Skip to main content

गाजर-मिरचीचे चटकदार लोणचे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 21/12/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २-३ गाजर सालं काढून, उभे तुकडे केलेले ३-४ हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात (मिरच्यांचे प्रमाण,गाजर किती घ्याल त्याप्रमाणे वाढवावे किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) २ टेस्पून लिंबाचा रस १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १-१/४ टीस्पून मेथीदाणे वाटून पूड केलेली १-१/४ टीस्पून मोहरीची डाळ मीठ चवीप्रमाणे तेल . पाकृ: गाजर आणी मिरच्यांच्या तुकड्यांना मीठ, हळद, लाल तिखट,लिंबाचा रस,मेथीदाणेपूड व मोहरीची डाळ एकत्र करुन चोळून घ्यावे. स्वच्छ, कोरड्या बर्णीत हे मिश्रण एक - दोन दिवस बंद करुन ठेवावे. साधारण लोणचे पूर्ण बुडेल इतके तेल घ्यावे (मी पाव वाटी तेल वापरले) व ते गरम करावे. गरम केलेले तेल पूर्ण गार झाले की मिश्रणात ओतावे. ३-४ दिवस मुरु द्यावे. अधून्-मधून चमच्याने लोणचे हलवावे. . हे लोणचे तुम्ही पराठा, खिचडी, वरण-भात, थालीपीठाबरोबर खाऊ शकता. . नोटः मी कमी प्रमाणात हे लोणचे तयार केले आहे. आवडीप्रमाणे मिरच्या, लाल तिखटाचे प्रमाण वाढवू शकता. २-३ महिने सहज टिकतं हे लोणचं.

वाचने 7525
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

काय देखणं झालंय लोणचं!!

यम्मी! मिक्स भाज्यांचेपण असेच करायचे का?

सानिका, पाकृ योग्य मोसमात मिळाली कारण आता अमेरिकेच्या नॉर्थइस्टच्या हिवाळ्यात सुर्यदेव मंदस्मित करु लागलेत त्यामुळे इतर लोणच्यांच्या पाकृंप्रमाणे दररोज लोणचं घातलेली बरणी दिवसा सुर्यप्रकाशात ठेवून संध्याकाळी घरात आणायची ही खटपट वाचली. मी तुमच्या पाकृ आवडीने वाचत असते. धन्यवाद.

छानच दिसत आहे.करुन पाहिन.

तोंडात पूर आला !!! ;)

मस्त दिसतय लोणचं..हे बाहेर ठेवलं तरि चालेल का फ्रिजमधेच ठेवावं लागेल?

In reply to by दिपक.कुवेत

हे लोणचं बाहेर ठेवलं तर सहज टिकतं.

हे लोणचं किमान दहा दिवस मुरवुनच खायला हवे.. तांदळाची कडक भाकरी आणि हे लोणचे कसलं जबरी लागतं.. मी ह्यात ओल्या हळदीचे तुकडेपण टाकतो.. - पिंगू

मस्तच....! एकदम फक्कड दिसतय लोणचं(फोटुत)

गाजराचं आणि मिरचीचं लोणचं अतिशय आवडणारं (कैरी पेक्षाही) आणि इथे तर दोन्हीही सोबतच :) धन्यवाद.

In reply to by निखिल - प्राजक्ता

मोहरीची डाळ तर खुप सार्‍या लोणच्यात वापरतात. नाही लागत कडवट, उलट एक प्रकारच सळसळत टेक्स्चर येते लोणच्याला. मला तर आवडते मोहरीची डाळ लोणच्यात.

In reply to by स्पंदना

हेच म्हणते.

तुमच्या पोस्टस वाचत नाही...

आहाहा... :) तोंपासु... तोंपासु... तोंपासु ! :)