Skip to main content

देह आत्म्याचे मंदीर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 24/12/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.

उभे भक्कम पायावर
एक राजस आहे घर
तेथे भगवंताचा वास,
देह आत्म्याचे मंदीर

देणे लाभले इश्वरी
चमत्कार खरोखरी
त्याचे लोभस रुपडे
काया रेशमी गोजीरी

चार खांबांचा निवारा
दोन नेत्रांचा पहारा
आत्माराम तेजोमय
राही धरूनी पिंजरा

नको भरू ते धूराने
नको माखू काजळीने
प्राणज्योतीचे देऊळ
ठेवी त्याला निगुतीने

देह आत्म्याचे मंदीर
दिव्यतेजाचे ते घर
उरे मूठभर माती
जाता प्राणपक्षी दूर

लक्ष चौ-यांशी फ़े-यांत
आला मानवी देहात
नको घालू रे करंट्या
देणे इश्वरी, कच-यात

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1912
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मागची आणि ही अश दोन्ही कविता आवडेश.

अवांतर :- शिर्षक वाचून मिपावरच्या डांबिस आत्म्याचे मंदीर वैग्रे उभे राहिले का काय अशी शंका वाटून गेली.


In reply to by परिकथेतील राजकुमार

@मिपावरच्या डांबिस आत्म्याचे मंदीर वैग्रे उभे राहिले का काय अशी शंका वाटून गेली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© >>>> आपल्याला वाटून गेली,हे 1 आश्चर्यच आहे. :-b


'द्येह द्येवाचे मंदिर' येवढेच माहित होते, उदयराज गोडबोले यांच्या गाण्यामुळे. आता हे नवीन कळले.