Skip to main content

भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

लेखक विकास यांनी शुक्रवार, 11/01/2013 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे. तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अ‍ॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अ‍ॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला. आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्‍यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली: Sagarika Ghose says sorry Chetan Bhagat apology Pierre Fitter of India Today Pierre Fitter of India Today मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे: Media misleads ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे. ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात... अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?

वाचने 51331
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा.

In reply to by पिंपातला उंदीर

च्यायला थोडी टीका देशस्थांच्या वर सुद्धा करा की ह्या निमित्ताने ही पोट जात सुद्धा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ह्याची दखल घेतल्या जाईल. हे वाक्य जे प्रत्येक गोष्टीत ब्राह्मण द्वेष आणतात त्यांच्या साठी आहे/ विशेतः बिगर कोकणस्थ.... असे विधान करण्याच्या ऐवजी अभ्यास वाढवा सर्व मराठी बांधवांनी एकत्र ह्या यावे असे मला मनापासून वाटते , जात पात प्रत्येक गोष्टीत आणली पाहिजे का

In reply to by निनाद मुक्काम …

ह्या निमित्ताने ही पोट जात सुद्धा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ह्याची दखल घेतल्या जाईल.
अगदी अगदी :)

In reply to by पिंपातला उंदीर

>>> भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. परत परत तेच. काही न वाचता टंकायचे... वरची चर्चा वाचा अथवा संघ आणि समितीवरील माहिती वाचा. बाकी काही नाही तर लोकसत्ता आयडीआ एक्सचेंजमधील सरसंघचालक मोहनजी भागवत यांची विस्तृत मुलाखत ऐका... >>> १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा. तुम्ही जाती मानता का? संघ मानत नाही आणि कधी विचारत देखील नाही. बाकी मुळ मुद्याबद्दल काय म्हणणे आहे ते लिहायचे विसरलात का? - प्रसार माध्यमांच्या खोटेपणाबद्दल काय म्हणायचे आहे?

In reply to by विकास

तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला. एवढ्या मोठ्या संघटनेला गेल्या ८७ वर्षात एकही स्त्री किंवा गेला बाजार एका विशिष्ट जातीपलिकडे सरसंचालक मिळत नाही हे पटत नाही. आम्ही जात मानत नाही वैयागेरे युक्तिवाद भावनिक ठिकाणी ठीक आहेत.

In reply to by पिंपातला उंदीर

ओ साहेब, स्त्रियांबद्दल इथेच वर झालेली चर्चा वाचलीत का? ती आधी वाचा. तुम्हाला कशाबद्दलही काहीही माहिती नाही असे दिसतेय! कोकणस्थ सरसंघचालक Keshav Baliram Hedgewar (1925-1930 and 1931 to 1940) Dr. Laxman Vaman Paranjpe (1930-1931) (when Dr Hedgewar was in jail during Forest Satyagraha) Madhavrao Sadashivrao Golwalkar, called as Guruji (1940-1973) Madhukar Dattatraya Deoras, called as Balasaheb (1973-1994) Rajendra Singh, called as Rajjubhaiya (1994-2000) K. S. Sudarshan (2000-2009) Mohan Bhagawat (March 2009-present) यांच्यापैकी श्री परांजपे हे एकटे कोकणस्थ होते हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते. इतरांबद्दल माहिती दिलीत तर माझेही सामान्यज्ञान वाढेल.

In reply to by पैसा

अहो बाईसाहेब एक तरी ब्राम्हणेतर आहे का या यादीत. बाकी देवरस हे कोकणस्थ नवते म्हंतल्यावर डोळे पानवले. असो.

In reply to by पिंपातला उंदीर

संघचालक कोणी का असेना,पण त्यांच्या मदतकार्याच्या वृत्तीला तोड नाही.

In reply to by पिंपातला उंदीर

माझ्या आईवडिलांनी मला नावावरून जाती ओळखायला शिकच्वले नाही ही मोठी चूक झाली. इतर सरसंघचालक जातीने कोण हे मला माहिती नाही म्हणून तर तुम्हाला विचारतेय ना! तुम्हाला जातींबद्दल बरीच माहिती दिसतेय. म्हणून तर सांगा की. आम्ही तरी माणसाला त्याच्या कामावरून ओळखतो. जातीवरून नाही.

In reply to by पैसा

तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे तुमच्या बद्दल नाही बोलत आहोत. संघाबाद्दल बोलत आहोत. वैयक्तिक होणे इथेच थांबवुयात. आणि मुखया म्हणजे आती भावनिक ना होता जरा fact-based चर्चा करूयाात.

In reply to by पिंपातला उंदीर

आत्तापर्यंत बोलले नाही. वाचते आहे. पण फॅ़क्टस तुम्हीच सांगा. संघावर जातीयतेचा आरोप तुम्ही करत आहात. प्रूफ तुम्ही द्या.

In reply to by पिंपातला उंदीर

कै च्या कै... चर्चेचा मूळ मुद्दा कुठल्या कुठे सोडून जातिपाती चे फाटे फोडण्याला काय अर्थ आहे..

In reply to by पिंपातला उंदीर

कोणी का असेना, फरक काय पडतो? (तुम्हाला व मला, दोघानाही) या 'फॅक्ट' बदल बोलाल का जरा?

