Skip to main content

बलात्काराविरूद्धचा रामबाण उपाय

लेखक अर्धवट यांनी रविवार, 06/01/2013 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहावा की न लिहावा हे नक्की होत नव्हतं, पण माझ्या सर्व जालीय मित्रांच्या हे नजरेला पडलं असेलच असं नाही म्हणून मुद्दाम लिहितोय. मिडीयावर, जालावर, वृत्तपत्रांमधून आणि एकूणच सर्व समाजचव्हाट्यावर बलात्कार, पीडीतांना न्याय, बलात्कार्‍यांची मानसीकता यावर उहापोह चालू आहे. ह्या सर्व मंथनातून काही चांगले कायदे, अंमलबजावणीत सुसूत्रता व कठोरता, समाजाच्या एकूण मनोवॄतीत सुधारणा वगैरेर फायदे झाले तर ते निश्चीतच चांगले ठरेल. भेदरलेली जनता सध्यातरी रोज न्यूज चॅनलवर कोकलणार्‍या पॅनेलीस्टना पाहाणे याखेरीज काहीही करू शकत नाही. पण ह्याच भेदरलेल्या समाजमनाचा फायदा इतरही काही लोक अत्यंत साळसूदपणे व घृणास्पदरित्या घेताना दिसले. ह्या यादीमधे तथाकथीत अध्यात्मीक गुरूही असतील याची कल्पना नव्हती. गणपाच्या फेसबूक वॉलवर अनिरुद्ध बापूने सांगीतलेल्या बलात्कारापासून वाचण्याच्या जालीम उपायांची यादी पाहिली आणि थक्क झालो. आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी आणि सुरक्षेसाठी ती यादी इथे देत आहे.. दिनांक ३ जानेवारी रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरूंनी श्रीहारीगुरुग्राम येथे सर्व स्त्रियांना भयमुक्त केले. एवढेच नाही तर, एका गोष्टीची खात्री बाळगायला सांगितली कि यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही - परमपुज्य बापूंनी खालील पंचसुत्री सांगितली, ०१. कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल . ०२. जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. ०३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने श्री मातृवात्सल्य उपनिषदातल्या, श्रीशिवगंगागौरीच्या महात्म्याचे दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल. ०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल. ०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल. परमपुज्य सद्गुरूंनी सर्वांना सांगितले कि आत्माविश्वासाने भयमुक्त जीवन जगा व त्या परमात्म्यावर मनापासून प्रेम करत संपूर्ण सुखमय जीवनाचा आनंद लुटा. आपण खरोखरच फार सुदैवी आहोत की आपल्याला बापुंसारखा बाप, नंदाईसारखी आई आणि सुचीतदादासारखा मामा सातत्याने आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करावयास ढालीसारखे आपल्या सर्वबाजुनी उभे आहेत. मला स्वत:ला कोणी तथाकथीत गुरू असे सांगून स्वतःचेच हसे करून घेइल असे अजीबात वाटले नव्हते, म्हणूनच अर्थात ह्या प्रकारावर विश्वास बसला नव्हता, पण नंतर गणपाच्याच वॉलवर प्रत्यक्ष त्याच बुवाच्या प्रवचनाची वीडीओ लिंक पाहिली.. http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be आता ह्या सगळ्या प्रकारावर हसावं की रडावं हे मला खरोखरीच कळत नाहिये. वास्तवीक हा सगळा प्रकार मी केवळ हास्यास्पद म्हणून सोडून दिलाही असता पण मला जास्ती त्रासदायक वाटला त्या बापूच्या प्रत्येक वाक्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट. प्राथमीक उद्वेग ओसरल्यावर काही प्रश्न मनात आले त्यावर इथल्या सदस्यांनी काही विचारप्रदर्शन केल्यास चर्चा पुढे नेता येइल. १. माझे नाव घ्या म्हणजे अमूकमूक होइल असे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस ह्या लोकांमधे कुठून येत असावे. २. ते जे सांगतात त्यामागची प्रेरणा काय असेल, म्हणजे त्यावर खरोखरीच त्यांचा स्वतःचा विश्वास असेल की समोर बसलेल्या माणासांना केवळ फसवण्याचा उद्देश असेल. ३.असल्या कल्टमधे ओढले गेलेले लोक नक्की कशामुळे असल्या मूर्खपणाच्या कथांवर विश्वास ठेवत असतील. ४. कल्ट्मधे ओढल्या जाणार्‍या लोकांची विचारशक्ती इतकी मृतवत कशामुळे होत असेल.

वाचने 31423
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

दुनिया झुकती है | झुकाने वाला चाहिये| अंधश्रद्धेने मती कुंठीत होते. गांभीर्याचा भाग असा कि अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे खरे वाहक असतात. बापूंवरच्या श्रद्धा हा त्या भक्तांचा व्यक्तिगत मामला आहे असे म्हटले की झाले. त्याची चिकित्सा करायला कोणी जात नाही.

