✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रंगीत दहशतवाद

ह
हुप्प्या यांनी
Wed, 01/23/2013 - 22:42  ·  लेख
लेख
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे. त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत. पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत. http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्‍या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते. आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का? फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54489 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

धन्यवाद

विकास
गुरुवार, 01/24/2013 - 23:07 नवीन
फॉर दी रेकॉर्ड इतके स्पष्ट लिहील्याबद्दल धन्यवाद! अगदी संघ-भाजपाच्या विरोधकांकडूनही इतकेच म्हणायची गरज आहे. असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार

अनामिका
Sat, 02/02/2013 - 00:08 नवीन
केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या रविवारी जयपूर येथील कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात केलेल्या एका आरोपाने मोठीच राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्या हाती आलेल्या अहवालानुसार संघ व भाजपा यांच्या शिबीरात भगवा दहशतवाद शिकवला जातो व हिंदू दहशतवादी घडवले जातात; अशा स्वरूपाचा तो आरोप आहे. मग त्यांनी हिंदू शब्द वापरला, की भगवा यावर वाद घालण्यात अर्थ नाही. त्यातला आशय स्पष्ट आहे. त्यांनी देशातला व संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या रा. स्व. संघावरच दहशतवाद फ़ैलावत असल्याचा आरोप केलेला आहे. आता त्या आरोपामुळे भाजपा वा संघवाले विचलित झाले, संतापले आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला तर योग्यच आहे. पण त्यावर गदारोळ उठल्यावर शिंदे वा अन्य कॉग्रेसजनांनी केलेला खुलासा कमालीचा हास्यास्पद आहे. तो खुलासा म्हणजे गृहमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला जातो. विपर्यास भाजपाने केला म्हणायचा तर नेमका त्यांनी घेतला; तोच अर्थ पाकिस्तानात बसलेल्या लष्करे तोयबाच्या प्रमुखानेही काढला आहे. म्हणजेच गृहमंत्री बोलल्याचा जो आशय इथल्या माध्यमांनी व भाजपाने काढला; तोच त्या विधानाचा सर्वसाधारण अर्थ असू शकतो. त्यावरूनच प्रतिक्रिया उमटणार ना? सवाल असा आहे, की देशाच्या गृहमंत्र्याने कुठलेही विधान करतांना जपुन बोलायचे असते. कारण त्याच्या विधानाचा संदर्भ अनेक गोष्टींसाठी लावला जाणार असतो. पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एका जागी बोलताना असेच वादग्रस्त विधान केलेले होते व भारताने त्याचे भांडवल केले आहे, मग शिंदे वाटेल ते बोलून निसटू शकतील काय? ‘पाकिस्तानने काही काळ दहहतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून केला’, असे झरदारी बोलून गेले होते. तो वापर कश्मिर धोरणाच्याच बाबतीत झाला; असे भारताने कायम म्हटलेले आहे. म्हणजे तसे विधान करून झरदारी यांनी भारताला पाकविरुद्ध मुद्दाच पुरवला होता. शिंदे यांनी त्याची परतफ़ेड केली म्हणून त्यांचे जयपूरमधील विधान हा गंभीर मामला आहे. भारतातल्या दहशतवाद व जिहादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात आहे; असे आरोप आपण गेली दोन दशके करीत आहोत. मग मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत बलुचिस्तानमध्ये जो असंतोषाचा भड्का उडाला, त्याला भारताच्या कारवाया कारणीभूत आहेत; असा आरोप पाकिस्तान करू लागला. त्याला कुठला पुरावा नाही. पण आरोप होतच असतो. आपणही तसे आरोप पाकिस्तानवर करता असतो. मुंबईतील हल्ल्याचा सुत्रधार म्हणून आपण लष्करे तोयबाचा प्रमुख हफ़ीज़ सईद याच्याकडे बोट दाखवत असतो. त्या्च्या विरोधातले सज्जड पुरावे मिळाल्याने व जगाला ते दाखवले असल्याने; अमेरिका व राष्ट्रसंघानेही त्यावर बंदी घातली आहे. पण पाकिस्तानने कधीच सईदला त्यातला गुन्हेगार मानलेले नाही वा तसा आरोप स्विकारलेला नाही. उलट त्याने लष्करचे नाव बदलून जमात उद दावा असे केले. ती सेवाभावी संघटना आहे असाच पाकिस्तान प्रत्येकवेळी प्रतिदावा करीत आलेले आहे. मात्र आपल्याकडे हिंदूत्ववादी संघटनांवर जे आरोप सेक्युलर पक्ष व माध्यमांकडून होत असतात, त्याचा आधार पाकिस्तान नित्यनेमाने घेत असते आणि त्याच आधारावर भारतातच हिंदू दहशतवाद बोकाळला असल्याचा प्रतिआरोप केला जात असतो. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने त्याच आरोपाला दुजोरा मिळालेला आहे. इथे शिंदे यांची चुक कुठे झाली, ती लक्षात घेतली पाहिजे. ते कॉग्रेस पक्षात आहेत व कॉग्रेसचे नेताही आहेत. पण त्याचवेळी ते भारत सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. मग ते बोलतील त्याकडे कॉग्रेस पक्षाच्या नेत्याचा आरोप म्हणून बघितले जाणार नाही. तर भारत सरकारचे मत वा निष्कर्ष म्हणूनही बघितले जाणार असते. शिंदे यांनी केलेला आरोप व दिग्विजय सिंग यांनी केलेला आरोप यात असा मूलभूत फ़रक असतो. म्हणूनच अशा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याचे कायम भान राहले पाहिजे. शिंदे यांना त्याचेच भान ठेवता आलेले नाही. पण पक्षिय अभिनिवेशामध्ये त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाला किती नुकसान होईल; हा भागा अजिबात महत्वाचा नाही. शिंदे यांच्या त्याच विधानाने भारताचे किती नुकसान केले वा होणार; या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. शिंदे यांनी ते भाषण केल्यावर इथे भाजपाने कल्लोळ केला, ह्याला महत्व नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातून तात्काळ आलेली प्रतिक्रिया महत्वाची होती. लष्करे तोयबाचा मुखिया व २६/११ च्या मुंबई हल्यातला सुत्रधार, आरोपी हफ़ि़ज़ सईद याने भारतातच दहशतवाद पोसला जातो, याला भारताच्या गृहमंत्र्यांनीच दुजोरा दिल्याचे घोषित केले. तेवढ्यावर न थांबता त्यांने तात्काळ तीन भारतीय हिंदू दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचे आवाहन अवघ्या जगाला करून टाकले. त्यांनी नावे वाचली तर शिंदे किती हास्यास्पद ठरलेत; त्याचा अंदाज येऊ शकतो. हफ़िज़ने बंदीची मागणी केली त्यात संघ व हिंदू परिषदेचे नाव असायला हरकत नाही. पण त्याने बंदी घालायची मागणी केलेल्या तिसर्‍या संघटनेचे नाव ‘शिंदे’ असे दिले होते. म्हणजे त्या माकडाला शिंदे हे व्यक्तीचे नाव किंवा आडनाव असते हेसुद्धा माहीत नाही. अशा माकडाच्या हाती आपण कोलित देतो आहोत, याचे भान गृहमंत्र्यांनी ठेवायचे असते. कारण गृहमंत्र्याचे विधान जाहिर असले; मग ते भारत सरकारचे धोरण वा मत मानले जात असते. जगभर पाकिस्तानी जिहादी धुमाकुळ घालत आहेत. मुंबई हल्ल्यातला हाती लागलेला एकमेव फ़िदायिन अजमल कसाब; यानेही हफ़िज़च आपल्या हल्ल्याचा सुत्रधार असल्याची कोर्टात कबुली दिलेली आहे. त्याचा फ़ोनवरचा आवाजही नोंदला गेलेला आहे. त्याच्या आवाजाचा नमूना द्यायचेही पाकिस्तानने नाकारले आहे. त्याच्यासह लष्कर विरोधातले पुरावेही पाकने नाकारले आहेत. फ़ार कशाला जगाकडे पुरावे असताना लष्कर नावाची संघटना पाकिस्तानात कार्यरत आहे; हे सुद्धा स्विकारण्यास नकार दिला आहे. आणि दुसरीकडे आमचे गृहमंत्रीच ज्या संघटनांबद्दल काही संदिग्ध पुरावे किरकोळ प्रकरणातले आहेत. त्याचा हिंदू दहशतवाद म्हणून जगभर डंका पिटणार असतील, तर पाकने त्याचा गैरवापर करू नये असे कोणी म्हणू शकेल का? आपण भाजपाला शह देण्याचे राजकारण करताना भारत सरकारच्या पायावर धोंडा मारतोय याचे तरी भान शिंदे यांनी ठेवायला नको का? त्याच्या परिणामांचा विचार नको करायला? हफ़िज़ने त्याच्याही पुढे जाऊन अनेक मागण्या केलेल्या आहेत. भारताचे गृहमंत्रीच इथे दहशतवादी संघटना आहेत व त्या घातपात हिंसेचे प्रशिक्षण देतात. तेव्हा या निवेदनाच्या आधारे भारताला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, अशीही मागणी हफ़िज़ने केली आहे. नशीब अजून पाकिस्तानने तशी मागणी केलेली नाही. पण उद्या नजिकच्या काळात पाकिस्तान तशी मागणी करणार नाही, याची कोणी हमी देउ शकते काय? कारण तशी मागणी करण्यासाठी पाकिस्तानला कुठले पुरावे देण्याची गरज नाही. कारण तसे पुरावे आहेत व तसा अहवालच आपल्या हाती आलेला आहे, असे भारताच्या गृहमंत्र्यानेच खुलेआम सांगून टाकलेले आहे. तेव्हा ती एकप्रकारे भारतात दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे असल्याची भारत सरकारचीच कबुली ठरते. त्याचे पुरावे राष्ट्रसंघाने पाकिस्त्तानकडे मागायची गरज उरत नाही. ते पुरावे आहेत म्हणणार्‍या भारत सरकार व गृहमंत्री शिंदे यांनाच द्यावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांनी जे काही नंतर वा आधी भाजपच्या तोंडावर खुलासे टाकले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्यांना तशी वेळ आली तर जगासमोर त्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. आणि ते पुरावे भाजपा किंवा संघाच्या विरोधातले देऊन चालणार नाही. तर त्यांनाच निर्दोष ठरवणारे पुरावे द्यावे लागतील. कारण भाजपा किंवा संघ दहशतवादी संघटना असतील तर त्यावर भारत सरकारला बंदी घालावी लागेल. कारण तशी माग्णी पाकिस्तानने लावून धरली तर त्यासाठी समोर भाजपा किंवा संघाचा कोणी प्रवक्ता नसेल. समोर असेल राष्ट्रसंघ व अवघे जग. त्यामुळेचे जे कोणी पोपटासारखे भाजपा व संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावून अकलेचे तारे तोडत आहेत, ते शिंदे यांचे समर्थन करीत नसून भारताला सापळ्यात अडकवत आहेत. मग ते माध्यमातले बावळट सेक्युलर असोत किंवा कॉग्रेसचे मुर्ख नेते असोत. कारण पाकिस्तानने त्याचा आधार घेतला तर जगासमोर नाचक्की भाजपाची होणार नाही ती नाचक्की भारत सरकारची होणार आहे. त्याचे उत्तर भारत सरकार म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसलाच द्यावे लागणार आहे. कारण या आरोप व भाषणाचा आधार पाकिस्तानने घेतला तर भाजपा व संघ बाजूला पडून देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.-भाऊ तोरसेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