In reply to by पिंपातला उंदीर

आधी सर्व कोकणस्थ म्हणालात, मग दोन दक्षिण भारतीय म्हणून त्यांना वगळलं. मग जेव्हा बहुसंख्य कोकणस्थ नाहीतच हे लक्षात आणून दिल्यावर ब्राम्हणेतर नाहीत यावर वळलात. मग यादी माहीत नसताना कोकणस्थ हा मुद्दा इथे कशासाठी आणला होता आणि त्याचा वरील चर्चेशी - भागवत यांच्या वाक्याचा मीडियाने केलेला विपर्यास आणि संघविरोधकांनी मूळ भाषण न पाहताच चालवलेल्या लेखण्या हा होता. त्यातून श्री घासकडवी यांनी भागवत काहीही म्हटले असले तरी स्त्रियांचे संघातील स्थान हे दुय्यम आहे असा मुद्दा काढला. म्हणजे जो मूळ चर्चाविषय आहे की मीडिया हवा तसा विपर्यास करून mass (मराठी ?) मध्ये पाहिजे तो विरोधी विचार पसरवण्याचं काम करते हा बाजूलाच. (संघ समर्थक नसलेला पण जातीभेदविरहीत अनेक शाखा जवळून पाहिलेला) मैत्र

In reply to by पिंपातला उंदीर

अजून माध्यमांच्या संदर्भाच्या चर्चेत काही बोलता येत नाही.माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का? पण त्याबद्दल लिहायचे सोडून जे आडात नाही ते पोहर्‍यात आणायचा बाष्कळ प्रयत्न चाललाय. जिथे तिथे जाती बघण्यार्‍यांना आणि तरी स्वतःला सुधारकी दाखवण्याची धडपड करणार्‍यांना "जातीयवादी सुधारक" असे म्हणता येईल

In reply to by विकास

बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील. हा प्रतिसाद पाहावा. आणि एखाद्या संघटनेत एका जातीपलिकडे सरसंचालक होत नाः हे दाखवणे हा जातीयवाद कसा? माझा युक्तिवाद मान्य नसेल तर तो उदाहरण देऊन नाकारवा. बाकी भावनिक युक्तिवाद ला reply द्यायला खरेच वेळ नाही. फॅक्ट्स द्या आणि बोला.

In reply to by पिंपातला उंदीर

अजून देखील मूल चर्चेतील प्रश्नाला बगल देत आहात. माध्यमे प्रामाणिक वाटतात का? ही चर्चा आहे... याचे उतर द्या. बाकी कोणाची जात काय बघणे आणि त्यावरून काँमेंट करणे याला जातीयवाद म्हणतात. तुम्ही कदाचीत स्वतःला सुधारक समजणार्‍या कंपुतले समजता असे दिसते , म्हणूनजातीयवादी सुधारक आहात असे म्हणले.

In reply to by विकास

ह्या मुद्द्यावर भागवत यांच्यावर खूप टीका केली होती मीडीया ने. करा प्रतिवाद. बाकी मी मांडलेले इतर मुद्दे खूप जड आहेत प्रतिवाद करायला. बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील.

In reply to by पिंपातला उंदीर

"आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी" आणि "माकड म्हणतं माझीच लाल" या म्हणिंची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मांडलेले इतर मुद्दे खूप जड आहेत -;)

In reply to by विकास

"अजून माध्यमांच्या संदर्भाच्या चर्चेत काही बोलता येत नाही.माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का? " ८ जानेवारी २०१३ ला संध्याकाळी आयबीएन लोकमत पहात होतो. त्यादिवशी मुम्बई दंगलीला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निखिल वागळे एक "विशेष वृत्तांत" दाखवित होते. त्यांच्या प्रतिधिनिने त्या दंगलीत एकून ९०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असे सांगून त्यापैकी ६०० ते ६४० "मुस्लिम" होते व उरलेले "इतरधर्मीय" होते, असे सांगितले. ज्या व्यक्तीने ९०० तले एकूण मुस्लीम अगदी अचूक मोजले त्या व्यक्तीने उरलेल्यातले "हिंदू" किती हे मात्र सांगितले नाही. नंतर एकूण ४-५ जणांच्या मुलाखती दाखविल्या. त्यात दंगलीची झळ पोचलेल्या दोन मुस्लिम व्यक्ती होत्या, तिस्ता सेटलवाडची मुलाखत दाखविली व उरलेले दोघे दंगलीची झळ पोचलेल्या मुस्लिमांचे प्रातिनिधित्व करणारे मुस्लिम वकील होते. त्या दंगलीत किमान एक तृतीयांश हिंदू मृत्युमुखी पडलेले होते (यात राधाबाई चाळीत खोलीत कोंडून जाळलेले ८ जण, ६ जानेवारीला भोसकून मारलेल ६ माथाडी कामगार अशा अनेकांचा समावेश होता), पण "हिंदू" या शब्द वापरून आपली जीभ विटाळून घेण्यापेक्षा त्या प्रतिनिधिने "इतरधर्मीय" हा शब्द वापरला. तसेच दंगलीची झळ अनेक हिंदूंनादेखील पोचली होती. पण या "विशेष" वृत्तांतात त्याचा पुसटता देखील उल्लेख नव्हता. हा अत्यंत एकतर्फी व पक्षपाती वृत्तांत होता व असे करण्याची वागळे यांची व आयबीएन-लोकमतची ही पहिली वेळ नव्हती किंवा अखेरची देखील नसेल. वागळे, हेमंत देसाई, जतीन देसाई, गिरिष कुबेर, सुरेश भटेवरा इ. पत्रकार हे कट्टर संघ/भाजपविरोधी आहेत आणि ते वेळोवेळी पक्षपाती वृत्तांकन करत असतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

संघाच्या विचारांशी मतभेद म्हणजे संघद्वेष्टपणा नव्हे. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

लेख आवडलाच. प्रसारमाध्यमे जबाबदार असावीत त्यांनी समाज जागृतीचे कार्य करावे वगैरे अपेक्षा आता टू मच वाटतात. अगदी इंदिराजींच्या काळातही ठराविक बातम्याच दूरदर्शन आणि आकाशवाणीवर येत असत. मुंबई हल्ल्याच्या काळात ताज हॉटेलवरून थेट प्रक्षेपण करून अतिरेक्यांना कमांडो कारवाईची इत्थंभूत माहिती पुरवायचे काम मीडियाने केले होतेच. काही ठराविक लोकांचे उद्गार मोडतोड करून वापरणे हा मीडियाचा आवडता उद्योग आहे. जो तो ट्यार्पीच्या मागे. त्याचे इतर काही अवांछित परिणाम होतात का याच्याशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे आजकाल आम्ही बातम्या बघणे सोडले आहे. पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्स आल्यामुळे तेही कार्यक्रम बघणे सोडले आहे. येऊन जाऊन कार्टून फिल्म्स बघायला टीव्ही नावाच्या खोक्याचा उत्तम उपयोग होतो आणि रद्दी जमा करण्यासाठी वृत्तपत्रांचा.

