भावना दुखावणे हा एक प्रकार आपल्या भारतीय समाजात रुढ झाला आहे. ह्यात लेटेस्ट म्हणजे कमल हासनच्या विश्वरुपम ने मुस्लिम समाजाच्या दुखावल्या आणि त्या चित्रपटावर तामिळनाडु सरकारने बंदी आणली.
हा चित्रपट अजुन पाहण्यात आलेला नाही, पण तरीही त्याला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तो चित्रपट रिलीज व्हायला काही हरकत नसावी. भावना दुखावल्याच्या नावाखाली ज्या झुंडशाहीचे प्रदर्शन होतांना दिसते त्याला कंट्रोलमधे आणायलाच हवं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र शासनाने ह्याबद्दल कौतुकास्पदरित्या ठाम भुमिका घेतलेली आपण पाहिली. ’माय नेम इज खान’ रिलीज होऊ दिला. तसेच ’योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ चे प्रयोगही झाले.
कलाकारांकडे-लेखकांकडे झुंडीचं बळ नसतं. फ़्रिडम ऑफ़ एक्स्प्रेशन चा घटनात्मक मुलभुत अधिकार प्रत्येकालाच आहे. त्यामुळे इतरांना दुखावण्याचा अधिकार नसला तरी अपप्रचार, अश्लीलता किंवा कुठल्याही प्रकारचे समाजविरोधी कृत्य ह्याविरोधात न्यायालयात जाता येतेच. प्रोटेस्ट करायच्याच असल्या तर शातंतापुर्ण पद्धतीने करता येतात. असे असतांनाही अनेक सामाजिक संस्था रस्त्यावर उतरतात, जाळपोळ, दगडफ़ेक करतात. ह्याला आवर घालायचे काम हे सरकारचे आहे. विश्वरुपमवर बंदी आणुन तामिळनाडु सरकारने स्वत:ची जबाबदारी तर झटकली. त्यामागे मतपेटीचं राजकारण आहे की कायदा-सुरक्षेच्या प्रश्नाची काळजी हा एक प्रश्न आहेच. पण अशा परिस्थितीत कलाकारांनी कुठे जावं?
सोशल मिडियाच्या प्रसारामुळे हा मुद्दा अधिक व्यापक होत जाणार आहे. सामान्यजनही फ़ेसबुक-ब्लॉग्स इत्यांदीवरुन स्वत:ची म्हणणे मांडायला लागलेले आहेत. अशा वेळी नागरिकांच फ़्रिडम ऑफ़ एक्स्प्रेशन जपलं गेलंच पाहिजे. कठीण प्रसंगी सरकार आपल्यामागे उभं राहत नाही ह्याची नागरीकांना खात्री आहेच. पोलिसांकडे जायलाही सामान्य माणुस घाबरतो. असे प्रसंग ही समजुत आणखी पक्की करतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकं अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाहीत.
वाचने
5050
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे बरोबर आहे..
हम्म!
लेखनाशी सहमत..........!
अशा सगळ्या प्रकरणांमधे
सरकार एक गठ्ठा मत दान वाल्या
In reply to अशा सगळ्या प्रकरणांमधे by शैलेंद्रसिंह
मला वाटत मुळात भारतासारख्या
सहमत. काही टक्के लोकांकडे
In reply to मला वाटत मुळात भारतासारख्या by पिंपातला उंदीर
खैरलांजी प्रकरणात दलित संघटना
In reply to सहमत. काही टक्के लोकांकडे by सांजसंध्या
मला काही ती चर्चा आता सापडली
In reply to खैरलांजी प्रकरणात दलित संघटना by शैलेंद्रसिंह
तुमच्या भावना समजु शकतो
:D
:D:D पैसा बोल्ता है!
In reply to :D by पैसा
मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे,
न बोलणेच बरे ..
आपल्या भन्नाट राज्यघटनेवर न
In reply to न बोलणेच बरे .. by चौकटराजा
ह्या न त्या कारणाने भावना
भावना दुखावणारे राजकीय नेते
आजच काँग्रेस
राएस्मा रुग्णालयासमोरील अदिती
In reply to आजच काँग्रेस by खटासि खट
अदिती हॉटेलच्या व्यवस्थापनास
In reply to राएस्मा रुग्णालयासमोरील अदिती by विश्वनाथ मेहेंदळे