Skip to main content

थुक्का का लावतात?

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 17/01/2013 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. रस्त्यात खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "माणसं, व्यवहारात थुक्का का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "पद्धत" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "व्यवहारात विश्वासानंतर थुक्का लावयची" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "माणसं विश्वास का ठेवतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगतो की अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, व्यापारात अनेक प्रकारचे व्यवहार असतात. , पैकी एक आहे खटास्खट व्यवहार ज्याला रोखठोक व्यवहार हेदेखील नाव आहे. या व्यवहारानुसार म्हणून अनेक जण थुक्का लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?

वाचने 4726
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

तर काहींना सांगते की............. आणि मी निरुत्तरसा होतो. हा प्रकार कळला नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

हॅ हॅ हॅ कटपेस्टमधल्या डुलक्या ! शुचितैंचा धागा कट करुन बदल केले. काही तसेच राहिले :) संपादक महोदय वा महोदया घ्या बरं संभाळून... नक्की संभाळा बर का ! नाही तर लावाल थुक्का ! ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

इथेही काही राधा-कृष्ण भानगड आहे काय? ;)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

एय.. मिसळलेला... सांगू का तुझं नाव संपादकांना ! ऑ !! मिसळलेला सोडून विरघळलेला होशील !! ;)

In reply to by नाना चेंगट

नको ओ नको, माझं नाव नका सांगू... उगा गरिबाला सुळावर कां देताय? मी आपली छोटीसी चम्मतग केली.. मापी करा.

माझ्या मर्यादित ज्ञानानुसार: थुक्का लावणे म्हणजेच चुना लावणे. चुन्यात कॅल्शियम असते आणि त्यामुळे हाडांना बळकटी येते.. शिवाय दातही मजबूत होतात आणि घशात जात नाहीत.. बाकी पुराणतज्ञ प्रकाश टाकतीलच.

In reply to by गवि

फारच मर्यादित ज्ञान बुवा तुमचं!! स्पन्दनं, लहरी, चक्र असं काहीच माहीत नाही तुम्हाला??

नाना.... तुला तर सगळंच माहित आहे रे!.. अर्थशास्त्राचं तत्वज्ञान, थुक्का लाऊन करायचे रोख्ठोख वेव्हार!,.... तरीही विचारतोस्स? शेयर बाजारातली एनर्जी इन्डेक्सवर जाईपर्यन्त थापा, अफवा वगैरे प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना रिंगिंग बेलपासूनच बाजारात थुक्का लावण्याची परम्परा आहे.......ऑनलाईन ट्रेडिंग झाल्यापासून खेळाडू असणार्‍या स्त्रियांना देखील आजकाल थुक्का लावतात!! =================== माझ्या मते थुक्का हा शब्द शुक्कीपासून आला असावा. थुकताना घशातीत तसेच जीभेवरील कुठलुआशा ग्लँड्सवर ताण येतो आणो अधिक लाळ गळते. (पैसे पाहुन कशी लाळ गळतेय हे तुम्ही ऐकले असेलच, तीलाळ पैसे पाहुन नव्हे तर शुक्का लावून पैसे लाटल्याने गळत असते). तर अधिक लाळेमुळे पचन उत्तम होते. ========= तांबे म्हणतात त्यानुसार थुक्का लावणे हे एक आसनही आहे (मात्र ते तांबे यांच्याइतके उत्तम करण्यासाठी प्रचंड साधना लागते.) ========== थुक्का हा अलंकार आहे. ते रोख्ठोक व्य्वहारचे प्रतिक आहे. हा वेव्हार सर्व वेव्हारातील बीन पुराव्याचा असून त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल. ========= बाकी थुक्का, चुना यासारखी प्रतीक व्यापरांनाच का बाळगावी लागतात? वरती कुणीतरी थुक्का लावण्याच्या आसनाचे औषधी गुणधर्माच वर्णन केल आहे. हा फायदा इतरांना का नको? अशा सामान्यजनद्वेष्टया धर्माचा जाहीर निषेध. : )

माझ्या मर्यादित डोस्क्यानुसार ... आपल्याला जिथे बुक्क्का मारायला जमत नाही तिथे थुक्का कामाला येतो. अमर्यादित डोस्क्यानुसार .. ते सगंळ तुम्ही चित्र विचित्र ताईला विचारा ,,,,,,,

In reply to by स्पंदना

नाही अपर्णा माझं लेखन असलच असतं पण नाना खूप सुरेख लिखाण करुन जातात. त्यांचे हे विडंबन फाऊल धरण्यात यावे.

स्वानुभवाचा अभाव असल्याने काही सांगणं शक्य नाही. क्षमस्व. ;-)

या धाग्याची सुरुवात रामायण शब्दाने झालीये पाहून गलबलून आले आन्ध्री माणसेही कपळाला कुकू लावतात