In reply to by पैसा

येऊन जाऊन कार्टून फिल्म्स बघायला टीव्ही नावाच्या खोक्याचा उत्तम उपयोग होतो

स्त्रीयांवरील अत्याचाराचे घटनास्थळीचे प्रक्षेपण एखादया चॅनलवर दाखवतात म्हणजे घटना घडत असताना कोणी प्रतिनिधी तेथे असतो. दिल्ली प्रकरणाबद्दल नव्हे आधीच्या काही घटनांमध्ये पाहिले होते. तो प्रतिनिधी मदत न करता पोलिसाना न कळ्वता आपल्या चॅनलला प्रथम बातमी पोहोचणे यातच धन्यता मानतो.

मला सुरवातीला भागवतांचे विधान ऐकून त्यांचा खूप राग आला होता. पण नंतर उलगडा झाला. आपण पुरोगामी आहोत, आपण कडव्या मुस्लिमांच्या विरोधात आहोत तसेच कडव्य हिंदूंच्याही असे लोकांच्या मनावर ठसवायचेच असा काहीसा अजेंडा घेऊन ही उच्चभ्रू माध्यमे काम करतात. त्यामुळे संघाच्या कुठल्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळालीच तर ती अशी हिंदुत्वद्वेषाची कावीळ झालेली असते. अती उजवे मुस्लिम आणि अती उजवे हिंदू हे एक अत्यंत समतोल समीकरण आहे असा ह्या लोकांचा समज आहे. आणि तो साफ चुकीचा आहे. मागे सुमार केतकर लोकसत्तेचा संपादक असताना मनमोहनसिंग निवडणूक जिंकले आणि लगेच भारतातील शेअर कोसळले तेव्हा हे सगळे किरीट सोमय्या (भाजप) ने घडवून आणले असा बिनबुडाचा आरोप केतकरांनी केला होता. एक मोठ्ठा अग्रलेख लिहिला होता. पण नंतर कधीतरी बारीकशा चौकटीत ह्या बिनबुडाच्या, खोट्या आरोपाबद्दल माफी मागणारा उल्लेख होता. आता लोकांच्या अग्रलेख लक्षात रहातो का हा खुलासा हे ओळखणे अवघड जाऊ नये. वरील काही लोकांच्या मतावरून झोपलेल्याला उठवणे अवघड असेल पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे अशक्य ह्या विधानाची आठवण झाली. असो! अभ्यासपूर्ण लेख. आभार!

बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील.

In reply to by पिंपातला उंदीर

दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून अनेक बलात्कार होत आहेत. पुण्यासारख्या तुलनेने लहान शहरात सुद्धा बलात्कारांच्या अनेक घटना घडताना दिसतात. दिल्लीला भारताची "बलात्कारांची राजधानी" अशी कुप्रसिद्धी मिळालेली आहे. अशा परिस्थितीत लहान गावांच्या तुलनेत मोठ्या शहरात जास्त बलात्कार घडतात असा गैरसमज होणे साहजिक आहे.

विकास, मुद्देसूद लेख, पैसाताई वगैरे इतरेजणांनीही उत्तम मुद्दे मांडून बेसलेस विधाने खोडली आहेत हे उत्तम. धन्यवाद.

काही दिवसापूर्वी सानिया मिर्झा ने कुठल्याशा कार्य्क्रमात सांगितलेला तिच्या लग्नाच्या वेळचा मिडीया संबंधी एक अनुभव ऐकला.. हे मिडीयावाले ८ दिवस तिच्या घराभोवती खडा पहारा देऊन होते.. दारंखिड्क्या सोडाच पण घराच्या वेंटिलेटर्स मधुन हि कॅमेरे घरात घुसवण्याचे प्रयत्न त्यांनी केले. स्वतःच्याच घरात सगळीकडे बेड्शीटे लावुन त्यांना ८ दिवस रहाव लागलं... इररिस्पेक्टि व ऑफ ऑल ऑदर काँट्रोव्हर्सीज ऑफ सानिया , तिच्यासारख्या सेलिब्रिटीला जर हे असलं सहन कराव लागलं असेल तर काही कारणाने चर्चेत आलेल्या एखाद्या सामान्य माणसाला काय भंडावून सोडत असतील हे लोकं.. प्रसारण स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याच्या वैयक्तीक आयुष्यावर आपण किती अतिक्रमण करतोय याचा विचार माध्यमांनी करायला हवा... या धाग्याच्या निमित्ताने 'पीपली लाइव्ह' मधला नथ्था आठवला....

माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दलचा सदर प्रसंगातला त्रागा कळला. या धाग्याची प्रस्तावना करताना ' संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो'. असे आपण म्हणाला आहात पण तुम्ही(विकास/अर्धवट/इतर) धोरणान्बद्दलच्या आक्षेपाना प्रतिसाद देऊन विषयातर केलेच आहे तर माझे काही प्रश्न- दोनच मुद्द्यांबद्दल आक्षेप, एकतर प्रश्नकर्त्याच्या सरसंघाचालाकाना विचारलेल्या मूळ प्रश्नाबद्दल - दिल्लीतल्या बलात्काराने फक्त हिंदूंचेच तेवढे खच्चीकरण नक्की कसे काय होते ते कळले नाही. प्रश्नकर्त्याचा रोख याबाबतीत पुरेसा स्पष्ट असताना सरसघचालकानी त्याची दखलही घेतली नाही. मग लोकसत्तेच्या मुलाखतीत संघाचा हिंदुत्ववाद समजावून सांगताना 'संघात हिंदूही आहेत, मुस्लिमही आहेत' हे जे विधान केले गेले त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण करण्याची संधी या प्रश्नाचे उत्तर देताना घेता आली असती. हा अत्याचार एका स्त्रीवर झाला हे अधोरेखित करता आले असते. तसे का झाले नसावे यावर आपले मत ऐकायला आवडेल. लोकसत्तेच्या मूळ मुलाखतीत मोहनजी म्हणतात, 'संघ समाजाचे संघटन करतो'. संघ हा समाजातले संघटन नसून समाजाचे संघटन करतो हेही वेळोवेली ऐकलेले आहे. वैचारिक पातळीवर त्या विचाराचे मोलही मलातरी पटण्यासारखे आहे. पण मग समाज फक्त पुरुषांचाच आहे का? त्याच(लोकसताच्या) मुलाखतीमध्ये 'संघात महिलांना कसे काय स्थान नाही' या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, ' त्यांचे वेगळे संघटन आहे. त्यांच्या सरसंघाचालिका आमच्या बैठकांमध्ये असतात.' हेही मान्य. म्हणजे संघाच्या बैठकीमध्ये एक राष्ट्रसेविका समितीची प्रतिनिधी येणे आणि संघात महिलांना स्थान असणे यात काहीच फरक नाही असे म्हणायचे आहे का? की इतर परिवार सघटनापेक्षा समितीचे स्थान परिवारात वेगळे आहे? ते 'मान देण्याचे' वगैरे शाब्दिक खेळ न करता संघाचे स्त्रीयांना समानता याबाबतीत संघाचे नक्की काय धोरण आहे ते कृपया समजवावे. समितीबद्दल वरचे वाचले आहेच. शिवाय संघ-परिवारात पुर्वी काही वर्षे कार्यरत असल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवही आहे (अगदी समितिचासुद्धा).

