“आई, मस्त चिकन बनवशील का आज ?” पिल्लाचं आर्जव…… तेही त्याच्या वाढदिवसाला……!! मग ते न बनवून कसं चालणार… !! इकडे तिकडे थोडं सर्च करुन, घरी असलेल्या वस्तू वापरुन मस्त रेसिपी तयार झाली.”मूर्ग हैदराबादी”.
साहित्य :
मॅरिनेशन :
चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून
ग्रेव्ही :
बारीक चिरलेला कांदा – २ कप
लसूण पेस्ट – १ टेबल स्पून
कोथिंबीर – अर्धा कप
पुदीना – अर्धा कप
हळ्द – १ टी स्पून
तिखट – १ टी स्पून
गरम मसाला – २ टी स्पून
मीठ – चवीनुसार
तळलेले काजू १०-१२
तेल – ४ टेबल स्पून
कृती :
१. मॅरीनेशन चं साहित्य चिकनला चोळून चिकन साधारण दीड तास मॅरीनेट करा.
२. कढईत तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या.
३. मग त्यात लसूण घालून थोडं परता.
४. त्यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घाला.
५. आता त्यात चिकन चे मॅरीनेट झालेले तुकडे घालून परता.
६. मग त्यात अर्धा कप पाणी घालून नरम शिजवून घ्या.
७. शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीना आणि काजू घालून आणखी एक उकळी काढा.
८. मस्त चमचमीत तयार झालेलं चिकन कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून सर्व्ह करा. तबीयत खुश होणारच
पिल्लाने अगदी मनापासून दाद दिली होऽऽऽऽ
वाचने
8310
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट!!
नुसता,
फोटो मस्त आहे...
अगं पुदीना हाच तर मुख्य घटक
In reply to फोटो मस्त आहे... by मनीषा
असं आहे होय.. मला वाटलं,
In reply to अगं पुदीना हाच तर मुख्य घटक by जयवी
तोंडाला झरे फुटलेत.....पार
अद्वैत ला...
नक्की दीपक
In reply to अद्वैत ला... by दिपक.कुवेत
लेकाला आमच्या तर्फे
धन्यु लोक्स
मस्त चिकन.
पेठकर काका...... काजू अलिप्त
In reply to मस्त चिकन. by प्रभाकर पेठकर
मीसुद्धा
In reply to मस्त चिकन. by प्रभाकर पेठकर
खी खी खी!
In reply to मीसुद्धा by विसुनाना
अग्गागा!
खल्लास!!
जयवी, तुमच्या हातालाच चव
मनापासून धन्यवाद दोस्तांनो
लेकाला वाढदिनाच्या हार्दिक
ख ल्ला स!
काय रे हसवतोस? म्हणे
In reply to ख ल्ला स! by धमाल मुलगा
आवडलं
निरपराध आणि सजीव असणार्या
तुझ्या भावना समजू शकते मुला
In reply to निरपराध आणि सजीव असणार्या by मदनबाण
सगळ्या पाचकरसांचे एकदम उदिरण झाले की हो ?
च-वि-ष्ट
"आज जुम्मे के दिन ये डिश देखा