Skip to main content

तेजाळलेल्या रात्रीचे क्षण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 02/01/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस तू? त्या तेजाळलेल्या रात्रीचे क्षण अजूनही रेंगाळतायत, तुझी लाल चुटुक टिकली माझ्या दंडावर घट्ट आहे, निसटलेला एक चुकार केस चिकटलाय त्या उशीवर, लांबसडक... कपाळावर तुझ्या ओठांची महिरपी मोहर, घरभर तुझ्या गजऱ्याचा मोगराच दाटलाय, अन् हातांच्या तळव्यावर तुझ्या गालांचा सायस्पर्श घुटमळतोय, ----- पण तू कुठे आहेस? ----- तू इतकी जवळ आहेस, कि तुला पाहू तरी कसे? जरा दूर जाशील तर पाहता येईल ना.. जराशी दूर हो... पाहू तरी तेजाळलेल्या रात्री मोगरा माळलेला गुलाब कसा दिसतो.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०१/०१/२०१३)
काव्यरस

वाचने 3150
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

जबर्या शृंगारिक का काय ते... ;)
तू इतकी जवळ आहेस, कि तुला पाहू तरी कसे? जरा दूर जाशील तर पाहता येईल ना.. जराशी दूर हो... पाहू तरी तेजाळलेल्या रात्री मोगरा माळलेला गुलाब कसा दिसतो....
कसं काय सुचतं नै ;)

In reply to by स्पा

@जबर्या शृंगारिक का काय ते...>>> 11111111 @कसं काय सुचतं नै>>> =)) बघ,बघ खोकलीच्या ! :-D नाय तर तू ********** :-b

In reply to by अत्रुप्त आत्मा

मिक्या कडे कल्लास लावायला हवा आता ;) पण हल्ली तो कुठे तोंड घेऊन गेलाय देव जाणे