✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपण इंटरनेट हिंदू आहात का?

प
पिंपातला उंदीर यांनी
Sun, 12/23/2012 - 09:53  ·  लेख
लेख
रामचंद्र गुहा हे विख्यात विचारवंत आणि इतिहासकार म्हणून बहुतेकाना माहीत आहेत. त्यांच एक इंट्रेस्टिंग आर्टिकल काही दिवसापूर्वी वाचनात आल. ढोबळ मानाने विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. इंटरनेट. गुहानी या आर्टिकल मधून त्या विषयाला तोंड फोडल आहे जो आपल्या सगळ्यांना जाणवत तर होता पण त्याला शब्द रूप देता येत नवत. गुहानी या आर्टिकल मध्ये इंटरनेट हिंदू ही संकल्पना मांडली आहे. गुहांच्या शब्दात ," However, it is always articles that touch on the philosophy and practice of Hindutva that attract the most attention (and anger). They have brought me into contact with a certain kind of Indian who gets up before dawn, has a glass of cow’s milk, prays to the sun god, and begins scanning cyberspace for that day’s secular heresies. If a column I write touches in any way on faith, Hinduism, Hindutva, Guru Golwalkar, Gujarat, or Ayodhya, by breakfast I have had deposited, in my inbox—or perhaps in the ‘Comments’ section of the newspaper’s own website—mails which are hurt, complaining, angry, or downright abusive." गुहांची ही इंटरनेटथियरी हे आर्टिकल पब्लिश झाल्या वर वनव्यासारखी पसरली. अनेक फोरम , वेब साइट्स वर वादळी चर्चा सुरू झाली. आता या विषयावर माझ वैयक्तिक निरीक्षण. अर्थात च हे निरीक्षण माझया पर्सनल sample survey वर आधारित असल्याने त्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे. पण चर्चा व्हयला काय हरकत आहे. असो. कॉंग्रेस राजवटीत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस आली. जनमानसात त्याबद्दल खूप असंतोष होता, आहे. माझया फेस्बूक अकाउंट वर अनेक मित्र कॉंग्रेस ची खिल्ली उडवणारी कार्टून्स आणि स्टेटस अपडेट करत होते. कधी कधी हे स्टेटस हिनतेची पातळी गाठणारे होते. पण केजरिवालानी अजुन एक बॉंबगोला टाकला. नितीन गडकरींची भ्रष्टाचार प्रकरण त्यानी उघडकीस आणली. आणि हे रोज कॉंग्रेसी भ्रष्टाचराविरुद्ध लढा पुकार्णारे Internet Warriors भूमिगत झाले. त्यांच्या स्टेटस चे एव्हाना व्यसन लागल्याने मी त्याना मेसेज केले की अरे बाबा नो तुम्ही आहात कुठे? गडकरी ची एवढी प्रकरण बाहेर येत आहेत. त्यापैकी बहुतेकांचा आलेला प्रतिसाद धक्कादायक होता. त्यातल्या बहुतेकांचा उत्तराचा रोख हा की मित्रा गडकरी हे आपले आहेत. त्यांंच्यवर टीका कशी करणार? मला धक्काच बसला. धर्माच्या नावाखाली 'आपण' आणि 'ते' ही झालेली विभागणी प्रकर्षाने जाणवली होती. पण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पण ही विभागणी आहे हे बघून धक्का बेसल. माझा अजुन एक मित्र केजरिवालांच्या आंदोलन चा कट्टर समर्थक होता. पण केजरिवालानी हा गडकरी बॉम्ब फोडताच त्याने केजरिवलांची सांगत सोडली. वर पत्र लिहून त्याने केजरिवालना पत्र लिहून आव्हान केले की आपला मुख्या शत्रू कॉंग्रेस आहे. भाजपा वर आरोप करून तुम्ही कॉंग्रेस ला बळ देत आहात म्हणून. आता बोला. कुठल्याही वृत्तपत्राच्या वेबसाइट गेलात की कॉमेंट सेक्शन मध्ये गेलात तर हे इंटरनेट हिंदू तिथे आढळतील.विचारसरणी वग्ैरे सर्व ठीक आहे. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हा दूतोनडी पणा का? का कॉंग्रेस हा bigger evil आणि भाजपा lesser evil असा काही वैचारिक गोंधळ आहे? तुमच्या सगळ्यांची मत या संवेदनशील विषयावर जाणून घ्यायला आवडतील. गुहांच्या आर्टिकल ची लिंक पुढीलप्रमाणे : http://www.outlookindia.com/article.aspx?282904
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12029 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

