✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुंकू का लावतात

श
शुचि यांनी
Wed, 01/16/2013 - 20:38  ·  लेख
लेख
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78745 वाचन

💬 प्रतिसाद (237)

प्रतिक्रिया

+१

शुचि
Fri, 01/18/2013 - 00:47 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अगं अवांतरच करायचं तर

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 15:04 नवीन
अगं अवांतरच करायचं तर किरकिरतेस कशाला? यामुळेच बैकांना शिव्या घालतात बघ लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

कुंकू का लावतात

केदार-मिसळपाव
गुरुवार, 01/17/2013 - 15:11 नवीन
कुंकू का लावतात
कारण त्या वेळी इतर वहिन्यान्वर कोणतेही मनोरन्जक कार्यक्रम नसतात म्हणून... हे आपले सहजच सुचले..तुमच्या आमेरिकन प्रश्णकर्त्यास सान्गा असे... आम्ही असल्या प्रतीसादा ला पी-जे असे म्हणतो...
  • Log in or register to post comments

____/\_____

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/17/2013 - 15:24 नवीन
____/\_____ तो ही साष्टंग...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

काही प्रतिसाद खूप माहितीपर आहेत .

चेतन माने
गुरुवार, 01/17/2013 - 15:47 नवीन
पण बर्याचदा असल्या प्रथांची जी कारण सांगितली जातात ती खरच अवास्तव वाटतात !! एखादीला सहज वाटल असेल बघू कसं दिसतं ते , तिचं बघून बाकीच्याही करायला लागल्या असतील !!! कारण पहिल कुंकू लावलेल्या बाईला एवढं शास्त्र सांगितले गेला असेल अस वाटत नाही
  • Log in or register to post comments

हल्ली

तिमा
गुरुवार, 01/17/2013 - 17:35 नवीन
हल्लीच्या भेसळीच्या युगात, कुंकवामधे शिसे असते असे वाचले होते. त्याने पिट्युटरी ग्लँडच काय, सगळ्या शरीराचा बँड वाजू शकतो.
  • Log in or register to post comments

उत्तर सोपं आहे ..

चौकटराजा
गुरुवार, 01/17/2013 - 18:12 नवीन
कुंकू खाता येत नाही .नाहीतर मिपाकरानी त्याचा ही एखादा कट्टा केला असता ना ? अतः ते लावतात !
  • Log in or register to post comments

बायकांनी कुंकू लावणे बंद केले

नाना चेंगट
गुरुवार, 01/17/2013 - 19:08 नवीन
बायकांनी कुंकू लावणे बंद केले पाहिजे. कुंकू लावण्यामधून तर्कहीनता आणि विज्ञानद्वेष्टेपणा दिसून येतो. :) विधानाची सत्यता पडताळून दाखवण्याचा आग्रह फाट्यावर मारला जाईल. ;)
  • Log in or register to post comments

पहील्यांदा पुरषांनी "बायकांनी

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 19:16 नवीन
पहील्यांदा पुरषांनी "बायकांनी यंव बंद करावं अन त्यवं बंद करावं" अशी हुकूमशाही बंद केली पाहीजे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

अन पैल्यांदा बायकांनी सोताचे

बॅटमॅन
गुरुवार, 01/17/2013 - 23:22 नवीन
अन पैल्यांदा बायकांनी सोताचे सुद्दलेकण सुदार्ले पायजे, नैतर आंतरजालीय टीकाचार होतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

जबरा धागा आणि प्रतिक्रीया!

विकास
गुरुवार, 01/17/2013 - 20:46 नवीन
जबरा धागा आणि प्रतिक्रीया! नंदन ने म्हणल्याप्रमाणे अगदी मळवट भरला आहे! प्रतिसादांमधे सगळेच कव्हर झाले (आणि कहर पण झाला) आहे! त्यामुळे अधिक काय लिहायचे! :-) कुंकू म्हणल्यावर अजून एक आठवावी अशी गोष्ट म्हणजे...
  • Log in or register to post comments

हे गाणं ऐकलं की कार्तिकी

आनन्दिता
गुरुवार, 01/17/2013 - 21:44 नवीन
हे गाणं ऐकलं की कार्तिकी गायकवाड च आठवते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

'पिच्युटरी ग्लँड' वाल्यांसाठी

सस्नेह
गुरुवार, 01/17/2013 - 21:11 नवीन
'पिच्युटरी ग्लँड' वाल्यांसाठी एक शंका.. हिंदू नसलेल्या स्त्रियांना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात गळ्याला कुंकू लावतात. त्यांची पिच्यु गळ्यात असते का ?
  • Log in or register to post comments

