✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनमोल...!

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 08/25/2008 - 23:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15203 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

च
चिखलू Mon, 08/25/2008 - 23:56 नवीन

पाच + १ अनमोल गोष्टी (५ जरा कठिण आहे )

१) सह्याद्री वर चांदण्यातली रात्र (कुठेही) २) एखाद्या लहानग्याचे गळ्यात असलेले हात, निरागस हास्य आणि बोबडे बोल... ३) पिठ्ल्-भाकरी. ४) शाळेतल्या आठवणी. ५) दुपारचे सहकुटंब तुडंब जेवण आणि बाहेर झाडाखाली झोप.. +१) पोट सुटले आहे तरी आई/आजी चे "किती रे वाळलास" हे डोक्यावरून (पोटावरून नाही) हात फिरवून म्हणणे...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/26/2008 - 00:01 नवीन

क्लास..!

+१) पोट सुटले आहे तरी आई/आजी चे "किती रे वाळलास" हे डोक्यावरून (पोटावरून नाही) हात फिरवून म्हणणे... हे केवळ क्लास! :) आपला, (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/26/2008 - 00:04 नवीन

खूप आहेत..

१ ला नंबर मिळावा अशा गोष्टीही खूप आहेत. तरीही १. लेकराचं निरागस हास्य.. २. आईने मायेने केलेली पुरणपोळी आणि दिलेली तिची एखादी साडी ३. नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक ४. कोकणातलं अस्सल कोकणी जेवण.. एखाद्या आत्यानं किंवा काकूनं केलेलं ५. केवळ मायेपोटी एखाद्या सुरेखानं किंवा पांडेकर आजीने केलेलं चिकन , तां-पां रस्सा किंवा शेवग्याच्या शेंगाचि भाजी ६. हृदयापासून गायलेली गाणं... . . . . . . तात्या, यादि खूप मोठी आहे हो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 08/26/2008 - 04:04 नवीन

कन्यारास म्हणते

३. नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक काय गं प्राजु तै ? असं म्हणतात जी गोष्ट दुर्मिळ तेवढी ती अनमोल्/महत्वाची. किंवा एखादी गोष्ट काही केल्या परत येणार नसेल तर , उदा. बालपण ....खाऊचं कौतुक अंमळ दुर्मिळ आहे का ग ? (ह.घे.) -कंन्यारास (टार्‍या खातोय मार आता .. युएस वरून व्हाया युरोप येतंय बघ लाटणं आता अफ्रिकेत )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
भ
भास्कर केन्डे Wed, 08/27/2008 - 21:50 नवीन

प्राजूताई

नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक - - कौतूक झालेल्या पदार्थांचे १३१२३ मध्ये स्वागत आहे. फक्त फोन करा आणि पहा... मी २ मिनिटात येतो का नाही ते... आणि तेही मोठ्या डब्ब्यासहित! आपला, (खादाड) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Tue, 08/26/2008 - 00:07 नवीन

कृपया....

कृपया.... कृपया.... कृपया....! आपले पर्याय कितीही असू शकतात हे मान्य. परंतु इथे केवळ पहिले पाचच लिवा. त्यातच या काथ्याकुटाची गंमत आहे! :) फार फार तर ६ चालतील, परंतु शक्यतो पाचच लिवा अशी पुन्हा एकवार विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/26/2008 - 00:57 नवीन

माझ्या साठी...

माझ्या साठी... १) माझ्या पहिल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा आलेलं फीलींग अनमोल आहे. (अजून तो क्षण फोटोग्राफिक मेमरी सारखा स्वच्छ आठवतोय). २) रात्री झोपताना माझ्या मुली लाडात येऊन मस्ती करतात ते अनमोल आहे. ३) कधी तरी गाणं / एखादं वाद्य ऐकताना एखाद्या क्षणी ते आत जाऊन भिडतं ते अनमोल आहे. ४) सुट्टीवर घरी जातो आणि शेवटच्या दिवशी निघताना नमस्काराला वाकल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यात जे भाव येतात ते अनमोल आहेत. ५) एखाद्या शांत न गजबजलेल्या देवळात, नुसतं डोळे बंद करून बसल्यावर एकप्रकारची शांतता अनुभवाला येते ती अनमोल आहे. या ५ मधे वर-खाली (रँकिंग) नाही. ज्या गोष्टी खरोखर अनमोल वाटतात त्या सगळ्या सारख्याच महत्वाच्या असतात. इथे फक्त ५चे बंधन आहे म्हणून ५ देत आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/26/2008 - 06:26 नवीन

