तुझा कुणी केला घात…
नियतीची पालखी असुरी हातात
अंधाराचे सावट, दिन असो रात
प्रतिकुलतेचा येथे नाते झंझावात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात
प्रयत्नांची शर्थ जेव्हा व्यर्थ क्षणात
विषण्ण विचारांचे तांडव मनात
व्यर्थ तुझ्या कार्माविना तुझा अश्रुपात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात
काळोखाच्या काजळीच्या मन विळख्यात
छोटासा ही धक्का येथे भासतो आघात
दैवाची नाराजी ही की फळे कर्मजात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात
थैमान अविचारांचे सतत काळजात
आपुलेच ओठ आणि आपुलेच दात
तरी बळ झुंझायाचे तुझ्या मनगटात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात
छान !!!
धन्यवाद धन्या
छान!
छान आहे