फार दिवसांपासुन मनात
एक प्रश्न सलत राहीला
कधी याचे उत्तर मिळेल का?
हेच विचारत राहीला
उत्तर शोधण्यासाठी माझे मन
सदैव झगडत राहीले
अनेक उत्तरे मिळवुन सुद्धा
ते उत्तर शोधतच राहीले
यश आले अखेर 'नेमके' उत्तर मिळवायला
पण् हेच नेमके मान्य नव्हते नियतीला
अनेक समिकरणे जुळवुन कसेबसे उत्तर मिळवले
पण् 'नियती'च ती! तिने सारे प्रश्नच बदलून टाकले.........!!!!!!!!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1075
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे कविता. खरच आवडली.
छान आहे कविता. खरच आवडली. शेवट तर अगदी मस्त!