In reply to by बाईमाणुस

अर्धवट कोणाला म्हणताय ? मिपाकराचा असा अपमान? आता तुम्ही नेमके कोण आहात ते माहित नाहि (बाई कि माणुस) म्हणुन आवरतं घेतो (नसत्या बाबतीत आपण स्त्रि-पुरुष समानता मानत नाहि) आयला... आमची रावबाजी एव्हढी जगजाहीर असताना असं अनुल्लेखानं मारायचं म्हणजे काय. >> एकतर प्रश्नकर्त्याच्या सरसंघाचालाकाना....तसे का झाले नसावे यावर आपले मत ऐकायला आवडेल. - सरसंघचालक अगदी प्रत्येक गोष्ट हिंदुंवर काय परिणाम करते या अँगलने बघत असतील तर त्याचं मलातरी काहि आश्चर्य वाटत नाहि. तसं पाहिलं तर दिल्लीची घटना स्त्रि अत्याच्याराच्या कॅटॅगरीत येतच नाहि मुळी... ति येते व्यक्ती व्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत. एका मनुष्याने दुसर्‍या मनुष्याचा स्वतंत्र जीवन जगण्याचा हक्क नाकारते आहे हि घटना. मग म्हणुन काय स्त्रि-संघटनांनी आपला आवाज गप्प करायचा का? >>लोकसत्तेच्या मूळ ... अनुभवही आहे (अगदी समितिचासुद्धा). -- तुम्हाला जर सैन्यदलात स्त्रियांना जबाबदार्‍या फारशा का दिल्या जात नाहित हे कळलं तर याहि प्रश्नाचं उत्तर मिळेल. कुठलिही संघटना आपल्या उद्दीष्ट प्राप्तीकरता बेस्ट पॉसीबल कार्यक्षम मार्ग अनुसरते. संघाचे स्वयंसेवक अगदी तरुण वयात प्रचाराला घराबाहेर पडावे अशी अपेक्षा आहे. आपला ऐन तारुण्याचा काळ हे स्वयंसेवक घरापासुन दूर, कुठल्याही करीअर वगैरे भानगडीत न पडता, आर्थीक सुबत्तेला मुकण्याचा धोका पत्करुन, केवळ संघटनेचं काम म्हणुन करत असतात. घरोघरी वार लावुन जेवतात. (मी जेंव्हा या संघटनेचा थोडाफार अभ्यास केला तेंव्हा तरी हेच चित्र होतं...). त्यातले अनेक पुढे स्वखुषीने किंवा अनिवार्यतेने अविवाहीत राहातात. भारतीय समाजात स्त्रिवर्गाला असलं जीणं थोडं कठीण आहे. तेंव्हा "मोड्स ऑफ ऑपरेंडी" ठरवताना फक्त पुरुषांची अशी वेगळी संघटना बांधायचं ठरवलं असेल तर ते सहाजीक होतं... त्यात बराच सुटसुटीतपणा आहे व मॅनेजमेण्ट दॄष्टीने सहजता देखील. जसा जसा काळ बदलेल तसं तसं संघटनेचं रूप देखील बदलेल (अशी अपेक्षा आहे...) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चुकुन राव लिहायचे राहुन गेले. बाईमाणुस ही टर्म 'मी आपली बाईमाणुस' इतक्याच अर्थाने घेण्याची आहे हो. माझी आयडेन्टिटी हा इथे मुद्दा अनाठायी आहे. पण तुम्ही माझ्या प्रश्नाना बगल दिली नाहीत हे महत्वाचे. >> तसं पाहिलं तर दिल्लीची घटना स्त्रि अत्याच्याराच्या कॅटॅगरीत येतच नाहि मुळी... ति येते व्यक्ती व्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत. अगदी हेच म्हणायचे होते मला. आणि सरसन्घचालकानी प्रश्नकर्त्याला तसेर का बरे म्हटले नसावे? प्रश्नाच्या त्या भागाचा भागाचा अनुल्लेख का केला असावया? असे मी विचारत होते. असो! >> जसा जसा काळ बदलेल तसं तसं संघटनेचं रूप देखील बदलेल (अशी अपेक्षा आहे...) असा सूर भागवतानी लावला असता तर? याचा विचार करत होते म्हणुन एक बाईमाणुस असूनही प्रश्न विचारायचे धाडस केले हो. :)

In reply to by बाईमाणुस

>>सरसन्घचालकानी प्रश्नकर्त्याला तसेर का बरे म्हटले नसावे? -- काहि कल्पना नाहि. पण जसं मी पूर्वी म्हटलं, कि सरसंघचालक अगदी २४ बाय ७ आपली काळि टोपी उतरायला तयार नसतील तर मला तरी त्यात आश्चर्य नाहि वाटत. >>असा सूर भागवतानी लावला असता तर? अगदी संघटनेत स्त्रि सभासदांसंदर्भात नाहि, पण कळानुरुप बदलण्याची भाषा त्यांनी अनेकदा वापरली आहे. असो. अर्धवटराव