आणि

आणि शेवटच्या दिवशी निघताना नमस्काराला वाकल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यात जे भाव येतात ते अनमोल आहेत. सुंदर...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भाग्यश्री Tue, 08/26/2008 - 03:04 नवीन

माझ्यासाठ

माझ्यासाठीच्या ५ अनमोल गोष्टी.. १) माझे आई, बाबा,सासू सासरे २) माझा नवरा ३) माझ्या मित्र-मैत्रिणींचा + वरील सर्वांचा माझ्यावरचा विश्वास.. ४) आत्मविश्वास ५) सेल्फ एस्टीम ( अवास्तव नसलेला आत्मसन्मान ) बाकीच्या गोष्टी खूप आहेत, संगीत्,खाद्यपदार्थ,चांगली पुस्तके, किंवा अजुन मी न अनुभवलेल्या गोष्टी.. पण हे वरचे पाहीजेच, आणि ते माझ्यासाठी अनमोल आहेत.. !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/26/2008 - 06:33 नवीन

४)

४) आत्मविश्वास खरं आहे. एकदा हा गमावला की माणूस काहीच करू शकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ट
टारझन Tue, 08/26/2008 - 03:43 नवीन

आपलं जरा येगळंच ए ..

१. मला जॉब लागल्यावर पहिल्या पगार आणि चितळे भाउंचे पेढे देताना आई-बाबांना झालेला आनंद २. नरेंद्र-देवेंद्र-प्रशांत(टारझन) यांनी कॉलेज काळात देवेंद्रच्या रूम वर कंप्युटर्स लॅन वर लाउन बोटं+डोळे+पाठ त्रास देइ पर्यंत २०-२० तास खेळलेल्या गेम्स ; भेळ, समोसे,गुलाबजाम,ढोकळा, आइसक्रिम च्या पार्ट्या (खाउ खाऊन झाला की पॅकिंगचे बोळे आम्ही गुपचुप दुसर्‍यांच्या घरावर फेकत असू, त्यामुळे याला "बोळे पार्टी" असं नाव पडलं आहे (ह्यावर खरं तर लेखंच होउ शकेल ;) ) थ्री चियर्स माय फ्रेंड्स , ३. १००१ वेळा प्रपोज केल्यावर 'तिने' अति अति हळू आवाजात दिलेला 'होकार' (अंगावर शहारे आलेले आहेत) ४. आमच्या टोळभैरवांबरोबर पाठ दुखेस्तोवर केलेल्या बाईक्सच्या सहली ... ५. गणिताच्या मास्तरचं ८वीत असताना कार्टून काढल्यावर संपुर्ण वर्गात एक आठवडा हशा पिकवला होता. त्यानंतर मास्तर मला या न त्या कारणाने रोज मारत असे आणि मी निर्लज्जा सारखं हसत असे. मारचं लागत नसे हो, आणि हसणं कंट्रोल होतच नसे. आणि मी हसताना पाहून वर्ग हसत असे...म्हणून मी परत हसत असे... लै छड्या तुटल्यात पाठीवर खॅखॅखॅ .. (आर्ररर मापटी,नकला करणे, एखाद्याला रडेपर्यंत चिडवणे आणि मारामार्‍या राहिल्याच की .. तात्यांनी मर्यादा घालून गोची केली राव) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 08/26/2008 - 05:06 नवीन

मा़झ्यासाठी.

१. मा़झ्या मुलाला जन्म दिल्यावर त्याला पहिल्यांदा पाहिले तो क्षण २. मुलगा जेव्हा "आई" अशी हाक म्हणुन गळ्यात पडतो तो क्षण ३. लग्नात अग्नी भोवती घेतलेल्या ७ फेर्‍या. ४. आई -वडिल, भाऊ- बहिण ह्यांचे प्रेम व त्यांच्या कडुन लाड करून घेणारा प्रत्येक क्षण. ५. मा़झ्या जवळच्या मित्र्-मैत्रीणींनी बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 08/26/2008 - 06:02 नवीन

माझ्यासाठी....

