छोटेखानी मुलाखत आवडली सर.
धन्यवाद!
मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे.
मराठी साहीत्य महान म्हणुन डॉ. पानतावणे यांची मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली?? समजले नायं
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. छायाचित्रांसह दिलात त्यामुळे जास्त आपुलकीचा वाटला! धन्यवाद!
इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
हे ते लाख बोलले, कर्मण्येवाधिकारस्ते!
चतुरंग
इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
अगदी पटले.
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला.
स्वाती
छान मुलाखत !
आपल्याला अशी संधी मिळाली आणि लगेच आपण तीचा योग्य सुंदर वापर केलात. आपले अभिनंदन. संकेतस्थळांवरील साहित्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आभार.
अवांतर : विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे ना ! त्यांच्या या वाक्याचा काही अर्थ लागला नाही .. ''माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. ''
--लिखाळ.
मराठी साहित्य हे जागतिक साहित्याचे तोडीचे आहे, म्हणजे मराठी साहित्य, साहित्यिक हा सुद्धा वैश्विक जाणिवेचे आहे, तो लिहु शकतो. म्हणुन डॉ. पानतावणे यांची निवड ही वयक्तिक असली तरी ती निवड सर्व मराठी साहित्यिकांची आहे, ती वैश्विक आहे. म्हणुन त्या सर्वांचा तो सन्मान म्हणुन माझी निवड असे म्हणायचे असावे, असे वाटते.
बिरुटे सर,
खास मिपाकरता म्हणून संमेलनाध्यक्षांची धावती मुलाखत घेतलीत याचा आनद वाटतो...! विश्वसाहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून एक अत्यंत व्यासंगी व लायक व्यक्ति लाभली ही चांगलीच बाब आहे.
परंतु,
आम्हा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कष्टाचे, कररुपाने भरलेले २५ लाख रुपये परदेशी साजर्या होणार्या संमेलनाकरता वापरले जाणार याचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील अनेकानेक रसिकजनांना इतक्या दूर जाणे शक्य होणार नसल्याने या संमेलनाला मुकावे लागणार याचा खेद वाटतो...!
बिरुटेसर, या संबंधात आपण पानतवणे सरांना काही प्रश्न विचारला असतात तर अधिक बरे झाले असते असे वाटते!
ज्या पैशांवर महाराष्ट्रातील जनतेचाच सर्वस्वी हक्क आहे त्या पैशांची मुक्त उधळण करीत काही मोजकीच मंडळी संमेलनाच्या नावाखाली चकटफू अमेरिकावारी करू पाहात आहेत याची कीव वाटते! अरे अमेरिकेला जायचे तर खुशाल जा की भडव्यांनो! पण स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या हिंमतीवर जा आणि भरवा ना तिकडे हवी तेवढी संमेलने! साला, नाही कोण म्हणतंय? ठालेपाटील तर अमेरिकेला जायला केव्हाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तैय्यार आहेत!
असो, वरील कारणाकरता मी व्यक्तिश: एक मराठी साहित्यप्रेमी महाराष्ट्रीयन या नात्याने या संमेलनाचा तीव्र निषेध करतो..
या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते!
तात्या.
या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते!
अरे तात्या, बातम्या वाचतोस की नाही हल्ली ?
रत्नांग्रीकर गोगटे महाविद्यालयाच्या मैदानात भरवणारच आहेत डिसेंबरात समांतर संमेलन.
जाणार आहेस ना ?
-- वैद्य
जाणार आहेस ना ?
जायची इच्छा आहे आणि ते रत्नांग्रीत असल्यामुळे जाणं शक्यही आहे! परंतु घरी वृद्ध आई असल्यामुळे ऐनवेळेस जाऊ शकेन याची खात्री देता येत नाही. ती हल्ली काही वेळा अंमळ आजारी असते त्यामुळे तिच्या प्रकृतीवर ते ठरेल...
असो,
बातम्या वाचायला हल्ली वेळ मिळत नाही परंतु रत्नांग्रीत सम्मेलन होणार ही अत्यंत आनंदाची बातमी.. माझा व्यक्तिश: याच संमेलनाला भरभरून पाठिंबा आणि मन:पूर्वक शुभेच्छा! :)
तात्या.
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच...
का नको? अहो २५ लाखांचा प्रश्न आहे आणि ते पैसे महाराष्ट्राचे आहेत! मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग येथे महाराष्ट्रात राहणार्या आणि कर भरणार्या लोकांकरता का होऊ नये?
मी म्हणतो की अगदी एकवेळ महाराष्ट्रात नको, भारतात कुठेही घ्या. कारण भारतात कुठेही जाणे एकवेळ शक्य आहे, अमेरिकेच्या मानाने परवडण्याजोगंही आहे. पण भारताबाहेर जायचं म्हणजे अगदी व्हिसा, पासपोर्ट, परदेशी राहण्याचा खर्च इथपासून तयारी लागते! इथल्या प्रत्येक सर्वसामान्य साहित्यप्रेमीची आहे का तशी तयारी?? त्या ठाले पाटलाच्या बापाचं काय जाणार आहे? त्याचा खर्च त्या २५ लाखांतून आपसूक होणार आहे! परंतु हाच ठाले पाटील जर साहित्य महामंडळाच्या कोणत्याही पदावर नसतांना एक सर्वसामान्य मराठी साहित्यप्रेमी या नात्याने स्वत:च्या खर्चाने गेला असता का अमेरिकेला ते सांगा पाहू!
