दिल्लीत जे घडल ते मन सुन्न करणार होत, त्यानंतरच नाट्य तर अतिशय घ्रुणास्पद! सरकारने तर असंवेदनक्षीलतेचा आणि नपुसकतेचा कळस गाठला पण नुसता की बोर्ड बडवून निषेध करणे कधी पटले नाही आणि करणारही नाही पण हे सगळ खोल आतमध्ये कुठेतरी एक घाव करुन गेल जो घाव सहजासहजी भरुन निघणार नाही.
गेल्या काही वर्षात युरोप आणि युके मधील वास्तव्यात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे एकंदर समाज आणि राजकारण यांची संवेदनक्षीलता आणि माणुसकी. कोणताच समाज किंवा राष्ट्र हे परिपूर्ण नसते हे जरी कितीही खर असल तरी जे काही आज काल भारतात चालु आहे ते भयानक आहे. एका आजीशी सहजच बोलताना तिने दिलेली प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी आणि समाजाच नेमक स्वरुप दर्शवणारी आहे. आजी म्हणाल्या " बाबा, जर का हे असच चालणार असेल तर २०१२ मध्ये जगबुडी येण हेच सर्वांच्या हिताच आहे". या प्रतिक्रियेला मी तितकस मनावर घेतल नाही कारण मी सकारात्मक विचार करणारा आणि आपण बदल घडवून आणू शकतो असा विचार नेहमीच करत आलो पण काल घडलेल्या एका प्रसंगाने सुन्न झालोय.
भारतात असताना नुसत्या सरकारला शिव्या घालयच्या नाहीत आणि फेसबूकवर निषेध नोंदवत न बसवता जस शक्य होईल तस बदल घडवून आणायचा हा निश्चय. काल संध्याकाळी बदलापूर येथुन मुलुंड्करता लोकल पकडली आणि पत्नीसमवेत प्रवासाला सुरुवात झाली. समोरच्या सीटवर बसलेला "मराठी माणूस" लाउड स्पीकरवर गाणी ऐकत आणि ऐकवत होता पण मी जाउ दे म्हटल, उगाच वाद नको. ४-५ वेळा त्याने आमच्या कुटुंबाकडे गलिछ नजरेने पाहिल पण माझ लक्ष आहे असे समजल्यावर ते थांबल. एकंदरच मला त्याची भयंकर चीड आली होती पण कोणी कोणाकडे पाहणे हा तसा गुन्हा नाही पण कुठेतरी "दिल्ली" पार्श्वभूमीवर मला त्याच तस पाहण खटकत होत. पण मी ही सौ च्या म्हणण्यानुसार "जाने दो" धोरण स्वीकारल आणि गप्पांमध्ये रमलो.
पुढे कल्याणला २ गुजराथी जोडपी गाडीत चढली आणि गाडीला बर्यापैकी गर्दी असल्यामुळे आमच्या समोर येउन उभी राहीली. आता या नगाला तर मेजवानी मिळाली होती, या स्त्रीयांनी गुजराथी पद्धतीने साडी नेसली होती आणि सहाजिकच उभ्या असल्यामुळे थोडस (बरचस) अंग दिसत होत आणि कोणत्याही पुरुषाने पाहिल तर स्वाभाविकच होत पण ह्या नराधमाचा आता चेहराच बदलला होता, त्याचे डोळे अक्षरशः लाल झाले, तो अतिशय कामुक आणि घ्रुणास्पद नजरेने तिच्याकडे पाहू लागला. इथे नमूद करायला संकोच वाटतो पण तुम्हाला प्रसंगाच गांभीर्य कळाव म्हणून नमूद करतो (स्त्री सभासदांनी माफी करावी) त्याने आपल्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली.
माझ्या अंगातून वीज सळसळली आणि मी त्याच्यावर कडाललो "अरे हरामी, कधी बाई बघितली नाहीस का?.. लाज नाही वाटत का तुला?" आणि बरचस अस काही. त्याने निर्लज्जपणे उत्तर दिल "तुझ्या बायकोकडे नाही बघत आहे ना मग गप्प बस." माझी सटकली आणि मी ठरवल की ह्याचा इथेच हिशोब करायचा पण मी सीटवरुन उठून त्याच्या कानाच माप घ्यायच्या आत त्या स्त्रीची, तिच्या नवर्याची आणि सहप्रवाशाची अशा ३ प्रतिक्रिया खाली देतो आणि माझा लेख संपवतो. ह्या प्रसंगावर प्रतिक्रिया किंवा विष्लेशण करायच्या मनस्थितीत मी अजूनही नाही.
तीचा नवरा: "अरे बॉस, जाने दो... क्यो लफडा करते हो?"
ती स्त्री: त्याला: "क्या रे, घरमे मा-बहेन नही है क्या?" मला: "भैय्या, जाने दो ना, हमे आदत है"
सहप्रवासी: "च्यायला... ह्याला काय पडली आहे? हा हिरो आहे का?"
सौरव जोशी
मेरा भारत महान (?)
वाचने
5013
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईईईईई ग्ग्ग्ग्ग्ग !
मी तर सध्या एकच प्रतिसाद
In reply to आईईईईई ग्ग्ग्ग्ग्ग ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to मी तर सध्या एकच प्रतिसाद by ५० फक्त
+ १११११११११
+१
In reply to + १११११११११ by लीलाधर
बरेच दिवसांनी
दुर्दैवाने काही लोकाना धागा
In reply to बरेच दिवसांनी by पैसा
मिसळपाव चुरचुरीत ,खुसखुशीत
In reply to दुर्दैवाने काही लोकाना धागा by पिंपातला उंदीर
प्रतिसाद
बरोबर आहे. तिथच चोप देयाला
In reply to प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
सरळ कानफाटात ठेउन द्यायची.....
दुर्दैवाने काही लोकाना धागा
प्रत्येक प्रतिसाद वेगळा आणि
In reply to दुर्दैवाने काही लोकाना धागा by पिंपातला उंदीर
मॅच संपल्यावरच असा reply
In reply to प्रत्येक प्रतिसाद वेगळा आणि by परिकथेतील राजकुमार
_/\_
In reply to मॅच संपल्यावरच असा reply by पिंपातला उंदीर
तेच तेच .... पून्हा तेच .
हो ना....
In reply to तेच तेच .... पून्हा तेच . by जेनी...
स्त्रीवर होणार्या
In reply to तेच तेच .... पून्हा तेच . by जेनी...
बरं मेहेंदळे .
In reply to स्त्रीवर होणार्या by विश्वनाथ मेहेंदळे
ईथे नीव्वळ धागे उसवून खचीतच
भारतीय लोकांच्या *** वर
एकदा ट्रेनमध्ये एका सहप्रवासी
हा धागा आणि आजतक या
हातवारे करणे, कमेंट पास करणे
रोज बलात्कार ! :(
सदर घटना नक्कीच क्लेशदायक आहे
गेल्या काही वर्षात युरोप आणि