Skip to main content

चुप्प!

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 04/01/2013 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
सखे मला सांग, तू कधी विचार केलायसं? जेव्हा शरीरं थकलेली असतील, डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील, पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं काही होणार नाही सग्गळं बोलून-सांगून झाले असेल, रुसून-फुगून झाले असेल भांडून-बिंडून झाले असेल, कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझे अन् मला तुझे म्हणणे नीट समजायला लागले असेल, अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीन 'तु मला खुप आवडतेस' तेव्हाही तु अश्शीच लाजून, डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?
काव्यरस

वाचने 6813
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

मिका: ही अप्रतिम प्रेमकविता तुमच्या नावासकट आप्त-मित्रांना फॉरवर्ड करतो आहे, तुमची परवानगी गृहीत धरून, आशा आहे तुम्हाला चालेल. (का कुणास ठाऊक, पण वाचता वाचता Fiddler on the roof मधला हा प्रसंग आठवला):

साधासाच प्रश्न पण सुरेख गुंफलाय कवितेत

अय हय.....मजा़ आ गया..आता वरती इंदुसुता म्हणताहेत तसं याचं उत्तरदेखील लौकरच लिहून टाका बरं!

आवडली आपल्याला. सोपे शब्द सुन्दर वर्णन.

त्या 'सैल पडलेल्या' ओळीशी चुकून रेंगाळलो आणि कानांनी आश्वस्त झालो.

छानच

काही सजेशन्स :
पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं काही होणार नाही
पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं नाही
सग्गळं बोलून-सांगून झाले असेल, रुसून-फुगून झाले असेल भांडून-बिंडून झाले असेल, म्हणणे नीट समजायला लागले असेल
सग्गळं बोलून-सांगून झालं असेल, रुसून-फुगून झालं असेल भांडून-बिंडून झालं असेल,
कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझे अन् मला तुझे म्हणणे नीट समजायला लागले असेल
कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझं अन् मला तुझं म्हणणं नीट समजायला लागलं असेल
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीन
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुझ्या सुरकुतलेल्या गालांवर हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात ____ (हे जरा नजाकतदार हवं) हळूच कुजबुजीन.. बाकी कवितेची मांडणी आणि आशय उत्तम!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

इतक्या सुरेख कवितेवर प्रतिसाद देण्याऐवजी व्य. नि. करायला हवा होता. सं.मं.ला प्रतिसाद काढण्याची विनंती केली आहे. या ओळी मात्रः
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीन
अश्या सहज वाटतील अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुझ्या सुरकुतलेल्या गालांवर हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या कानात हळूच कुजबुजीन..

वाह!!