:(

अभ्या..
गुरुवार, 01/24/2013 - 22:52 नवीन
साह्यबांच्या विधानाचा योग्य अर्थ फक्त सोलापूरसाठीच आहे. हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरचा जिल्हा आहे. सध्या येथील राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलच्या धडाकेबाज मोहिमेला दिलेले उत्तर आहे ते. देशपातळीवर जरी याचा परिणाम झाला तरी तो काँग्रेसला हवाच आहे. किंबहुना धर्मांध आणि निधर्मांध असे कथित ध्रुवीकरण इलेक्शनपर्यंत झाले तरी ते काँग्रेसला फायद्याचे आहे. त्याचाच हा एक बाण आहे. शिकार किती होतील कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments

कसले सोलपुर घेउन बसला आहात.

चिंतामणी
Tue, 01/29/2013 - 17:37 नवीन
शिंदे सायबांच्या या महान विचारांमुळे त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत आहेत. हे वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दहशतवाद हा दहशतवाद असतो.

पिंपातला उंदीर
गुरुवार, 01/24/2013 - 23:13 नवीन
दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्याला धर्माची लेबल लावण चुकच. पण मुस्लिमाणा सरसकट दहशतवादी ठरवणे पण चुक आणि सरसकट सगळे हिंदू दहशतवादी आहेत असे म्हणे पण चुकच.
  • Log in or register to post comments

आणि

विकास
Fri, 01/25/2013 - 02:45 नवीन
कुठल्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध न करता, त्या अरोपांना न्यायालयात तडीस न नेता, नुसते वर्षानुवर्षे डांबून ठेवून, त्याचा नुसताच राजकीय वापर त्या व्यक्तीपेक्षा गिल्ट बाय असोसिएशन ने इतर संघटना/संस्थांच्या विरोधात करणे हे महाचूकच, मानवाधिकारच्या विरोधात आहे. अर्थात अशा ठिकाणी ते बोलायला जात नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

फक्त माहिती साठी ...सध्या

अनामिका
Tue, 02/12/2013 - 17:19 नवीन
फक्त माहिती साठी ...सध्या कॉंग्रेसचे तहहयात रोजंदारी कामगार असलेले सुशील कुमार .ज्याना सध्या कॉंग्रेसने दहशतवादाचे रंगारी म्हणुन कंत्राट दिलेय त्यांना हा तपशिल अंमळ माहित नसावा "प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो पण पकडला जाणारा प्रत्येक दहशतवादी हा मुसलमान असतो" हे गृहितक संघ अथवा भाजपाचे नसून "It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims"-Abdel Rahman al-Rashed
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सगळे मूर्खागमनी आहेत झालं

बॅटमॅन
Fri, 01/25/2013 - 02:57 नवीन
सगळे मूर्खागमनी आहेत झालं बरळणारे.
  • Log in or register to post comments

अवांतरः-

अग्निकोल्हा
Fri, 01/25/2013 - 05:49 नवीन
'विश्वरूपम' या चिपत्रटाच्या प्रदर्शनाला घातलेल्या दोन आठवड्यांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर कमल हसन यांनी हा 'सांस्कृतिक दहशतवाद' असल्याचे म्हटले आहे. यावर उपाय काय ?
  • Log in or register to post comments

इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा

नितिन थत्ते
Fri, 01/25/2013 - 07:35 नवीन
इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा कुणाला प्रश्न पडला असेल तर हा धागा पहावा.
  • Log in or register to post comments

हम्म

विकास
Fri, 01/25/2013 - 09:03 नवीन
मला माहीत नव्हते तुम्ही समोरच्याला धर्माच्या नजरेतून बघता ते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आणि तसा प्रश्न पडला नसेलच तर?

