अन्यथा
लेखनविषय:
काव्यरस
जीवना, भेट केव्हातरी
अंतरीच्या उमाळ्यापरी
आसवांच्या उधाणातही
पापण्यांच्या रित्या घागरी
भांडणावाचुनी व्हायची
भेट माझी-तुझी का खरी?
नाव मी भोवर्याला दिली,
साद देती किनारे जरी
जीवघेणा कडाका इथे,
सांत्वनाच्या तिथे चादरी !
पाचवीलाच मी पूजिली
शब्द झेलायची चाकरी
अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!
वाचने
5334
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आह!
क्लास !
सुरेख!!
In reply to सुरेख!! by किसन शिंदे
+१
अंत पाहू नको रे सुखा, साथ दे,
सुंदर.
कविता आवडली.
शेवटचा शेर जोमदार
छान कविता..भावस्पर्शी.
सुरेख
क्रांती, सुरेख लिहिलं आहेस.
मस्त.. आवडली
In reply to मस्त.. आवडली by शैलेन्द्र
+१
सुरेख गझल !
छान..!
मस्त
सलाम
खुप दिवसांनी आलात
धन्यवाद
अंत पाहू नको रे सुखा,
आहाहा
In reply to आहाहा by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
नाव मी भोवर्याला दिली,
अप्रतिम !
कविता आवडली.. सुरेख रचना