माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे.
साहित्य :
मस्त लाल गाजरं - ५-६
लसूण पाकळ्या ५-६
मीठ चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
लिंबाचा रस - चवीप्रमाणे
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर
मोहरी
हिंग
कृती:
१. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं.
२. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या.
३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं.
४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं.
एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार
लोणच्यासारखं खाल्लं तर १०-१५ जण खाऊ शकतात ;)
अधिक टिपा:
फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो.
ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट.
आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं.
गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं.
वाचने
8063
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती दिवस टिकतं ?
हे लोणचं फार दिवस टिकत नाही.
In reply to किती दिवस टिकतं ? by सूड
फोटू छान दिसतोय. चवही मस्तच
हा हा...
आजच फ्लोवर्,गाजराच लोणचं
रसरशीत धागा...
अरे वा! सोपं लोणचं आहे. मी हे
उगाचच त्या पोराला
In reply to अरे वा! सोपं लोणचं आहे. मी हे by रेवती
कोण? परा? काय म्हणता?
In reply to उगाचच त्या पोराला by रामदास
हो मग !
In reply to कोण? परा? काय म्हणता? by रेवती
इकडे केप्रचा मसाला, भाजणी
In reply to हो मग ! by परिकथेतील राजकुमार
श्याम कोण ?
In reply to उगाचच त्या पोराला by रामदास
मानव?!
In reply to श्याम कोण ? by ५० फक्त
अंहं, मनोहर.
In reply to मानव?! by कवितानागेश
आई गं...
अरे वा!
काय सुपर्ब फोटो आहे
धन्यवाद लोक्स
फो.............टूऊऊऊऊऊऊऊउ
खल्लास!!
लोणच्याचा रसरशीतपणा बघुनच
लोणचं पाहून कैय्रा आठवल्या,
हे लोणचं तर मातोश्रींनी
(No subject)
:)
चमचमीत दिसतय हो
धन्यवाद
गाजराचं