Skip to main content

अकबरुद्दीन ओवेसी या धर्मांधाचे देशाबाहेर पलायन

लेखक सागर यांनी रविवार, 06/01/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा. अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली. आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत. असो. धार्मिक तेढ वाढवणे हा या धाग्याचा हेतू नसून आपल्या देशात काही असामाजिक तत्वे अतिशय भयानक वेगाने वाढत आहेत हे मिपाकरांच्या वाचकांच्या ध्यानात आणून देणे हा आहे. अलिकडेच एम.आय.एम. चे अनेक नेते महाराष्ट्रात नांदेड मध्ये ही निवडून आलेले आहेत. ही साम्राज्यविस्तारवादी प्रवृत्ती लोकशाही साठी अतिशय घातक आहे. वेळीच या प्रवृत्तींवर कायमस्वरुपी उपाय केला नाही तर येत्या १० वर्षांत प्रत्येक मुस्लिमेतर नागरिकांसाठी आपल्याच देशात मुक्तपणे जगणे हे अशक्य होईल. प्रमुख मुद्दे: १. एकाही मुस्लिम नेत्याने अकबरुद्दीन ओवेसीच्या भाषणाचा जाहीर निषेध केलेला नाहीये. ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणार्‍या तत्त्वांना मूक संमती असणे हे येणार्‍या अराजकतेचे मोठे लक्षण आहे. २. आपल्या भाषणात ओवेसीने खूपच चिथावणारी वक्तव्ये केलेली आहेत, जसे रामाची आई कोठे कोठे गेली होती, गाईचे मांस खायला खूप मजा येते, अजंठा वेरुळची नागडी चित्रकला, वगैरे वगैरे. वाचकांसाठी ओवेसीच्या या वादग्रस्त भाषणाचे युट्युबवरचे दुवे देत आहे. भाग १: http://www.youtube.com/watch?v=WI94cm8Zihg भाग २: http://www.youtube.com/watch?v=JDAtxnoWa7U

वाचने 24448
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

सेना मनसेची मान्यता का रद्द करु नये अशी कोर्टाने विचारणा केल्याचे ऐकु आले,धन्य धर्मनिरपेक्ष भारत जय हो सेक्युलर ओवेशीचे पायघड्या घालुन स्वागत केल्याबद्दल हैद्राबादी नागरीकांचे हार्दिक अभिनंदन

In reply to by श्री गावसेना प्रमुख

@सेना मनसेची मान्यता का रद्द करु नये अशी कोर्टाने विचारणा केल्याचे ऐकु आले,धन्य धर्मनिरपेक्ष भारत जय हो सेक्युलर ओवेशीचे पायघड्या घालुन स्वागत केल्याबद्दल हैद्राबादी नागरीकांचे हार्दिक अभिनंदन>>> वर्षानुवर्षे सरकारच्या या बेशरम वृत्ती आणी चोंभाळूपणातूनच विखारि हिंदुत्वाची बीजं बाहेर पडत आहेत.

=)) =)) =)) जन्म-मृत्युच्या सीमीवरील अत्रुप्त जगातील आत्म्यांच्या शब्दकोषातले बाकी शब्दही येऊ देत बोर्डावर. काय लिहीता बुवा.. वाह :) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............धवट.....राव....! काय अर्थ लागला हो तुंम्हाला त्या शब्दाचा. ??? ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

जो काहि अर्थ लागला तो इथे टंकता येणार नाहि... उगा संपादक मंडळाला तसदी कशाला द्या :D अर्धवटराव

In reply to by अत्रुप्त आत्मा

आमच्या अगाध प्रतिभेने आम्हि अनेक अचाट चावट अर्थ काढले त्या शब्दाचे =)) ... एकाच शब्दात किती अर्क ओतला तुम्ही... कौतुक वाटले अर्धवटराव

संदर्भ : एबीपी माझाची बातमी टाईम्स ऑफ इंडियाची बातमी शेवटी सकाळच्या मेडिकल टेस्टने हे सिद्ध केलेले दिसते आहे की ओवेसी धडधाकट आहे आणि त्याने एअरपोर्टवर दिलेला मेडिकल टेस्ट चा रिपोर्ट खोटा होता... ;)

सावरकरांचे सहा सोनेरी पाने परत वाचायला घेतली आहेत. व त्यात पाचव्या सोनेरी पानात ह्या मानसीकते बद्दल काय सुंदर विवेचन केले आहे. प्रत्येक भारतीयांनी ते वाचायलाच पाहिजे असे आहे. ह्या वर एक लेख खूप पूर्वी लिहिला होता त्याची लिंक देत आहे कारण तो इंग्रजीत आहे. तो परत ब्लॉगवर देत आहे. http://rashtravrat.blogspot.in/2013/01/the-bane-of-population.html

सावरकरांचे सहा सोनेरी पाने परत वाचायला घेतली आहेत. व त्यात पाचव्या सोनेरी पानात ह्या मानसीकते बद्दल काय सुंदर विवेचन केले आहे. प्रत्येक भारतीयांनी ते वाचायलाच पाहिजे असे आहे. ह्या वर एक लेख खूप पूर्वी लिहिला होता त्याची लिंक देत आहे कारण तो इंग्रजीत आहे. तो परत ब्लॉगवर देत आहे. http://rashtravrat.blogspot.in/2013/01/the-bane-of-population.html

ठरलं का कुणी कोणाला संपवायचं ते, ठरलं असेल तर लिस्ट करून घ्या, संपवा लगेच, म्हणजे आम्ही उरलेले तरी सुखानं जगू म्हणतो चार दिवस..

या धर्मांध ओवेसीने अटकेत असताना आता नवीनच पवित्रा घेतलेला आहे. http://www.thehindu.com/news/states/andhra-pradesh/owaisi-noncooperativ… ते भाषण मी केलेलेच नाही, ध्वनिफितीतला आवाज माझा नाही व या भाषणाबद्दल मला काहीही आठवत नाही असे त्याने पोलिस कस्टडीत सांगितले. त्यामुळे पुढे कोणताही तपास न करता त्याची मिळालेली पोलिस कस्टडी पोलिसांनी स्वतःहून सोडून दिली व त्याला न्यायालयीन कोठडीसाठी पुन्हा न्यायालल्याच्या ताब्यात दिले आहे. एकंदरीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे असं दिसतंय. काही दिवसातच तो जामिनावर सुटुन बाहेर आल्यास व नंतर हा खटला अनंत काळापर्यंत लांबणीवर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्याच्यावर बोलणार्या हिंदु धर्मगुरुंना तत्काळ अटक व कोठडीत रवानगी आणी हा मजा मारतोय्,जय हो. याच्याशिवाय दुसर काय होणार होत्,बी जे पी शासीत राज्यात बोलायला हव होत याने.बाकी व्हिडीयो क्लीप हा पुरावा नाही होउ शकत का?