In reply to by बाईमाणुस

मग लोकसत्तेच्या मुलाखतीत संघाचा हिंदुत्ववाद समजावून सांगताना 'संघात हिंदूही आहेत, मुस्लिमही आहेत' हे जे विधान केले गेले त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण करण्याची संधी या प्रश्नाचे उत्तर देताना घेता आली असती.
अहो ताई, "मुस्लिम राष्ट्रीय मंच" याविषयी एकले आहे का?. राष्ट्रवादी मुस्लिमांची संघाच्या प्रेरणेने उभी राहिलेली संघटना आहे ही. संघाचे जेष्ठ प्रचारक आणि अ. भा. कार्यकारीणी सदस्य मा. इंद्रेशजी या संघटनेचे मुख्य संरक्षक आहेत. गरज असेल तेव्हा संघ या संघटनेला आपले पाठबळ पुरवत असतो. माझ्या ओळखीत अनेक मुस्लिम स्वयंसेवक आहेत, तसेच अनेक जण मु.रा.मं मध्ये ही काम करत आहेत. संघ कधीही हा मुस्लिम स्वयंसेवक, हा हिंदू स्वयंसेवक (जसा जातीच्या आधारावर केला जात नाही तसा) असा भेदभाव करत नाही, संघात सगळेच स्वयंसेवक असतात. त्यामुळे कदाचित सरसंघचालकांनी उदाहरण दिले नसावे. मु.रा.मं विषयी अधिक माहितीसाठी आपण ह्या पानाला भेट देऊ शकता. http://www.facebook.com/#!/MuslimRastriyaManch

आणि हो, अमेरिकेतल्या शाखेत मात्र शाखा पुरुष आणि महिला या दोघान्ची एकत्र असते. ते का? रिटेल मार्केटबद्दल्च्या सरकारी धोरणाबाबतीत दोन परिवार सन्घटनेचवेपरस्पर विरोधी मत असले तरी समजू शकते. पण स्त्री आणि पुरुष या पातळीवर त्याच हिन्दु कुटुम्बाच्या बाबतीत भारतात(इन्डिया/भारत) आणि भारताबाहेर हा फरक कळला नाही.

In reply to by बाईमाणुस

भारतात ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतात ती संघटना भारताबाहेर नाही. परदेशात साधारण त्याच विचारांची जी संघटना आहे तिचे नाव हिंदू स्वयंसेवक संघ आहे. त्यांचा गणवेषही वेगळा आहे. त्यामुळे त्यांचे नियम आणि ह्यांचे नियम हे एकच असावेत अशी अपेक्षा का? संघाच्या विचाराच्या अनेक संघटना आहेत जसे विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद वगैरे. ह्या इतर संघटनांमधे स्त्री पुरुष एकत्र काम करतात. त्यामुळे ही तुलना अत्यंत गैरलागू आहे.

In reply to by हुप्प्या

ती वेगळी सन्घटना आहे हे पण मान्य पण माझ्या अनुभवानुसार धाटणी तीच असते हो, तसेच शारिरीक, बौद्धिक वगैरे. अगदी पावसात ईन्डोर असते तेव्हाचे खेळ सुद्धा नॉस्ताल्गिक करणारे. येऊन बघा हवेतर. :) (त्यातसुद्धा काही बौद्धिकात कधीकधी एकाच वेळेला दोन विषय असतात 'चीनची डबल्यू टू मधली एन्ट्री' पुरुषान्करत आणि 'घरगुती आयुर्वेदिक उपचार' बायकान्करता आणि त्यात अर्थात क्रॉस-एन्ट्री नसते, क्रॉस-एन्ट्री मागुन पाहिली आहे) . गणवेष वेगळा याचे मूळ वातावरणात असेल. तेही बरोबरच. पण जसे वातावरण/तपमानातला बदल हे एक कारण तसेच समाजातले बदलते वातावरण हेही एक कारण कारण होऊ शकते ना? त्या अनुषन्गाने होणार्या बदलाची दखल विचारात घेतली गेली आहे असे चित्र आज दिसले तर उद्या कदाचित बदल प्रत्यक्षात येण्याची शक्यता तरी दिसू शकेल माझ्यासारखीला. एरवी 'स्त्री ही देवी' वगैरे विचार उदात्त असले तरी ते समाजातल्या बदलात टिकणारे नाहीत.

मुळ लेख काय ? त्यावरचे प्रतिसाद काय ? मिडियाचा शहाणपणा असा टॉपिक आहे हो..... त्यावर बोला. माझ्या अंदाजाने ६० ते ७० टक्के प्रतिसाद लेखात विचारलेल्या प्रश्नाला सोडुन आहेत.

In reply to by अमोल खरे

श्री. अमोल खरेजी, मला देखील हाच प्रश्न पडला आहे, पण मिपा देखील या तथाकथित मिडियाचाच एक भाग आहे ना, अगदी मॅक्रो किंवा मायक्रो किंवा कुठल्याही हिशोबात असला तरी. मग बाकी मिडियात जे चालतं, मुळ प्रश्न सोडुन नको त्या विषयावर गप्पा मारणे, इथं देखील तेच चालु आहे असं म्हणायला कुणाची हरकत नसावी. एक नम्र विनंती - मा. संपादक मंडळ, या किंवा कोणंत्याही काथ्याकुटात मुळ प्रश्नाशी संदर्भ नसलेले चर्चा प्रस्ताव / प्रतिसाद वगैरे मुळ चर्चा प्रस्तावकाच्या संमतीने किंवा मुळ प्रस्तावक व मा. संपादक मंडळ यांची साधक बाधक चर्चा करुन उडवुन टाकण्याची सोय करता येईल काय ?

तुमचा मुद्देसूद लेख आवडला. भागवतांच्या विधानांवर तत्परतेने चर्चा घडवून आणणारी प्रसारमाध्यमं आपली चूक मान्य करण्यासाठी तेवढ्याच तत्परतेनी चर्चा घडवून आणणार का? नैतिकतेचा ठेका घेतलेले हे सूत्रसंचालक विधानं ट्विस्ट केल्याबद्द्ल प्रामाणिकपणे माफी मागणार का? शक्यता फारच कमी आहे. अशाच एका कार्यक्रमामधे एक नेता संघाविषयी बोलताना कायम त्यांना नथुरामाची अवलाद म्हणतो. त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी ह्या बेजबाबदार विधानाबद्द्ल त्या नेत्यावर कार्यक्रमात आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. असो. आता ही जी माहिती तुम्ही वरती दिली तिचा टारगेट ऑडिअन्स फारच कमी आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना भागवतांनी वादग्रस्त विधानं केली हेच कायम लक्षात राहिल.

