Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिंपातला उंदीर on Sun, 12/23/2012 - 09:53
रामचंद्र गुहा हे विख्यात विचारवंत आणि इतिहासकार म्हणून बहुतेकाना माहीत आहेत. त्यांच एक इंट्रेस्टिंग आर्टिकल काही दिवसापूर्वी वाचनात आल. ढोबळ मानाने विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. इंटरनेट. गुहानी या आर्टिकल मधून त्या विषयाला तोंड फोडल आहे जो आपल्या सगळ्यांना जाणवत तर होता पण त्याला शब्द रूप देता येत नवत. गुहानी या आर्टिकल मध्ये इंटरनेट हिंदू ही संकल्पना मांडली आहे. गुहांच्या शब्दात ," However, it is always articles that touch on the philosophy and practice of Hindutva that attract the most attention (and anger). They have brought me into contact with a certain kind of Indian who gets up before dawn, has a glass of cow’s milk, prays to the sun god, and begins scanning cyberspace for that day’s secular heresies. If a column I write touches in any way on faith, Hinduism, Hindutva, Guru Golwalkar, Gujarat, or Ayodhya, by breakfast I have had deposited, in my inbox—or perhaps in the ‘Comments’ section of the newspaper’s own website—mails which are hurt, complaining, angry, or downright abusive." गुहांची ही इंटरनेटथियरी हे आर्टिकल पब्लिश झाल्या वर वनव्यासारखी पसरली. अनेक फोरम , वेब साइट्स वर वादळी चर्चा सुरू झाली. आता या विषयावर माझ वैयक्तिक निरीक्षण. अर्थात च हे निरीक्षण माझया पर्सनल sample survey वर आधारित असल्याने त्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे. पण चर्चा व्हयला काय हरकत आहे. असो. कॉंग्रेस राजवटीत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस आली. जनमानसात त्याबद्दल खूप असंतोष होता, आहे. माझया फेस्बूक अकाउंट वर अनेक मित्र कॉंग्रेस ची खिल्ली उडवणारी कार्टून्स आणि स्टेटस अपडेट करत होते. कधी कधी हे स्टेटस हिनतेची पातळी गाठणारे होते. पण केजरिवालानी अजुन एक बॉंबगोला टाकला. नितीन गडकरींची भ्रष्टाचार प्रकरण त्यानी उघडकीस आणली. आणि हे रोज कॉंग्रेसी भ्रष्टाचराविरुद्ध लढा पुकार्णारे Internet Warriors भूमिगत झाले. त्यांच्या स्टेटस चे एव्हाना व्यसन लागल्याने मी त्याना मेसेज केले की अरे बाबा नो तुम्ही आहात कुठे? गडकरी ची एवढी प्रकरण बाहेर येत आहेत. त्यापैकी बहुतेकांचा आलेला प्रतिसाद धक्कादायक होता. त्यातल्या बहुतेकांचा उत्तराचा रोख हा की मित्रा गडकरी हे आपले आहेत. त्यांंच्यवर टीका कशी करणार? मला धक्काच बसला. धर्माच्या नावाखाली 'आपण' आणि 'ते' ही झालेली विभागणी प्रकर्षाने जाणवली होती. पण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पण ही विभागणी आहे हे बघून धक्का बेसल. माझा अजुन एक मित्र केजरिवालांच्या आंदोलन चा कट्टर समर्थक होता. पण केजरिवालानी हा गडकरी बॉम्ब फोडताच त्याने केजरिवलांची सांगत सोडली. वर पत्र लिहून त्याने केजरिवालना पत्र लिहून आव्हान केले की आपला मुख्या शत्रू कॉंग्रेस आहे. भाजपा वर आरोप करून तुम्ही कॉंग्रेस ला बळ देत आहात म्हणून. आता बोला. कुठल्याही वृत्तपत्राच्या वेबसाइट गेलात की कॉमेंट सेक्शन मध्ये गेलात तर हे इंटरनेट हिंदू तिथे आढळतील.विचारसरणी वग्ैरे सर्व ठीक आहे. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हा दूतोनडी पणा का? का कॉंग्रेस हा bigger evil आणि भाजपा lesser evil असा काही वैचारिक गोंधळ आहे? तुमच्या सगळ्यांची मत या संवेदनशील विषयावर जाणून घ्यायला आवडतील. गुहांच्या आर्टिकल ची लिंक पुढीलप्रमाणे : http://www.outlookindia.com/article.aspx?282904
  • Log in or register to post comments
  • 12029 views

प्रतिक्रिया

Submitted by तर्री on Mon, 12/24/2012 - 22:27

Permalink

एदियुरप्पा हा कलंक आहे !