२०१० मध्ये रामचंद्र गुहांच "

सुहास..
Sun, 12/23/2012 - 10:04 नवीन
२०१० मध्ये रामचंद्र गुहांच " मेकर्स ऑफ मॉडर्न ईंडिया " प्रकाशित झाले होते, योगायोगाने त्यावेळी मी बंगळुरात होतो , नशीबाने त्यांची वेळ मिळाली. जावुन भेटुन आलो. पुस्तकावर ऑटोग्राफ च्या निमीत्ताने काही बाबतींत चर्चा ही झाली होती. त्यावेळी वर उल्लेखलेली बाब/विषय झाला होता. आर्टिकल अजुन वाचले नाही, वाचल्यावर बोलुयात :) पण त्या ही आधी ' Patriots and Partisans ' वाचेन असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

निव्वळ वेळ घालवणे, चघळायला

समयांत
Sun, 12/23/2012 - 10:15 नवीन
निव्वळ वेळ घालवणे, चघळायला विषय हवा म्हणून असं एक कारण असावं. युरोप आणि इतर खंडांतही अशी उदाहरणं असतात. वंशद्वेष हे त्याचे स्वरूप असं म्हणता येईल. माणसाची मुलभूत प्रेरणा असते कि आपले व तसेच दुसरे मानणे, आपपरभाव. मग आपल्यांना मोठ्यातला मोठा गुन्हा माफ असतो. निष्कर्ष न निघणार्‍या संचातील हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

मग आपल्यांना मोठ्यातला मोठा

सुहास..
Sun, 12/23/2012 - 10:20 नवीन
मग आपल्यांना मोठ्यातला मोठा गुन्हा माफ असतो. >>> अर्थात याची ही श्वाश्वती नाही, स्वतापर्यंत आल्यावर बर्‍याच जबाबदारांना हात झटकताना ही पाहिले आहे .
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Sun, 12/23/2012 - 10:39 नवीन
आपण इंटरनेट हिंदू आहात का?
काय कल्पना नाय बॉ ! नेमाडेंना विचारले पाहिजे.
  • Log in or register to post comments

हा शब्द समुह सागरिका घोश यांचा आहे.

कापूसकोन्ड्या
Sun, 12/23/2012 - 11:21 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे हा शब्द सागरीका घोश यांनी कॉइन केला आहे. इथे पहा
  • Log in or register to post comments

ठिक आहे. त्या गुहा साहेबांना

स्पंदना
Sun, 12/23/2012 - 12:13 नवीन
ठिक आहे. त्या गुहा साहेबांना म्हणाव जरा बाकिच्या गोष्टींवर लिहुन बघा. मग तुम्हाला आपण इंटरनेट ****आहोत का असे धागे काढावे लागतील. तरीही भ्रष्टाचाराच्या बाबतीत सहमत.
  • Log in or register to post comments

गुहानी अनेक विषयावर चौफेर

पिंपातला उंदीर
Sun, 12/23/2012 - 12:23 नवीन
गुहानी अनेक विषयावर चौफेर लिखाण केले आहे. लिखाणावर मतभेद असु शक्तात.प विषय गुहा नसून त्यांनी मांडलेली ही संकल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

