Skip to main content

पुरुषार्थ

लेखक विदेश यांनी रविवार, 13/01/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती जणांचा धावा केला कुणी न तेव्हां धावत आला किती दमले मी टाहो फोडुन रडले कुढत अपुल्याच मनातुन जपण्याचा मी प्रयत्न केला शीलाच्या माझ्या ठेव्याला दुर्दैवाचा घाला पडला नशिबी दुर्योधन धडपडला जगास फुटला नाही पान्हा धावत नाही आला कान्हा सुन्न-खिन्न टाकून मी मान पुरुषार्थाचा बघत अपमान ! . . .
लेखनविषय:

वाचने 989
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

:( काय बोलावे? देव काय माणूस सुद्धा धावून येत नाही आता.