१) माझ्या मुलाचा जन्म २) आम्हा बहिणींची लग्न होण्याअगोदरचा, आम्ही सर्व एकत्र असलेला तो काळ ३) ऑनसाईट (जपानमध्ये) एकटं राहण्याचा अनुभव आणि त्याकाळात शिकायला/पहायला मिळालेल्या सर्व चांगल्या गोष्टी ४) माझ्या (कै.) आजोबांच्या सहवासातले क्षण ५) हापूस आमरस विथ साजूक तूप -वर्षा
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 08/26/2008 - 06:52 नवीन

अनेक चांगल्या - वाईट आठवणी..

या माझ्यासाठी अनमोल आहेत. आणि.... १) माझा मुलगा २) घर (म्हणजेच घरातील सर्वजण ) ३) एखाद्या निराशेच्या क्षणी कोणी कळत्-नकळत दिलेला आधार ४) पु. ल. ची पुस्तके / लता,आशा, रफी ची असंख्य गाणी ५) मित्र / मैत्रीणी
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 08/26/2008 - 06:52 नवीन

माझ्यासाठी

१. तिचे डोळे, तिचे स्मित आणि हनुवटीवरचा तीळ २. जिथे शिकलो त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणुन काम केले ते दिवस ३. नागावला समुद्रकिनारी घालवलेली होळीची रात्र ४. कट्ट्यावर बसुन मित्रांसोबत तासनतास हाणलेल्या गप्पा ५. दमुन भागुन घरी आलो की दारातुनच येणारा आईने केलेल्या मसाले भाताचा वास.....
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 08/26/2008 - 08:16 नवीन

+१

पुरंदरला केदारेश्वराच्या मंदीरात अनुभवाला येणारी शांतता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
स
सुचेल तसं Tue, 08/26/2008 - 09:33 नवीन

१) प्रसंगी

१) प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आई-वडिलांनी दिलेले पैसे/ केलेले लाड. २) बहिण रक्षाबंधनाला बांधते ती राखी तसेच भाऊबीजेला ओवाळते तो क्षण ३) परिक्षेला/मुलाखतीला जाताना आजी हातावर देते ते दही. ४) पहिली नोकरी लागते तसेच पहिला पगार हातात येतो तो क्षण. ५) एखादं सुंदर पुस्तक वाचताना किंवा चित्रपट पाहताना भारावुन टाकणारे ते क्षण. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 08/26/2008 - 10:56 नवीन

आईला माझ्या लेखनातुन मिळालेले समाधान

१) आईला आवडलेले माझे मिसळपाव वरील लेखन ( माझी आई सौ. उज्वला केळकर ही लेखिका आहे. आत्तापर्यंत साधारण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक जण तिला विचारत असत की काय हो तुमचा मुलगा काही लिहितो की नाही? त्यावेळी मला फार वाईट वाटायचे. आईला जेंव्हा मी केलेली विडंबने दाखवली तेंव्हा तिला आश्चर्याचा सुखद धक्क बसला. त्या विडंबनाचा दर्जा , मात्रा , वृत्त यमक न पाळता केलेली विडंबने फारशी चांगली नव्हती तरी तिच्या चेहर्‍यावरचा आनंद पहाण्यासारखा होता. याबद्दल मी मिसळपाव/ तात्या अभ्यंकरांचा आभारी आहे मला अनमोल वाटणार्‍या इतर गोष्टी २) सांगलीची भेळ ३) मुंबई-काठमांडु पहिला विमान प्रवास ४) रविवारच्या सकाळी रंगोली पहात, पेपर वाचत निवांतपणे घेतलेला चहाचा आस्वाद. ५) कोजागिरीची रात्र / गाण्याची मैफल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/26/2008 - 12:02 नवीन

सर्वोच्च पाच

१. राष्ट्रगीत १. रात्रभर मित्रांबरोबर/नातेवाईकांत रंगलेल्या गप्पा १. घर व घरातले सगळे १. आईच्या मांडीवर डोके ठेऊन विसावणे.. व तीचा डोक्यातून फिरणारा हात १. दहावी झाल्यावर आजीने हातावर ठेवलेला सव्वा रुपया -(पाचामुखी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 18:11 नवीन

पंचमी...