त्यांची नाही

विकास
Mon, 12/24/2012 - 05:57 नवीन
ही संकल्पना त्यांची नाही, सागरीका घोष यांची आहे. बाकी चर्चाविषयातील, "आपण इंटरनेट हिंदू आहात का?" या प्रश्ना बाबतः असे काही मान्यच नाही. तमाम लेफ्टीस्ट, स्युडोसेक्यूलॅरीस्टस, सेक्यूलॅरीस्टस, मुसलमान, ख्रिश्चन आणि अर्थातच हिंदू आहेत जे जालावरती अ‍ॅक्टीव्ह आहेत. त्यातील अनेक जण रीअ‍ॅक्टीव्ह पण आहेत. मग त्या सर्वांना अशाच प्रकारच्या संज्ञेने ओळखले जाते का? बरं असे बरेच लेफ्टीस्ट, स्युडोसेक्यूलॅरीस्टस, सेक्यूलॅरीस्टस, अस्तात जे व्यक्तीगत हिंदू असतात आणि जे इंटरनेटवर चांगल्या/वाईट दोन्ही अर्थांनी अ‍ॅक्टीव्ह आहेत. मग ते इंटरनेट हिंदू नाहीत का? नसल्यास त्यांना काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

नक्कीच. इंटरनेट हे असे माध्यम

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 10:18 नवीन
नक्कीच. इंटरनेट हे असे माध्यम आहे जिथे सगळेच आपला अजेंडा राबवत असतात. मग तो वैचारिक असो वा पर्सनल. पण लेखात म्हंटल्याप्रमाणे हा माझा वैयक्तिक sample survey आहे. माझया अनुभावक्षेत्रात असे अनेक इंटरनेट हिंदू मला जवळून पाहायला मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उदाहरणे

विकास
Mon, 12/24/2012 - 18:51 नवीन
नक्की कुठली उदाहरणे देऊ शकता? नुसते मित्रांनी केले ही काही उदाहरण होऊ शकत नाही. तसे सागरीका घोष बाई या मेडीयास्युडोसेक्यूलॅरीस्ट आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सॉरी विकास. माझा पॉइण्ट सिद्ध

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 19:56 नवीन
सॉरी विकास. माझा पॉइण्ट सिद्ध करायला मी लोकांची privacy नष्ट करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तर मग..

विकास
Mon, 12/24/2012 - 20:15 नवीन
माझा पॉइण्ट सिद्ध करायला मी लोकांची privacy नष्ट करू शकत नाही.
तर मग तुमच्या म्हणण्यात काही पॉइंटच नाही आणि तुम्ही उगाच हिंदू म्हणत झोडपत आहात. अशा आरोप करणार्‍यांना लोकं इंटरनेटअँटीहिंदू इंटरनेटड्युप्ली-आयडी वगैरे म्हणू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

ठीक आहे. यापुढे तुमच्याकडून

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 20:48 नवीन
ठीक आहे. यापुढे तुमच्याकडून काहीतरी कॉंक्रीट प्रतिक्रिया मिळेल ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कशाबद्दल?

विकास
Mon, 12/24/2012 - 21:02 नवीन
यापुढे तुमच्याकडून काहीतरी कॉंक्रीट प्रतिक्रिया मिळेल ही अपेक्षा.
कशाबद्दल हवी? बाकी चार आठवड्यात तुम्ही नक्की माझे काय काय वाचले ज्यात कॉक्रीट आणि वीटा मिळाल्या नाहीत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

Honestly काहीच नाही : )

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 21:08 नवीन
Honestly काहीच नाही : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सहज आठवलं

गणपा
Mon, 12/24/2012 - 21:16 नवीन
धम्मक लाडूची सही आठवली,
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

दगडापेक्षा

पैसा
Mon, 12/24/2012 - 22:32 नवीन
वीट मऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हे कसे आहे माहित आहे, म्हणजे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 12/24/2012 - 22:40 नवीन
हे कसे आहे माहित आहे, म्हणजे गावात नाही झाड आणि म्हणे एरंडाला आला पाड !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अगदी अगदी. हे पण चांगलं आहे.