In reply to by सुचेल तसं

इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन बोलणार्या प्रतिसादाची लोकाणा आलर्जी आहे का ? पुन्हा एकदा दुआ देतो. कृपया आपले मत द्या. (भावनिक आणि शब्द बम्बाल प्रतिसादाना महत्व दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17896786.cms

In reply to by पिंपातला उंदीर

सदर विधान असलेले भाषण मी ऐकले नाही पण त्या विधानाच्या अगोदरची वाक्ये पण तशीच असल्यास ते विधान व भाषण दोन्हीही भंपक असावीत. बाकी मोहन भागवत बोलण्यामध्ये त्यांच्या पूर्वीच्या दोघांपेक्षा खूपच बरे आहेत. अवांतर - दोन अडीच वर्षांपूर्वी दोन फूल एक हाफ मध्ये मोहनभैया व (पांढरे कपाळ असलेली) कमळाबाई यांचा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील रंगवलेला प्रसंग आठवला. अन दोन फूल एक हाफ सदर बंद पडल्याचे पुन्हा एकदा दुःख झाले. सदर धाग्याबद्दल धागाकर्त्याचे अनेक आभार. काही वर्षांअगोदरपर्यंत मी नित्यनेमाने एका हिंदी / इंग्रजी न्यूज चॅनेलचे प्रसारण नेमाने पाहत होतो. पण महाराष्ट्राबद्दलची बातमी असली की त्यांचा पूर्वग्रह ओसंडून वाहायचा. त्यानंतर मी ती वाहिनी पाहणे थांबवले अन जालावरील बातम्या वाचताना भंपक विधानांशी संबंधीत बातम्या वाचणेही सोडून दिले. आजकाल मी फावला वेळ घालवण्यासाठी हिस्ट्री किंवा नॅशनल जिओग्राफिक वाहिन्यांचे जालावर उपलब्ध असलेले कार्यक्रम पाहतो.

In reply to by पिंपातला उंदीर

किंबहुना मुद्दाम उटपटांग तर्क लावणार्‍यांची फिरकी घेण्यात मिपा ला मजा येते. विकासरावांनी प्रसारमाध्य्मांच्या विश्वासाहर्तेवर जे बोट ठेवलय त्याच्या नेमक्या कारणाचं उदाहरण म्हणाजे मटा ची हि बातमी. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात पाश्चात्य जीवलशैलीच्या अंधानुकरणावर बोट ठेवलं. अनेक मुद्दे आले. भारतीय जीवनशैलीचे भलेबुरे पैलु ही त्यात आले. अत्यंत विकृत पद्धतीने सामुहीक बलात्कार करुन व्हीक्टीमला ठार मारण्याचा प्रयत्न करणारी मानसीकता कशी व का फोफावतेय याचा उहापोह झाला. त्याच भाषणातले दोन वेगवेगळे वाक्य कॉईन करुन मटा ने हि बातमी छापली. ग्रामीण भारतात काय काय गुन्हे होतात याचं निरीक्षण सरसंघचालकांना मटावाल्यांपेक्षा निश्चित जास्त आहे. ति मुलगी अत्यंत दु:खदायक प्रसंगातुन गेली... शेवटी तिने प्राणही गमवले. एव्हढ्या सेन्सेटीव्ह मुद्याला संघाच्या बदनामीकरता वापरण्याची मानसीकता किती खालच्या पातळीवरची म्हणायची... आणि वरुन आपले उफराटे वांझोटे तर्क चालवणारे आंतरजालीय विद्वान. मरणार्‍याच्या टाळुवरचे लोणी खाणारे तर ऐकले होते.. पण मेंदुसुद्धा खाणारे बघुन किळस वाटायला लागली आता. अर्धवटराव

In reply to by पिंपातला उंदीर

(भावनिक आणि शब्द बम्बाल प्रतिसादाना महत्व दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
हे तुम्ही म्हणावं? आश्चर्य आहे.. वरती काहीही संबंध नसताना तुम्ही सरसंघचालक एका विशिष्ट जातीचेच झाले आहेत असं विधान केलं होतं. त्याचा आणि विकास ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा काय संबंध? निव्व्ळ रोगट प्रतिसाद वाटला मला तो. माझी कमेंट ही विकास ह्यांनी जे सागरिका घोष ह्यांनी ट्विट केलं त्यावर होती. त्यावर तुमचं म्हणणं काय?

सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अ‍ॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अ‍ॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता.
'शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावारुपाला आणली होती' यासंदर्भाने? मला नाही वाटत. सरसंघचालक मोहन भागवतांनी ती टिप्पणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच भारतीय संस्कृती (संघप्रणीत) विरुद्ध इंडिया संस्कृती (संघाला वाटते ती) याविषयी केली आहे. शरद जोशींच्या इंडिया विरुद्ध भारत या मांडणीचे संदर्भ सांस्कृतिक कमी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विकासविषयीची भूमिका यासंदर्भात अधिक आहे. तेव्हा, येथे तुम्ही केलेली मांडणी दिशाभूल करणारी ठरते. ती तशी नसेल तर भागवतांच्या बोलण्यामागील भारत विरुद्ध इंडियाचा संदर्भ पूर्ण द्यावा लागेल किंवा मग तो आहे तेवढाच शाब्दीक ठेवून बाकी मांडणी करावी लागेल. ती तेवढीच केली तरी, माध्यमांची चूक ही चूकच राहते, हे निश्चित.
प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला.
मी काही सरसंघचालकांचे यूट्यूबवर "असणारे" भाषण ऐकलेले नाही. त्यामुळे ते काय म्हणाले याविषयी मी बोलणार नाही. पण, तुम्ही म्हणता तसे ते बोलले असतील आणि माध्यमांनी त्याचे भलतेच संदर्भ लावत बातम्या दिल्या असतील तर ती चूकच आहे. गंभीर चूक आहे. त्याबद्दल ट्विटरवर वगैरे माफी मागण्यात अर्थ नाही, तर ती माफी त्याच माध्यमात मागितली पाहिजे. माफी मागून प्रश्न सुटत नाही, तर असे का घडते आहे याचा विचारही माध्यमांना करावा लागेलच. अर्थात, ही एक अपेक्षा आहे आणि अपेक्षाभंगाची तयारी ठेवूनच ती व्यक्त करतो आहे. येथे मोहन भागवतांनी भारतीय तत्वज्ञान वगैरेचा उहापोह केला आहे, असे तुम्ही म्हटले आहे. सिल्चरमधल्या इंडिया विरुद्ध भारत यालाही तोच संदर्भ असावा. त्यापलीकडे सरसंघचालक अर्थ-राज्य-विकास अशा संदर्भात भारत-इंडिया असे द्वैत करतील असे वाटत नाही. किंबहुना, तशा मांडणीची क्षमता त्यांच्यात दिसलेली नाही. ते संघटक आहेत. संघटकच राहतील, असे आत्तापर्यंतचे चित्र सांगते.

'शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावारुपाला आणली होती' यासंदर्भाने? मला नाही वाटत.
सहमतच. आणि तसे मी म्हणलेले देखील नाही. म्हणूनच असे म्हणले की, "भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अ‍ॅटीट्यूड सांगायची पद्धत ..." त्यापुढे मी जे, "त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अ‍ॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता...." जे म्हणले आहे, त्यातील कदाचीत "त्यांचा" जे म्हणले त्यामुळे गैरसमज झाला का? कारण मी "त्यांचा" हे मी मोहनजींना उद्देशून म्हणले होते शरद जोशींना उद्देशून नाही. म्हणूनच "अर्थातच सांस्कृतिक होता" असे म्हणले.
ती तेवढीच केली तरी, माध्यमांची चूक ही चूकच राहते, हे निश्चित.
मी माध्यमांची ती म्हणजे आसाममधील बातमी देण्यात चूक झाली आहे असे म्हणले नव्हते. त्या बातमी संदर्भातील माध्यमांचे (आणि संघाचे) विश्लेषण एखाद्याला पटेल अथवा न पटेल हा वेगळा मुद्दा आहे. म्हणूनच मी त्यात पुढे, "विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते." असे म्हणले होते. तो भाग मी केवळ सध्या चालू असलेल्या घटनाक्रमातला म्हणून दिला होता आणि म्हणून पुढे मी म्हणले होते की , "त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. " आणि नंतरचा वृत्तांत दिला...
पण, तुम्ही म्हणता तसे ते बोलले असतील आणि माध्यमांनी त्याचे भलतेच संदर्भ लावत बातम्या दिल्या असतील तर ती चूकच आहे. गंभीर चूक आहे. त्याबद्दल ट्विटरवर वगैरे माफी मागण्यात अर्थ नाही, तर ती माफी त्याच माध्यमात मागितली पाहिजे. माफी मागून प्रश्न सुटत नाही, तर असे का घडते आहे याचा विचारही माध्यमांना करावा लागेलच.
धन्यवाद. हे मी म्हणायचा प्रश्न नव्हता. किंबहूना म्हणूनच सागरीका घोष / पिअर फिटर/ चेतन भगत सारख्यांना माफी मागावी लागली. किंबहूना त्यांनी म्हणजे माध्यमप्रतिनिधींनी तो प्रामाणिकपणा दाखवला. पण माध्यमांनी मात्र दाखवला नाही. (खेदाने म्हणावेसे वाटते की निखिल वागळ्यांना मात्र अशी आचारसंहीता अगदी ट्विटरवर देखील पाळाविशी वाटली नाही.) असो. खुलासा मागितल्याबद्दल धन्यवाद. मूळ लेख/चर्चा ही माध्यमांच्या अप्रामाणिकपणाबद्दल होती. मात्र ज्यांना केव्ळ संघाबद्दल अभ्यास न करता बरळायचे होते त्यांनी त्यात अतिअवांतर केले. अर्थात त्यात काही आश्चर्य वाटले नाही...

संघ संचालकाचा मुद्दा मांडण्यमागे संघाचे वैचारिक व्यासपीठ किती संकुचित आहे हे सांगण्याचा उद्देश होता. ही कूटल्याही एका जातीवर टीका नाही तर एका संघटणेवर केलेली टीका होती. आणि एकूण चर्चा पुढे जाण्यासाठी संघटनेचे गुण-दोष पण चर्चीले गेले पाहिजेत. असो तुम्ही या मुद्द्याचा प्रतिवाद करू शकला नाहीत. किंवा तुम्ही आणि इतर अनेक म्हणता त्याप्रमाणे जात मानत नसल्याने संघाचा हा angel तुमच्या लक्षात आला नसावा. असो. पण महाराष्ट्र टाइम्स दिलेली आकडेवारी भागवत यांच्या विधानाला सरसकट खोडून काढते . भागवत यांच्या विधानाला पुष्टी देणारी आकडेवारी आपण देऊ शकता का ? जर नाही तर भागवत यांचे विधान चुकीचे आहे याची कबूली द्याल का? जाणता अजाणाता कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

In reply to by पिंपातला उंदीर

परत एकदा "आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी" आणि "माकड म्हणतं माझीच लाल" या म्हणिंची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद हा लेख खोटि बातमी देणे आणि ते पुढे आल्यावर माफी मागणे यावर आहे त्यावर तुमचे भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा. असले वांझोटे प्रतिसाद वाचुन थोडा टाईमपास झाल्याबद्दल धन्यवाद. असो तुमच्यासाठी अजुन काही खाद्य http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17896786.cms याबद्दल विकास आणि श्रामोंनी लिहले आहेच पण अर्धवट माहिती नको म्हणुन लेखातले सर्वेक्षण कशाचे आहे ते नक्की वाचा (कोर्टाने दोषी ठरवलेल्यांची)

In reply to by पिंपातला उंदीर

तुमच्या कुठल्या मुद्द्याला कोण उत्तर देउ शकलेले नाही हे कळेल काय? अतिशय हास्यास्पद, तर्कशून्य आणि निराधार विधाने करुन तुम्ही स्वतःचेच हसे करुन घेतले आहेत. त्यावर बर्‍याच जणांनी तुम्हाला सयुक्तिक पुरावे दिले. त्याकडे लक्ष न देता तुम्ही उत्तरे मिळाले नाही म्हणत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. शिवाय जशी उत्तरे मिळत गेली तसे तुम्ही तुमचे आरोप बदलत गेताल. म्हणजे तुमचे आधीचे सगळे आरोप चुकीचेच्च होते हे तर सिद्धच झाले.

सगळे जण एका आयडीचे "गैरसमज" दूर करायच्या पंदात का पडत आहेत. सदर आयडी मुद्दाम खोडसाळपणा करत आहे हे दिसून येत आहे, तेह्वा सरळ दुर्लक्ष करणे हे उत्तम.

चर्चेचा मुद्दा हा माध्यमांचे अप्रामाणिक वर्तन या संदर्भात होता आणि त्याबद्दल अजुनही पार्टी क्रॅशरसारखे संघावर वाटेल ते बरळणार्‍यांनी उत्तर दिलेले नाही. अर्थात त्यात नवल नाही. हा लेख संघाच्या प्रचाराकरता नव्हता. किंबहूना कुणाला कोणची विचारसरणी आवडावी आणि नावडावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खोटे-नाटे लिहीणे हे अनैतिक आहे आणि तेच येथे काहीजणांकडून परत परत दिसून आले. वर सारखा म.टा. मधे आलेल्या मुळच्या टाईम्समधील बातमीवरून दुवा देत, (पुलंच्या भाषेतल्या) टॉवेल मिळालेल्या आर्कीमिडीझचा आनंद गगनात मावत नसल्याप्रमाणे, युरेका युरेका म्हणून ओरडले गेले. वास्तवीक तो विदा आणि मोहनजींचे मुळचे संपूर्ण वक्तव्य यात काडीचाही संबंध नाही. त्याबद्दल मी येथे लिहू इच्छित नाही. जर कुणाला त्यावर चर्चा करायची हौसच असेल तर त्यांनी नविन धागा चालू करावा आणि त्यात संपूर्ण वक्तव्याचे वाचून विश्लेषण करावे, मग चर्चा करायची का ते बघेन. तो पर्यंत मटा/टाईम्स मधे ज्याचा संदर्भ देत लिहीले गेले आहे त्या म्रिणाल सतिशच्या संशोधनाबाबतः त्याला ट्विटरवर कोणी एका sunetra choudhury ने विचारले की, Oh. how is it that people were already quoting from it? did you write a newspaper article? त्यावर म्रिणाल सतिश यांनी उत्तर दिले आहे की, "It's a part of my doctoral dissertation at Yale on rape sentencing. Not published yet. Will publish once I receive degree. " म्हणजे थोडक्यात ज्या संशोधकाच्या नावाने हे पेपरवाल्यांनी छापले आहे, त्याने ते अजून अधिकृतपणे छापले देखील नाही. त्यावर त्याला पिएचडी देताना ते संशोधन कसे केले गेले याचा उहापोह होऊन पिएचडी दिली जाईल, मग तो विदा सर्वांना अधिकृतपणे बघता येईल आणि मग त्यातले बरोबर काय आणि चूक काय हे ठरवता येईल. पण जी प्रसारमाध्यमे एकदा नाकावर पडली त्यांना मात्र वाट्टेल ते करून मोहनजींना आणि संघाला चूक ठरवायची घाई झालेली आहे म्हणून आधीच लिहून टाकले झाले. बाकी त्यात देखील निकाल लागलेल्या केसेस वगैरे मुद्दे आहेतच पण माझ्या दृष्टीने विश्वासार्ह नसलेल्या माध्यमांनी एका अनपब्लीश्ड रिसर्चचा त्यांना वाटेल तसा केलेला गैरउपयोग या व्यतिरीक्त त्या बातमीला अधिक महत्व नाही.

बलात्काराचे प्रमाण लाखामागे मोजल्यास दिल्ली ४.५,मुंबई ३.७ तर पुणे २ च्या आसपास आहे.हीच आकडेवारी शिकलेल्या आणि कायदा आपल्या तुलनेत ठीकठाक असलेल्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मध्ये २३ तर लॉस एंजलीस मध्ये तब्बल २७.५० आहे.अमेरिकेत २७ , ब्रिटन मध्ये २३ आणि भारत (इंडिया) मध्ये १.८ आहे . तथाकथिक बलात्काराची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये ४.५ तर पुणे २.१ ,मुंबई ३.५असे प्रमाण आहे.भारत आणि इंडिया हि तुलना चुकीची वाटली, ग्रामीण भागात हे प्रमाण आकडेवारी नुसार जास्त आहे आणि तरीसुद्धा ग्रामीण भागातील ८५-९०% गुन्हे पोलिसात नोंदविले जात नाहीत. आकडेवारी : ऍड.असीम सरोदे आणि UNODC (United Nations Office on Drugs and Crime)

>>>>माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का ? हो. पण कोणा एका विषयासंदर्भात 'हो' म्हणत नाही. सर्वसामान्य कोणत्याही विषयांवर माध्यमांचा अप्रामाणिकपणा दिसतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर तुम्ही पुरोगामी आहात का? असलात तर तुमची मते(निष्पक्ष)नाहितर तुम्ही ईंटरनेट हिंदू अवांतरः संस्कार ही काही पुरोगामी विचारजंताची मक्तेदारी नव्हे ही सही डकवावी म्हणतो

In reply to by चेतन

>>> बिरुटे सर तुम्ही पुरोगामी आहात का ? च्यायला, हे पुरोगामीपणा काय असतो ते मला माहिती नाही. पण, माझी बांधिलकी आधुनिक विचारांशी आहे. >>> नाहितर तुम्ही ईंटरनेट हिंदू इंटरनेट हिंदु काय आहे, हे मला अजून नीट समजलेले नाही. कळलं तर लिहिन म्हणतो. बाकी, विचारजंत वगैरे असं हिणवणे बरं नाही. -दिलीप बिरुटे