सखे ...
लेखनविषय:
काव्यरस
वळणांवळणांवरती सखे
तव आठवणींची भरती सखे
कसे विस्मरू सांग तुला मी
हे श्वास श्वास तुज स्मरती सखे |
पाऊस हा घनगर्द सखे
अन् तुझ्या मिठीचा गंध सखे
कसा सुटावा असा रेशमी
तव बाहुंचा बंध सखे
रक्तवर्णित तव लज्जित चर्या
श्वासा श्वासांवरि भीति सखे
अनामिकशा त्या ओढीने
रोमांचित तव कांती सखे
चिंब चिंब ही तुझी कुंतले
चेहर्यावरी मम रुळती सखे
थेंब थेंब हा तुला स्पर्षता
न कळत होई मोती सखे
थरथरत्या तव अधरांची
मग पडे घट्ट ती मिठी सखे
असे गुंतलो एकामेकीं
जणु जन्मांतरीची भेटी सखे
श्रावणातल्या सायंकाळी
मला गवसले मीच सखे
विरुन गेले तुझ्यात अलगद
सायुज्यता का हीच सखे
ही भोगाची उर्मी म्हणु की
तल्लीनतेची समाधी सखे
की त्याच्याही पलकडली, मी
राधा , तु घनश्याम सखे
------------------------------------------
नाहीस जरी तू इथे सोबती
नाहीस जरी तू माझी सखे
माझे माझे कशा म्हणु मी
माझी "मी" च तुझी सखे !!
वाचने
7764
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
मस्त
कविता छानच आहे
In reply to कविता छानच आहे by शैलेन्द्र
ते माहिती नाही...
In reply to ते माहिती नाही... by धन्या
मला गवसले मीच सखे
In reply to ते माहिती नाही... by धन्या
या ओळींवरुन भलतंच प्रकरण
In reply to ते माहिती नाही... by धन्या
हाण्ण!
सुंदर रचना.
कवितेच `ओरियंटेशन' गंडलय असं वाटतं
In reply to कवितेच `ओरियंटेशन' गंडलय असं वाटतं by संजय क्षीरसागर
ओरियंटेशन
In reply to ओरियंटेशन by प्रसाद गोडबोले
कविता पहिल्या पासुन शेवटपर्यंत एक सखी दुसर्या सखीला म्हणत आहे?
In reply to कविता पहिल्या पासुन शेवटपर्यंत एक सखी दुसर्या सखीला म्हणत आहे? by संजय क्षीरसागर
हे नॉर्मली `सखा आणि सखीत होतं
In reply to हे नॉर्मली `सखा आणि सखीत होतं by धन्या
नॉर्मल आणि जनरल
In reply to नॉर्मल आणि जनरल by संजय क्षीरसागर
general: involving, relating
कविता सुरेख आहे..
सुंदर
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by प्रसाद गोडबोले
ह्म्म ... कल्पना होती ह्या
In reply to धन्यवाद ! by प्रसाद गोडबोले
माझ्या मते ...प्रेम प्रेम असतं ...कोणी का करत असेना !
In reply to धन्यवाद ! by प्रसाद गोडबोले
हे बरंय...
In reply to हे बरंय... by धन्या
पहिली "ती"न सात सात कविता
:हा सखीचा स्वयं संवाद आहे
माय नेम इज शीला गाणे आठवले
छान आहे आवडली
आधी प्रतिसाद वाचुन मग कविता
In reply to आधी प्रतिसाद वाचुन मग कविता by जेनी...
कविता वाचनाची ही पद्धत आवडली,
In reply to कविता वाचनाची ही पद्धत आवडली, by शैलेन्द्र
पूजा, मागून पुढे वाचल्यामुळे असं होतं :
कविता आवडली.
अप्रतिम लिहलंय!
मस्त कविता !