१) गच्च भिजलेल्या अवस्थेत लोकलने प्रवास करताना नजिकच्या स्थानकावर उतरायला मिळणे, आणि समोरच सार्वजनिक संडास, मुतारी मोकळी मिळणे........... अहाहाहाहाहाहाहाहाहाहा....! २) पँटच्या चेनने दगा दिला असता खोचलेला शर्ट बाहेर काढल्यावर तो 'सफिशियंट' लांब असणे आणि कोणाच्या लक्षात यायच्या आत घरी पोहोचणे. ३)मैत्रीणी बरोबर हॉटेलात जाऊन, महागडे पदार्थ ऑर्डर केल्यावर चु़कून पैसे/पाकिट घरी राहिल्याची आठवण होणे आणि तेंव्हाच मैत्रीणीने ' ए! आज बील मी भरणार हं, तू पाकिटाला अज्जीबात हात लावायचा नाही' असा लाडीक दम भरणे. (बऽऽऽऽऽर, बाबा) ४)'थोडे दिवस माहेरी जाईन म्हणते' असा प्रस्ताव पत्नी मांडते तो क्षण. ५) चार वर्षांनी परदेशातून परतताना मुलाला फोनवर विचारले, 'तुझ्यासाठी काय आणू?' तेंव्हा त्याने दिलेले 'दाढीचे सामान' हे उत्तर. तो क्षण. असे खूप खूप आहेत पण तात्यांनी पाचाची पाचर मारून ठेवलीए नं!
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/26/2008 - 22:17 नवीन

+++++१

ऍज युज्वल, पेठकर काकांचा बेश्ट प्रतिसाद आहे ! -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/26/2008 - 22:20 नवीन

मस्त !!!

एक, दोन, तीन, चार मस्त !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चतुरंग Wed, 08/27/2008 - 00:07 नवीन

पेठकरकाकांची 'पंच'मी लाजवाब!

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
नंदन Wed, 08/27/2008 - 01:16 नवीन

+१

असेच म्हणतो :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Wed, 08/27/2008 - 00:11 नवीन

मजेदार

:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
क
कोलबेर Wed, 08/27/2008 - 01:42 नवीन

हा हा हा

आई -वडील, मायेचा हात, डोळ्यातले अश्रू, खाण्याच्या गोष्टी ह्याशिवाय वेगळे काहीतरी वाचून मजा आली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 09:36 नवीन

सगळ्यात बेष्ट !!!!!!!!!!

४)'थोडे दिवस माहेरी जाईन म्हणते' असा प्रस्ताव पत्नी मांडते तो क्षण. काकु मिपा वाचते का हो काका ? :D राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
राम भाऊ Wed, 08/27/2008 - 10:28 नवीन

सहि आहे !!!!!

सहि आहे !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
भ
भास्कर केन्डे Wed, 08/27/2008 - 21:52 नवीन

पंत

पंत, आपला प्रतिसाद वाचून आज मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले! आपला, (प्रभावित) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
झ
झकासराव Fri, 09/05/2008 - 12:00 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रामदास Tue, 08/26/2008 - 19:35 नवीन

नाय जमत आहे.

एक साधा प्रश्न माझा लाख त्याची उत्तरे हे खरे की ते खरे ते खरे की हे खरे. बहुतेक भटांची कविता आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 20:03 नवीन

खूप विचार केला तेव्हा वाटलं

१. आई गेल्यावर बाबांना मिठी मारून रडले होते तेव्हाचा त्यांचा स्पर्श २. पीएच. डी. करायला इंग्लंडला जायला निघाले तेव्हाचा सुलीकाकूचा आणि अशोक काकांचा एकाच वेळी झालेला रडवा आणि हसरा चेहेरा ३. पीएच.डी. संपवून इंग्लंडला भेवटचा बायबाय केला तेव्हा माझ्या मास्तरचं वाक्य, "आता भारतात येण्यासाठी एक कारण आहे." आणि तेव्हाच्या हाऊसमेट्सचं विमानतळावर येणं आणि हळूच माझे आणि स्वतःचे डोळे पुसणं ४. पीएच.डी. संपवून परत भारतात आले तेव्हा अभिरचा (तेव्हाचा माझा बॉयफ्रेंड, आताचा नवरा) चेहेरा ५. हल्ली ऊठसूठ भाऊ फोन करून " ... झालं, आता काय करू" विचारतो ... त्याचं प्रेम!
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Tue, 08/26/2008 - 20:27 नवीन

गिनीपीग

३. नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक प्राजु नवर्‍यावर पदार्थाचं प्रयोग करतेस का?
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Wed, 08/27/2008 - 07:21 नवीन

प्रतिक्रिया

१)जीवन सन्मानाने व स्वाभिमानाने कसे जगावे हे स्वानुभवाने शिकविण्यार्‍या वडिलांच्या आठवणी २)माझे बंधू मा.मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले तो दिवस. ३)कै.सौ.सरोजिनीबाई वैद्य यांची 'रणांगण' कादंबरीवरील व्याख्याने. ४)श्रीमद् भगवद्गीता ५)पंडित भीमसेन जोशी यांचा सकाळी सकाळी कानावर पडलेला अभंग
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 09:42 नवीन

आई शप्पत !!!

२)माझे बंधू मा.मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले तो दिवस. आई शप्पत ! एवढे उच्च कनेक्षन आहे हे आम्हाला माहितीच नव्हते ! प्राचार्यांना आमचा नमस्कार सांगा. म्हणावं, त्याच्या जावयाशी आमची जी "मिलीभगत" आहे, ती मोडू नका, अशा क्षुल्लक प्रतिसादांमुळे. जावयाने लाटलेले भूखंड आम्हालाही ३०-३५ टक्के देताहेत, त्यात अशी बाधा नको. काय ? -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस
व
वैशाली हसमनीस Wed, 08/27/2008 - 11:38 नवीन

लक्षात घ्या!

आपण म्हणता तसे माझे उच्च कनेक्शन (शब्द नीट लिहीला आहे) वगैरे काही नाही. मी शिवसेनेचे काम करीत होते त्यामुळे ते मला बंधूसमानच आहेत.पण आपल्यासारख्या अमेरिकास्थित उच्चविद्याविभूषित माणसाला मुंबईतील क्षुल्लक भूखंडाचे प्रेम कशाला? असो,शाब्दिक मारामारीचा कंटाळा आल्यामुळे येथेच थांबणे बरे.अच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैद्य
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 12:20 नवीन

हुश्श !

मी शिवसेनेचे काम करीत होते त्यामुळे ते मला बंधूसमानच आहेत हुश्श ! आता बरे वाटले. धन्यवाद. तसेच असेल, तर आम्हालाही ते काकांसमान आहेत. आणि त्यांचे जावई बंधूसमान. (ता. क. भूखंड मुंबईतील नाहीत, पुण्यातले.) -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 12:19 नवीन

बापरे!

मी शिवसेनेचे काम ... शाब्दिक मारामारीचा कंटाळा...
बापरे! म्हणजे डायरेक्ट रस्त्यात गाठून हाणामारीची धमकी की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस
भ
भास्कर केन्डे Wed, 08/27/2008 - 21:46 नवीन

अनमोल - फक्त पाचच?

१. आई-वडिल, आजी व भावंडाच्या डोळ्यातले वात्सल्य/प्रेम. २. कॉलेजातले मंतरलेले दिवस. ३. अर्ध्या रात्री झोपीतून उठून मला शोधत येऊन "माझा बाबा" म्हणून मिठी मारून पुन्हा बिनधास्त ताणून देणारी माझी चिमुरडी अरुषी. ४. सकळी उठल्या बरोब्बर इवल्याश्या अर्णीचे (कन्या) डोळे उघडून पहिल्या नजरेत मिळणारे निरागस स्मितहास्य. ५. कोकण रेल्वेने श्रावणात (दिवसा) पनवेल-सावंतवाडी केलेला प्रवास व पहिले कोकण दर्शन - एका गडावर अजूबाजूला कोणी नाही हे पाहून खूप मोठ्याने केलेले "गोब्राम्हण ... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!" आपला, (रोमांचित) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 09/05/2008 - 12:31 नवीन

५ च का?

१. माझ्या लग्नात मी-आई-बाबा-ताई ५-१० मिनिट एकमेकांचे हात हातात घेऊन बसलो तो क्षण. २. माझ्या भाच्याचा जन्म झाला तेव्हा. ३. मी B.sc ची परीक्षा First Class मिळवून पास झाले तेव्हा कारण मी खुप आजारी होते पास व्हायचीच खात्री नव्हती. ४. माझ्या मांजरीला पहीलं पिल्लु झालं तो क्षण. ५. लहान असताना रात्री लाईट गेल्यावर आई-बाबांच्या मधे झोपायचा केलेला हट्ट पुर्ण व्हायचा तेव्हा.. तात्या खुप आहेत हो ....... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा