कुठचा राग कुठच्या प्रसंगी गावा याचे शास्त्रीय संगीतात काही संकेत आहेत. ते नियम आहेत असे समजू नये. जास्तीत जास्त कोमल स्वरांचे राग संधीकाळी व शुद्ध स्वरांचे राग पूर्ण प्रहरी असे सर्व साधारण विभाजन आहे. जे राग जास्त आर्त आहेत - मारावा , पूरिया ते सायंकाळी व जे प्रसन्न आहेत ते सकाळी - बिभास , भैरव , तोडी अशी त्यांची विभागणी आहे. साधारणपणे भैरव व भैरव थाटातले राग पहाटे गातात. कोमल ऋषभ हा ( जीवघेणा) स्वर हया सर्व रागांचा प्राण आहे.
दोनीही मध्यम असणारे राग - यमन , छायानट , बिहाग , केदार , भूप हे रात्रीच्या पहिल्या प्रहारचे मात्तबर राग ( ओपनिंग बेंटस्मन ). म्हणून ते मैफिलीच्या सुरवातीला गातात. आता आपल्याकडे सुरवात म्हटली की गणपती बाप्पा ना पहिले नमन आणि मग यमन , अशीच ती सुरवात होते. यमन , केदार , भूप मध्ये बाप्पाची असंख्य गाणी , चीजा आहेत.
आता भक्ती संगीत सकाळी ऐकण्यात एक निखळ निर्मल आनंद असतो आणि म्हणूनच यमन , केदार , बिहाग सकाळी ऐकण्याची आपणाला सवय होवून जाते.
संगीताचा संबंध वेळ , समय , यांच्या आधी भावनेशी आहे. रागाची वेळ ही एक सर्वसाधारण सोय आहे एवढेच मला वाटते. भैरवीची गम्मत पहाटेच. रंगलेली मैफल मग भैरवीची फर्माईश , मग चहा कॉफी आणि उत्तर रात्रीच्या गप्पा ! आता भैरवी चे नाते शेवटास लावल्याने , संध्याकाळ च्या मैफिलीचा शेवट कुणी भैरवी ने केला तर ते समयोचित नाही पण सर्व सामान्य श्रोत्यांना खटकणार नाही. मैफिल पहाटे संपू दे नाही तर संध्याकाळी – ती शेवटची हुरहूर मनात माजवायला भैरवीच हवी.
हल्ली सकाळी सकाळी एफ.एम. वर भक्ती संगीत लागते आणि त्याची सुरवातच भैरवी ने करत्तात ! आता बोला.
भारतीय शा.संगीत ऐकताना सुरवातीला तरी त्याची “ओळख” करून घेणे , एवढाच उद्देश असु ध्यावा. कानाला गोड लागले , हृदयाला भिडले तर राग , थाट , घराणे , वादी , संवादी हया व्याकरणाला बसावा टेंपोत आणि ऐका मनमुराद. एकदा हया ओळखीचे रुपांतर “प्रेमात” झाले की पहा कसे ऋतू फुलून येतात. हेच प्रेम पुढे गेले आणि नशा चढली तर मग आयुष्य इतके रंगीत , सोप्पे वाटेल की ज्याचे नाव ते.
सुहा कानडा (पं. थोरले अभिषेकी), हिंडोल ( पं.कैवल्य कुमार ) , काफी कानडा ( विदुषी आश्विनीताई) हया आणि अश्या लेण्यांमध्ये भान हरपले तर मिपाच्या नशेचीच अनुभूती येईल. पहिले दोन तू नळी वर आहेत. पं. कैवल्य कुमार ह्यांचे गाणे ऐकले नसेल तर जरूर ऐका. एका महान होऊ घातलेल्या गायकाचे गाणे ऐकल्याचे समाधान प्राप्त होईल.
शा.संगीतामाधले आपल्याला “काही” कळत नाही हा एक मोठा गैर समाज आपण सतत वागवतो. त्याचे विसर्जन लवकर केल्यास बरे. कोणत्याही कलेचा आनंद घेण्यासाठी ती समाजावीच लागते का ? माझ्या अर्धांगिनीला क्रिकेट समजत नाही (असे मी समजतो ) पण मी सचिन बद्दल काही बाही बोललो तर त्या रात्री नक्की उपास (येथे डोळा मारणारी स्मितिका ). एकदा ती म्हणाली गावस्कर समालोचन करताना किती चुका करतो. सचिन च्या फटक्याला “ cover drive” म्हणाला आणि गांगुलीने तेथेच फटका मारला तर “on drive ”म्हणाला. क्षेत्र रक्षकांच्या जागा सांगतानाही गल्लत करतो सारखा. एकदा “silly mid off” म्हणतो आणि त्याच जागेला सचिन आला की “ silly mid on” म्हणतो.
तिला क्रिकेट कळते की नाही ? हा मुद्दा महत्वाचा नाही तर ती त्या खेळाचा आनंद छान लुटते. तसेच शा. संगीताचे आहे. लट उलझी , सुलझा बालम ची मजा घेता आली की झाले. तो बिहाग असु दे नाही तर मारू बिहाग. आपण त्या प्रेमी युगुलाच्या भावना जाणल्या की काम फत्ते !
शा. संगीताचा समय आणि समज हया छोटेखानी लेखाची प्रेरणा “स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ (२/२) “ व त्या वरील प्रतिक्रिया येथून मिळाली आहे.
वाचने
9683
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
'कुणीतरी लिहायलाच हवं' अशा विषयाला सुरूवात केल्याबद्दल आभार
अगदी असेच म्हणतो. तात्यांनी
In reply to 'कुणीतरी लिहायलाच हवं' अशा विषयाला सुरूवात केल्याबद्दल आभार by बहुगुणी
तुम्ही एकेक राग दिवसाच्या योग्य समयी देऊन
सहमत आहे...
In reply to तुम्ही एकेक राग दिवसाच्या योग्य समयी देऊन by संजय क्षीरसागर
पं विजय खोपटीकर (आडनांव नेमकं
In reply to सहमत आहे... by धन्या
हो.
In reply to पं विजय खोपटीकर (आडनांव नेमकं by आदूबाळ
संजय ...सूचना चांगलीच.
जरूर पाहा करून
In reply to संजय ...सूचना चांगलीच. by तर्री
+१
In reply to जरूर पाहा करून by संजय क्षीरसागर
हा लेख समजण्यासाठी...
लेख आवडला
शास्त्रीय संगीत अज्जिबात समजत
दत्तबावन्नी
दत्तबावनी
In reply to दत्तबावन्नी by उपास
क्लासिकल म्योझिक हे स्किल आहेच. लय आणी आनंदही आहे!
भारतीय शास्त्रीय संगिताबद्दल
ॠतु, समय प्रधानता ई.
कर्नाटकी ..
In reply to ॠतु, समय प्रधानता ई. by चौकटराजा
संगीत हे फक्त
In reply to कर्नाटकी .. by अभिरत भिरभि-या
फारसी = इराणी, पर्शियन !
In reply to संगीत हे फक्त by चौकटराजा
छान
सर्व प्रतिकिया आवडल्या.
छान दुवे
In reply to सर्व प्रतिकिया आवडल्या. by तर्री
आगदी बराबर
In reply to छान दुवे by पैसा
मस्त लेख..
लेख आवडला.
तोडी
तोडी.
In reply to तोडी by लॉरी टांगटूंगकर
दुवे
In reply to तोडी. by तर्री
पसंद अपनी अपनी
लगाव महत्वाचा ...रचना महत्वाची
In reply to पसंद अपनी अपनी by रमेश आठवले