हुप्प्या
Fri, 01/25/2013 - 23:05 नवीन
ते असो. पण चिचाजी, आपले या विषयावर मत काय? (पूर्व)ग्रहमंत्री शिंदेसाहेब योग्य बोलले की नाही? दहशतवादाला रंग देणे योग्य की अयोग्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

धर्माची नजर नसावी

आजानुकर्ण
Fri, 01/25/2013 - 23:20 नवीन
इंटरनेट हिंदू हा वेगळा धर्म नाही. ते एक Behavioral Trait आहे. जसे शंकरपाळी मध्ये शंकराचे अस्तित्व नसते तसे इंटरनेट हिंदूंचे खऱ्याखुऱ्या हिंदुत्वाशी काही नाते नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अवांतर

प्रसाद प्रसाद
Mon, 01/28/2013 - 13:33 नवीन
जसे शंकरपाळी मध्ये शंकराचे अस्तित्व नसते शंकरपाळी हा शब्द हिंदीतील ‘शक्करपारे’ ह्या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे वाचल्याचे आठवते, खूप दिवसापूर्वी वाचले होते त्यामुळे देण्यासाठी संदर्भ सापडत नाहीये..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

विचारजंत

चेतन
Tue, 01/29/2013 - 14:20 नवीन
विचारजंत म्हणजे कोण असा कुणाला प्रश्न पडला असेल तर ह्या धाग्यावरिल प्रतिसाद पहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सगळ कस राजकारण(आपण फक्त चघळत

श्री गावसेना प्रमुख
Fri, 01/25/2013 - 09:05 नवीन
सगळ कस राजकारण(आपण फक्त चघळत बसायच)
  • Log in or register to post comments

आजकाल काहीही झाले तरी

श्रीगुरुजी
Fri, 01/25/2013 - 22:04 नवीन
आजकाल काहीही झाले तरी संघपरिवारावर ठपका ठेवला जातो. माझ्या मते संघपरिवारात फक्त ४-५ संघटना येतात. त्या म्हणजे रा.स्व.संघ, भाजप, अभाविप, भारतीय मजदूर संघ व वनवासी संघ. शिवसेना, भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना, पतितपावन संघटना, श्रीराम सेने, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अभिनव भारत, सनातन भारत, श्रीरामजन्मभूमी न्यास इ. संघटना/पक्ष संघाच्या नियंत्रणात नाहीत. परंतु या इतर संघटनांनी काहीही केले तरी संघपरिवारावर म्हणजे पर्यायाने रा.स्व.संघावर ठपका ठेवला जातो.
  • Log in or register to post comments

हा हा

आजानुकर्ण
Fri, 01/25/2013 - 23:19 नवीन
हम्म. हे रोचक आहे. संघ परिवारात फक्त ४-५ संघटना येतात हे केवळ तुमचे मत आहे की तथ्य आहे? येथे थोडी माहिती पाहा. http://www.sanghparivar.org/organization-profiles http://en.wikipedia.org/wiki/Sangh_Parivar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी वर दिलेल्या यादीपैकी फक्त

श्रीगुरुजी
Sat, 01/26/2013 - 20:36 नवीन
मी वर दिलेल्या यादीपैकी फक्त विश्व हिंदू परिषद या एकाच संघटनेचा संघाच्या संकेतस्थळावर उल्लेख आहे. बाकी इतर संघटनांचे नाव आपल्याशी संबंधित असल्याचा संघाच्या संकेतस्थळावर उल्लेख नाही. म्हणजे विश्व हिंदू परिषद वगळता मी दिलेली उर्वरित यादी बरोबर आहे. या उर्वरित संघटना संघाशी संबंधित नाहीत म्हणजेच संघ त्यांचे व्यवस्थापन करित नाही किंवा संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सदरचा लेख फक्त माहितीसाठी

अनामिका
Tue, 02/12/2013 - 16:59 नवीन
सदरचा लेख फक्त माहितीसाठी बाकी चालू द्या .. Do u know who said this "It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims" A Wake-up Call : Almost all terrorists are Muslims.. Arab News ^ | Abdel Rahman al-Rashed Posted on Sunday, October 3, 2004 6:58:34 AM by paltz It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims. The hostage-takers of children in Beslan, North Ossetia, were Muslims. The other hostage-takers and subsequent murderers of the Nepalese chefs and workers in Iraq were also Muslims. Those involved in rape and murder in Darfur, Sudan, are Muslims, with other Muslims chosen to be their victims. Those responsible for the attacks on residential towers in Riyadh and Khobar were Muslims. The two women who crashed two airliners last week were also Muslims. Osama bin Laden is a Muslim. The majority of those who manned the suicide bombings against buses, vehicles, schools, houses and buildings, all over the world, were Muslim. What a pathetic record. What an abominable "achievement." Does all this tell us anything about ourselves, our societies and our culture? These images, when put together or taken separately, are shameful and degrading. But let us start with putting an end to a history of denial. Let us acknowledge their reality, instead of denying them and seeking to justify them with sound and fury signifying nothing. For it would be easy to cure ourselves if we realize the seriousness of our sickness. Self-cure starts with self-realization and confession. We should then run after our terrorist sons, in the full knowledge that they are the sour grapes of a deformed culture. Let us listen to Yusuf al-Qaradawi, the sheikh – the Qatar-based radical Egyptian cleric – and hear him recite his fatwa about the religious permissibility of killing civilian Americans in Iraq. Let us contemplate the incident of this religious sheikh allowing, nay even calling for, the murder of civilians. This ailing sheikh, in his last days, with two daughters studying in "infidel" Britain, soliciting children to kill innocent civilians. How could this sheikh face the mother of the youthful Nick Berg, who was slaughtered in Iraq because he wanted to build communication towers in that ravished country? How can we believe him when he tells us that Islam is the religion of mercy and peace while he is turning it into a religion of blood and slaughter? In a different era, we used to consider the extremists, with nationalist or leftist leanings, a menace and a source of corruption because of their adoption of violence as a means of discourse and their involvement in murder as an easy shortcut to their objectives. At that time, the mosque used to be a haven, and the voice of religion used to be that of peace and reconciliation. Religious sermons were warm behests for a moral order and an ethical life. Then came the neo-Muslims. An innocent and benevolent religion, whose verses prohibit the felling of trees in the absence of urgent necessity, that calls murder the most heinous of crimes, that says explicitly that if you kill one person you have killed humanity as a whole, has been turned into a global message of hate and a universal war cry. We can't call those who take schoolchildren as hostages our own. We cannot tolerate in our midst those who abduct journalists, murder civilians, explode buses; we cannot accept them as related to us, whatever the sufferings they claim to justify their criminal deeds. These are the people who have smeared Islam and stained its image. We cannot clear our names unless we own up to the shameful fact that terrorism has become an Islamic enterprise; an almost exclusive monopoly, implemented by Muslim men and women. We cannot redeem our extremist youths, who commit all these heinous crimes, without confronting the sheikhs who thought it ennobling to reinvent themselves as revolutionary ideologues, sending other people's sons and daughters to certain death, while sending their own children to European and American schools and colleges. *Abdel Rahman al-Rashed is general manager of Al-Arabiya news channel. This article first appeared in the London-based pan-Arabic newspaper Al-Sharq Al-Awsat.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