गणपा
Mon, 12/24/2012 - 23:20 नवीन
अगदी अगदी. हे पण चांगलं आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काय हे!!

Nile
Mon, 12/24/2012 - 23:32 नवीन
इथे महत्त्वाच्या विषयावर वाद चाल्लेत अन तुमचे उखाण्याचे खेळ काय हो मध्येच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

निळ्या उखाणे नै कै. म्हणी अन्

गणपा
Mon, 12/24/2012 - 23:39 नवीन
निळ्या उखाणे नै कै. म्हणी अन् वाक्प्रचार म्हणतात या प्रकारांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे म्हंजे

इरसाल
गुरुवार, 12/27/2012 - 13:08 नवीन
देअर इज नो ट्री इन द व्हिलेज आनी म्हणे एरंडाला आला पाड ! (आपल्याला इंगलिश चा प्राब्लेम नाय बरे !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हि मुलाखत बघा

अनामिका
Sun, 12/23/2012 - 12:29 नवीन
हि मुलाखत बघा
  • Log in or register to post comments

इंटरनेट मुस्लिम, इंटरनेट

बॅटमॅन
Sun, 12/23/2012 - 23:58 नवीन
इंटरनेट मुस्लिम, इंटरनेट क्रिश्चन, इटरनेट रेसिस्ट, इ.इ. सर्व क्याटेगरीज अस्तित्वात आहेत, लेखात उल्लेखिल्याप्रमाणे दुटप्पीपणा करणारेदेखील कैकजण आहेत. यूसलेस आणि विविध डिस्कशन फोरम पिंजून काढण्याची सवय असलेल्यांना हे नक्की माहिती असावे. निव्वळ गुहाने म्हटल्यामुळे इंटरनेट हिंदू ही बिग डील आहे का???? अवांतर: इंटरनेटवरच्या चर्चांमध्ये जसजसा वेळ जाईल तसतसे डिस्कशन कधी ना कधी नाझीझम आणि हिटलरबद्दल होऊ लागते असा एक लॉ आहे. याची भारतापुरती व्हर्जन ही नाझीझमच्या जागी "हिंदुत्व/इस्लाम" घातल्यावर आपसुकच तयार होईल असे वाट्टे, वॉट से?
  • Log in or register to post comments

त्या लॉची लिंक.

बॅटमॅन
Mon, 12/24/2012 - 00:00 नवीन
त्या लॉची लिंक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मान्य. पण निव्वळ गुहानी

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 10:13 नवीन
मान्य. पण निव्वळ गुहानी म्हंतल्यामुळे हा विषय दुर्लक्षित पण करता येणार नाही. मुळात सर्व लेख (गुहांचा) वाचावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@कुठल्याही वृत्तपत्राच्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/24/2012 - 10:01 नवीन
@कुठल्याही वृत्तपत्राच्या वेबसाइट गेलात की कॉमेंट सेक्शन मध्ये गेलात तर हे "इंटरनेट हिंदू" तिथे आढळतील.>>> अहो, त्याला जातीयवादी असा साधा सरळ शब्द आहे हो.
  • Log in or register to post comments

होय .. मी आहे इंटरनेट हिंन्दू..

विटेकर
Mon, 12/24/2012 - 10:23 नवीन
जसा मी इतरत्र हिंदू आहे तसाच मी इंटरनेट्वरही हिंदूच आहे.. येथे येताना आपला धर्म बद्लून यावा अशी तुमची अपेक्षा आहे ? असल्यास का ? जरा स्वःतशी तरी प्रामाणिक रहावे ना ! खरया जगात एक .. नेट वर एक ..कशासाठी ?
  • Log in or register to post comments

विटेकर साहेब हिंदू असणे ही एक

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 10:30 नवीन
विटेकर साहेब हिंदू असणे ही एक अविभाज्य ओळख आहे याबद्दल दुमत नाही. पण मग धर्माच्या नावाखाली दुटापपी भूमिका घेणे (जसे लेखात गडकरींचे उदाहरण दिले आहे) हे कितपत योग्य आहे. ? गडकरी 'आपले' आहेत म्हणून किंवा केजरिवाल भाजपा वर आरोप करतात म्हणून त्यांची सांगत सोडणे हा दुटप्पीपणा आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

इंटरनेट हिंदू आणि गडकरी यामधे

Dhananjay Borgaonkar
Mon, 12/24/2012 - 11:21 नवीन
इंटरनेट हिंदू आणि गडकरी यामधे काय कनेक्षन आहे? मला इंटनेट हिदू ही संज्ञाच मुळात समजत नाहीये. हा काय प्रकार आहे? उद्या ऑफीस हिंदू, मैदानी ईस्लाम, धंदेवाईक ज्यु असे पण ऐकायला मिळेल का? मी हिंदू आहे, आणि सगळीकडे हिंदू म्हणुनच वावरतो. मग ते घर असो, ऑफिस असो, इंटरनेट असो अथवा काही असो. राहीला गडकरींचा मुद्दा, त्यावर चौकशी चालु आहे. यशवंत सिन्हा, जसवंत सिंग इत्यादी बर्‍याच भाजपाच्या ज्येष्ट नेत्यांनी उघडपणे नारीजी व्यक्त केली होती. तुमच्या काँग्रेसच्या जावयावर आरोप झाले, त्याने फेसबुकावर अकलेचे तारे तोडले तेव्हा सगळे तुमचे नेते मुग गिळुन चुप्प. कोणाच्याही नेत्याच्या **** दम नव्हता विरुद्ध बोलायचा. हरीयाणा सरकारने तर लगेच जावई निर्दोष आहेत याचे पुरावे शुन्य मिनिटात दिले. वाह रे सरकार्..असे ताबडतोप निकाल सर्वसामन्य नागरींकाच्या बाबतीत सुद्धा लावा. असा लेख तेव्हा का नाही टाकलात? आणि हिदु काय फक्त भाजपा वाले आहेत?
  • Log in or register to post comments

मी कॉंग्रेस समर्थक नाही.

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 11:29 नवीन
मी कॉंग्रेस समर्थक नाही. अख्ख्या प्रतिसादा त उत्तर देण्याएवढे इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

मी कॉंग्रेस समर्थक नाही.

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 11:29 नवीन
मी कॉंग्रेस समर्थक नाही. अख्ख्या प्रतिसादा त उत्तर देण्याएवढे इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

पण मी काय म्हणतो " गडकरी"

मृत्युन्जय
Mon, 12/24/2012 - 11:38 नवीन
पण मी काय म्हणतो " गडकरी" हिंदु आहेत म्हणून हे लोक शांत बसले की ते भाजपाचे आहेत म्हणुन? काँग्रेसला कंटाळलेली काही जनता आहे. की जी काँग्रेसच्या अनागोंदीला कंटाळलेली आहे. भ्रष्ट सगळेच नेते असतात, काँग्रेसने कहर केला आहे. शिवाय हे निष्क्रीय आणि स्वार्थी नेते आहेत असे मानुन काही लोक केवळ काँग्रेसविरोधात आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात नव्हे तर कॉम्ग्रेसच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. शिवाय काही लोकांसाठी काँग्रेसचा शत्रू तो आपला मित्र आहे असे लोकही गडकरींवर आगपाखड करणार नाहित. थोडक्यात काय तर सध्या काँग्रेसविरोधी वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणारे हजार सापडतील. तेच लोक कदाचित इतरांविरुद्ध चिडचिड करणार नाहित. हे सगळे लोक काय लगेच इंटरनेट हिंदु, अतिरेकी हिंदु, बायस्ड हिंदु झाले की काय?
  • Log in or register to post comments

नक्कीच नाही. पण भाजपाचा

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 11:45 नवीन
नक्कीच नाही. पण भाजपाचा भ्रष्टाचार ला दुर्लक्षित करून नामणिराळे राहणारे अनेक लोक आहेत. वरच्या काही पोस्ट बघा. एकानी गडकरींची चौकशी चालू आहे त्यामुळे त्याना पिंजर्यात उभे करण्यास नकार दिला आहे. मग हाच संशयाचा फायदा राजा , कलमाडी, याना द्यायला नको का? नैतिकदृष्या गडकरी, राजा, कलमाडी आणि इतर महारथी यांच्यात काय फरक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नैतिक दृष्ट्या....

अर्धवटराव
Mon, 12/24/2012 - 11:55 नवीन
>> नैतिकदृष्या गडकरी, राजा, कलमाडी आणि इतर महारथी यांच्यात काय फरक आहे? -- नैतिक दृष्ट्या विचार करतो म्हटलं तर अक्खं मिपा बंद व्हायचं... कोणि कोणाला कुठल्याच पिंजर्‍यात उभा करु शकणार नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

पण भाजपाचा भ्रष्टाचार ला

Dhananjay Borgaonkar
Mon, 12/24/2012 - 12:24 नवीन
पण भाजपाचा भ्रष्टाचार ला दुर्लक्षित करून नामणिराळे राहणारे अनेक लोक आहेत. वरच्या काही पोस्ट बघा. एकानी गडकरींची चौकशी चालू आहे त्यामुळे त्याना पिंजर्यात उभे करण्यास नकार दिला आहे
परत एकदा प्रतिसाद वाचावा. मी गडकरी निर्दोष आहेत अस कुठेही म्हणालेलो नाही. हिंदुत्वाचं उदाहरण देताना गडकरीच का? का तर ते संघात जातात, भाजप चे आहेत म्हणुन? दोषी असतील तर शिक्षा जरुर करा आणि व्हायलाच हवी, पण तुम्ही जे काँग्रेसचे छुपे गुणगान गात आहत ते बंद करा. तुम्ही स्वतः दुटप्पीपणाच चेष्मा घालुन लेख लिहिलाय आणि वर लोकांना काय विचारताय? संशयाचा फायदा राजा आणि कलमाडींना चान चान......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

तुमच्या लेखाचा विषय चुकीचा

मृत्युन्जय
Mon, 12/24/2012 - 14:34 नवीन
तुमच्या लेखाचा विषय चुकीचा आहे मग. कोंग्रेस विरोधी असलेला प्रत्येक माणुस इंटरनेट् हिंदु असतो असे आपणास म्हणावयचे आहे काय? म्हणजे सोनिया ख्रिश्चन, राहुल पारशी, मनमोहन शीख असल्याकारणाने यांच्यावर छुपे इंटरनेट हिंदु प्रहार करत आहेत आणि गडकरी हिंदु असल्याने त्यांस विरोध करीत नाही आहेत असे आपणास म्हणावयाचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

:)

ऋषिकेश
Mon, 12/24/2012 - 11:56 नवीन
माझ्यामते गुहा अश्या व्यक्तींबद्दल लिहित असावेत ज्यांना प्रत्यक्ष आयुष्यात प्रतिगामित्त्वाच्या शिक्क्यामुळे म्हणा किंवा कसल्यातरी न्यूनगंडामुळे म्हणा किंवा एकूणच भिडस्तपणे म्हणा स्वतःचे हिंदु असणे किंबा हिंदुत्त्ववादी विचार व्यक्त करणे यावर मर्यादा असावी. मात्र इंटरनेटवर येताच खरी ओळख दिली जात नसल्याने त्यांचे ते 'लपलेले' हिंदुत्त्व उफाळून येत असावे. अर्थात गुहा जरी हिंदूबद्दल बोलत असले तरी इंटरनेटवर - अगदी मराठी संस्थळांवरही- तशा अर्थाने इंटरनेट-कम्युनलिस्ट, इंटरनेट-सेक्युलरिस्ट, इंटरनेट-रेसिस्ट, इंटरनेट-फेमिनिस्ट वगैरे (थोडक्यात इंटरनेटवर प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा विपरित किंवा दाबून ठेवलेली मते देणारे) दिसत असतातच! ;)
  • Log in or register to post comments

एकदम पटले..

