✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मसाज ... एकपात्री शब्दखेळ

भ
भडकमकर मास्तर यांनी
Wed, 08/27/2008 - 17:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10383 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

म
मनिष Wed, 08/27/2008 - 17:16 नवीन

मसाज...

बघितले नाही....पुस्तक चाळले होते पण वाचले नाही, वाचेन आता नक्की! :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/27/2008 - 17:21 नवीन

हं

हं वाचायला हवे! खरे तर अशी पुस्तके मी फारशी वाचत नाहि पण तुमचे समीक्षण वाचून वाचून बघावेसे वाटत आहे. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 08/27/2008 - 17:51 नवीन

काही विचार ....

लेख आवडला. तेंडुलकरांच्या ह्या पुस्तकाविषयी कधी ऐकले-वाच्ले नव्हते. आता तुम्ही परिचय करून दिल्यावर उत्सुकता थोडी वाढली आहे. वाचून बघायला हवे... परिचय वाचून काही विचार मनात आले ते अशे - हा माणूस कोणी कर्तबगार नाही, हुशार नाही, रूढार्थाने यशस्वी नाही त्यामुळे या बिनमहत्त्वाच्या आयुष्याचं वेगळेपण प्रेक्षकांपर्यंत तेंडुलकरांनी या मसाज नावाच्या प्रथम पुरुषी लिहिलेल्या लेखनाद्वारे पोचवले आहे. खरे म्हणजे, सर्वसामान्य माणसाचे आत्मचरीत्र हे कुठल्याही प्रतिथयश माणसाच्या आत्मचरीत्राइतकेच सुरस असते. फक्त त्याला ते व्यवस्थित मांडता येत नाही म्हणून ते लोकांपर्यंत पोचत नाही, इतकेच. हे पुस्तक वाचताना मजा येते... प्रयोगात मला जरा कमी मजा येईल असं वाटतं, काही अंदाज नाही.. नाटक हे "पर्फॉर्मिंग आर्ट" आहे हे खरेच. पण ते तसे असायलाच हवे का? असे नाटक लिहिता येणार नाही का की जे "प्रयोगक्षम" नाही पण नुसतेच वाचनीय आहे (एखाद्या कथा, कादंबरी प्रमाणे)? कुठल्या नाटककाराने असा प्रयत्न कधी केला आहे काय? हे असं कोणी आपल्याला न विचारता आपल्याबद्दल सांगणं हाही मसाजच, नव्हे का? आपणच आपल्याला करून घेतलेला ... हे वाक्य आवडलं. (तेंडुलकरांचा चाहता) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/27/2008 - 23:29 नवीन

असे नाटक

असे नाटक लिहिता येणार नाही का की जे "प्रयोगक्षम" नाही पण नुसतेच वाचनीय आहे (एखाद्या कथा, कादंबरी प्रमाणे)? कुठल्या नाटककाराने असा प्रयत्न कधी केला आहे काय? प्रश्न थोडा मजेशीर आहे... म्हणजे जर ते नुसतेच वाचनीय असेल तर ती कादंबरीच होईल, ते नाटक कसे? असो.. आपल्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला... मसाज वाचताना ती एक दीर्घकथा किंवा लघुकादंबरीच वाटते.... त्याचे मंचन करायचे ठरवणे आणि ते नाटक म्हणून यशस्वीरित्या पेलून दाखवणे हे अवघड.... वैयक्तिक मत : प्रयोगक्षम नसणारे नाटक करायचे म्हणजे कौशल्य नसून एक मर्यादा ( लिमिटेशन ) आहे...जे नाटकात मंचावरती घडूच शकत नाही, असे लिहिणे म्हणजे प्रयोगक्षम नसणे... पाऊस पडून बराच वेळ होऊन गेला होता... हीरो बोट फुटून पाण्यात फेकला जातो आणि गटांगळ्या खाऊ लागतो... असले काहीबाही.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
मेघना भुस्कुटे Wed, 08/27/2008 - 22:06 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मास्तर. येत्या पखालफेरीत 'मसाज' नक्की. ते अजून वाचलं नाहीय मी.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2008 - 22:59 नवीन

पाहिलं नांही पण...