पण मी म्हणतो की काहितरी विवेक जागेवर असलेल्या पानतवण्यांनीदेखील अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी हा विचार करायला नको का? प्रश्न संमेलन अमेरिकेत भरवण्याचा नाहीये, प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांचा!
बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता!
परंतु मानाच्या जागा मिळाल्यावर माणसाचा विवेक सुटतो तेच बहुधा गंगाधररावांच्या बाबतीत झालं असावं!
तात्या.
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच...
आम्हाला वाटतं साहित्य संमेलन कुठे घ्यावे, महाराष्ट्रीय माणूस आणि साहित्य रसिक म्हणुन काय वाटते, यावर चर्चा मिपावर झालेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, मिपावर प्रतिसादाचे स्वातंत्र्य असल्याने अवांतर वाटण्यार्या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!
या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी,
अप्रस्तूत कसे काय? ज्या विषयावर फक्त मिपावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली त्याबाबत संमेलनाध्यक्षांचं वैयक्तिक मत काय आहे हे कळलं असतं तर बरं झालं असतं! कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते!
अवांतर वाटण्यार्या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!
अवांतर कसे काय? सदर मुलाखत ही संमेलनाध्यक्षांची होती तेव्हा त्यांना अभामसासंचे विसासं असे सोयिस्कररित्या नाव बदलून सदर संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? हे प्रश्न विचारणे हे अवांतर आहे असं मला वाटत नाही..
तात्या.
कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते!
तात्या, आपण म्हणता तसे कदाचित असेलही. आम्ही सरांसमोर जरा दडपणानेच बोलत असतो, वावरत असतो. त्यामुळे आमच्यासंबधी आपण केलेला ( सहृदय स्वभावाचा ) विचार अगदी योग्य आहे. :)
संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य?
तात्या,
आपला प्रश्न अगदी योग्य आहे, त्याबद्दल शंका नाही. मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.
मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.
हे मात्र पटले.
इन फॅक्ट, खास मिपाकरता आपण मुलाखत घेतलीत हे मात्र नक्कीच प्रशंसनीय आहे हे आम्ही आधीच म्हटले आहे आणि आताही म्हणतो...! :)
असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. परंतु प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या २५ लाखांचा आहे म्हणून अंमळ जीव जळतो इतकंच....
आपला,
(मवाळ बिरुटेसरांचा अंमळ जहाल विद्यार्थी) तात्या. :)
असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो.
बस का आता !!! आपल्या एका चाहत्याची क्षमा वगैरे, आम्हाला असे लाजवू नका. आमचंच चुकत असेल तर आमच्याच चुका पदरात घेत चला. असो, आपल्या स्पष्ट आणि कडवटपणाबरोबर एक ललित लेखक म्हणुन याबाबतीत तर आम्ही आपले सर्वात जुने फॅन आहोत.
-दिलीप बिरुटे
(आपला)
तात्या॑शी सहमत. फुकट गावले तर वायट कित्याक? अमेरिकेला, तेही फुकटात जायला अन राह्यला मिळत
असेल तर भल्या भल्या॑चे 'सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा' उलट्या पालट्या होतात :) हे सगळे वर्गात शिकवायला चा॑गले असते! महाराष्ट्र अतिशय श्रीम॑त राज्य आहे हे आपण विसरता कामा नये, हा॑ आता (विदर्भातल्याच!) काही पाच-पन्नास मूर्ख शेतकर्या॑नी केल्या असतील आत्महत्त्या, त्यात काय एव्हढे? त्यातर सैनिक पण करतात आजकाल! म्हणा- जय जवान, जय किसान!
आणि वाढती महागाई, बेकारी वगैरे सामान्य (तथाकथीत मध्यमवर्गीय) लोका॑ना हादरवणार्या प्रॉब्लेम्सचा आणि साहित्यिका॑चा काही स॑ब॑ध असण्याची गरजही नाही. श्रीम॑त मराठी लेखक- वाचका॑च्या तो॑डी असल॑ काही शोभत नाही हो! शाईनि॑ग मराठी !! (आणि बर्नि॑ग मराठी माणूस) जाऊ दे!
दोस्त हो, आपणास मुलाखत आवडली, आपण केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहान नव-नवीन लेखनप्रकारास बळ देते.
आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!
इतनी मुहब्बत मिलती है आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है
इस मुहब्बत के बदले हम क्या नजर दे, हम तो कुछ भी नही !!!
-दिलीप बिरुटे
साहित्य संमेलनापासून इतके दिवस वेगळी चूल मांडणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे अध्वर्यू आता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत.... थोडक्यात दलित चळवळीचा, साहित्याचा गौरव होतो आहे.... मंडळाने चांगलाच गेम खेळलांय....
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
प्रतिक्रिया
अरे वाह!
अरे सह्ही सर!
अरे वा बिरुटेसर!
असेच म्हणते.
+१
अरे वा
मराठीतील साहित्य
आभार
एकदम मस्त!
धन्यवाद
असेच म्हणतो
असेच म्हणतो!
संमेलना आधी
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
बिरुटे
भरवणारच आहेत
जाणार आहेस
अभिनंदन..
मुलाखत
बिरुटे
अवांतर :
बिरुटेसाह
मास्तर आपल्याशी सहमत आहे.
या
तात्या, हे बकी खरं आहे.
मुलाखत
बस का आता ?
मराठी शाईनि॑ग आहे तात्या!
खास
आभार !!!
गेम
छान मुलाखत
आवडली
पायंडा