एदियुरप्पा, महाजन, गडकरी आणि इतर अनेक हे कॉंग्रेस वाल्यांपेक्षा कुठे वेगळे आहेत.? एदियुरप्पा हा संघाचा - भाजपचा कलंक आहे ! अजिबात दुमत नाही. पण गडकरी - महाजन हे "प्रक्टिकल" नेते आहेत. आणि असे १/२ लागतातच. पूर्वी ही भैरोंसिंग हे "प्रक्टिकल" नेते होतेच. हया भल्या माणसाने राजस्थान मध्ये काँग्रेस च्या नाकावर टिच्चून जेमतेम बहुमतावर ५ वर्षे सत्ता केली ती काय उगाच ? राज्य करायचे तर सोवाळेही लागतात आणि परोसेही लागतात. आणि ज्यांचा शत्रू कोंग्रेस सारखा निर्ढावलेला पक्ष आहे त्यांना तर सगळे हातखंडे वापरूनच त्यांच्या तंगड्या गळ्यात द्याव्या लागणार. घाण काढायची तर घाणीत उतरावे लागणारच !
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 12/24/2012 - 22:31

Permalink

ते इंटरनेट हिंदू काय आपल्याला माहित नाही.

पण मला "इंटरनेट वायझेड" ही जमात माहित आहे ब्वॉ!!
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 12/25/2012 - 03:03

Permalink

हो, आहे आम्ही इंटरनेट हिंदू.

हो, आहे आम्ही इंटरनेट हिंदू. आणि आहे आम्हाला मान्य हिंदूंचा भ्रष्टाचार. काय म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Tue, 12/25/2012 - 13:06

Permalink

आपण इंटरनेट हिंदू आहात

आपण इंटरनेट हिंदू आहात का? ...ह्या प्रश्नावर माझ्या काही ओळी... १) इंटरनेट हिंदू हा शब्द शोधून काढल्याबद्दल सागरिका घोष यांचे अभिनंदन. २) सागरिका घोष यांनी ज्या अर्थाने आणि संदर्भात हा शब्द वापरला त्याच अर्थाने आणि संदर्भात इंटरनेट मुस्लिम, इंटरनेट ख्स्रिश्चन, इंटरनेट दलित, इंटरनेट समाजवादी, इंटरनेट सेक्युलर वै वै शब्द सुद्धा शोधून काढलेत का ते माहित नाही, आणि नसल्यास का नाही ते जाणून घ्यायला आवडेल (तेवढीच ज्ञानात भर). ३) इंटरनेट हिंदू हा समाज जर अस्तिवात असेल तर इतर इंटरनेट समाजाला सुद्धा अस्तित्वात असायला हरकत नाही किंवा इतर इंटरनेट समाज अस्तिवात असेल तर इंटरनेट हिंदू समाजाला सुद्धा अस्तित्वात असायला हरकत नाही. ४) सागरिका घोष आणि त्यांचे पति राजदिप सरदेसाई यांचे राजकिय विचार तसेच त्यांचा व्यवसाय लक्षात घेता इंटरनेट हिंदू या शब्दाचा उगम समजणे शक्य आहे. परंतू या शब्दामुळे वेगळे ते काय सिद्ध करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न आहे तो कळला नाही. ५) जास्तीत जास्त लोकं ही पक्षपाति असतातच. हा मानवी स्वभाव आहे. मी, माझं कुटूंब, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझा समाज(जात), माझा धर्म असा हा प्रवास असतोच. त्या नुसार पक्षपातीपणा केला जातो. हाच स्वभावधर्म मग इतर ठिकाणी सुद्धा वापरला जातोच. माझे सहव्यवसाई, माझा व्यवसाय्/नोकरी/खातं ते माझा राजकिय पक्ष, संगठना असा इतर ठिकाणी सुद्धा पोहोचतोच. वरील माहिती नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा ठेवतो :) राहीला प्रश्न तो आपण इंटरनेट हिंदू आहात का? माझ्या बाबतीत फक्त एवढंच सागू शकेन की मी हिंद् आहे परंतू नेमक्या कोणत्या उपप्रकारातील ते माहित नाही जसे की मी इंटरनेट वापरतो म्हणून इंटरनेट हिंदू, ईमेल वापरतो म्हणून ईमेल हिंदू, मोबाईल वापरतो म्हणून मोबाईल हिंदू, टॅब वापरतो म्हणून टॅब हिंदू वै वै.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Tue, 12/25/2012 - 13:48