हे खरे गुरू नव्हेत रे! खरा गुरू म्हणजे काही तरी ज्ञान देणारा. हे फक्त लोकांच्या भाबडेपणाचा लाभ उठवणारा बिनभांडवली धंदा करत आहेत. समाजाला उपयोगी असलेली डॉक्टरकी सोडून हा धंदा करण्यामागे किती प्रचंड फायदा मिळत असेल याचा विचार करून बघ. असल्या कल्टमधे ओढले जाणारे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात. डोके खांद्यावर असणारा कोणीही माणूस असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवणार नाही. प्रभावी व्यक्तिमत्व आणि मुलायम वाणी यांच्या जोरावर अश्राप लोकांना कल्टमधे ओढणे सोपे जात असावे.

In reply to by पैसा

डोके खांद्यावर असणारा कोणीही माणूस असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवणार नाही. इथेच तर खरी गोम आहे ना! डोके कुणाच्या खांद्यावर हे स्पष्ट झाले पाहिजे. स्वतःच्या की दुसर्‍याच्या?

सहमत, पण असल्या मानसिकदृष्ट्या कमकुवत लोकांची प्रचण्ड संख्या पाहूनच डोळ्याला अंधारी येते..

माझे बापु एकदम जालिम माणुस आहे. एकदा त्यांना भारताच्या बॉर्डरवर न्या आणि बघा. पाकिस्तान व चायनिझ वंश त्यांच्या प्रखर तेजा मुळे जगातुन कायमचे नाहिसे होतील.पण त्यामुळे भारतातील लोंकावर खुप ताण पडेल म्हणुन बापु जात नाहीत.

कशाचा तरी सश्रद्ध जप केल्याने स्वतामध्ये ज्यामुळे आत्मविश्वास, त्वेष, धाडस जागॄत होतो ते म्हणा... मग ते 'हर हर महादेव' असेल वा 'अनिरुद्ध' ... आपण कसे काय ठरवणार?? -सूर्यपुत्र.

In reply to by सूर्यपुत्र

अहो चित्रफीत पहा. श्रद्धेमुळे मानसिक बळ मिळते या मुद्द्यावर ते मर्यादित नाहिये. एखाद्याला ओम अनिरुद्धाय नमः असे म्हटल्याने बरे वाटते. आनंद होतो. समाधान मिळते असा तो विषय नाही. एखाद्याने असे जर म्हटले कि असे केल्याने माझ्यात त्वेष निर्माण होतो व मी प्रतिकारास सिद्ध होतो तर मी एकवेळ समजू शकतो.

अनिरुद्ध बापू (डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी) वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई(टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२ दुनिया झुकती है | झुकाने वाला चाहिये|

त्यांच्या संदेशात किती अंतर्विरोध आहे:
यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही
...बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल .
म्हणजे नक्की बलात्कार होईल की नाही? आणि बलात्कारी नपुंसक झाला की नाही हे सर्वांना कसं कळेल? त्याला सर्वांसमक्ष बलात्काराचा प्रयत्न करून आपण असमर्थ आहोत हे दाखवावं लागेल काय?
जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही.
पण जबरदस्ती करणारी व्यक्ती देखील तो मंत्र रोज पाच वेळा म्हणत असेल तर काय होईल?
०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल.
पहिल्यांदा म्हटलय : जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. आता पुन्हा ही टेक्निकची काय भानगड आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

पण जबरदस्ती करणारी व्यक्ती देखील तो मंत्र रोज पाच वेळा म्हणत असेल तर काय होईल?
एकाह्द्या जबरदस्ती करनार्या व्यक्तीने जर मन्त्र म्हटला, तर तर बलाक्तार करता करता ती व्यक्ती थाम्बेल. आणि एच्कुअल पापक्रिया घदनार नाहे. किम्वा बलाक्तार करन्यापूर्वी म्हटला. तर त्याची बलाक्तार करयाची इच्झाच नाहेशे होइल. खुप अधीपसुण जर तो मन्त्र महनत असेल, तर तो मणुस सुधारेल आणि पाप करणार नाही.

In reply to by बालगंधर्व

आपण जो मराठीचा केला आहे त्यालाच का बलाक्तार महनतात? बाकी काही नाही तर नाही, पण नावाची तर राखायची ना राव...

दाभोळकरांचे एक पुस्तक आहे - ना मी आता विसरले - पण त्या पुस्तकात ह्या बापूंचा पूर्वेतिहास दिला आहे. लोणावळ्यामध्ये गायनॉकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टीस करत असताना ह्या माणसाविरुद्ध स्त्रियांशी गैरवर्तन केल्यावरुन तक्रार नोंदवण्यात आली होती. शेवटी ग्रामस्थांकडून मार खाऊन हे गृहस्थ तेथून अंतर्धान पावले ते सर्व देवांचा अवतार म्हणून मुंबैला प्रगट झालेत आणि आजतागायत आपल्या लीला दाखवत आहेत! पुस्तक मिळाले की नाव व पान क्रमांक देईन.

In reply to by यशोधरा

हे खरे असेलही ...पण दाभोळकर ही विश्वासार्ह व्यक्ती नाही... त्यांचा रेफरन्स तुमच्या मुद्द्याला डायलुट करत आहे

एक फार पूर्वीची चर्चा आठवली. आत्तापर्यंत हा मूर्खपणा बंद झाला असेल असं वाटलं होतं, पण अजूनही तेच चालू आहे हे वाचून अत्यंत वाईट वाटलं. :(

तुम्हाला अजुनही अशा गोष्टींचे आश्चर्य वाटते? लोक पैसे दुप्पट करतो असे सांगणार्‍यांवरही विश्वास ठेवतात आणि दु:खापासुन मुक्ति देतो असे सांगणार्‍यांवरही विश्वास ठेवतात. अनेकदा कळते पण वळत नाही, परिस्थितीने गांजलेला माणुस अशांच्या नादी लागतो. या सत्पुरुषाविषयी असे ऐकले आहे की ते 'बापु'ज बँक ऑफ रामनाम' असे मुखपृष्ठ असलेल्या वह्या भक्तांना वाटतात आणि भक्त त्या वह्या यांच्या/ रामाच्या नावाने भरतात आणि त्यांच्या पायी सादर करतात. अशा एका भक्ताला मी हरप्रकारे सांगुन पाहिले की वह्या अशा वाया घालविण्यापेक्षा नाव तोंडी घे आणि कोर्‍या वह्या एखाद्या गरजु विद्यार्थ्याला दे. त्याला पटले नाही वर तो माझावर रागावला. चालायचेच. उद्या अशा बलात्कार निवारण मंत्रजपाची शिबिरे सुरु झाल्याचे ऐकु आल्यास आश्चर्य वाटणार नाही. सहभागी होणार्‍यांपैकी कुणीही त्या सत्पुरुषाला असा प्रश्न विचारणार नाही, की सर्व स्त्रियांच्या वतीने हे महाराज असा मंत्र स्वतःच का जपत नाहीत की ज्यायोगे बलात्कार्‍याला तसे कृत्य करण्यापूर्वीच केवळ नपुंसकत्वच नव्हे तर अर्धांगवायुचा झटकाही येईल.

In reply to by सर्वसाक्षी

अनेकदा कळते पण वळत नाही, परिस्थितीने गांजलेला माणुस अशांच्या नादी लागतो.
अगदी खर आहे. बाकी बिनतोड विश्लेषण

In reply to by सर्वसाक्षी

मी पूर्वी ज्या वाड्यात रहायचो तिथल्या एक आज्जी हा "रामनाम वह्यांचा" उद्योग करायच्या. सर्वात गंमत म्हणजे त्या हे वाड्यातल्या पोरासोरांना आउट्सोर्स करायच्या आणि त्याचे हिशोब वह्यांच्या मागे लिहून ठेवायच्या!

ह्या. ह्या. ह्या.. बुवांबरोबर(अत्रुप्त आत्मा) ठाण्यातल्या तलावपाळीवर फिरत होतो तेव्हा तिथे जे दृश्य पाहीलं त्याची आठवण आली. ;) मी नाही सांगत, बुवा जेव्हा हि प्रतिक्रिया पाहतील तेव्हा तेच ह्याच्यावर लिहतील. ;)

शुद्ध मुर्ख पणा आहे हा सगळा. अनिरुद्ध माझ खरं नाव आहे, ह्या माणसानी नाव चारचौघात सानगायची सोय ठेवली नाही आज. :(

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही निदान आयडी तरी वेगळा घेतलाय हो!

In reply to by खबो जाप

आपल्याला जसे वाटते की पाश्चात्य देशात "व्यभिचार (अनाचार)" बोकाळला आहे पण तसे नाही. तद्वत या पाश्चात्यांना वाटते की अजूनही भारतात "साप, हत्ती" रस्त्यावर फिरतात (शब्दशः नसेल पण तितकेच मागास)

In reply to by खबो जाप

कै च्या कै !!! हे असले प्रकार तथाकथित प्रगत देशात पण जोरात चालतात. युट्यूब वर बघा जरा शोधून. बाकी एखाद्याची विशिष्ट प्रतिमा का बनते आणि तशीच का टिकून राहते हा संपूर्ण वेगळा विषय आहे. अवांतर :- जगात म्हणजे अमेरिकेत का हो ?

निव्वळ भोंदुगिरी... अवांतर - डॉक्टर असून त्यांनी निवडलेल्या "या" व्यवसायामध्ये पडण्यासाठी काय करावे? कोणी मार्गदर्शक धागा टाकेल का मिपावर? :p

In reply to by सुहास झेले

सोपे आहे रे सुहास... १) काही दुर्मिळ गुणांची गरज असते, उदा. कोडगेपणा, स्वार्थीपणा आणि अप्पलपोटेपणा. हे गुण दुर्मिळ यांसाठी की आपल्यासारखे पापभिरू लोक भुताला भीत नाहीत इतके समाजाला भितात, या भोंदू लोकांचे बरे असते, एका गावात पब्लीकने चपलाने मारले तरी दुसर्‍या गावात हसतमुख आणि निलाजरेपणे वावरायचे. हा झाला कोडगेपणा. आपल्याकडे येणारा माणूस परिस्थितीने गांजलेला आहे माहिती असताना त्याला आणखी नागवायचे कशासाठी तर स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी. (अगदी या म्हाराजांनी / मातांनी आणि तत्सम मनुष्यविशेषाने धर्मदाय आश्रम उघडून पैसे वाटावेत अशी अपेक्षा नाही.. पण कित्येक कुटूंबे देशोधडीला लावली आहेत त्यांचे काय?) बाकी असल्या म्हाराजांकडून होणारे स्त्रीशोषण हा मुद्दा वेगळाच. २) एखादे अर्थहीन पण अर्थाने खचाखच भरलेले वाक्य असावे असा गुरूमंत्र तयार करावा. (याचे उपयोग आपण पुढे बघू) ३) आपल्याभोवती चार खुषमस्कर्‍यांचे टोळके जमवायचे आणि फुल्ल मार्केटींग सुरू करायचे. मग हळूहळू लाईन लागायला सुरू होईल. (इथे जितके जास्त वेटींग.. तितकी म्हाराजाच्या पावरबाजपणाबद्दल पब्लीकला खात्री पटते.) लाईनमध्ये आपलेच पित्तू पेरून सुरूवातीला हजार पाचशेच्या नोटांची पुडकी सर्वांसमक्ष आपल्यालाच अर्पण(?) करून घ्यावीत. लाजेकाजेस्तव त्याच्या मागे उभा असलेला हजाराच्या पटीत जमणार नसेल तर शेकड्याच्या पटीत तर दान देतोच देतो. बरं हा शेकड्याने दान देणारा स्वतःची कॉलर टाईट होण्यासाठी "मी त्यांच्या पायावर इतके पैसे दान दिले!" हे (बर्‍याचदा मोठ्या आकड्यामुळे) गावभर बोंबलत जातो. दान दिल्यामुळे "गुण आला / समस्या सुटली / प्रश्न सुटला / परिस्थिती निवारण झाली" हेच उत्तर कंपल्सरी सगळीकडे द्यावे लागते कारण आता मारूतीच्या बेंबीत बोट घातले आहे.. गार लागते आहे असेच म्हणावे लागणार आहे.. नाहीतर पब्लीक "तुमची साधना कमी पडली" वगैरे बोलेल अशी भिती (?) असते. ४) जमलेल्या मायेच्या आधारे आणि या दरम्यान मिळालेल्या प्रसिध्दीच्या लाटेमध्ये एखाद्या भक्ताकडून दान मिळालेल्या जमिनीच्या आजूबाजूची जमीन साम दाम दंद भेद या मार्गाने मिळवावी आणि भरभक्कम इष्टेट करावी.. ५) मग मार्केटींग पुढच्या स्टेजला न्यावे. खुर्चीची काळजी असणारा एखादा आमदार, खासदार, मंत्री वगैरे पकडून त्याला मिळणार्‍या न मिळणार्‍या खुर्चीचा आपण फायदा करून घ्यावा.. इष्टेटीबरोबर झैरातीत सहजरीत्या वाढ होते. इथे होणारे बेरजेचे राजकारण कुणालाही तोंडात बोटे घालायला लावेल असेच असते. एक नेता + त्याचे अनुयायी + त्याचे विरोधक (या बाबामुळे एकाच पार्टीचे चांगले होणार आहे असे थोडेच आहे?) विरोधकाचे अनुयायी + अपक्ष (मी तर मागे का राहू! या भावनेने कदाचित असेल) + अपक्षाचे (असलेले / नसलेले) अनुयायी + राजकीय क्षितिजावर उगवणारे तरूण नेते + त्यांचे अनुयायी.... असे घाऊक प्रमाणात भक्त मिळतील. या गोतावळ्यात एकादा साखर कारखाना, सूतगिरणी असले आजारी उद्योग असले की मग चांदीच चांदी. ६) आता बेस पक्का झाला की नवीन नवीन मार्केटींग टेक्नीक वापरायच्या.. वह्या, पेन, कीचेन, टोप्या, पुस्तके, रूमालापासून ते .. मिळेल त्या वस्तूवर आपले चित्र, आशीर्वाद देणारी पोझ किंवा गुरूमंत्र चिकटवून द्यायचा. "मी सतत तुमच्या सोबत आहे" असले काहीतरी जाणवून दिले की सो कॉल्ड भक्तीमध्ये आंधळा झालेला भक्त असल्या वस्तू विकत घेतोच घेतो.. म्हणजे पुन्हा फायदा. ७) एखादा सुशिक्षीत बेकार पण हुशार लेखक हाताशी पकडून स्वत:वर कवने, सुविचार, स्तुतीपर वाक्ये, आरत्या, ओव्या "पाडून" घ्याव्यात. संस्कृत भाषेला लोक अज्ञानामुळे घाबरतात त्यामुळे त्या भाषेमध्येही असले साहित्य तयार "करवून" घ्यावे. ८) यादरम्यान एखादा विरोधक उभा राहिलाच किंवा पूर्वीच्या खुषमस्कर्‍याच्या टोळक्यामधला कुणी डोईजड होवू लागला की त्याला नाहीशी करण्याची पावर अंगी येतेच, शेकडो एकर जमिनीत ५ फुटाचा हाडाचा सांगाडा कुणाला सापडणार आहे? तस्मात् विरोध मोडून काढताना पुढे मागे आजीबात बघत बसू नये. ९) दीक्षा दिलेल्या तमाम पब्लीकमध्ये ३० ते ४० % लोक दीक्षेचा प्रभाव असो वा नसो, यशस्वी होतातच होतात त्यांच्या तोंडून आपली स्तुती वदवून घ्यावी. थोडक्यात "माझीच कशी लाल" हे अप्रत्यक्षरीत्या वदवून घ्यावे... झालास की रे तू सुहासबापू.. किंवा झेले महाराज.. किंवा सत्यसुहासबाबा... आणि हो... वर्तमानपत्रात, गावकीत, चावडीवर, अंतर्जालावर बदनामी झालीच तर भक्तगणांना आदेश द्यावा की.. "मीच तुमची परिक्षा बघतो आहे, बघु कोण माझे खरे भक्त आहेत" असे बोललास की झाला बल्ल्या.. भक्तगण परिक्षेत पास होण्यासाठी धडपडणार.. खरेपणा सिध्द करण्यासाठी वह्यांच्या वह्या नावे खरडण्यापासून "विशेष सेवे" पर्यंत सर्वकाही पेश करणार म्हणजे इथेपण प्लसमध्ये. आणि विरोधात लिहिणार्‍यांना "मीच बुद्धी देतो आहे!" असा आव म्हणजे भक्ताच्या नजरेत तुमचे स्थान अढळच.. आणखी बरेच मुद्दे आहेत.. पण हे बाबा लोक आणखी वेळ देण्याइतके महत्त्वाचे नाहीत. (मुद्दे हवेच असतील तर अवचटांचे "धार्मिक" नावाचे पुस्तक आहे.. सुप्परलाईक्क!) बोला सुहासबाबा झेलेमहाराज की.....

In reply to by मोदक

मस्तच.
एखादा सुशिक्षीत बेकार पण हुशार लेखक हाताशी पकडून स्वत:वर कवने, सुविचार, स्तुतीपर वाक्ये, आरत्या, ओव्या "पाडून" घ्याव्यात.
काही वर्षापुर्वी स्वाध्याय नावाचा प्रकार अगदी जवळून बघितलाय (घरातले त्याच्या आहारी गेले होते). माझं वय लहान होतं पण त्याही वेळेला प्रश्न पडायचे की त्यांना पूज्य असणारा योगेश्वर भगवान सोडून सगळी गाणी पांडूरंगावर का आहेत? :). मग कळलं की हा विठोबा वेगळाय. तो पंढरीचा विटेवर उभा आहे आणि तीच वीट डोक्यात हाणाविशी वाटणार हा पांडूरंग वेगळाय. ;)

In reply to by प्रकाश घाटपांडे

दुवे वाचतो. त्यानंतर त्यातला फोलपणा घरातल्यांच्या लक्षात आला. आणि नंतर मग अग्निहोत्र प्रकरन चालू झालं. :)

In reply to by ५० फक्त

आमच्या सारखंच.
चला कुणीतरी समदु:खी सापडलं. अग्निहोत्राचं प्रकरण मात्र तीन चार वर्षे चालू होतं. नंतर-नंतर संपुर्ण घरात आंबट वास येउ लागला, भिंतीना पिवळी पुटं चढली आणि धुराने डोळे खराब व्हायलागल्यावर ते उघडले आणि घरातले सगळे 'ममी' होण्याआगोदर ते अग्निहोत्राचं पिरॅमिड माळ्यावर टाकून दिलं. :)

In reply to by दादा कोंडके

धन्यवाद दादा. निवांतपणे बघतो. या धाग्यामुळे सध्या दाभोलकरांचे "ऐसे कैसे झाले भोंदू" वाचतोय.. लै खतरा किस्से आहेत एक एक...

In reply to by मोदक

@ मोदक, वर दिलेले दुवे अगदी योग्य आहेत अग्निहोत्राबद्दल, आणि प्रकरण म्हणाल तर अग्निहोत्री होती एक आमच्या वर्गात.. पण असो. हल्ली बरीच ओळखीची लोकं आहेत इथं. त्याबद्दल नंतर कधीतरी.

मृगनयनीबाईंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे ....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्यांनी तो गुप्त मंत्र फेकला तर अनावस्था प्रसंग ओढवेल!

In reply to by अर्धवट

आमची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!!! :) बाकी धाग्याची शम्भरी पार केल्याबद्दल अभिनन्दन!!! :) ___________________________________________ श्रद्धेने गुरुमन्त्रा'चा जप करणार्‍या व्यक्तीला गुरुमन्त्र नेहमीच तारक ठरलेला आहे.प्रत्येक संकटातून "गुरुमन्त्र" नेह्मीच्च वाचवतो... ज्यांना कुणी गुरु नसेल.. किन्वा कुणाला "गुरु" मानायची इच्छा नसेल त्यांनी-विशेषतः स्त्रियांनी- श्रद्धेने "दुर्गा कवच" किन्वा "महिषासुरमर्दिनी-स्तोत्र" (अयि गिरिनन्दिनी.. नन्दितमेदिनी.. ) मोठ्याने नियमित वाचावे. निश्चित या मन्त्राचे, स्तोत्राचे सुरक्षा कवच आपल्याभोवती निर्माण होते. कदाचित या मन्त्रसामर्थ्याची किन्वा प्रतिक्रियेची इथे थट्टाही होईल.. किन्वा खिल्ली उडवली जाईल.. परन्तु जेव्हा खरोखर दुर्दैवाने एखाद्या स्त्री'वर बलात्कारसदृश आपत्कालीन स्थिती येइल..तेव्हा हे मन्त्रसामर्थ्यच्च्च उपयोगाला येणार आहे.. त्यामुळे आपल्या इज्जतीची कायमची खिल्ली उडू नये म्हणून.. "कोण काय म्हणेल..." याचा विचार न करता स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करावा. तसेच स्वतःजवळ छोटेसे धारदार कटर नेहमी (विशेषतः प्रवास करताना) बाळगावे. कारण मन्त्रसामर्थ्याने कदाचित काही स्त्रिया स्वतःभोवती सुरक्षाकवच नक्कीच निर्माण करतील.. पण ज्या स्त्रियांकडे हे "कवच" नाही..किन्वा स्वतःच्या अतिशहाणपणामुळे किन्वा मूर्खपणामुळे ज्या स्त्रिया स्वतःवर आपत्कालीन परिस्थिती ओढवून घेतात.. त्यांचे ऑन दी स्पॉट रक्षण करण्यासाठी हे कटर उपयोगी पडते.... तसेच (किमान) रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी जाताना स्त्रियांनीदेखील आपल्या कपड्यांचे भान ठेवावे. स्त्रियांबरोबर पुरुषांनी देखील "उचित" आणि "पवित्र" गुरुमन्त्रा'चे नेहमी स्मरण ठेवावे. "महिषासुरमर्दिनी स्त्रोत्र"देखील वाचू शकता.. म्हणजे समाजातील नराधमांचे निर्दालन करण्यासाठी त्यांचा पुरुषार्थ उपयोगी पडेल..... किमान परस्त्री'बद्दल त्यांच्या मनात ""नेहमीच"" आदराची भावना राहील. . . . . अभिलाषेची नाही.... _______________________________________________ "त्या" पीडीत ज्योती'ला / "दामिनी"ला भावपूर्ण श्रद्धांजली..*~*~*~*~*~* "ती" मित्राबरोबर, रात्री साडेअकरा वाजता सम्पणार्‍या पिक्चरला गेली नसती...किन्वा "ती"च्या मित्राने चुकुन 'पब्लिक बस' समजून 'प्रायव्हेट बस' प्रेफर केली नसती.. तर कदाचित हा दुर्दैवी प्रकारच झाला नसता.. असो.... त्या नराधमांना कोणती शिक्षा द्यावी.. यावर अजून उहापोह करण्यापेक्षा प्रसन्गी 'इस्लाम धर्मा'तील शिक्षांची मदत घेण्यास काहीच हरकत नाही.. असे मला वाटते.... || कालाय तस्मै नमः ||

In reply to by मृगनयनी

देअर यू गो.. अपेक्षीत प्रतीसाद, पण तरीही आम्हाला प्रतिक्षा आहे ती वर दिलेली पाच कलमे व त्यांचा कर्ता 'अनिरुद्ध धैर्यधर जोशी' कसा बरोबरच आहे याचे विश्लेषण वाचण्याची

In reply to by मृगनयनी

प्रत्येक संकटातून "गुरुमन्त्र" नेह्मीच्च वाचवतो... तुमची नक्क्क्क्क्क्क्क्की अशी खात्री आहे..? बघा हं परत लाईफ इन्शूरन्सवाल्यांसारखे हे डिसीज कव्हर करत नाही ते डिसीज कव्हर करत नाही त्या लायनीवर संकटांची विभागणी करू नका म्हणजे मिळवले. एक काम करा.. एखाद्या गडावर चला. तुम्हाला उंच कडे दाखवतो, तिथून तुमच्या गुरूमंत्राचा जप करत उडी मारा. "सुरक्षा कवच" असल्याने तुम्हाला शष्प काही होणार नाही. काहीही न खरचटता वर येवून मला भेटा, पेप्रात झैरात देतो की तुमचा गुरू ग्रेट आहे. तुमची भक्ती ही तुमची वैयक्तीक गोष्ट असल्याने त्या भक्तीबद्दल काही बोलायचे नाही पण घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे तापलेल्या तव्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेताना बोलल्या गेलेल्या सर्वच गोष्टी तुम्हाला पटल्या आहेत का याचे खरेखुरे उत्तर द्या. उदा - कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल. किमान परस्त्री'बद्दल त्यांच्या मनात ""नेहमीच"" आदराची भावना राहील. . . . . अभिलाषेची नाही.... तुम्हाला नक्की हेच म्हणायचे आहे..? पुरूषांबद्दल सरसकटीकरण करताना आपले गुरू, वडील, भाऊ वगैरे पुरूषच्च आहेत याचे ""नेहमीच"" भान ठेवावे अशी नम्र सुचवणूक...

In reply to by मृगनयनी

तुमचा असल्या मंत्रा-तंत्रावर खरेच विश्वास आहे की काय? श्रद्धा ठेवणे/ असणे काहीच गैर नाही.. पण कुणाला आपल्या श्रद्धेचा अथवा भक्तीभावाचा गैरफायदा घेऊ न देण्याची देखील प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी.
"ती" मित्राबरोबर, रात्री साडेअकरा वाजता सम्पणार्‍या पिक्चरला गेली नसती...किन्वा "ती"च्या मित्राने चुकुन 'पब्लिक बस' समजून 'प्रायव्हेट बस' प्रेफर केली नसती.. तर कदाचित हा दुर्दैवी प्रकारच झाला नसता..
या जर-तर च्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण विधिलिखित कोणालाच टाळता येत नाही. अवांतर : शिवसेना स्त्रीयांना चाकू देणार आहे म्हणे. म्हणजे या मंत्रावर शिवसेनेचा फारसा विश्वास नसावा असे वाटते. नाहीतर त्यांनी या मंत्राच्या प्रति वाटल्या असत्या.

शांत शांत. ह्या ११ उपायानंतर ह्या उपायांना हसणार्‍या लोकांना नपुंसक बनविण्याचा मंत्र त्यांनी गुप्त ठेवला आहे. तेव्हा बरीक सांभाळुन बरं !

In reply to by इरसाल

मोठ्यानं म्हटला तर त्यांचावरच परिणाम व्हायचा! आणि नाही झाला तर मंत्रात दम नाही !! अशी दुहेरी पंचाईत झालीये बापूंची.

In reply to by संजय क्षीरसागर

@मोठ्यानं म्हटला तर त्यांचावरच परिणाम व्हायचा! आणि नाही झाला तर मंत्रात दम नाही !! अशी दुहेरी पंचाईत झालीये बापूंची.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

पब्लिक येडं हाय म्हनल्यावर आसलं बुवा-बापू फायदा घेनारच की. गर्दी जमतीय आसं दिसलं की माकडवाल्याच्या आन् डोंबार्‍याच्या खेळाला जोर येतुया. तसं या म्हाराज, बुवा आन् फुडार्‍यांच आसतं. बरं या बाप्पूला काय प्वार-बाळ हाय का? कुनाला काय म्हाईती?

अनिरुद्ध बापू या शब्दाने एक मोठा काळच जागा झाला. त्यांचा दरबार अटेंड कधीच केला नाही त्यामुळे त्यांच्या विचारांविषयी मत देत नाही पण एकेकाळी त्यांचं प्रस्थ खूप होतं आणि नेहमीच्या लाईफमधे अनिरुद्धांचा विषय दिवसात एकदा तरी ऐकण्या पाहण्यात यायचाच. गुरुवारी मात्र प्रत्यक्ष प्रभाव पहायला मिळायचा.. दादर प. येथे डिसिल्वा स्कूलसमोरच नोकरी असण्याच्या काळात दर गुरुवारी तिथे त्यांचा दरबार भरायचा. त्या वेळी ते "ऑन द पीक ऑफ फेम" होते. गुरुवारी संध्याकाळी लोकलने परतीचा प्रवास फार कठीण होऊन जायचा. अक्षरश: लाखांत लोक त्या जागी हजर असायचे. बर्‍याच तासांची रांग वगैरे हे नेहमीचं असतंच. पण खास एक "कल्ट" कसा बनतो हे त्यावेळी दिसायचं. चहाच्या/सरबताच्या/मिसळीच्या टपरीवर सर्वत्र अनिरुद्धभक्त दाटीवाटीने उभे. सर्वांच्या तोंडी साक्षात्कार, दर्शन, अनुभव, अनुभूती अशा आणि अशाच प्रकारची बोलणी असत. चहा पितापिता जोक्सही अध्यात्मिक. बापूंप्रमाणे खास लांब आणि भरघोस मिशा ठेवण्याची फॅशन भक्त पुरुषांत होती. मिसळ किंवा कोल्ड्रिंक पीत तश्या मिशीदार लोकांचे ग्रुप उभे असायचे, गणवेष असावा तशी मिशी. बापू पेप्सीत मीठ टाकून सर्वांसमोर पितात म्हणून त्या एरियात आणि एरवीच्या आयुष्यातही पेप्सी हा ब्रँड मीठ टाकून घ्यायला असंख्य लोकांनी सुरुवात केली होती. नंदामातांची परफ्युम्स / पावडर / क्रीम अशी काही प्रकारची कॉस्मेटिक्स असायची, त्यांचा खप प्रचंड होता आणि त्यांना अध्यात्मिक वेष्टन होतं. सुचितदादा हे बंधू. त्यांना शेषनागाचे अवतार समजत. लोकलने परत येताना सर्व डबे भक्तांनी भरलेले असल्याने लोकलच भक्तिमय होऊन जायची. एरवी गंभीर किंवा स्थूल असणारे लोकही ठसाठस गर्दीतही मोकळेपणाने उच्चारवात गात आणि नाचत असायचे. लेके चलो लेके चलो.. लेके चलो पालकी, दादर के लाल की, खांदा लगा के बोलो जय अनिरुद्ध बापू की.. मग लेके चलो पालखी शेरावाली की, खांदा लगा के बोलो जय नंदामाता की.. अशीच शेषनाग किंवा कोणाची पालखी, आणि खांदा लगा के जय सुचितदादा की. अशा अनेक आरत्या / गाणी लोकलच्या भिंती / छत बडवून सतत चालू असायच्या. मी जिथे राहात होतो त्यांच्या घरचे हा दरबार नियमित अटेंड करत. घरात बापू हे एक सदस्यच होते. भिंतीवर मोठा फोटो. त्याची पूजा. घरात एकमेकांशी बोलतात तसे त्यांच्याशी बोलत. वादावादी झाली की, "बापू बघताय ना?" वगैरे असं. सतत बोलणं चालायचं. त्यांची काही नियतकालिकं यायची. बरीच जाड असायची. त्यात भक्तांच्या अनुभवांचं कथन असायचं. पेट्रोल नसतानाही बापूनामस्मरणाने कार चालत राहिली इथपासून रस्त्यात रुमाल पडला आणि एका व्यक्तीने मागून मला तो आणून दिला.. ती व्यक्ती अचानक निघून गेली आणि मग मला समजलं की ते बापूच होते, मी पाहातच राहिलो. किंवा मला एकशेदोन ताप चढला. मनापासून फक्त बापूंना हाक दिली. तीन तासांत ताप उतरला.. वगैरे असे अनुभव अत्यंत भक्तीभावाने लिहीलेले असायचे. ते समाजोपयोगी कामं करायचे असंही ऐकण्या वाचण्यात यायचं. त्यांची साईसदृश काहीतरी नावाची सेवाभावी संस्थाही आहे मला वाटतं. सध्या बांद्रा की अन्य कुठे असतो दरबार बहुधा. पण तो दहा वर्षांपूर्वीचा "ऑरा" दिसत नाही.. किंवा सेंट्रल लाईनच्या कॉमन पब्लिकऐवजी आता वेस्टर्न्स लाईनचे एच एन आय भक्त आले असतील.

In reply to by गवि

त्यात भक्तांच्या अनुभवांचं कथन असायचं. पेट्रोल नसतानाही बापूनामस्मरणाने कार चालत राहिली इथपासून रस्त्यात रुमाल पडला आणि एका व्यक्तीने मागून मला तो आणून दिला.. ती व्यक्ती अचानक निघून गेली आणि मग मला समजलं की ते बापूच होते, मी पाहातच राहिलो.
=)) =))

In reply to by पैसा

छ्या, स्पावड्याची सगळ्या हडळ पिशाच लोकांची डायरेक वळख आहे, ह्या असल्या मंत्रा बिंत्रानी फरक नाय पडत त्याला. आणि असंही जनभावनांचा रेटा आला की स्पावड्या मागं सरकतो.

In reply to by स्पा

एका भक्ताने सांगितलेला अनुभव कुठेतरी वाचला होता.. तो म्हणे प्रातर्विधीला गेला. कार्यक्रम उरकल्यावर पाहतो तो नळाचे पाणी गायब..आता काय बरं करणार? मग त्याने मनापासून बापूंचा धावा केला आणि अहो आश्चर्यम, नळ धो धो वाहू लागला की हो.. :D

In reply to by चिर्कुट

मला वाटले नाम स्मरण केले आणि सर्व काही आपसूकच धुतल्या गेले , पाण्याची गरजच लागली नाही,