विहिंप संबंधी एक प्रश्न

श्रीरंग_जोशी
Sat, 01/26/2013 - 01:11 नवीन
एक प्रश्न आहे, उत्तर कोण देऊ शकेल माहित नाही. १९८९ - ९० च्या दरम्यान विहिंपने अयोध्येतल्या प्रस्तावित राममंदीरासाठी वर्गणी गोळा केली होती. ते मंदीर अजूनही प्रस्तावितच आहे. एवढ्या सार्‍या पैशांचे पुढे काय झाले? माझ्याही घरून काही वर्गणी गेली होती. दहा बारा वर्षांपूर्वी वर्गणी गोळा करणारर्‍यांना हा प्रश्न गमतीने विचारला असता ते म्हणाले पावती दाखवा वर्गणीचे पैसे परत करू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नवीनच माहिती...

विकास
Sat, 01/26/2013 - 01:43 नवीन
मी (आम्ही/घरच्यांनी) काही वर्गणी दिली असे वाटत नाही. एकूणच त्यात गुंतलेले नव्हतो. दहा बारा वर्षांपूर्वी वर्गणी गोळा करणारर्‍यांना हा प्रश्न गमतीने विचारला असता ते म्हणाले पावती दाखवा वर्गणीचे पैसे परत करू.... हा हा! मस्तच उत्तर. तरी देखील उत्सुकतेपोटी गुगलले तर Clouds of uncertainty looms over VHP workshop ही टाईम्स मधील बातमी वाचायला मिळाली. त्यात म्हणल्याप्रमाणे ७०% मंदीर तयार आहे. उर्वरीत ३०% "वही बनाएंगे" ;) असल्याने राहीले आहे. त्यातील मुद्द्याचा परीच्छेद खाली देत आहे: There have been other hiccups too. In 1989, the VHP raised an amount of Rs 2.75 crore after accepting donations of Rs 1.25 each from Ramlala's followers. By the time the construction on the temple began, the interest capitalised on the funds gave the VHP a whopping Rs 7.5 crore with which to order material needed for construction. Spokesperson for VHP's Awadh region, Sharad Sharma confirmed all the money had been spent on acquiring material. "We exhausted the entire funds in acquiring materials for construction. थोडक्यात पैसे वापरले गेले आहेत. तेंव्हा परत मागायला जाऊ नका...पण अजून देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Sat, 01/26/2013 - 02:16 नवीन
२३-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी केवळ २.७५ कोटी रु. एवढीच रक्कम जमली असेल यावर विश्वास बसत नाही. तुमच्या प्रतिसादानंतर आठवले की बातम्यांमध्ये एकदा उ.प्र. मधील एका मार्बल फॅक्टरीमध्ये राममंदिरासाठी तयार असलेले संगमरवर वगैरे दाखवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आता

विकास
Sat, 01/26/2013 - 02:30 नवीन
२३-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी केवळ २.७५ कोटी रु. एवढीच रक्कम जमली असेल यावर विश्वास बसत नाही. कल्पना नाही. पण आता इतकी(शी) रक्कम एखादा नगरसेवकही त्याच्या एका खिशातून काढून देऊ शकेल असे वाटते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

समजू शकतो

श्रीरंग_जोशी
Sat, 01/26/2013 - 02:36 नवीन
तेव्हा तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा विहिंपचा साधा कार्यकर्ता दिवसाला हजार दिड हजार रुपये सहज जमवत असे. देशभरातील मोठी शहरे व धनाढ्यांकडून मिळालेल्या देणग्या पाहता रक्कम किमान १ अब्ज तरी असायला हवी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

जुनी आठवण

राही
Sat, 01/26/2013 - 11:35 नवीन
रा.स्व. संघाचे एक निष्ठावंत वृद्ध पदाधिकारीकार्यकर्ता आमच्या घरी येत असत.वनवासी कल्याणाशी संबंधित काम असे. नंतर जन्मभूमी चळवळ उफाळून आली तेव्हा मदतीचा प्रश्न आला.त्यातले हेतू व अंमलबजावणीची दिशा मान्य नसल्याने थोडा मैत्रीपूर्ण वाद झाला.त्या काळात मंदिरनिर्मितीसाठी गावागावांतून समारंभपूर्वक विटा गोळा करण्याचा कार्यक्रम चालत असे.सुंदर वस्त्रालंकारयुक्त स्त्रीपुरुषांनी या विटा माथ्यावरून वाजत गाजत वाहून आणायच्या,गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी समारंभपूर्वक पूजा वगैरे करायची आणि नंतर त्या राममंदिरासाठी अयोध्येकडे रवाना करीत आहोत असे सांगून तिथून हलवायच्या अशी साधारणतः कार्यपद्धती असे.याबद्दल आम्ही नापसंती व्यक्त करताच ते वृद्ध गृहस्थ म्हणाले होते, अहो,आम्ही घराघरांतून मदत मागतो ते संपर्क,प्रचार आणि वातावरणनिर्मितीसाठी. मंदिरासाठी अशा किरकोळ वैयक्तिक देणग्यांची गरज नाही. परदेशांतून इतका पैसा आला आहे की त्यात कितीतरी मंदिरे उभी राहू शकतील. काहींनी तर खर्‍याखुर्‍या सोन्याच्या विटा पाठवल्या आहेत.आहात कुठे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हे सहीच. असाच एक संघाचा

अमोल खरे
Sat, 01/26/2013 - 11:56 नवीन
हे सहीच. :) असाच एक संघाचा माणुस मला म्हणाला होता की जेव्हा भाजपा ह्या राममंदिरा च्या इश्यु मधे घुसला, सर्व बट्ट्याबोळ झाला. नाहीतर मंदिर कधीच बांधुन झालं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

हा हा

आजानुकर्ण
Sat, 01/26/2013 - 13:15 नवीन
मंदीर बांधून झालं तर पुढच्या निवडणुकीत काय विषय घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

अयोध्या तो बस झानकी है ;