आनन्दा
Mon, 12/24/2012 - 15:31 नवीन
जे घराघरात खाजगीत बोलले जाते, पण भीतीमुळे सार्वजनिक बोलू शकत नाही, ते सारे इंटरनेटवर सार्वजनिकरीत्या बोलता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तुम्ही इंटरनेट पुरोगामी आहात

Dhananjay Borgaonkar
Mon, 12/24/2012 - 12:31 नवीन
तुम्ही इंटरनेट पुरोगामी आहात का? तुम्ही इंटरनेट समतावादी आहात का? . . . . तुम्ही इंटरनेट ब्रह्मज्ञानी आहात का? तुम्ही इंटरनेट ऑरगेसमवादी आहात का? अशी एक प्रश्नमालिकाच टाकायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

गडकरी ह्यांच्या वर

चिकित्सक
Mon, 12/24/2012 - 13:32 नवीन
गडकरी ह्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत , त्यानीं भ्रष्टाचार केला का नाही हे कोर्ट ठरवणार तुमच्या आमच्या सारखे सामान्य माणसे नाही ! काँग्रेस नेते आणि गडकरी ह्यांना एका पारड्यात तोलणे हेच मुळात चुक आहे . काँग्रेस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री असलेले राजा आणि इतर नेत्यांना न्यायायिक कोठडीत ठेवण्यात आले आहे आणि त्यांचा घोटाळ्यात सहभाग पुराव्यानिशी सिद्ध झाला आहे , गडकरींचे तसे नाही . कोण कुठला केजरिवाल आणि दिग्विजय सिंह म्हणतो म्हणून गडकरी काही भ्रष्टचारी सिद्ध होत नाहीत
  • Log in or register to post comments

;)

नितिन थत्ते
Mon, 12/24/2012 - 14:25 नवीन
>>गडकरी ह्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत , त्यानीं भ्रष्टाचार केला का नाही हे कोर्ट ठरवणार तुमच्या आमच्या सारखे सामान्य माणसे नाही ! हा हा हा. आपला तो..... असो. त्यांनी भ्रष्टाचार केला की नाही हे कोर्ट ठरवणार हे पूर्णपणे मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक

मिसळ पाव वर like चा पर्याय

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 20:07 नवीन
मिसळ पाव वर like चा पर्याय टाका राव : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

काँग्रेस वाले 'आम आदमी' ला

चिकित्सक
Mon, 12/24/2012 - 21:53 नवीन
काँग्रेस वाले 'आम आदमी' ला 'ते' (परके) वाटले तर त्यात तुम्हाला एवढ हसण्या सारख काय झाल ? आज महाराष्ट्रा चे नेते दिल्लीत बसून कामन वेअल्थ चे घोटाळे करतात , कृषि मंत्री इथले असून शेतकर्यांना आत्महत्या करावीशी वाटते , उर्जा मंत्री अर्ध्या देशाला काळोखात लोटतात आणि वर प्रमोशन मिळवून राजरोस पणे गृह मंत्री बनतात आणि लोकांना दांडूके हाणून त्यांना माओवादी ठरवतात. ही हसण्याची नव्हे तर लाज वाटायची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

साठ-सत्तर टक्के

राही
Mon, 12/24/2012 - 14:22 नवीन
चारसहा महिन्यांपूर्वी मला वाटते लोकसत्तामध्ये रास्वसंचे एक वरिष्ठ नेता,बहुधा भागवत असावेत,यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती,त्यात त्यांनी'जालावर वावरणार्‍या भारतीयांमध्ये संघाशी निष्ठा किंवा संघाविषयी सहानुभूती असलेले लोक साठ ते सत्तर टक्के आहेत'असे ठाम विधान केले होते.
  • Log in or register to post comments

हो !

तर्री
Mon, 12/24/2012 - 18:21 नवीन
मी इंटरनेट हिंदू आहे. ह्यापूर्वी मी वृत्तपत्र हिंदू होतो आणि त्यापूर्वी कीर्तन हिंदू. (जोपर्यंत इतर धर्म हिंदू धर्मावर अत्याचार / फसवणुकीने धर्मांतर करतात तोपर्यंत मी हिंदुत्ववादीच आहे.)
  • Log in or register to post comments

इंटरनेटस्नेही कुठे आहेत?

प्यारे१
Mon, 12/24/2012 - 19:23 नवीन
इंटरनेटस्नेही कुठे आहेत? त्यांना विचारुया !
  • Log in or register to post comments

राजकारण आणि भ्रष्टाचार !

तर्री
Mon, 12/24/2012 - 21:50 नवीन
कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष हा "भ्रष्टाचार" ण करता राहू शकत नाही. ही सगळी इंदिराबीची देशाला मिळालेली देणगी आहे. ( सर्वोदयी / प्रजा समाजवादी/ रा.स्व.संघ भ्रष्टाचारी नाहित पण त्यांची अवस्था आपण जाणत असाल - २ खपले १ कालानुरूप बदलला. गडकरी हे कलमाडी / राजा प्रमाणे भ्रष्टाचारी नव्हेत. तसे ते असते तर सत्तेत होते तेंव्हा ( आणि हो कुराणाचे मालक होते - सार्वजनिक बांधकाम मंत्री ) तेंव्हाच रग्गड खाल्ले असते.गडकरी खासदार नाहित की मंत्री नाहित - पक्षाध्यक्ष म्हणून दिल्लीत राहणे आणि काम करणे म्हणजे काय ते सुज्ञास सांगायला नकोच. सोय पाहायला लागते हो. तेवढीच केलेली आहे , ती ही उजळ माथ्याने, त्यामध्ये काहीहीच वावगे नाही, व्यवसाय करणे हा मुळीच गुन्हा नाही. भा.ज.प. ला जरा समजून घ्या तरच समजेल. सब घोडे बारटक्के हा न्याय वापरालात तर तसेच दिसेल. अनेक वर्षे भा.ज.प. चे कार्यालय वर्गणी काढून चालवले जात होते. अजूनही सहज म्हणून मुबईच्या वसंतराव भागवत स्मृती इमारती मध्ये एकदा जावून या. (आणि हो कोंग्रेस च्या टिळक भावना मध्येही,). त्या इमारती व खोल्या पुरेशा बोलक्या आहेत.
  • Log in or register to post comments

विषयाला धरून आणि संवेदनशील ना

पिंपातला उंदीर
Mon, 12/24/2012 - 22:08 नवीन
विषयाला धरून आणि संवेदनशील ना होता प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद तर्रि साहेब. पण पूर्वापूण्याई हा निकष लावायचा तर कॉंग्रेस पण एकेकाळी लोकवर्गणी वर चालायची. आता महाजन आणि गडकरींची भाजपा तशी आहे का? एदियुरप्पा, महाजन, गडकरी आणि इतर अनेक हे कॉंग्रेस वाल्यांपेक्षा कुठे वेगळे आहेत.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

सिंघवी , कांडा , रंगीले

चिकित्सक
Mon, 12/24/2012 - 22:24 नवीन
सिंघवी , कांडा , रंगीले तिवारी , कलमाडी , सुखराम , सज्जन सिंह , एच के एल भगत सारखे नेते ह्यांच्या विरुद्ध काँग्रेस ने काय पावले उचललीत ? ह्या उलट बंगारू लक्ष्मण , येदयुरप्पा , साखलेचा , मधोक , जुदेव सारखे नेत्यांना भाजप ने बाहेर ची वाट दाखवली , काँग्रेस आणि भाजप मध्ये अंतर तो हाच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा