असते, पण ते मोठे झाल्यावर अपुरेपणा लक्षात येतो. ताई-दादा किंवा लहान भावंडांच्या नात्याची जाणीव झाली नाही तर सिंगल चाईल्ड एकलकोंडे बनते, मागेल ते मिळणारच, लाडाचा वाटेकरी मी एकटाच यातून आत्मकेंद्रीपणा येतो. इतरांबरोबर काही गोष्टी शेअर करण्याची सवय लागत नाही. जबाबदारीची जाणीव होत नाही. असे मूल हट्टी, वर्चस्ववादी बनण्याची शक्यता जास्त असते आणि पुढे एक जबाबदार नागरिकही त्यातून घडत नाही (मी-माझा, समाजाशी मला देणे-घेणे नाही अशी स्वमग्नता) त्यामुळे पुढचा पसारा वाढवू नये, हे ठीक, पण 'हम दो हमारे दो' हे तत्त्व उत्तम

In reply to by योगप्रभू

सोशल नेटवर्किंग तुफानी आहे. वाय कुणालाही बहिण मानून जगणं (बहुदा) घरातल्या बहिणीपेक्षा अत्यंत सोयीच असावं. इस्टेटीचे वाटे, आई-वडीलांची जवाबदारी, नणंद-भावजय कलगीतुरे, काही लफडी रहात नाहीत. सगळं ऑपशनल आणि तरीही सर्व भावनिक गरजा पूर्ण होतात.
इतरांबरोबर काही गोष्टी शेअर करण्याची सवय लागत नाही.
ती मित्रा-मैत्रिणींबरोबर राहिलं की लागते. पुढे बायको आली की सगळं शेअर केल्याशिवाय मजा नाही ते कळतं.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय, आभासी जगापेक्षा वास्तव जगच आपल्याला जमिनीवर ठेवण्यास मदत करते. अर्थात कुठल्या जगात रमावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. आमचे अनुभव वेगळे आहेत. 'आमचे' शब्द वापरण्यामागे ज्यांना संभाव्य समस्येची वेळीच जाणीव झाली असा पालकांचा गट आहे.

In reply to by योगप्रभू

तुमचा तसा अनुभव असेल तर तो मान्य आहे. पण एकूणात देशाची लोकसंख्या, दुसरं मूल वाढवण्यात होणारी (दुहेरी) भावनिक गुंतवणूक, आर्थिक ताण आणि मानवी नातेसंबंधात असणारी कमालीची संदिग्धता बघता माझा अनुभव `एक कुटुंब, एक मूल' आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

"सिंगल चाईल्ड" हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य. परंतू सामाजिक दृष्टीकोनातून आणि एकंदरीत त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही निवड तितकीशी योग्य ठरत नाही.
पण एकूणात देशाची लोकसंख्या, दुसरं मूल वाढवण्यात होणारी (दुहेरी) भावनिक गुंतवणूक, आर्थिक ताण आणि मानवी नातेसंबंधात असणारी कमालीची संदिग्धता बघता माझा अनुभव `एक कुटुंब, एक मूल' आहे.
"सिंगल चाईल्ड" चे परीणाम या सार्‍या बाबींपेक्षा गंभीर होऊ शकतात. चीनने हा प्रयोग करुन पाहीला आहे.

In reply to by योगप्रभू

एकुलते एक बाळ ही कल्पना मुलांच्या लहानपणी (मुलगा आणि मुलगी दोघेही अभिप्रेत) कितीही रम्य वाटत असली, त्याने आपले "सोशल स्टेटस" स्टेटस कितीही उंचावत असले तरीही हे प्रकरण ते मुल मोठे झाल्यावर, संसारात पडल्यावर खुपच तापदायक ठरु शकते. जेव्हा एकुलते एक मुल असते तेव्हा आई वडीलांचं लक्ष पुर्णपणे त्याच्यावरच केंद्रीत असते. याने त्याला "सेंटर ऑफ स्टेज" राहण्याची सवय लागते. आई वडील त्याची प्रत्येक ईच्छा पुर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात आणि मग तडजोड काय असते हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही. असो "सिंगल चाईल्ड" या विषयाचा आवाका खुप मोठा आहे. तुर्तास एव्हढेच. जाता जाता, चीनने त्याची लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी "एकच मुल" ही योजना राबवली आणि मानसशास्त्रात लिटील एम्परर सिंड्रोमची भर पडली.

In reply to by धन्या

इथे इश्श्यू एकुलते एक बाळ असा नसून, पालक त्याचे पालन कसा करतात हा आहे. एकुलत्या एक बाळाचे संगोपन व्यवस्थित केले तर त्याला समाजात राहण्याचे सर्व धडे आरामात गिरविता येतील. मी स्वतः अशी कैक उदाहरणे पाहिली आहेत. वरचा प्रतिसादही सिंगल चाईल्डच्या कल्पनेचे जनरलायझेशन आहे, ज्याशी मी असहमत आहे.

In reply to by बॅटमॅन

मी जनरलायझेशन केलंच नाही.
संसारात पडल्यावर खुपच तापदायक ठरु शकते.
आजूबाजूची एकुलती एक बाळं मानसशास्त्राचा चश्मा लावून पाहिली की त्यातली खुपच कमी तुम्ही म्हणताय तशी हेल्दी पॅरेंटींग झालेली/होत असलेली असतात हे मात्र नक्की. :)

In reply to by धन्या

मानसशास्त्राचा चश्मा लावून पाहिली की त्यातली खुपच कमी तुम्ही म्हणताय तशी हेल्दी पॅरेंटींग झालेली/होत असलेली असतात हे मात्र नक्की.
माझा व्यक्तिगत अनुभव एका मुलाचा आहे. शिवाय बहिणीला एकच मुलगा आहे. त्या दोन्ही भावंडात कमालीच ट्युनिंग आहे. माझ्या मेव्हण्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भाच्यावर आमच उभयतांच प्रेम आहेच पण मुलीला आम्ही आमचीच मुलगी समजतो आणि तिचे सर्व हट्ट स्वतःच्या मुलीसारखे पुरवतो. चीनचं माहिती नाही पण भारतात कुटुंबसंस्था अजून तग धरून आहे. मी सांगतोय तसा विचार केला तर फॅमिली एक्स्टेंशन तर होतंच आणि देशाच्या सर्वव्यापी समस्येत आपला सोडवणूकीचा वाटा राहतो.

In reply to by संजय क्षीरसागर

या बाबतीत बॅटमॅन म्हणत आहेत ते लागू होतं. आई वडीलांना बाल संगोपन म्हणजे काय याची जाण असेल तर मुलांच्या संख्येवर मुलांचा व्यक्तिमत्व विकास अवलंबून नसतो. प्रत्येक कुटुंबातील आई वडीलांना अशी जाण असतेच असं नाही. किंबहूना अशी जाण खुप कमी आई वडीलांना असते. :)

In reply to by बॅटमॅन

हे "सँपल बायस" काय प्रकरण आहे मालक? गुगलून उत्तर मिळेल. परंतू तुम्हीच जरा विस्ताराने लिहा. तुम्ही याच मुद्दयाला धरुन लिहाल त्यामुळे व्यवस्थित कळेल.

In reply to by बॅटमॅन

बॅट्या, तुला आधी सांगितलंय तेवढं कर. तुझ्या इश्शूबाबत (प्रतिसादाबाबत) ३-४ वर्षांनी बघूच आम्ही. घोडामैदान फार लांब नाही. :)) मला नवल एका गोष्टीचं वाटतंय, की बाबांच्या संगोपनावर अजुन आया कशा बोलत नाहीयेत? पुरुषजातीच्या कौशल्यांबाबतचा हा पारंपरिक अविश्वास म्हणावा का? :)

In reply to by योगप्रभू

हा योगप्रभूंचा फाऊल धरण्यात यावा. बाबांच संगोपन ऑलरेडी झालय. आयांच संगोपन सुद्धा झालेलय. त्यांनी `एकमेकांच संगोपन कसं करावं' अशी चर्चा शुचिच्या पोस्टवर चालू आहे.

In reply to by धन्या

आता काय झालं? तुम्ही उगीच मला `शिरेयस मानूस' समजताय राव.

In reply to by संजय क्षीरसागर

माझा आहे विश्वास. संजयजी देउ शकतात असे प्रतिसाद. :) आणि त्यांनी तसे खूप दिलेत.

In reply to by संजय क्षीरसागर

हा हा हा.. संजय, बाबांचे संगोपन कौशल्य असं मला म्हणायचं होतं. गरीबाला सांभाळून घ्या. :) मस्त गुदगुल्या करताय.

In reply to by अभ्या..

तू तुझ्या स्वाक्षरीच्या वर सेपरेटर लाईन टाक. पुढे मागे गडबड होऊ शकते.

In reply to by बॅटमॅन

बॅट्या, तरुणाईच्या नौका भवसागरात विहरताना बघायला बरं वाटतं रे. एक वेडा समुद्रपक्षी नुकताच वाट चुकून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला. भवसागरात चोचसुद्धा ओली केली नाही त्या पाखरानं. जाऊ दे.

In reply to by योगप्रभू

अप्रीशिएट द सेंटिमेंट पण थोडे मतभेद आहेत. अर्थात, इथे लिहिले तर "अवांतरांचा गल्बला | कोणी पुसेना कोणाला||" असे होईल म्हणून थांबतो. :)

माझी लेक खरच खुप शहाणी आहे तशी , मी तिला संभाळायच्या एवजी तीच मला संभाळुन घेते बर्‍याचदा,पप्पा सतत कामात असतो हे तिला चांगलच कळत्,तिने जो काही बालहट्ट केला तो पुरवायलाही खरच खुप समाधान असत.दुसर म्हणजे ती मुलगी आहे म्हणुन कदाचित स्त्रीकडे असणार्‍या उपजत समजुदार स्वभावामुळे असेल पन जर मुलगा असता तर त्या माठ्याने एतक समजुन घेतल असत की नाही कोनास ठाउक.बाकी खोड्या मात्र ठरवुन काढते,सुपिक बुद्धीमत्ता,आणी जोडीला डोरेमॉन आणी शिनचॅन नावाच कार्टुन असल्यावर दुसर अपेक्षित तरी काय धरायच....

In reply to by बाबा पाटील

कदाचित स्त्रीकडे असणार्‍या उपजत समजुदार स्वभावामुळे असेल
हे जनरलायझेशन झालं. अर्थात हे असं जनरलायझेशन खुप वेळा होतं, पुरुष म्हणजे एक विशिष्ट गुणांची यादी आणि स्त्री म्हणजे एक विशिष्ट गुणांची यादी. या बाबतीत वपुंचं एक वाक्य आठवतं, "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणाने सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणाने सांगता येत नाही." हे वाक्य स्त्री आणि पुरुषांना सारखेच लागू होतं.

In reply to by बाबा पाटील

वॉव डॉरेमॉन आणि शिंच्यान मला पण आवडतं :) लाल शर्ट आणि पिवळी चड्डी काय भारी दिसतो :) त्याचा आवाज खुप फेव्रेट ....:) तुमच्या मुलीची रास कन्या आहे कैवो ???

In reply to by बाबा पाटील

सहिये ;) भारी कार्‍टून असणार ... गणपा काकाच्या कन्येची आठवण आली ....

In reply to by जेनी...

घरातली दहा मानस एक साईड्ला अन हे एक पिल्लु एक साईडला........

In reply to by बॅटमॅन

१०० वेळा सहमत शुचितैंशी, आयला वृश्चिकेची दोन चार माणसं आहेत म्हणुन तर जग चाललंय सुखासुखी नाहीतर काय विचारायची सोय नव्हती....

In reply to by ५० फक्त

होय तेचायला, नैतर मेष-वृषभ-सिंह-कर्क-मीन-धनु-मकर वगैरेंच्या जंगलराज्याऐवजी आणि उर्वरितांच्या माठ आणि हरामी राज्यांपेक्षा स्कॉर्पियन क्वीनचे राज्यच खरे , हो की नै...

बापाने पोर कशी संभाळायची ?
हा प्रश्न तुम्हाला पडला या बद्दल तुमचे अभिनंदन. कारण बर्‍याच घरात , स्त्री नोकरी करणारी असो वा नसो, घर, मुलं इ. ची जबाबदारी फक्तं आणि फक्तं स्त्रीचीच असते. तसं मुलांना सांभाळणं (मोठ्यांच्या तुलनेत) काहीच अवघड नसतं. प्रत्येक मुल हे युनिक असतं, त्या मुळे दुसर्‍यांचे अनुभव उपयोगी पडतीलच असं नाही. आणि "आलिया भोगासी ..." अशा अविर्भावात हे काम करण्यापेक्षा, ती एक आनंददायक जबाबदारी आहे अशा पद्धतीने स्विकारले तर आपोआप मार्ग मिळत जाईल..

In reply to by मनीषा

ती एक आनंददायक जबाबदारी आहे अशा पद्धतीने स्विकारले तर आपोआप मार्ग मिळत जाईल..
एकमेव सोल्यूशन!

माझ्या नवर्‍याला विचारा... (त्या साठी आधी मला व्यनी करा!) माझा मुलगा आणि माझा त्याचा बाबा ह्यांचा एकमेकांवर भयंकर जीव आहे. एकदा ऑफिस मधुन घरी आलो की नवरा आणि पोरगा किंचाळत एकमेकांकडे झेप घेतात. दोघांचे चेहरे बघण्या लायक असतात. माझा नवरा बर्‍याचदा मला आराम म्हणुन रात्रि ३ द पोरगं रडत उठलं कि ३ ही वेळा उठुन गरम दुधाची बाटली घेउन येतो आणि त्याला पाजतो. शी-शु च त्याला वावडं नाही. शी चे लंगोट स्वतः धुवुन टाकतो.. एक जन्म दिला त्यानंतर आता असं काहीच नाहीये की मी आई म्हणुन वेगळं करु शकते आणि माझा नवरा नाही. हो फक्त झोपताना त्याला माझ्या मांडीची सवय आहे आणि बाबांची मांडी टोचते म्हणुन तेवढं मात्र मीच करते. बाकी कामावर जाणार्‍या आयांचे नवरे कसे असायला हवेत ह्याचा माझा नवरा वस्तुपाठ आहे. एकदा बाळ रात्री सारखे उठवते म्हणुन सासुबाई त्याला स्वतःपाशी घेउन गेल्या. मी अत्यंत आनंदात ताबडतोब झोपुन घेतलं (हो हो.. झोप हीच सर्वोच्च आनंददायक गोष्ट असु शकते..) नवरा मात्र ४ दा उठुन बाळाकडे जाउन आला.. मुळात तो इतका आनंदात असतो त्याच्या मुलासोबत की त्याला ही जबाबदारी वाटतच नाही..

In reply to by पिलीयन रायडर

सेम एक्स्पिरियन्स हियर. पोराला बापाचा अन बापाला पोराचा आईपेक्षा जास्त लळा. विचित्र वाटेल पण, कधीतरीच... आपला जीव वैतागला असताना पोराच्या छोट्याशा कुशीत डोकं ठेवून पाहिलं आहेत का? आईच्या कुशीत वाटलं नसेल असं शांत वाटतं.

In reply to by गवि

अगदी अगदी हेच्च... बाळाचा स्पर्श "स्ट्रेस बस्टर" असतो.. काय सुरेख हसतात मुलं..!! चाटतात काय आपल्याला.. आणि मी दिसल्यावर तो माझ्याकडे पाहुन खुप खुश होतो..मग जोर्जोरात पाय झाडतो..आणि मग जी "झेप" घेतो ना.. माझ्या जन्माचं सार्थक होतं तेव्हा..!!

गवि आणी पिलीयन रायडरशी १००% सहमत.

ह्याच्यासाठीच आधी विचार करून मग कृती करायची असते. असो...

घरी बाबा आल्यावर मुलगा खांद्यावर हात टाकून मित्रासारखा बसतो. ओरडण्याचे काम आईचे असा अलिखीत नियम आहे आमच्या घरी! गतिमान आयुष्यातील स्वागतार्ह बदल आहेत हे! माझ्या बाबांना मी खूप घाबरत असे, पण तेवढच प्रेमही होत. आई हरीतालिकेचा उपवास कड्क करायला लावायची. रात्री बाबा मस्त पिठलं-भात करीत आणि खायला लावीत. मला म्हणायचे, मी देईन तुला चांगला नवरा बघून, उगाच उपाशी नको झोपू!

मला उगीचंच 'इन पर्स्युट ऑफ हॅपीनेस' आठवला. त्यातला बाप, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुठलीही सपोर्ट सिस्टीम नसताना आपल्या मुलाला कसा सांभाळतो हे खरंच बघण्यासारखं आहे. त्या चित्रपटात मुलगा जरा मोठा दाखवला आहे. मात्र खर्‍या आयुष्यात त्या माणसाचं मूल फक्त दीड-दोन वर्षांचं होतं. म्हणजे त्याला सांभाळायला जिवाचा किती आटापिटा करायला लागला असेल.

In reply to by मराठे

ह्रुदयस्पर्शी चित्रपट - 'इन पर्स्युट ऑफ हॅपीनेस'. मराठीमध्येही 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' असा चित्रपट दोन दशकांपूर्वी येऊन गेलाय...

In reply to by मराठे

विषेशतः "पॉसिबल" आणि "प्रोबॅबल" मधला फरक तो मुलाला जसा सामजावतो आणि त्यानंतर मॅच पहायला जायचं असताना पोरगं जे कॉमेंट करतं... सहीच! आता मनोरंजनाकडेच विषय वळलाय तर नॉट विदाउट माय डॉटरही वाचताना फार कंटाळ आला न्हवता...

एकुन मस्त चर्चा झालीय ..... बालपणात शिरायलाहि वेळ लागला नाहि ... वडील खुप हळवं व्यक्तिमत्व असतं .. लहानपणी त्यांच्या कुशीत जेवढं सुरक्षित वाटतं तेवढच सुरक्षित त्यांचं सतत आपल्यावर लक्ष असल्यावर वाटतं . मी इकडे यायला निघाल्यावर पप्पा एअर्पोर्ट्वर येइपर्यंत माझ्यासमोर अजिबात रडले नाहित ... पण मी आत शिरल्यावर मात्र त्यांचे भरुन आलेले डोळे आजहि विसरायला होत नाहित . मी इकडे आल्यावरहि पप्पाना घरात माझ्या बडबडीचा भास व्हायचा ... कितीहि लांब असलं तरी ते सतत जवळ असल्यासारखं वाटतं .. खुप एकटं वाटलं , कुणाशी भांडण झालं , अगदि कधी कधी काहि कारण नसलं तरि मी कधीहि त्यांना फोन करते ... खुप हलकं वाटतं त्यांच्याशी बोलुन ... अटॅच्मेन्ट इतकी गोड आहे कि स्वताहाला नशिबवान समजन्याइतकी .....

१००!

बाबांच संगोपन ऑलरेडी झालय. आयांच संगोपन सुद्धा झालेलय. त्यांनी `एकमेकांच संगोपन कसं करावं' अशी चर्चा शुचिच्या पोस्टवर चालू आहे.
आजकाल त्याला संगोपन म्हणतात काय... :)) बरी सामान्य ज्ञानात भर पडली... :) बाकी ( मी) बाबा नसल्यामुळे, अण्भव णाय म्हणून पास....