पिच्यु पिच्यु पिच्यु

जेनी...
गुरुवार, 01/17/2013 - 23:22 नवीन
=)) पिच्यु पिच्यु पिच्यु =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ग्रंथित

नंदन
गुरुवार, 01/17/2013 - 23:36 नवीन
याचे उत्तरही ग्रंथित आहे - म्हणजे ग्रंथीत, थायरॉईड ग्रंथीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दंडवत साहेब !!! उच्चकोटीची

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/18/2013 - 00:45 नवीन
दंडवत साहेब !!! उच्चकोटीची कोटी केली आहे. त्यानिमित्ताने कभूधावि हा शब्द अनेक वर्षांनी आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहमत

अभ्या..
Fri, 01/18/2013 - 00:48 नवीन
अत्यंत उच्च दर्जाचीच कोटी. असे पाणिनी, असे वैय्याकरणी मिपावर आहेत अन कोन म्हणते मिपावर सुद्दलेकनाना फाट्यावर मारण्यात येते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ते आहेत म्हणून कळते फाट्यावर

इनिगोय
Wed, 01/23/2013 - 18:42 नवीन
ते आहेत म्हणून कळते फाट्यावर मारल्याचे.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आयला!!!!!!

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 13:11 नवीन
आयला!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सिंदूर्,हिंगूळ त- बरेचसे अवांतर् - या धाग्यावर चालेल म्हणा!

राही
गुरुवार, 01/17/2013 - 21:16 नवीन
उत्तर भारतात कुंकवाला सिंदूर म्हटले जाते.(दोन्हीतले घटक वेगळे असू शकतील) आणि तो भांगात लावण्याची प्रथा आहे. एकवेळ कपाळावर टीका नसला तरी चालेल पण 'माँग में सिंदूर'हवाच.सिंदुरातला मुख्य घटक शेंदूर अर्थात मर्क्युरिक सल्फाइड. असे म्हणतात की बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीकाठी हा विपुल मिळे.ह्या नदीकाठी हिंगलाज मातेचे देऊळ आहे.पाकिस्तानातली ती एक 'प्रोटेक्टेड साइट' आहे. आपल्याकडच्या क्षत्रियांची,पांचाळ,लोहाणा समाजाची आणि इतर अनेकांची ती कुलदेवता आहे. महाराष्ट्रात तिला हिंगुळजा देवी म्हणतात. फाळणीनंतर ह्या देवीची यात्रा करणे तितकेसे सुकर राहिले नाही त्यामुळे भारतातल्या गुजरात किंवा राजस्थानात एक नवीन देऊळ उभारले गेले आहे. पाकिस्तानातले मूळ देऊळ थरपारकरच्या वाळवंटात म़करान टेकड्यांमध्ये एका गुहेत आहे.
  • Log in or register to post comments

ही माहिती नवीन आहे एकदम!!!

बॅटमॅन
गुरुवार, 01/17/2013 - 23:35 नवीन
ही माहिती नवीन आहे एकदम!!! धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

जुनंपानं काई सापडलं की

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 23:49 नवीन
जुनंपानं काई सापडलं की ब्याट्यास्वामी खुश! आधी कुंकू का लावतात ते शोध रे. कॉलिन्ग वल्ली. जुन्या लेण्यांमध्ये बायकांच्या कपाळावर कुंकू कोरलेले असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माउतै, तुमचा प्रश्न नीट

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 23:57 नवीन
माउतै, तुमचा प्रश्न नीट विचारा जरा, तुम्हाला जुन्या लेण्यांमधल्या चित्रांत असलेल्या बायकांच्या कपाळावर म्हणायचं आहे का जुन्या लेण्यात असलेल्या बायकांच्या कपाळावर, मा.सं.वल्ली उर्फ इं.जो. यांच्या समजुतीत थोडा गोंधळ झाला तर ..... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

होउ दे की गोंधळ थोडा... काय

कवितानागेश
Fri, 01/18/2013 - 00:06 नवीन
होउ दे की गोंधळ थोडा... काय ५०काका तुम्हीपण. अहो, ते लगेच फोटो टाकतील की इथे लेण्यात बघितलेल्या कुंकूवाल्यांचे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हे घ्या.

प्रचेतस
Fri, 01/18/2013 - 09:38 नवीन
हे घ्या. अजिंठा लेणीत बायकांच्या कपाळावर कुंकवाच्या जागी केसातून ओवलेले दागिने आढळतात. कार्ले लेणीत मात्र स्त्रियांच्या कपाळावर कुंकवासारखी गोलाकार आणि ठसठशीत खूण कोरलेली दिसते. पण ही शिल्पे महायानकालीन म्हणजे इस. २५० ते ६५० या दरम्यानची आहेत हे पहा Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

शोधू की, है कै अन नै कै बाकी

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 00:09 नवीन
शोधू की, है कै अन नै कै :) बाकी देवळांत कोरलेल्या बायांची कपाळे कोरीच दिसतात. अजिंठा धाग्यातील बायांची चित्रे बघ, तीदेखील तशीच आहेत. हे कुंकवाचे बंड गुप्तोत्तर कालीन असण्याचा संभवही बराच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माझा प्राथमिक अंदाज असा आहे,

कवितानागेश
Fri, 01/18/2013 - 00:43 नवीन
माझा प्राथमिक अंदाज असा आहे, की कुठल्यातरी कुंकू तयार करणार्‍या कंपनीनी काढलेलं हे फॅड असावं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो ब्याम्या,

सस्नेह
Fri, 01/18/2013 - 10:15 नवीन
बाकी देवळांत कोरलेल्या बायांची कपाळे कोरीच दिसतात. इतक्या शतकांनंतर त्यांचे हातपायसुद्धा जागेवर राहिलेले नाहीत तर कुंकू काय राहाणार कप्पाळ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

?

गवि
Fri, 01/18/2013 - 12:45 नवीन
का बोवा? त्यांचे पतीपुतळे तुटले असतील,,तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अभावितपणे तुम्ही कप्पाळावर

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 15:08 नवीन
अभावितपणे तुम्ही कप्पाळावर उत्तम कोटी केलेली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लेण्यांमधल्या बायकांच्या

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/18/2013 - 00:50 नवीन
लेण्यांमधल्या बायकांच्या कपाळाकडे काय कप्पाळ लक्ष जाणार... तुम्ही भटे अशीच... भंडाऱ्याच्या खानावळीत गेलात तरी वरणभात आणि मेतकुट हेच शोधणार ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ट्रोलनाथ गदारोळे...

गवि
Fri, 01/18/2013 - 06:49 नवीन
ट्रोलनाथ गदारोळे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

फक्त शोधत असतील हो

सूड
Fri, 01/18/2013 - 10:50 नवीन
ते फक्त शोधत असतील हो. नंतर 'तीर्थात मुंडण आणि कोर्टात भांडण यास लाजायचें नाहीं' या न्यायाने चालत असतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मला वाटलं शिक्रण अन मटार उसळ

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 13:09 नवीन
मला वाटलं शिक्रण अन मटार उसळ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हळद/कुंकू देविला वहाताना हे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/17/2013 - 23:57 नवीन
हळद/कुंकू देविला वहाताना हे मंत्र अनुक्रमे म्हटले जातात हरिद्रा:स्वर्ण वर्णाभा सर्वसौभाग्य दायिनी। सर्वालंकार मुख्याही देवित्वं प्रतिगृह्यताम॥ हरिद्रा चूर्ण संयुक्तंम् कुंकूमम् कांतीदायकम्।/(वा-काम दायकम।) वस्त्रालंकरणं सर्वं देवित्वं प्रतिगृह्यताम॥ वाघुळशास्त्री....अता यांना सुद म्हर्‍हाटीत करा वो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अवो अत्रुप्त, हे आल्रेडी

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 00:06 नवीन
अवो अत्रुप्त, हे आल्रेडी साध्या संस्कृतात हाये. कुंकवाची स्तुती केलीये. सोन्याच्या रंगाचे, सौभाग्यदर्शक असे कुंकू सर्व अलंकारांत मुख्य आहे आणि ते आम्ही त्वां देवीला अर्पितोय असे म्हटलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

रनौट झालास बेट्या

पैसा
Fri, 01/18/2013 - 12:17 नवीन
सोन्याच्या रंगाचे हरिद्राला म्हण्टलाय. काय समजलेत? आणि हरिद्राचा संयोग केलेले कुंकुम असे आहे ते. भाशांतर परत एकदा नीट कर पाहू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आआआआअह! कुठे लक्ष होतं मायला

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 13:11 नवीन
आआआआअह! कुठे लक्ष होतं मायला कै म्हैती. सॉरी आणि चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कुंकू आणि सिंदूर यात फरक आहे...

योगप्रभू
Fri, 01/18/2013 - 00:17 नवीन
राही यांची माहिती छान आहे, पण कुंकू आणि सिंदूर यात फरक आहे. शुद्ध कुंकू हे शुद्ध हळद, चुनकळी आणि शुद्ध कापूर यापासून बनवले जाते. ते रंगाने लालभडक असते. सिंदूर किंवा शेंदूर हा रंगाने तांबडा असतो. पूर्वीपासून देवीपूजन करताना कुंकू आणि सिंदूर अर्पण करण्याचे मंत्र वेगवेगळे आहेत. प्रथम हळद, मग कुंकू, नंतर काजळ व नंतर सिंदूर वाहिला जातो. कुंकू लावताना 'हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम् / वस्त्रालंकरणं सर्व देवि त्वं प्रतिगृह्यताम्' असा मंत्र आहे. शेंदूर लावताना ' उदितारुणसंकाशं जपाकुसुमसंन्निभम् / सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्' असा मंत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

फरक आहेच

राही
Fri, 01/18/2013 - 00:39 नवीन
तसे वर म्हटले आहेच. शिवाय घरगुती चिकट कुंकू बनवताना पणजीआजीला पाहिलेले आहे. ती हळद,कापूर,कोळश्याची वस्त्रगाळ पूड थोड्या तेलात एकत्र करून पाट्यावर अगदी मुलायम होईपर्यंत वाटत असे.अगदी गंधासारखे मऊ. हे वाटणे अशासाठी असे की रॉ-मटीरिअल सगळे पूडस्वरूपात असले तरी ते एकजीव व्हावे लागे.तसे ते झाले नाही तर कपाळावर हव्या त्या आकारात(चिरी,टिळा इ.)लावता येत नसे.त्यातली पूड फुसफुशीत होऊन खाली पडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

आमच्या ऐकीव अन वाचीव

शिल्पा ब
गुरुवार, 01/17/2013 - 23:52 नवीन
आमच्या ऐकीव अन वाचीव माहितीप्रमाणे अनार्य लोक कुंकू लावीत असत ... आर्य बायकांनी ते पाहिलं अन "अय्या, कित्ती छान दिसतंय नै " म्हणून स्वत:हि कुंकू लावायला सुरुवात केली. अन मग त्याची प्रथा अन संस्कृती बनली.
  • Log in or register to post comments

+१

श्रीरंग_जोशी
Fri, 01/18/2013 - 00:52 नवीन
या नव्या माहितीने या धाग्याला चार चाँद लागले आहेत. चार चाँद असा उल्लेख असलेली टिकल्यांच्या कंपनीची जाहिरात पण होती एकेकाळी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

शिल्पा शिल्पा

अभ्या..
Fri, 01/18/2013 - 00:56 नवीन
शिल्पा चार चाँद लगाये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मी शिल्पाची ८ आणि ९ नंबरची

जेनी...
Fri, 01/18/2013 - 02:03 नवीन
मी शिल्पाची ८ आणि ९ नंबरची बिंदी वापरते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मग शिल्पा काय वापरते...असो हा

टवाळ कार्टा
Fri, 01/18/2013 - 02:18 नवीन
मग शिल्पा काय वापरते...असो हा जोक जुना झाला आता आणि तु ८ आणि ९ नंबर वापरायला कमी जास्त होत असते का? (उगीच एक शंका...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अबे डक्कन मी नै कै .. शिल्पा

जेनी...
Fri, 01/18/2013 - 02:22 नवीन
अबे डक्कन मी नै कै .. शिल्पा बिंदी साइझ कमी जास्त असते ८ जरा मोठी ९ तिच्यापेक्षा किंचित कमी . कधी ८ तर कधी ९ :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टिकल्या आणि ब्रिटिश वायर गेज,

५० फक्त
Fri, 01/18/2013 - 07:41 नवीन
टिकल्या आणि ब्रिटिश वायर गेज, हे उलटे का असतात आकडा जेवढा मोठा तेवढा साईझ कमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

गिटारीच्या तारासुद्धा.. एक

गवि
Fri, 01/18/2013 - 12:26 नवीन
गिटारीच्या तारासुद्धा.. एक नंबर जाडजूड डाँग डाँग, आणि सहा नंबर सर्वात बारकी टिंग टिंग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हेच हार्मोनियमच्या बाबतीतही..

धन्या
Fri, 01/18/2013 - 13:12 नवीन
हेच हार्मोनियमच्या बाबतीतही... एकदम बारीक वाटनारा आवाज वरच्या पटटीतला आणि जाडा भरडा आणि म्हणून मोठा वाटणारा आवाज खालच्या पट्टीतला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आणि माल्ट सुद्धा

चाणक्य
Fri, 01/18/2013 - 15:46 नवीन
सिंगल माल्ट लई महाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा