✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आवडती जाहिरात

स
समयांत यांनी
गुरुवार, 12/20/2012 - 00:17  ·  लेख
लेख
प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो. त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं. पण त्याऐवजी ती त्याच्या कडे बघत पुढे जाऊन त्याने आपला पेन खिश्यात ठेवला आहे कि नाही बघते, मग तोच चुकीचा का आवडता शर्ट पाहून तिचा ताण सौम्य होतो. याहीपुढे नवीन शर्ट असल्याने कॉलरची पुठ्ठ्याची टेप तशीच राहते, असा काहीही करून त्याचा निष्काळजीपणा अखेरी तिच्या नजरेस पडतो. तो मात्र डोळे माफक झुकवून दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी ती मागे वळून पुढे जात असता, तेव्हा तो उभा असतो असा कि हताश त्याच्या प्रेमाशिवाय तो तिथे अपूर्ण आहे...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
27152 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

लेख-विषय असलेली जाहिरात ही असावी

बहुगुणी
गुरुवार, 12/20/2012 - 00:57 नवीन
तपशीलात थोडीशी गल्लत झाली असावी असं वाटलं, लग्नानंतर प्रथमच ती एकटी भारतात चालली आहे, आणि आई-वडिलांसाठी घेतलेल्या कपड्यांत, तिने त्याच्या साठी घेतलेला शर्ट, तो चुकून तिच्या बॅगेत घालतोय असं दिसल्यावर ती तो शर्ट काढून त्याला देते, आणि तो शर्ट परिधान करून तो तिला विमानतळावर सोडायला येतो तेंव्हा तिला त्यातली कॉलरची पुठठ्याची पट्टी दिसते असा काहीसा प्रसंग आहे असं वाटतं. बाकी जाहिरातीत बॅकग्राउंड संगीत सोडलं तर काही विशेष वाटलं नाही, पण अखेर beauty lies in the eyes of the beholder हेच खरं, तेंव्हा तुम्हाला ती जाहिरात भावली यातच निर्मात्यांचं यश म्हणायचं. (तुम्ही बहुतेक प्लॅटिनम बँड घेणार असं वाटतं ;-))
  • Log in or register to post comments

अडाणी असावं नाही का जरा

समयांत
गुरुवार, 12/20/2012 - 13:39 नवीन
धन्यवाद :), तिचं निवेदन आणि मागून येणारं संगीत यांच निटसं कानांनी ग्रहण न केल्याने ती परदेशी चाललीय असं वाटलं. असं अडाणी राहूनही काही गोष्टी आवडून जातात त्यात मजा और असते. तुम्ही सर्व नीट सांगितलंय यामुळे बरं वाटलं, विशेष तुम्हांला जरी नाही वाटलंय पण समोरच्याला ते कित्ती विशेष आहे हे ओळखलंत, यात विशेष सर्व आलं. तुम्ही बहुतेक प्लॅटिनम बँड घेणार असं वाटतं .... नोप्स असं नाही ;) आणखी एक मला आवडणारी जाहिरात म्हणजे, जेम्सची. एक माणूस जेम्स गोळ्यांनी बनवलेलं म्युरल बघत असतो आणि त्याच्या आवडीच्या रंगाची गोळी ऩकळत तो तिथून काढतो मग भराभर सर्व म्युरल कोसळून पडतं. तेव्हा बिचार्‍या माणसाचा चेहरा अगदीच केविलवाणा होतो, इतर म्युझियमचे केअर टेकर्स या मोठ्या पण बिचार्‍या माणसाकडे पाहत राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आमच्या पर्‍याच्या

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 12/21/2012 - 11:21 नवीन
आमच्या पर्‍याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... (परायक पाठलागाचा फॅन )घाश्या कोतवाल
  • Log in or register to post comments

का

समयांत
Fri, 12/21/2012 - 11:35 नवीन
मला इथले प्रोटोकॉल्स अजून माहीत नाही आहेत, असो परा म्हणजे परिकथेतील राजकुमार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

धन्यवाद

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/21/2012 - 11:46 नवीन
रे कोतवाला. इथे आमच्या आवडत्या जाहिरातीं विषयी लिहायला फार आवडले असते. मात्र आम्हाला आवडणार्‍या जाहिराती सरकारला का आवडत नाहीत हेच कळत नाही. लगेच त्यांच्यावरती बॅन येतो. :( बरं हे एका देशाच्या नाही तर अजूनही बर्‍याच देशांच्या सरकारच्या बाबतीत देखील घडते. त्यामुळे सध्या आम्ही ह्या विषयावरती न बोलण्याचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

सरकार..

समयांत
Fri, 12/21/2012 - 15:01 नवीन
इथे आमच्या आवडत्या जाहिरातीं विषयी लिहायला फार आवडले असते, लिहा ना प्लीझ त्यासाठीच मी माझ्या आवडत्या जाहिरातीं त्यासाठी इथे टाकतोय. सरकार म्हणजे कोण पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छे छे !

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/21/2012 - 15:04 नवीन
इकडे असे काही लिहिले तर इथल्या शीशु वर्गातील पोरांना काय वाटेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समयांत

शिशुवर्गातल्या पोरांची भारी

५० फक्त
Fri, 12/21/2012 - 15:15 नवीन
शिशुवर्गातल्या पोरांची भारी काळजी तुम्हाला, पोरींची नाही.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/21/2012 - 15:17 नवीन
आम्ही फक्त १८ ते २५ ह्या वयोगटातील पोरींची काळजी घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पाहिलं

इरसाल
Fri, 12/21/2012 - 15:22 नवीन
दिल्लीत एव्हढ घडुनही लोक असे करतात म्हणुन मिपालही शरम वाटली असेल आज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राजकुमार हो तेच ते

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 12/21/2012 - 11:44 नवीन
परिकथेतील राजकुमार हो तेच ते त्यांना सिनेमा आणि जाहिराती पाहाण्याचा जाम आवड आहे
  • Log in or register to post comments

इतक्यातच पाहिलेल्या दोन

गवि
Fri, 12/21/2012 - 15:23 नवीन
इतक्यातच पाहिलेल्या दोन जाहिराती: जास्त वयाचा एक बिझनेसमन टाईप इसम कँडल लाईट डिनरवर आपल्या अजूनही तुलनेत तरुण दिसणार्‍या पत्नीला एक सॉलिटेर अंगठी देण्यापूर्वी सेल्फ क्रिटिकल मोडमधे बोलतो. मग तिला विचारतो की तू मला सोडून पळून तर जाणार नाहीस ना. तेव्हा ती अंगठी बघून "किमान दहा वर्षं तरी नाही पळून जाणार" असं सांगते. तेव्हा तो "दहा वर्षं.. उफ.." असा संकटात पडल्याचा भाव आणतो. त्यानंतर तिचं "ऑय.." इतकं झकास आहे की यंव रे यंव. याखेरीज दोन वृद्ध छोट्या टॅझो किंवा तत्सम खेळण्यांच्या एक्सचेंजवरुन लहान पोरांप्रमाणे हुज्जत घालत असतात. त्यातला एकजण एका टॉयच्या बदल्यात पाच मागतो. बाकी संवाद अगदी सिरियस बिझनेस निगोसिएशनसारख्या सुरात.. मजेदार वाटतं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद गवि

समयांत
Fri, 12/21/2012 - 16:28 नवीन
धन्यवाद गवि ती दुसरी जाहिरात जेम्स गोळ्यांचीच आहे, मला सुध्दा त्यातली कल्पना आवडते अगदी भारतीय वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

याखेरीज दोन वृद्ध छोट्या टॅझो

किसन शिंदे
Fri, 12/21/2012 - 18:00 नवीन
याखेरीज दोन वृद्ध छोट्या टॅझो किंवा तत्सम खेळण्यांच्या एक्सचेंजवरुन लहान पोरांप्रमाणे हुज्जत घालत असतात. त्यातला एकजण एका टॉयच्या बदल्यात पाच मागतो. बाकी संवाद अगदी सिरियस बिझनेस निगोसिएशनसारख्या सुरात.. मजेदार वाटतं.
माझी आवडती जाहिरात. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यंव रे यंव म्हणजे काय असतं ते

जेनी...
Mon, 12/24/2012 - 00:37 नवीन
यंव रे यंव म्हणजे काय असतं ते ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धारा

वादळ
Fri, 12/21/2012 - 23:22 नवीन
धारा तेलाची ति जुनी जाहिरात जलेबी वाली अनि टाइम्स ओफ इन्डिया ची
  • Log in or register to post comments

वादळ,

समयांत
Sun, 12/23/2012 - 21:03 नवीन
वादळ, धन्यवाद. धारा तेलाची जिलेबीची जाहिरात ही सर्वांसाठी ऑल टाईम फेव्हरिट असावी. त्या जाहिरातीतल्या मुलग्याची चांदी झाली असावी. ;) टाइम्स ची कोणती जाहिरात मला लक्षात नाही आले, जरा सांगाल का पूर्ण? बाकी टाइम्स ऑफ इन्डिया बद्दल माझं मत तसं पूर्वग्रहदूषित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वादळ

टाइम्स ऑफ इन्डिया

वादळ
Sun, 12/23/2012 - 23:13 नवीन
टाइम्स ऑफ इन्डिया बद्दल मला जास्त माहीत नाही पन त्यांची तुम चलो तो हिन्दुस्तान चले हे गाणं असलेलि जाहिरात आहे.लिन्क देता येत नाहिये मला,पण युट्युब वर जाहीरात आहे.
  • Log in or register to post comments

ती नाही का ती.. सर्फ एक्सलची.

आनन्दिता
Mon, 12/24/2012 - 01:46 नवीन
ती नाही का ती.. सर्फ एक्सलची... दोन छोटी बहिण भाऊ असतात... शाळेतुन घरी येत असतात... बहिण चिखलात पड्ते न ललु लागते.. मग भाऊ त्या चिखलाच्या ड्बक्याला " ए क्या रे तुने मारा इसको " असं म्हणुन जे बदड्तो.... अन् शेवटी दाग अच्छे है असं सांगतात ,, ती जहिरात आवड्ते मला..
  • Log in or register to post comments

ही पण खत्रा जाहिरात...

नानबा
Tue, 12/25/2012 - 09:01 नवीन
मला आवडलेली जाहिरात म्हणजे एका प्रसिद्ध अल्कोहोल ब्रॅंडची. सुमित राघवन बायकोसाठी हि-याची अंगठी घ्यायला शोरूममध्ये गेला आहे. काऊंटरवरचा माणूस त्याला १ कॅरेट, ३ कॅरेट अशा हि-याच्या अंगठ्या दाखवतो, आणि सहज विचारतो, "कब है ऍनिव्हर्सरी?" सुमित राघवन सांगतो, "कल थी. " हे ऐकून काऊंटर वरच्या माणसाचे भाव क्षणात बदलतात, आणि तो ५ कॅरेटची अंगठी काढून दाखवतो. शेवटी लाईन येते, "मेन विल बी मेन".. लय भारी जाहिरात. दोघांच्या चेह-यावरचे भाव, ऍनिव्हर्सरी कल थी कळल्यावर दुस-या माणसाच्या भावातला बदल, आणि संपूर्ण जाहिरातीत मागे मंद आवाजात ऐकू येणारी "प्यार की राह मे चलना सिख" ही गझल. एक नंबर. याच ब्रॅंडच्या इतर जाहिराती पण असल्याच जबराट..
  • Log in or register to post comments

अजुन १

कोल्हापुरवाले
Tue, 12/25/2012 - 11:10 नवीन
त्यान्चिच अजुन १ ,ज्या मधे सुमित त्यच्या बायकोचे नाव आठवत आसतो. फुलाचे नाव काय आसत?..... ऱोज .....आणी एन्ड ला तो "रोज डाल्रीन्ग" म्हण्तो... दुसरी जाहीरात !! ज्या मधे तो विचारतो...क्या हुआ?.... त्याचा मित्र म्हण्तो कुछ नही....वाईफ का टुर क्यान्सल हो गया. शेवटी लाईन येते, "मेन विल बी मेन"..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

मालक, लिफ्ट मध्ये २०व्या

वपाडाव
Tue, 12/25/2012 - 13:24 नवीन
मालक, लिफ्ट मध्ये २०व्या माळ्यावर जाउन तळघाराला परत येणार्‍या माणसाची जाहिरात विसरलात का? http://www.youtube.com/watch?v=4XQ7x7c2hkQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोल्हापुरवाले

आणखी एक..

नानबा
Tue, 12/25/2012 - 09:05 नवीन
ही आणखी एक लय विनोदी, बरीच जुनी आणि लोकांच्या विस्मृतीत गेलेली दंगा जाहिरात.. http://www.youtube.com/watch?v=pf1_zf542xI
  • Log in or register to post comments

बघता नाही आली जाहिरात..

समयांत
Tue, 12/25/2012 - 19:40 नवीन
प्रथम प्रथम ती जाहिरात इथे सांगा तरी काय आहे, तो दंगा आपल्या शब्दांत ऐकायला खरी मजा येईल आणि मिपाकर ती जुनी जाहिरात आपण परत स्मृतीत आणल्याबद्दल आभार मानतील. असो. लिंक मला तरी बघता आली नाही, येथील प्रस्थापित मिपाकरांनी ती पाहिली असावी बहुतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

ह्म्म... माझा आवडता विषय !

मदनबाण
Tue, 12/25/2012 - 10:09 नवीन
ह्म्म... माझा आवडता विषय ! :) सगळ्यात पहिल्यांदा मला सध्याची आवडलेली जाहिरात इथे देतो, ती आहे ICICI Bank - Love surprises यांची. जाहिरातीतले संगीत,जिंगल,लोकेशन आणि चिंटुकली मुले आणि एकुण जाहिरातीची कल्पनाच मला फार आवडली. :) https://www.youtube.com/watch?v=yX45sau4EHM या खालील दोन्ही जाहिराती मध्यप्रदेश टुरिझमच्या आहेत्,यातील कल्पकता आणि जिंगल दोन्ही मुळे मला या फार आवडल्या.:) https://www.youtube.com/watch?v=8OkKNx0rhQc https://www.youtube.com/watch?v=9OwwFEqnw7Y
  • Log in or register to post comments

जिंगल स्पेशल जाहिराती

समयांत
Tue, 12/25/2012 - 20:06 नवीन
मदनबाण धन्यवाद आपल्या आवडत्या जाहिरातींबद्दल, पण मला फक्त नाव ऐकून मजा नाही आली ब्वॉ. जिंगल्स मध्ये ती अमित त्रिवेदीने कॉम्पोझ केलेली मन उछ्ल उछ्ल जाय भारी आवडते. दरेक बीट्सला असणारे मस्त अ‍ॅनिमेशनमुळे मनही तसंच उडू लागतं :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

"ददू" मेन्टोस वाला

कोल्हापुरवाले
Tue, 12/25/2012 - 11:01 नवीन
तशी जुनि जहिरात आहे ही,मेन्टोस चोकलेट चि येकदम सुपर होति... मणसाची उत्र्क्रान्ती दखवलि होति. गाधअजुन पर्य्न्त लक्श्यात राहिलेलि
  • Log in or register to post comments

सिड हा...

वपाडाव
Tue, 12/25/2012 - 13:26 नवीन
ही कॅडबरीची जाहिरात मला लय आवडते... http://www.youtube.com/watch?v=UbIFGCo1Kq8
  • Log in or register to post comments

कॅडबरी ऑल्वेज रॉक्स

समयांत
Tue, 12/25/2012 - 20:00 नवीन
वपाडाव हा.. सिदला बघू पण आधी त्या जाहिरातीतल्या बाकी डिटेल्सना बघू. आपल्या शब्दांत ऐकायला आवडेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ते मला सांगता नाही यायचं...

वपाडाव
Wed, 12/26/2012 - 18:51 नवीन
ते मला सांगता नाही यायचं... मेलडी खाओ खुद जान जाओ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समयांत

लिंक देता येत नाहीये...

नानबा
Tue, 12/25/2012 - 20:23 नवीन
आवं, म्या लय प्रयत्न केला, पन मला हिकडं लिंकच देता येत न्हाई बगा.... कसं करायचं थोडं सांगा की...
  • Log in or register to post comments

चान चान

स्पा
Tue, 12/25/2012 - 20:31 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

कोड

समयांत
Tue, 12/25/2012 - 20:41 नवीन
चान चान सांकेतिक काही आहे का? बर्‍याच 'नवमिपाकर' धाग्यांवर पाहिलेय मी. असो. आपली एखादी आवडती जाहिरात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चान चान सांकेतिक काही आहे का?