पिंपातला उंदीर
Sat, 01/26/2013 - 17:10 नवीन
अयोध्या तो बस झानकी है ; मथुरा काशी अभी बाकी है ही घोषणा आठवली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

ज्या कामासाठी करोडो रुपये जमा

पिंपातला उंदीर
Mon, 01/28/2013 - 09:53 नवीन
ज्या कामासाठी करोडो रुपये जमा केले तो मुद्दा च सोयीस्कर पण खुंतीवर टांगुन ठेवणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार च की. त्या जमा केलेल्या पैशाच पुढे काय झाल हा वेगळाच भाग. पण आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा तो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

आणखी एक बिंदू

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/30/2013 - 22:40 नवीन
(संघद्वेष्टे किंवा संघाशी संबंध नसलेले सोडून देऊ.) संघाबद्दल सहानुभूती, आपुलकी, इ. इ. आहे असं दिसणारे प्रतिसाद लिहीणार्‍या व्यक्तीलाही, संघाशी संबंधित किंवा संघाच्या नियंत्रणाबाहेर असणार्‍या संघटनांची यादी बनवताना समिती आठवतही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लैच जीवघेणा सिक्सर मारला बघा

पिंपातला उंदीर
गुरुवार, 01/31/2013 - 12:27 नवीन
लैच जीवघेणा सिक्सर मारला बघा तुम्ही. एका धाग्यावर संघ कसा बायकाणा समानतेने वागवतो यावर अहमहीकेने वाद घालणारे महाभाग आठवले ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रंगच द्यायचा झाला तर...

हुप्प्या
Mon, 01/28/2013 - 02:18 नवीन
सव्वीस नोव्हेंबर, आझाद मैदान ह्या दहशतवाद, दंगेखोरीला हिरवा रंग दिला तर चालेल का?
  • Log in or register to post comments

रंग

नितिन थत्ते
Mon, 01/28/2013 - 10:55 नवीन
त्या दहशतवादाला नेहमीच* रंग दिला गेला आहे म्हणून तर दुसरा रंगही दाखवला जात आहे. प्रत्येक ...... दहशतवाई नसतो पण..... वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

पण दहशतवादाचा हा दुसरा रंग

श्रीगुरुजी
Mon, 01/28/2013 - 12:09 नवीन
पण दहशतवादाचा हा दुसरा रंग अस्तित्वात आहे का? या रंगाच्या किती जणांवर आजतगायत दहशतवादाचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

http://www.hindustantimes.com

पिंपातला उंदीर
Mon, 01/28/2013 - 12:16 नवीन
http://www.hindustantimes.com/photos-news/Photos-India/ConvictedinNarodaPatiyacase/Article4-921384.aspx http://www.mid-day.com/news/2012/aug/310812-Naroda-Patiya-case-Maya-Kodnani-Babu-Bajrangi-30-others-get-life-term.htm http://ibnlive.in.com/news/graham-staines-killer-dara-singh-gets-another-life-term/49162-3.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि

श्रीगुरुजी
Mon, 01/28/2013 - 14:20 नवीन
दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि जातीय दंगली या वेगळ्या आहेत. जातीय दंगली भारतात स्वातंत्र्यापूर्वीपासूनच सुरू आहेत. त्या जशा दोन धर्मात होतात, तशाच दोन जातींमध्ये पण होतात आणि एकाच धर्माच्या दोन पंथांमध्ये पण होतात. या दंगली बर्‍याचदा उस्फूर्त किंवा काही तात्कालिक कारणामुळे होतात व बहुतेकवेळा त्या योजनाबद्ध नसतात. जातीय दंगलीत आजवर अनेकांना (सर्व जातीधर्माच्या) शिक्षा झालेली आहे. अतिरेकी हल्ल्याला कोणतेही कारण लागत नाही. कुठेतरी जाऊन माणसे मारायची व दहशत निर्माण करायची हाच उद्देश दहशतवादामागे असतो. २६/११ पाकिस्तानमधून येऊन मुम्बईत निरपराध नागरिकांना मारणार्‍या अतिरेकी हल्ल्यामागे किंवा जुलै २००६ मध्ये मुम्बईत लोकलमध्ये प्रेशरकुकर मध्ये बॉम्ब ठेवून जवळपास २०० लोकांना मारणार्‍यांकडे पाकिस्तानकडे समर्थनीय कारण नव्हते. अतिरेकी हल्ले हे उस्फूर्त किंवा तात्कालिक कारणांमुळे होत नसून त्याची अतिशय थंड डोक्याने योजना बनविलेली असते. धर्माच्या नावावर भडकावून, धर्मग्रंथांचा हवाला देऊन, अनेक महिन्यांपासून ब्रेनवॉशिंग करून अतिरेकी घडविले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

मुळात दुसर्या माणसाला तो

पिंपातला उंदीर
Mon, 01/28/2013 - 15:34 नवीन
मुळात दुसर्या माणसाला तो निव्वळ दुसर्या धर्माचा आहे म्हणून लोकाना थंड डोक्याने मारणे हा बाबू बजरंगी आणि कसाब यांच्यामधला समान दुवा. कर्नल पुरोहित, साधवी प्रज्ञा आणि सनातन सारख्या संघटणावर खटले चालू आहेत. आणि जोपर्यंत न्यायालयात गुन्हा शाबित होत नाही तोपर्यत संबंधित इसम गुन्हेगार नाही हा युक्तिवाद अजित पवार, राजा, गडकरी पासून ते एदियुरप्पा पर्यंत सगळे जण वापरतात हा भाग अलाहिदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

__/\__

चिंतामणी
Tue, 01/29/2013 - 00:35 नवीन
__/\__ (घिसी पिटी वाक्य टाकल्याबद्दल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नेहमीच?

हुप्प्या
Tue, 01/29/2013 - 09:04 नवीन
नेहमीच म्हणजे काय? आजपर्यंतचे तमाम गृहमंत्री हिरव्या दहशतवादाबद्दल उच्चरवाने सांगत होते आणि आजचे व्यासंगी गृहमंत्री अद्ययावत संशोधनाच्या आधारावर भगव्या दहशतवादाबद्दल कंठशोष करत आहेत असे म्हणत आहात का चिचाजी? तसे असेल तर अधिकृत पातळीवरून, गृहमंत्र्यासारख्या उच्च स्थानी बसलेल्या कोणी हे हिरवे विधान केले ते जरा उलगडून सांगा. आम्हा अज्ञानी लोकांना तसे असल्याचे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शिंद्यांचे अत्यंत निराधार व

श्रीगुरुजी
Mon, 01/28/2013 - 12:08 नवीन
शिंद्यांचे अत्यंत निराधार व अत्यंत बेजबाबदार आरोप भारताला किती महागात पडणार आहेत याची ही एक झलक. असा बेजबाबदार माणूस भारताच्या गृहमंत्रीपदावर आहे हे आपलं दुर्दैव. http://www.outlookindia.com/article.aspx?283697 भाजप/संघावर आरोप करताना आपल्याच काँग्रेस पक्षाचा गुजरातेतला एक मंत्री महंमद सुर्ती याला १९९३ च्या सुरत बॉम्बस्फोट प्रकरणी २० वर्षाचा तुरूंगवास झाला आहे हे शिंदे सोयीस्कररित्या विसरले आहेत.
  • Log in or register to post comments

हा एकच नमुना नाही. असे अनेक आहेत.

चिंतामणी
Tue, 01/29/2013 - 15:26 नवीन
सडके राजकारण लोकांचे लक्ष "महागाई, अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार" इत्यादी गोष्टींवरून उडवण्यासाठी जी आघाडी केंद्रातील सत्ताधारी पक्ष्याच्या नेत्यांनी उघडली आहे ते बधून अत्यंत वेदना होत आहेत. असल्या सडक्या राजकारणाने आपण देशाची प्रतिमा बिघडवत आहोत आणि सर्वात जास्त धोकादायक शत्रू म्हणजे अतिरेकी यांना बळ देत आहोत याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांना नाही हे त्याहून वाईट. काही दिवसांपूर्वी आपल्या सैनिकांची शिरे कापून पळवणाऱ्या पाकिस्तानी लष्करला हाफिज सईद हा चिथावणी देण्यासाठी सीमेवर हजर होता असे वक्तव्य करणारे मंत्रीमहोद पक्ष्याच्या शिबिरात संघावर घसरले. आधी चिदंबर गृहमंत्री होते त्यांनी जे वक्तव्य केले तसेच आताच्या गृहमंत्री आरोप करीत होते. "तुमच्या हातात पुरावे आहेत तर कारवाई का करीत नाहीत " याचे उत्तर ते देऊ शकणार नसल्याने फक्त फुत्कार टाकत आहेत. या फुत्कारांनी बळ मिळालेल्या "हाफिज सईद साहेब" याने लगेचच दुगण्याझाडल्या आहेत. (हाफिज सईदचा उल्लेख "साहेब" असा करणाऱ्या नेत्याबद्दल बोलायची इच्छा नाही.) शिंदेंमुळे दहशतवाद्यांच्या हाती आयते कोलीत हि बातमी सविस्तर वाचा. ही बघा हाफिज सईद याची मुलाखत. शिंद्यांनी दिलेल्या टोनिकमुळे बळ मिळालेले त्याच्या वक्तव्यात दिसून येईल. अमेरिकेलासुद्धा आवाज देत आहे तो. BJP and RSS should be declared as 'terrorist outfits': Hafiz Saeed हे सुद्धा बघा. LeT chief Hafiz Saeed praises Shinde's terror remark शिंद्यांनी दिलेल्या डोसमुळे हाफिज सईद साहेब सुटले आहेत. त्यांची मुक्ताफळे वाचा. शाहरुखनं पाकमध्ये स्थायिक व्हावं!- हाफिज सईद आणि भारताकडून काश्मीर काबीज करणारच!- हाफिज सईद त्याच्या जोडीने ISI उतरली आहेच. 'भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्यास ५ लाख'...ISIची ऑफर आम्ही फक्त चिंता व्यक्त करणार. पाकनं आमची मैत्री गृहित धरू नये!- राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रणव मुखर्जींचे भाषण वृत्तसंस्था , नवी दिल्ली शेजारी देशांमध्ये मतभेद असू शकतात , सीमेवर तणाव असू शकतो. मात्र काही गटांच्या माध्यमातून दहशतवादाला प्रोत्साहन देणे ही देशासाठी चिंतेची बाब आहे. भारत मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार आहे , परंतु आम्हाला गृहीत धरू नका , असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला दिला. देशाच्या ६४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात मुखर्जी यांनी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा संदर्भ घेत पाकला ठणकावले. हे ठणकावणे आहे का? केंद्रीय गृह मंत्र्यांमुळे सर्व अतिरेकी संघटनांना बळ मिळाल्याचा हा अजून एक नमुना. मुसलमानांसाठी काश्मीरवर हल्ला करण्याची तालिबानची धमकी निष्पाप काश्मीरी मुसलमानांना काश्मीरातून हकलवून लावण्यासाठी भाजपने छुप्या पद्धतीने हिंदू दशहशतवादी शिबिरे चालवली आहेत , असा सूर तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानने आळवला आहे . ती शिबिरे नष्ट केली नाहीत तर भारतावर हल्ला करू , असा इशारा या संघटनेने दिला आहे . पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने ही माहिती आपल्या वृत्तपत्रातून देण्यात आले आहे . तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानचे प्रमुख एहसानुल्लाह एहसान याने डॉन या वृत्तपत्राकडे भारताचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत हा इशारा दिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आणी

चिंतामणी
Tue, 01/29/2013 - 15:34 नवीन
हे सुद्धा बघा. LeT chief Hafiz Saeed praises Shinde's terror remark
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

आता पाकच्या सरकारने कागाळी केली.

चिंतामणी
Tue, 01/29/2013 - 23:44 नवीन
( अर्थात ती करण्याचे त्यांचे धैर्य काश्मुळे झाले हे सांगायला नको) शाहरुखला सुरक्षा द्या! : पाकचा आगाऊपणा (येथे सविस्तर बातमी वाचा) लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफिज सईदने अभिनेता शाहरुख खानला पाकिस्तानात स्थायिक होण्याची ऑफर दिल्यानंतर आता पाकिस्तान सरकारनेही या प्रकरणात तोंड खुपसले आहे. ‘शाहरुख खानला भारत सरकारने योग्य सुरक्षा द्यावी, असा आगाऊपणाचा सल्ला पाकिस्तानचे वादग्रस्त गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

शाहरुखला सुरक्षा द्या! :

चिंतामणी
Tue, 01/29/2013 - 23:45 नवीन
शाहरुखला सुरक्षा द्या! : पाकचा आगाऊपणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

केवळ राजकारण

गब्रिएल
Mon, 01/28/2013 - 13:09 नवीन
जोपर्यंत (अगदी मेल्यानंतर मिळणार्‍या फायद्यांच्या) फुक्या गोड आश्वासनांवर भुलून जीव द्यायला / जीव घ्यायला तयार होणारे निर्बुद्ध लोक या जगात आहेत. अशा लोकांना उल्लू बनवून त्यांच्या चितेवर आपली पोळी भाजून घेताना शरम अथवा दु:ख न वाटणारे नराधम हजारो वर्षांपासून आस्तित्त्वात होते, आहेत आणि होत राहतील.... राजकारण्यांना (धर्माचा बुरखा घेतलेले राजकारणी यात समाविष्ट आहेत) कुठल्याही रंगाचे वावडे नसते. येशु ख्रिस्ताला ज्याने सुळावर चढवले त्याच रोमन साम्राज्याने नंतर ख्रिचियानीटीचा साम्राज्यवाढीसाठी खूप चांगला उपयोग होईल हा विचार करून ख्रिश्चन धर्मप्रसार आणि त्याच्या बळावर राज्यप्रसार हे धोरण यशस्वीपणे अवलंबले आणि बहुतेक सगळा युरोप आपल्या साम्राज्यात सामील केला. राजसत्तेच्या वाढीस फार उपयोगी आहे हे जाणून उथमान ने त्याकाळी आस्तिवात असणार्‍या ३६० पेक्षा जास्त कुराणाच्या प्रती जमा करून त्यांची एकत्रित एकच प्रत बनवली आणि इतर सर्व नष्ट केल्या. हे एकत्रित कुराण मुस्लिम जगतावर ऑटॉमान साम्राज्याचा एकछ्त्री अंमल आणण्यास कामाला आले. आता अफगाणिस्तानमध्ये चालेलेली तालिबानी दडपणूक आणि ड्र्गचा व्यापार हा पैसा व सत्तेचा खेळ नाही तर अजून काय आहे? आजच्या राजकीय / धार्मीक नेत्यांची भाषणे अथवा वागणूक ही मुख्यतः अशाच स्वयंकेंद्रित फायद्याकरिता आहे. जोपर्यंत त्यांच्यामागे धावणार्‍या समाजाला अक्कल येत नाही तोपर्यंत अश्या जनतेचा उपयोग नेत्यांच्या (गैर)फायद्याकरता होणे अपरिहार्य आहे.
  • Log in or register to post comments

श्री ४२०

विकास
Mon, 01/28/2013 - 17:52 नवीन
चिदंबरम, शिंदेंवर ४२० चा गुन्हा तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे आश्वासन देऊन केंद्रीय अर्थ मंत्री पी. चिदंबरम आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकांची फसवणूक केली असून दोन्ही नेत्यांवर आयपीसीच्या कलम ४२० खाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश आंध्र प्रदेशमधील न्यायालयाने दिले आहेत. अधिक वरील दुव्यात वाचायला मिळेलच.
  • Log in or register to post comments

चर्चा चांगलीच पेटलीये राव!

बाळकराम
Wed, 01/30/2013 - 02:47 नवीन
सुशीलकुमार शिंदेना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही- असला मेंगळट माणूस भारताच्या गृहमंत्रीपदी जाऊन बसतो हेच आपलं दुर्दैव (आणि हफीज सईद सारख्यांची चंगळ) आहे. एक प्रश्न पडतो- ज्या ज्या मराठी नेत्यांना केंद्रात गृहमंत्र्यासारखी महत्त्वाची पदं मिळाली ते बहुतेक सगळे असले नगच कसे निघाले- उदा शिवराज पाटील, सुशीलकुमार किंवा राज्य पातळीवर आर्र आर्र पाटील इ. एकापेक्षा एक सगळे शेळपट आहेत.
  • Log in or register to post comments

शिंदेना मराठी येत असेल तर

वेताळ
गुरुवार, 01/31/2013 - 12:19 नवीन
त्यांनी हा धागा वाचावा, म्हणजे त्याना कसे वागावे ह्या बद्दल मौलिक सल्ले फुकटात मिळतील.
  • Log in or register to post comments

सुशिलकुमार शिंदे खरे बोलले

अनामिका
Sat, 02/02/2013 - 00:15 नवीन
सुशिलकुमार शिंदे खरे बोलले असतील तर पाकिस्तानने उगाच आरोप अंगावर घेतला म्हणायचा का? संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव पण खोटा आहे का? तो प्रस्ताव काय म्हणतो? ‘लष्करे तोयबाचा अन्य सघटनांशी संबंध ठेवणारा प्रमुख संपर्काधिकारी कस्मानी आरिफ़ याने फ़ेब्रुवारी २००७ मध्ये भारतातील पानिपत येथे झालेल्या समझोता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फ़ोटात महत्वाची भूमिका बजावली. त्याला व अलकायदाला निधी उभारणीसाठी दाऊद इब्राहिमने मदत केली. अन्यत्र आपल्या कृत्याला सहाय्य देण्य़ाच्या बदल्यात अलकायदाने तोयबाला समझौता स्फ़ोटात मदत केली.’ (प्रस्ताव क्रमांक १२६७) हा प्रस्ताव राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने २९ जुन २००९ रोजी संमत केलेला आहे. दोनच दिवसांनी १ जुलै २००९ रोजी आरिफ़सह अन्य तीन पाकिस्तान्यांची नावे घेऊन अमेरिकेच्या अर्थखात्याने (आदेश क्रमांक १३२२४ अन्वये) त्या चौघांनाही दहशतवादी म्हणून घो्षित केले होते. तरी पाकिस्तानने त्याची कबुली द्यायचे नाकारले होते. पुढे सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी २४ जानेवारी २०१० रोजी कोड्यात टाकणारे विधान करत त्याची कबुली दिली. ज्यांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले त्या पाकिस्तान्यांचा समझौता स्फ़ोटात हात असल्याचे मान्य केले. पण तसे कस्मानी वगैरेंनी स्वेच्छेने केले नाही. त्यांना कर्नल पुरोहीतने भाडोत्री हल्लेखोर म्हणून सुपारी दिली असा रेहमान यांचा दावा होता. मग मालेगाव प्रकरणी पकडण्यात आलेल्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध कसा जोडण्यात आला? तर १४ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्र एटीएसने मालेगाव आरोपीच्या विरोधात कोर्टामध्ये नवेच निवेदन सादर केले आणि त्यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध जोडला. समझौता स्फ़ोटासाठी कर्नल पुरोहित यांनीच आरडीएक्स पुरवले, असे ते एटीएसचे निवेदन होते. पण हे निवेदन किती खरे मानायचे? कारण तोपर्यंत समझौता तपास पुर्ण झाला होता आणि त्यात पकडलेल्या आरोपींनी गुन्हा मान्यही केला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापरच झालेला नव्हता. मग महाराष्ट्र एटीएसने (ज्याचे प्रमुख तेव्हा हेमंत करकरे होते) त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरोहितने पुरवल्याचा शोध कुठून लावला? कारण ज्या दिवशी समझौता स्फ़ोट झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी तेव्हाचे मराठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापर झालेला नाही, अशी ग्वाही दिलेली होती. पुढे हरयाणा पोलिसांनी केलेल्या तपासात त्या स्फ़ोटासाठी पोटॅशियम क्लोरेट वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले होते आणि तसा दावा कोणा मंत्र्याने नव्हे तर फ़ोरेन्सिक प्रयोगशाळेने केला होता, ज्यांना त्या विषयातले जाणकार मानले जाते. पुढे २० जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र एटीएसने अधिकृतरित्या समझौता स्फ़ोटासाठी पुरोहितने आरडीएक्स पुरवले नसल्याचे कोर्टात मान्य केले. म्हणजेच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला, तसतसा मुळात राईच नाही असे उघडकीस आले. पण नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे मात्र आभासातल्या पर्वतावर स्वार झालेले आहेत आणि तिथून उतरायलाच तयार नाहीत. ते एकटेही नाहीत. त्यांच्यासह तमाम सेक्युलर अर्धवटरावही त्याच राईच्या पर्वतावर आरुढ होऊन भगव्या दहशतवादाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. जो पर्वत सोडा जिथे राईसुद्धा अस्तित्वात नाही. जयपूरमध्ये शिंदे यांनी जे राणा भीमदेवी थाटातले भाषण केले; त्यातही त्यांनी पुन्हा समझौता स्फ़ोटाचा दाखला दिलेला आहे. तो कसा धडधडीत खोटा आहे, त्याचे हे पुरावे आहेत. पण त्याचा उपयोग काय? ज्यांना पुराव्याच्या आधारे गुन्हा किंवा निरपराधीत्व सिद्ध करायचे असते त्यांच्यासाठी पुरावे कामाचे असतात. ज्यांनी आपल्या संशयिताला आधीच दोषी मानलेले असते, त्यांच्यासाठी पुरावे समोर असून उपयोग कुठला? या बाबतीत आपल्या देशातील सेक्युलर नेते, माध्यमे व विचारवंतांमध्ये एक कमालीचे साम्य आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे शेकडो पुरावे भारताने आजवर पाकिस्तानला दिलेले आहेत. पण त्यांनी एकतरी पुरावा मानला आहे काय? उलट तोंडाने पाकिस्तान म्हणत असतो, पुरावा तर द्या; हफ़िज़ सईदच्या विरोधात. आता इथे वर दिलेली माहिती ही अमेरिका, राष्ट्रसंघ, भारत सरकार, महाराष्ट्र पोलिस, व तात्कालीन वृत्तपत्रात आलेली आहे, बघणार्‍यासाठी उपलब्ध आहे. पण घट्ट डोळे मिटुन बसलेल्यांना दाखवायचे कसे आणि कोणी? नसलेले काल्पनिक पुरावे निर्माण करायचे आणि त्याचा गवगवा करायचा. त्याच्या अतिरंजित बातम्या रंगवायच्या. मग ते पुरावे कोर्टात वा प्रयोगशाळेत खोटे पडले; तरी जुन्या खोट्या बातम्यांचा आधार घेऊन तेच तेच खोटे आरोप करतच रहायचे; ह्याला हल्ली सेक्युलर बुद्धीवाद व युक्तीवाद समजले जाते आहे. आणि खोटे पुरावे कसे निर्माण करतात वा करावेत त्याचा पाठ शरद पवारांनी घालून दिलेलाच आहे. मुंबईत १९९३ सालात झालेल्या स्फ़ोटात पाकिस्तान व मुस्लिमांकडे संशयाचा रोख जाऊ नये म्हणून त्यांनी एअर इंडीयाच्या इमारतीमध्ये झालेल्या स्फ़ोटात दक्षिणेकडुन आलेली स्फ़ोटके असावीत असे खोटेच सांगुन टाकले होते. त्यातून मुजाहिदीन वा तोयबाऐवजी तामिळी वाघ मुंबई स्फ़ोटातले आरोपी असावेत; असा खोटाच संशय लोकांच्या मनात भरवण्याचा आपण प्रयत्न केला, अशी कबुली पवारांनी इंडीयन एक्सप्रेसचे संपादक शेखर गुप्ता यांना कॅमेरासमोर दिलेली आहेच. त्यांच्या वृत्तपत्रात तशी बातमीही त्यांनी छापलेली होतीच. तेव्हा शिंदे आज जो अहवाल सांगत आहेत व मालेगावपासून अन्य कुठल्याही स्फ़ोटामध्ये पुरोहित वा साध्वी यांच्या विरोधातले किंवा अन्य कुणा हिंदू दहशतवाद्याच्या विरोधातले ‘सज्जड व भक्कम’ पुरावे; सापडतात कुठे व असतात कुठे त्याचा पत्ता मिळाला? हे सगळे पुरावे काल्पनिक असतात व सेक्युलर सुपीक डोक्यातून निघालेले असतात. त्यामुळेच ते खर्‍याखुर्‍या न्यायालयात आणता येत नाहीत किंवा सिद्ध करता येत नाहीत. म्हणूनच कर्नल पुरोहितने समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप व पुरावा न्यायालयात तोंडावर आदळला तेव्हा माघार घेण्यात आली होती. तसा पुरावा नसल्याची एटीएसने कबूली दिली होती. पवारांनीही आपल्या खोटेपणाची स्वत:च कबुली दिलेली आहे. पण सुशिलकुमार किंवा कॉग्रेसवाल्यांची अवस्था ‘थोर’ विचारवंत कुमार केतकर म्हणतात तशी असते. ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’. जे लोक सत्तेसाठी लंपट व हपापलेले असतात. त्यांना कसलीच लाज नसते, की फ़िकीर नसते. त्यामुळे ते खोटे बोलू शकतात व सतत खोटे बोलत राहू शकतात. किंबहूना आता सेक्युलर म्हणवणार्‍यांचे तेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहेत. त्यांना खोटे बोलल्याची लाज उरलेली नाही, की खोटे पकडले गेल्याची शरम वाटेनाशी झाली आहे. उलट खोटे कुठे दिसले, की मिटक्या मारीत ते त्यावर ताव मारताना दिसतात. त्यामुळेच अशा वखवखलेल्यांसाठी शिंदे यांनी जयपुरात पंगत वाढली आणि तमाम सेक्युलर त्यावर तुटून पडले. सोकावलेल्या बिबट्याला गावात धुमाकळ घालू लागला, मग पकडायला सापळा लावावा आणि त्यात तो सापडावा, तशीच सेक्युलर शहाण्यांची आज अवस्था झाली आहे. त्या सापळ्य़ात एका बाजूला शेळी बांधतात व अर्ध्या भागात सापळा असतो. कुठूनही शेळीपर्यंत पोहोचण्याचा हव्यासात उतावळा झालेला बिबट्या शेवटी सापळ्याच्या बाजू्ने पिंजर्‍यात शिरतो आणि जेरबंद होतो. तशीच अवस्था आता भगव्या दहशतवादाच्या सापळ्यात अडकलेल्या सेक्युलरांची होऊन गेली आहे. कारण हे तमाम मुर्ख शिंदे नावाच्या शेळीच्या मागे धावले आणि खोट्या पिंजर्‍यात आयते येऊन अडकले आहेत, दिवसेदिवस त्यांचे हे नाटक लांडगा आलारे आला सारखे होत चालले असून त्यातून सामान्य नागरिकांचा जो भ्रमनिरास होत आहे; तो त्याला मतदार म्हणून नरेंद्र मोदींकडे घेऊन जाणार आहे. जातो आहे. गुरूवारी एबीई व हेड्लाईन्स टुडे नावाच्या वाहिन्यांनी मतदाराचा कल घेऊन प्रेक्षकांना सादर केला. त्यात कॉग्रेसची, पंतप्रधा्नांची लोकप्रियता रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते आहे. दुसरीकडे मोदींची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. खरे तर ती मोदींची लोकप्रियता असण्यापेक्षा कॉग्रेस व सेक्युलर नाटकाला कंटाळलेल्या लोकांची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे. निकामी, खोटारड्या व घातक सेक्युलर सत्तेपेक्षा खमक्या व धाडसी नेत्याच्या शोधात लोक आहेत. आणि जितका सेक्युलर खोटेपणा वाढत जाणार आहे; तितका अधिक लोकसमुदाय पक्ष वा विचार नव्हेतर धाडसी व खंबीर नेत्याकडे आकर्षित होणार आहे. मोदींना वाढता पाठींबा प्रत्यक्षात सेक्युलर थोतांडाला झिडकारण्याकडला वाढता कौल आहे. पण ते खोट्या भ्रामक जगात जगणार्‍यांना सांगायचे कोणी व दाखवायचे कोणी?-भाऊ तोरसेकर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा