Skip to main content

बलात्कार थांबतील कसे..?

लेखक सौरव जोशी यांनी मंगळवार, 25/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत जे घडल ते मन सुन्न करणार होत, त्यानंतरच नाट्य तर अतिशय घ्रुणास्पद! सरकारने तर असंवेदनक्षीलतेचा आणि नपुसकतेचा कळस गाठला पण नुसता की बोर्ड बडवून निषेध करणे कधी पटले नाही आणि करणारही नाही पण हे सगळ खोल आतमध्ये कुठेतरी एक घाव करुन गेल जो घाव सहजासहजी भरुन निघणार नाही. गेल्या काही वर्षात युरोप आणि युके मधील वास्तव्यात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे एकंदर समाज आणि राजकारण यांची संवेदनक्षीलता आणि माणुसकी. कोणताच समाज किंवा राष्ट्र हे परिपूर्ण नसते हे जरी कितीही खर असल तरी जे काही आज काल भारतात चालु आहे ते भयानक आहे. एका आजीशी सहजच बोलताना तिने दिलेली प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी आणि समाजाच नेमक स्वरुप दर्शवणारी आहे. आजी म्हणाल्या " बाबा, जर का हे असच चालणार असेल तर २०१२ मध्ये जगबुडी येण हेच सर्वांच्या हिताच आहे". या प्रतिक्रियेला मी तितकस मनावर घेतल नाही कारण मी सकारात्मक विचार करणारा आणि आपण बदल घडवून आणू शकतो असा विचार नेहमीच करत आलो पण काल घडलेल्या एका प्रसंगाने सुन्न झालोय. भारतात असताना नुसत्या सरकारला शिव्या घालयच्या नाहीत आणि फेसबूकवर निषेध नोंदवत न बसवता जस शक्य होईल तस बदल घडवून आणायचा हा निश्चय. काल संध्याकाळी बदलापूर येथुन मुलुंड्करता लोकल पकडली आणि पत्नीसमवेत प्रवासाला सुरुवात झाली. समोरच्या सीटवर बसलेला "मराठी माणूस" लाउड स्पीकरवर गाणी ऐकत आणि ऐकवत होता पण मी जाउ दे म्हटल, उगाच वाद नको. ४-५ वेळा त्याने आमच्या कुटुंबाकडे गलिछ नजरेने पाहिल पण माझ लक्ष आहे असे समजल्यावर ते थांबल. एकंदरच मला त्याची भयंकर चीड आली होती पण कोणी कोणाकडे पाहणे हा तसा गुन्हा नाही पण कुठेतरी "दिल्ली" पार्श्वभूमीवर मला त्याच तस पाहण खटकत होत. पण मी ही सौ च्या म्हणण्यानुसार "जाने दो" धोरण स्वीकारल आणि गप्पांमध्ये रमलो. पुढे कल्याणला २ गुजराथी जोडपी गाडीत चढली आणि गाडीला बर्यापैकी गर्दी असल्यामुळे आमच्या समोर येउन उभी राहीली. आता या नगाला तर मेजवानी मिळाली होती, या स्त्रीयांनी गुजराथी पद्धतीने साडी नेसली होती आणि सहाजिकच उभ्या असल्यामुळे थोडस (बरचस) अंग दिसत होत आणि कोणत्याही पुरुषाने पाहिल तर स्वाभाविकच होत पण ह्या नराधमाचा आता चेहराच बदलला होता, त्याचे डोळे अक्षरशः लाल झाले, तो अतिशय कामुक आणि घ्रुणास्पद नजरेने तिच्याकडे पाहू लागला. इथे नमूद करायला संकोच वाटतो पण तुम्हाला प्रसंगाच गांभीर्य कळाव म्हणून नमूद करतो (स्त्री सभासदांनी माफी करावी) त्याने आपल्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. माझ्या अंगातून वीज सळसळली आणि मी त्याच्यावर कडाललो "अरे हरामी, कधी बाई बघितली नाहीस का?.. लाज नाही वाटत का तुला?" आणि बरचस अस काही. त्याने निर्लज्जपणे उत्तर दिल "तुझ्या बायकोकडे नाही बघत आहे ना मग गप्प बस." माझी सटकली आणि मी ठरवल की ह्याचा इथेच हिशोब करायचा पण मी सीटवरुन उठून त्याच्या कानाच माप घ्यायच्या आत त्या स्त्रीची, तिच्या नवर्याची आणि सहप्रवाशाची अशा ३ प्रतिक्रिया खाली देतो आणि माझा लेख संपवतो. ह्या प्रसंगावर प्रतिक्रिया किंवा विष्लेशण करायच्या मनस्थितीत मी अजूनही नाही. तीचा नवरा: "अरे बॉस, जाने दो... क्यो लफडा करते हो?" ती स्त्री: त्याला: "क्या रे, घरमे मा-बहेन नही है क्या?" मला: "भैय्या, जाने दो ना, हमे आदत है" सहप्रवासी: "च्यायला... ह्याला काय पडली आहे? हा हिरो आहे का?" सौरव जोशी मेरा भारत महान (?)

वाचने 5013
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

हे धागे कधी थांबणार ? ह्या विषयावरचे धागेच आता मानसीक बलात्कार करु लागले आहेत. (लेखकाने वैयक्तिक घेऊ नये.)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी तर सध्या एकच प्रतिसाद टाइपतो आहे मिपावर असं वाटतंय्,मिपाचं फेसबुक करु नका. जाउदे पण काही जण जरा अंमळ जास्तच सिरियस घेतात. असो. मा. संपादक मंडळाला एक नम्र विनंती. सध्याच्या हॉट अँड हिट विषयांसाठी एक वेगळा विभाग करुन दिल्यास बरे होईल.

In reply to by लीलाधर

लीलाधरशी सहमत. गप्प बसून थांबवता येतील.

मिपावर बरेच दिवसांनी लिहिलंत. तुमचा अनुभव खरंच वाईट आहे, पण सगळीकडे तेच वाचून इथले बरेच लोक त्या मूडला कंटाळले असावेत. तुम्ही नक्कीच व्यवस्थित आणि चांगलं लिहिताय. वेगवेगळ्या विषयांवर अवश्य लिहीत रहा.

In reply to by पैसा

दुर्दैवाने काही लोकाना धागा कर्त्याचि भावना लक्षात घेण्यापेक्षा या विषयावर किती धागे उघडले आहेत हे महत्वाचे वाटत आहे हे दिसतच आहे. प्रत्येक अनुभव वेगळा आणि स्वताहत परिपूर्ण असतो हे लोकाना कळेल तो सुदिन.

In reply to by पिंपातला उंदीर

मिसळपाव चुरचुरीत ,खुसखुशीत ,अभ्यासपूर्ण लेख आणि प्रतिक्रिया यांसाठी प्रसिद्ध आहे.असे लेख परत परत वाचून सुतकि वातावरण निर्माण होतंय,नवीन लेख टाकण्यापेक्षा आधीच्या या विषयावरील लेखावर हे प्रतिक्रिया म्हणून टाकले असते तर बरं झालं असतं. लेखकांनी त्यांच्या भावना अगदी सच्च्या दिलाने व्यक्त केल्यात हे बाकी एकदम मान्य !

त्याला धरुन चोपायलाच हवा होता. काय करणार होता तो एकटा? असे जे लोकं जाऊ दे म्हणुन दुर्लक्श्य करतात ना त्याना पण कानपटायला हवयं.

जोशीसाहेब्,अश्यावेळी शिव्या घालत नाही बसायच्,सरळ कानफाटात ठेउन द्यायची,तुमची एक पडली की बाकीचे काम जमाव करतो,असेही अशी विकृत माणसे खुप भित्री असतात्,त्यांना थोड दमात घेतल की शेपुट घालतात....

दुर्दैवाने काही लोकाना धागा कर्त्याचि भावना लक्षात घेण्यापेक्षा या विषयावर किती धागे उघडले आहेत हे महत्वाचे वाटत आहे हे दिसतच आहे. प्रत्येक अनुभव वेगळा आणि स्वताहत परिपूर्ण असतो हे लोकाना कळेल तो सुदिन.

In reply to by पिंपातला उंदीर

प्रत्येक प्रतिसाद वेगळा आणि 'स्वताहत' परिपूर्ण असतो हे लोकाना कळेल तो सुदिन.

तेच तेच .... पून्हा तेच . स्त्रीवर होणार्‍या बलात्कारापेक्षाहि वाईट आहे हे . दिवसाला धागा ... विषय ' बलात्कार ' .... प्रत्येक जन येतो स्वताहाचे अनुभव घेवुन ... खरड खरड खरडतो ... प्रत्येक शब्दात प्रत्येक वेळी लख्तरं काढण्याचा माणस . प्रत्येक्वेळी बलात्कार हा शब्द वाचतानाहि धडधडतं .. पण इथे कुणाला काय त्याचं ?? ' तिच्या' वर तिच्या ' शरिरावर ' झालाय म्हटल्यावर इत्तर स्त्रीयांच्या ' मनावर ' व्हायला नको ?? बास करा तेच तेच ... शक्य असेल आणि स्त्रीबद्दल आदर असेल तर हे बलात्कारावर निघनारे दहा पाच धागे बंद करा . प्लिज बंद करा . अगदि येनहि बंद करायची वेळ आणु नका .

In reply to by जेनी...

दिवसाला धागा ... विषय ' बलात्कार ' .... प्रत्येक जन येतो स्वताहाचे अनुभव घेवुन ... खरड खरड खरडतो ...
तुमचा एखादा तरल नाजूक वगैरे नातेसंबंधावरचा धागा येउद्या आता. :)

In reply to by जेनी...

स्त्रीवर होणार्‍या बलात्कारापेक्षाहि वाईट आहे हे .
नक्की का? नीट विचार करा परत एकदा.
प्रत्येक्वेळी बलात्कार हा शब्द वाचतानाहि धडधडतं .. पण इथे कुणाला काय त्याचं ??
तरीही विषय वाचून धागा उघडलात ?? तुम्हालाच तुमची काळजी नाही इतर कोण कशाला करेल ?
शक्य असेल आणि स्त्रीबद्दल आदर असेल तर हे बलात्कारावर निघनारे दहा पाच धागे बंद करा . प्लिज बंद करा . अगदि येनहि बंद करायची वेळ आणु नका .
प्रत्येकाला सगळे विषय आवडावेत असे बंधन नाही आहे. उदाहरणार्थ असे समजू की मला तुमचे धागे आवडत नाहीत. मग मी काय करू शकतो, तर तुमचे धागे न वाचणे हा माझ्या पुरता उपाय आहे. तुम्हाला लिहू नका असे सांगण्याचा हक्क मला आहे काय? तरीही यायचेच नसेल तर कोण काय करणार म्हणा.

ईथे नीव्वळ धागे उसवून खचीतच थांबणार नाहीत. आधीच्या धाग्यावर अनेकांनी उपाय/खबरदारी सुचवल्यात ते ही जरा वाचण्याचे कष्ट घ्यावेत ही नम्र विनंती.

भारतीय लोकांच्या *** वर बांबुचे फटके दिल्याशीवाय अंगातले कीडे शांत होत नाहीत

एकदा ट्रेनमध्ये एका सहप्रवासी मुलीने अश्या वखवखलेल्या नजरेने बघणार्‍या गृहस्थाला त्याच्या बायकोसमोर "अहो, कितीही डोळे फाडलेत तरी माझे कपडे पारदर्शक होणार नाहियेत" असे मोठ्याने ओरडून म्हटल्यावर तिच्या मैत्रीणींनी आणि इतर सहप्रवाशांनी चोपायच्या आत तो बायकोला तिथेच सोडून ट्रेन मधून नेमक्या त्यावेळी गाडी सिग्नलला थांबल्याने उडी टाकून उतरून पळून गेला. बिचारी बायको अवघडून तशीच थिजली होती :( त्याची आठवण झाली.. अनुभव येतात.. चीड वाटते.. (काही प्रमाणात कीवही).. आणि मग कालौघात आठवणींवर पुटे चढतात.. आवेश कमी होतो हेच खरं..

हातवारे करणे, कमेंट पास करणे अंगचटीस जाणे वगैरे गोष्टींबद्दलचा आक्षेप समजू शकतो. बाकी नजरेबद्दल बोलायचं झालं तर निदान मी तरी सुंदर स्त्रिया आणि मुली यांना न्याहाळतो. आता ही नजर घाणेरडी आहे की नाही ते मला ठाऊक नाही. एवढंच कशाला इथे मिसळपाव वर कित्येकदा उत्तान फोटो डकवण्यात आलेले आहेत. आता त्या फोटोंकडे पण चांगल्या नजरेने पाहावे म्हणजे काय करावे हा प्रश्न पडलाय.

आता दिल्लीत परत गँग रेपची नवी केस घडली आहे. अशीच घटना महाराष्ट्रातील सोलापुरात सुद्धा घडली आहे.तर नाशिकमधे आश्रम शाळेतील मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. आपला देश लिंग पिसाट बलात्कार्‍यांचा देश झाला आहे आणि इथे रोजच कायद्याचा बलात्कात होत आहे कारण त्याचा धाकच मुळी उरला नाही. :( India's 'silent' prime minister आपल्या राष्ट्राचा आत्ता पर्यंतचा सर्वात दुबळा,मुका आणि संवेदनाहीन सरकारचा हा सुंदर मुखडा !

गेल्या काही वर्षात युरोप आणि युके मधील वास्तव्यात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे एकंदर समाज आणि राजकारण यांची संवेदनक्षीलता आणि माणुसकी. कोणताच समाज किंवा राष्ट्र हे परिपूर्ण नसते हे जरी कितीही खर असल तरी जे काही आज काल भारतात चालु आहे ते भयानक आहे. सहमत आहे. माझे देखील असेच मत आहे. परंतु माझा एक मित्र आहे जो हे मानत नाही. त्याने एक लिंक दिली. http://en.wikipedia.org/wiki/Rape_statistics मला या लिंकमधे युरोप युके तसेच अमेरीकेचे नाव नसेल अशी अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांत एक गोष्ट शिकलो ती ही की आपली अपेक्षा कितीही चांगली असली तरी ती पूर्ण होतेच असे नसते. असो. बदलेन कधीतरी.