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/26/2012 - 18:15 नवीन
चान चान सांकेतिक काही आहे का? बर्‍याच 'नवमिपाकर' धाग्यांवर पाहिलेय मी.
स्पा, तुला ते 'नवमिपाकर' म्हणताहेत बहुतेक ;-)
असो. आपली एखादी आवडती जाहिरात?
त्यांना स्वतःचीच जाहिरात (करायला) आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समयांत

+१

कवितानागेश
Wed, 12/26/2012 - 21:44 नवीन
मला स्पाची ही जाहिरात आवडते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मलापण.

बॅटमॅन
Mon, 12/31/2012 - 14:30 नवीन
मलापण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

धन्यवाद

स्पा
Mon, 12/31/2012 - 16:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ते जाऊ द्या हो दक्षिण

किसन शिंदे
Wed, 12/26/2012 - 23:40 नवीन
ते जाऊ द्या हो दक्षिण मुंबईकर्..तुमची आवडती जाहिरात कोणती ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जाउ द्या हो मध्य मुंबईकर्(खरे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/27/2012 - 16:02 नवीन
जाउ द्या हो मध्य मुंबईकर्(खरे तर मध्य भारतकर), आम्ही हल्ली खूपच पेटलेले असल्याने आमच्याकडून खूप चुका होतात आताशा. त्यामुळे राहू देत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आम्ही हल्ली खूपच पेटलेले

किसन शिंदे
गुरुवार, 12/27/2012 - 23:06 नवीन
आम्ही हल्ली खूपच पेटलेले असल्याने आमच्याकडून खूप चुका होतात आताशा. त्यामुळे राहू देत
ब्वॉर्रर्र!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चान चान

अभ्या..
Tue, 12/25/2012 - 20:59 नवीन
चान चान चा अर्थ ना ? त्याचा अर्थ असा आहे की की नव्याची नवलाई आता सोडा. रोज रोज गजरा काय गप्प पिशव्या घेऊन भाजी आणायला पळा.
  • Log in or register to post comments

आले आले

समयांत
Tue, 12/25/2012 - 21:10 नवीन
आणखी बाहेर आलेत सांकेतिक शब्द, अरे पूर्ण वाक्यंच आलंय की. :-D मिपाची परिभाषा लयी डेन्जर आहे बा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

??

वपाडाव
Wed, 12/26/2012 - 18:46 नवीन
आपण विदर्भवासी आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समयांत

कुठलं व्हो पावणं आपण

समयांत
Sun, 12/30/2012 - 14:25 नवीन
विदर्भाशी माझा संबंध यानिमित्ताने 'प्रस्थापित' झाला. नुकतीच पाहिलेली वाईट्ट जाहिरात म्हणजे, इन्वेस्टेमेंटच्या तक्रारी घेऊन आलेला नोकरदार माणूस आणि त्याला लटकवत ठेवणारी टेबलापलीकडची दरवेळेस बदलणारी मंडळी, त्यांचीही बदलणारी वाक्ये फक्त काम पुढे ढकलणे कॉमन. सेबीची आहे. :~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सध्या एक जाहिरात शोधत आहे, जी

मदनबाण
Wed, 12/26/2012 - 12:01 नवीन
सध्या एक जाहिरात शोधत आहे, जी सापडत नाहीये... तो पर्यंत खालील जाहिरात पाहु शकता ! ;) Tata DOCOMO - Bus Stop https://www.youtube.com/watch?v=IiicXtqFoMQ
  • Log in or register to post comments

मस्तच!

समीरसूर
Wed, 12/26/2012 - 16:50 नवीन
खूप इंटरेस्टींग विषय! माझ्या आवडत्या जाहिराती: गुड डे बिस्कीटांची - दोन मुले एका गाडीमागे धावताय आणि ती गाडी बिस्कीटाचे पुडे पाडतेय. त्या मुलांचा गुड डे होतो. खूप मस्त कनेक्शन जुळवलं आहे. ब्रँड लक्षात राहतो एकदम! जेम्स - वर सांगीतल्याप्रमाणे म्युरल बघतांना गोळी काढणे आणि शेवटी इतकं घडूनही ती गोळी तोंडात टाकणे. मस्त जमली होती जाहिरात. कॅडबरी - मुलगा मुलीकडे शुभ काम करण्याआधी गोड काहीतरी मागतो...मुलगी झकासच होती. कॅडबरीने काय हुशारीने सेगमेंट्स तयार केले आहेत. लहान मुले, टीनेजर्स, प्रौढ, वृद्ध्...सही ब्रँडींग! मॅक्स इंश्युरन्स - एजंटच्या मागे लपलेला राक्षस खोटं बोलायला सांगतो...पण एजंट खोटं बोलत नाही. कोक - एक जाहिरात होती; एका मुलाला दिवाळीसाठी घरी जायचं असतं आणि तो रस्त्यात लिफ्ट मागत उभा असतो. कोक ओपन हॅपीनेस! मारुति - कितना देती है? जबरदस्त कनेक्शन! डोकोमो - अधुरी कहानी - "मोहिनी, मोहिनी...ये तुम क्या कर रही हो..मोहिनी..." बायको संतापते. नवरा झोपेत पुढे म्हणतो, "मोहिनी बॅलन्स शीट मे एन्ट्री ऐसे करते हैं क्या?" - मस्त आयडिया पण ब्रँड कनेक्शन खास जमले नव्हते. बजाज डिस्कवर - एक अॅड सीरीज यायची. डिस्कवर इंडिया की काहीतरी. त्यात ते एखाद्या प्रसिद्ध ठिकाणावर बजाज डिस्कवर कशी जाऊ शकते वगैरे दाखवायचे. कनेक्शन जमले होते. नोकरी.कॉम - हरी साडू - मस्त स्टोरी आणि आयडिया. सायकल ब्रँड अगरबत्ती - भगवान है! बाकी निरमा, एमडीएच की देगी मिरच, ऑरेंजी बुलबुले, हो शुरु हर दिन ऐसे हे जिंगल्स खूप छान असल्याने ब्रँडस लक्षात राहिले आणि जाहिरातींचा उद्देश सफल झाला. नुसती जाहिरात लक्षात राहिली आणि ब्रँडच लक्षात नाही राहिला तर जाहिरात फार उपयोगात पडत असेल असे वाटत नाही. असो. प्रतिक्रिया छान आहेत. चालू द्या. मजा येतेय. :-)
  • Log in or register to post comments

छानच दिसतायत...

दादा कोंडके
Wed, 12/26/2012 - 17:33 नवीन
टिवी बघायचं काही हजार वर्षांपुर्वीच सोडून दिलं असल्यानं शक्य असल्यास युट्युब लिंका द्याव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

आपण तर डीरेक्टरीच उघडली की.

समयांत
Sun, 12/30/2012 - 14:38 नवीन
आपण तर डीरेक्टरीच उघडली की. आपली प्रतिक्रिया पण मस्त आहे ;) धन्यवाद हा धागा कितपत आवडतो आणि टिकतो ते मिपा ब्रँड ठरवेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

लेझर ब्लेड्स तकनीक का अनोखा

गवि
Wed, 12/26/2012 - 16:59 नवीन
लेझर ब्लेड्स तकनीक का अनोखा चमत्कार.. शेविंग की दुनिया में नया उपहार.. ज्यादा तेज धार.. भरपूर फसल लाये सरदार.. लक्ष्मी का है ये वरदान.. नवयुग का संदेश है सरदार.. सरदार.. जुन्या काळात घुसलं तर आवडल्या नावडलेल्या पेक्षा डोक्यात घुसून राहिलेल्या बर्‍याच आठवतात. नवीन काळातली ब्रिटानिया बिस्किटांची बहुधा.. ट्रक ड्रायव्हर स्पीड ब्रेकरवरुन नेमके एकदोन पुडे बाहेर सांडून जात असतो पोरांसाठी..
  • Log in or register to post comments

जळणाला लाकूड, गुरांना चारा,

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/26/2012 - 17:29 नवीन
जळणाला लाकूड, गुरांना चारा, गाठीला पैका घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येता दारी,
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा