साहित्यः
२-३ गाजर सालं काढून, उभे तुकडे केलेले
३-४ हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात
(मिरच्यांचे प्रमाण,गाजर किती घ्याल त्याप्रमाणे वाढवावे किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२ टेस्पून लिंबाचा रस
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१-१/४ टीस्पून मेथीदाणे वाटून पूड केलेली
१-१/४ टीस्पून मोहरीची डाळ
मीठ चवीप्रमाणे
तेल
पाकृ:
गाजर आणी मिरच्यांच्या तुकड्यांना मीठ, हळद, लाल तिखट,लिंबाचा रस,मेथीदाणेपूड व मोहरीची डाळ एकत्र करुन चोळून घ्यावे.
स्वच्छ, कोरड्या बर्णीत हे मिश्रण एक - दोन दिवस बंद करुन ठेवावे.
साधारण लोणचे पूर्ण बुडेल इतके तेल घ्यावे
(मी पाव वाटी तेल वापरले) व ते गरम करावे.
गरम केलेले तेल पूर्ण गार झाले की मिश्रणात ओतावे.
३-४ दिवस मुरु द्यावे. अधून्-मधून चमच्याने लोणचे हलवावे.

हे लोणचे तुम्ही पराठा, खिचडी, वरण-भात, थालीपीठाबरोबर खाऊ शकता.
नोटः
मी कमी प्रमाणात हे लोणचे तयार केले आहे.
आवडीप्रमाणे मिरच्या, लाल तिखटाचे प्रमाण वाढवू शकता.
२-३ महिने सहज टिकतं हे लोणचं.
प्रतिक्रिया
अरे वा! तोंपासू फोटू आला आहे
+१
In reply to अरे वा! तोंपासू फोटू आला आहे by रेवती
एकदम भन्नाट !! तोंपासु,,
ओय होय
स्स्स्ल्ल्ल्प्प्प....
यम्मी!
सानिका, पाकृ योग्य मोसमात
याला फोड्णी नाही का?
मस्तच !!
वा मस्तच :)
आजच करुन पाहते.गाजरे आणलेली
व्वा !!
खूपच छान!
वॉव....
धन्यवाद
In reply to वॉव.... by दिपक.कुवेत
हे लोणचं किमान दहा दिवस
लप्लप्लप्लप्लप्लप्प्प्प्प्प्प
In reply to हे लोणचं किमान दहा दिवस by पिंगू
सहीच एकदम.... पण मला इथे
मस्तच....!
झक्कास!
मोहरीची डाळ कडवट लागते.
नाही ग!
In reply to मोहरीची डाळ कडवट लागते. by निखिल - प्राजक्ता
सहमत
In reply to नाही ग! by स्पंदना
मी...
आहाहा...