In reply to आपण इंटरनेट हिंदू आहात by समंजस

Permalink

समंजस साहेब अतिशय समंजस

समंजस साहेब अतिशय समंजस प्रतिक्रिया : )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 12/26/2012 - 11:01

In reply to आपण इंटरनेट हिंदू आहात by समंजस

Permalink

सुंदर प्रतिसाद

आवडला, व सहमती आहे. माझे अजून काही: २, ३ व ४: हिंदूंना झोडपणे, इतर तत्सम क्रायटेरियांवरून झोडपण्यापेक्षा (उदा. इंटरनेट मुस्लिम [भीति], इंटरनेट तालिबानी [विशेष भीति], इंटरनेट अल- कायदी/ लष्करे--/जेम्मा---, [थरकाप])कितीतरी कमी रिस्की आहे. त्यामुळे ते कमी कष्टांत आकर्षकही ठरते. ५: स्वत:स (म्हणजे स्वतःलाच, स्वतःच्या कौटुंबियांस, स्वतःच्या समाजास, देशास, धर्मास... वगैरे) एक न्याय व इतरांना वेगळा न्याय, ही दुनियेची रीतच आहे. मी स्वतःही ते कमीअधिक प्रमाणात करत असतोच, आणि तसे आपण करत नाही, अथवा परिस्थिती पडल्यास आपण तसे करणार नाही, असे छातीवर हात ठेऊन जर कुणी सांगणार असेल, तर मी काही टिपीकल सिचुएशन्स इथे देण्यास तयार आहे. अर्थात व्यक्तिनुसार असे करण्याची थ्रेशोल्ड कमीजास्त असते, पण ह्याला कुणी अपवाद नसावे. चर्चालेखकाने स्वतः अनुभवलेली काही अ‍ॅनेक्डोटल उदाहरणे दिली आहेत. त्याउलट उदाहरणेही देता येतील, पण शेवटी हे सर्व अ‍ॅनेकडोटलच झाले. त्यावरून कसलेही जनरायलेझन करणे चुकिचे ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/26/2012 - 11:25

In reply to सुंदर प्रतिसाद by प्रदीप

Permalink

वस्तुस्थितीचे थोडक्यात आणि चपखल निवेदन !

वस्तुस्थितीचे थोडक्यात आणि चपखल निवेदन !
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 12/26/2012 - 19:43

In reply to सुंदर प्रतिसाद by प्रदीप

Permalink

म्हणजे?

पण शेवटी हे सर्व अ‍ॅनेकडोटलच झाले. त्यावरून कसलेही जनरायलेझन करणे चुकिचे ठरेल.
म्हणजे? असे ठरवले तर प्रतिसाद मिळू शकतील अशा वादग्रस्त चर्चा कशा टाकायच्या?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 12/26/2012 - 20:02

In reply to सुंदर प्रतिसाद by प्रदीप

Permalink

आवडला

नेहमीप्रमाणेच उत्तम विचार देणारा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ती on Tue, 12/25/2012 - 19:23

Permalink

म्हणजे?

नेटावर आले तर धर्म बदलतो कि काय? अरे देवा कसे होणार तर??
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/26/2012 - 22:55

In reply to म्हणजे? by मुक्ती

Permalink

मानलं तुम्हाला !

मानलं तुम्हाला ! +D
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 12/26/2012 - 00:01

Permalink

गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व

गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाचे दुतोंडीपण हे वैशिष्ठ्य आहे. हे नेहमीच दिसून आले आहे . तो अयोद्धेचा मुद्दा असो की मग येडीयुराप्पा असो की टूजी स्पेक्ट्रम मधील प्रमोद महजनांचा सहभाग असो अथवा अण्णा हजारेंचे आंदोलन असो. आपला तो बाब्या काँग्रेसचे ते कार्टे. वाजपेयी राजकारणतून मावळल्यानंतर तर तो पक्ष एकूणातच पोरका झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 12/26/2012 - 00:39

In reply to गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व by विजुभाऊ

Permalink

+१

यावर दुमत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 12/26/2012 - 01:41

In reply to गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व by विजुभाऊ

Permalink

+/- १

कुठल्या पक्षाचे दुसरे तोंड नसते विजुभाऊ? बाबरीकांडानंतर धोका हुआ म्हणत ओरडणारे काँग्रेस, जन्माने अभारतीय व्यक्तीला प्र.म. बनवु नये म्हणत बाहेर पडणारे रा.काँ, आधि काँग्रेसला फाट्यावर मारणारे आणि निवड्णुकीत दारुण पराभव झाल्यवर त्याच काँग्रसच्या वळाहणीला जाणारे लालू.... यु नेम इट अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 12/26/2012 - 05:25

Permalink

व्याख्या

आडॉट्कॉम डॉटनेट पर्यंता यस्य भारत विषया सदैव वादघालैश्च | स वै इंटरनेटहिंदूरीती स्मृतः || मला वाटते ह्या समाजाची घोषणा, "गर्वसे कहो हम इंटरनेट हिंदू है" अशी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 12/26/2012 - 13:29

Permalink

.