नाटक पाहिलेलं नाही. पण पाहणयची जबरदस्त ईच्छा होती. ह्याचे मुख्य कारण त्यावर्षात आलेल्या सर्व नाटकांना मागे टाकून फक्त 'मसाजने' आणि पर्यायाने 'निखिल रत्नपारखीने' कौतुकाची शाबासकी मिळविली होती. ह्याचे हिंन्दी प्रयोगही खूप झाले. पण तो कलाकार वेगळा. ओळखिचाच आहे पण आत्ता ह्या क्षणी नांव आठवत नाहिए. (सई परांजपेंच्या 'चश्मेबद्दूर' मधला...अं अं ...राकेश बेदी? हं. तोच तो.).
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/27/2008 - 23:20 नवीन

राकेश बेदी

अरेच्या... हे माहितच नव्हतं मला... मस्त माणूस .हिन्दी प्रयोगसुद्धा छानच होत असणार... माहितीबद्दल धन्यवाद काका... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 22:57 नवीन

सई

सई परांजपेंच्या 'चश्मेबद्दूर' मधला...अं अं ...राकेश बेदी? हं. तोच तो.). चष्मेबद्दूरमध्ये फारूख शेख होता... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मेघना भुस्कुटे Fri, 09/19/2008 - 23:00 नवीन

फारुख

फारुख शेखचे दोन मित्र होते ना, त्यातला गब्दुल मित्र म्हणजे राकेश बेदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मुक्तसुनीत Fri, 09/19/2008 - 23:00 नवीन

अहो

>> चष्मेबद्दूरमध्ये फारूख शेख होता... आणि राकेश बेदी व रवि वासवानी सुद्धा ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 23:03 नवीन

अरे हो

अरे हो की... पण हिंदीतून मसाजचा प्रयोग कोण करतं? राकेश की फारूख? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2008 - 12:26 नवीन

राकेश..

राकेश बेदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 08/27/2008 - 23:15 नवीन

जिज्ञासा निर्माण होते

मास्तरा॑ची नेहमीसारखीच छान पुस्तक/ नाट्य ओळख. औत्सूक्य निर्माण करणारी. कधी न ऐकलेल॑ नाटक, पण (मास्तरा॑मुळे) वाचल॑ / पाहिल॑ पाहीजे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/19/2008 - 23:06 नवीन

हेच म्हणते..

मास्तरांची पुन्हा एकदा चौकार.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
व
विसोबा खेचर Wed, 08/27/2008 - 23:59 नवीन

मुंबईत कधी

मुंबईत कधी होणार आहे या नाटकाचा प्रयोग? जाहिरातींकडे लक्ष ठेवले पाहिजे!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/28/2008 - 11:05 नवीन

समाज

मसाज च्या निमित्ताने समाजाचे होणारे चित्रण आवडले. नाटक बघायला आवडेल. लागल सुदर्शनला तर मास्तरांच्या नावाने पुकारा करु :H प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 09/19/2008 - 18:52 नवीन

प्रतिक्रिया

काल रात्रीच हे पुस्तक वाचून संपविले. म्हण्टले , अजून मनावरचा ठसा नवा आहे तोवर मास्तरांच्या थ्रेडवर जाऊन आपले २ आणे टाकून यावेत. पुस्तक अगदी लहानसे आहे - एका वाचनात संपावावे असेच. संहितेबद्दलच मला बोलता येईल. प्रयोग पाहण्याचे भाग्य आम्हाला कुठे ? तेंडुलकरांच्या लिखाणाचा एकूण आवाका पाहता, २००८ साली त्यांचे निधन होईपर्यंतच्या , उण्यापुर्‍या सुमारे ५५ वर्षांच्या कालवधीत त्यांनी केलेल्या लिखाणाचे प्रमाण प्रचंड म्हणावे इतपत मोठे आहे. बाप रे ! ५५ वर्षे तुमच्यातला किडा मरत नाही. त्यावर तुम्ही गुजराण करता ! रात्रंदिवस तेच लिहिता. कल्पना करणे सोपे नाही. तर आपल्या शेवटच्या वर्षांमधे - जेव्हा इतर लेखकांचा रस आटून संपलेला असतो - तेव्हापावेतो हा लेखक काही ना काही प्रयोग करत राहिला. शेवटी शेवटी दोन कादंबर्‍याही लिहील्या. २००४ साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची गणना या प्रयोगांतलीच. नेहमीप्रमाणेच मास्तरांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परिचय करून दिला आहेच ! (स्पॉईलर अलर्ट मात्र मास्तर टाकत नाहीत. हे अंमळ चूकच.) तर , तेंडुलकरांच्या एकंदर साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे ढोबळ मानाने दोन भाग करता येतील. विधिनिषेधशून्य सत्ताकारण/हिंसा/जमातवाद/भ्रष्टाचार यांच्यावर कठोर, मर्मभेदक भाष्य करणारे लिखाण - यात घाशीराम, बायंडर, गिधाडे, अर्धसत्यची पटकथा इ. इ. गोष्टी येतील. आणि दुसरे म्हणजे , समाजातल्या कडेकडल्या , अंधारलेले आयुष्य जगणार्‍या माणसांचे दर्शन घडविणारे - त्यांच्या प्रश्नाना काडेचिराईती किंवा धंदेवाईक पत्रकारितेचे किंवा दया दाखविण्याचे स्वरूप न देता. "मसाज" सरळसरळ दुसर्‍या श्रेणीतले. करंदीकर का कुणाची अशा अर्थाची ओळ आहे की "सामन्य माणूस मरत नाही - कितीही मारला तरी". "मसाज" सारख्या लिखाणातून हेच दिसते. सगळीकडून धुत्कारल्या गेलेल्या माणसालाही आपले आयुष्य उभे करता येतेच- मग अशा आयुष्यात कितीही मानहानी , फसवणूक असेना. आयुष्य नावाच्या जनावराशी प्रत्येक जण जमेल तितपत झगडत रहातो. ज्या व्यक्तिचे हे आत्मकथन आहे ती व्यक्ती लेखकाला जवळून माहिती होती असे त्यानी प्रस्तावनेतच म्हण्टले आहे. तर अशा या "सर्व्हायवल"च्या कहाणीत अनेक सामजिक विसंगती आणि वेगवेगळ्या स्तरातील माणसांचे बुरखे तेंडुलकर ओढतात. मसाज मधले काहीकाही उल्लेख सरळसरळ वास्तव व्यक्तींबद्दल - नावे बदलून अर्थात. स्मिता पाटीलबाबतचा उल्लेख असाच उघडउघड आहे. वर्णिलेला प्रसंग बदनामीकारक नसला तरी कुतुहल चाळवणारा. असो. हे पुस्तक मला माहित झाले मास्तरांमुळे . मास्तर भेटले मिपा मुळे. आणि माझे दोन आणे ऐकून घेतात मिपाकरच :-) पुन्हा एकदा आभारी आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 23:02 नवीन

स्पॉईलर

स्पॉईलर अलर्ट मात्र मास्तर टाकत नाहीत. हे अंमळ चूकच.) यावेळी जरा जास्तच स्टोरी लिहिली ... पुढे लक्षात ठेवीन.. वर्णिलेला प्रसंग बदनामीकारक नसला तरी कुतुहल चाळवणारा खरंय... तेंडुलकरांना त्यांनी पाहिलेल्या पात्रांची खरी नावंच नाटकात ठेवायची सवय होती.... त्याशिवाय त्यांची पात्रे नीट उभी राहत नाहीत असे त्यांनी स्वतःच कार्यशाळेत म्हटले होते, असे आठवते...... इथे त्यांनी नाव तरी बदलले नशीब... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा