एक रानगोष्ट
एक रान ल्याले होते पानांपानांतून मोती
गलबला पक्षी तेथे न जाणे कशास करीती
एक रान ओले होता चिमण्यांची शाळा भरली
पर्णांच्या छत्र्यांमध्ये चिवचीव उजळणी केली
एक रान चिंब भीजता धारांच्या बघ पागोळ्या
थेंबांनी रांग करूनी रेखिल्या शुभ्र रांगोळ्या
एक रान हसते जेव्हा किरणांच्या स्पुल्लिंगांनी
सुर्याची पिल्ले पिवळी बुंध्याशी जमती ढिगांनी
एक रान रात्री लाजले वारा गात्रांशी दंगा
चंद्राची मादक किरणे तशांत लगटली अंगा
एक रान करी आक्रोश लपटूनी केशरी ज्वाळा
सोडूनी सोयरे गेले पसरला गालिचा काळा
एक रान देई आहूती पुरविण्या मानवी लोभा
प्रेतासव हिरवे आसू चघळती यंत्रमय दाढा
एक सुंदर रानगोष्ट
कल्पना आवडली
छान आहे
छानच आहे.