-(इंटरनेट हिंदू ठरू या भितीने गप्प बसलेला) दादा
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 12/26/2012 - 16:50

Permalink

मित्रा

तु ईंटर्नेट हिंदू आहेस का ते माहीत नाही. पण तुझे बरेचसे इंटरेनेट मित्र,ओळखीचे हिंदू असावेत. जास्त भिन्नधर्मिय मित्र बनव मग तुला कदाचित जास्त सेक्युलर फीलिंग येइल. बा़की कॉलिंग ईंट्या!!! हे आहेच
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Wed, 12/26/2012 - 18:07

Permalink

एकंदरीत संघ, भाजपा, हिंदुत्व,

एकंदरीत संघ, भाजपा, हिंदुत्व, मोदी, इ. विरुद्भ लिहिलं की आपोआप प्रसिद्धी मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 12/27/2012 - 10:27

In reply to एकंदरीत संघ, भाजपा, हिंदुत्व, by सुचेल तसं

Permalink

प्रसिद्धी प्रसिद्धी काय

प्रसिद्धी प्रसिद्धी काय काँग्रेसच्या विरोधात लिहुन सुद्धा मिळते हो ( हे वाक्य पैसा काय ------- कमावते हो या धर्तीवर वाचावे). पण संघाच्या विरोधात लिहिले की तुमची वर्णी हुच्च्भ्रु वर्तुळात लागते. मदरश्यात जाणार्‍यांना दहशतवादाबरोबर अतिरेकी इस्लामप्रेमाचे आणि हिंदुद्वेषाचे बाळकडु मिळाले तर चालते पण संघात जाउन राष्ट्रप्रेमाचे आणि हिंदुभिमानाचे शिक्षण घेतले की ते देशविघातक ठरते असा अजब न्याय असलेल्या विचारजंत हुच्च्भ्रु समाजामध्ये संघद्वेषाला खुप महत्व आहे राव,
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on गुरुवार, 12/27/2012 - 11:05

In reply to प्रसिद्धी प्रसिद्धी काय by मृत्युन्जय

Permalink

+५००

खरय..त्याच बरोबर नवीन विचारसरणी सुद्धा जन्माला येते भगवा दहशदवाद. आणि मग राजदीप सरदेसाई सारखे हुच्च विचारसरणीचे लोक भगवा दहशदवाद हा पाकिस्तानी अतिरेक्यांपेक्षा किती घातक आहे याची कारण मिमासा करत बसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/27/2012 - 11:18

In reply to प्रसिद्धी प्रसिद्धी काय by मृत्युन्जय

Permalink

+१०००००००००००००००००००००००००००

+१०००००००००००००००००००००००००००००. एकच नंबर!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 12/27/2012 - 12:48

In reply to प्रसिद्धी प्रसिद्धी काय by मृत्युन्जय

Permalink

छे छे !

'संघ' असे म्हणायचे नाही मृत्युंजय शेठ. 'भाजपचा खरा चेहरा' असे म्हणायचे. म्हणजे एका वाक्यात अनेक कामे साधली जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/27/2012 - 12:54

In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

अगदी अगदी. भगवा दहशतवाद,

अगदी अगदी. भगवा दहशतवाद, भाजपचा खरा चेहरा, संघ, हे शब्द मग अधूनमधून वाक्यांत पेरून द्यायचे, की झाले. विचारजंत मंडळींना त्यांच्या बद्धकोष्ठावरील उतारा म्हणून ही डिश विशेष आवडते असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 12/26/2012 - 19:55

Permalink

रा कों हा प्रकारच वेगळा आहे.

रा कों हा प्रकारच वेगळा आहे. बोक्याला वाटते की शिंकाळ्याच्या खाली उभे राहिले की लोणी आपोआप मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Fri, 01/18/2013 - 23:54

Permalink

इंटरनेट हिंदू

इंटरनेट हिंदू ये क्या होता आहे
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com