नमस्कार मिपाकारहो ,
बरेच दिवस मी मिपा वाचत आहे.प्रथम वाचनातच मिपा आणि मिपाकर आवडले.मित्रांचा कंपू म्हणजे कधी सुटू नये असे स्थान.एक दोन जिवलग मित्र असले कि कुठलाही तणाव हलका वाटू लागतो.मग मानसोपचार तज्ञाकडे जावे लागत नाही असे वाचले होते कुठे तरी.आयुष्यात कधी तरी हि मैफिल मोडून जावे लागते, शिक्षण कामधंदा अश्या गोष्टीं करता.मग मात्र तसा अड्डा जमणे बरेचदा शक्य होत नाही.पण मिपावर मात्र हे सगळे आढळले.काही मराठी संस्थळावर हि डोकावले होते.पण तिथे परत शाळेत गेलो कि काय असा भास झाला.मिपावर मात्र आपल्या कट्ट्यावर आल्यासारखे वाटले.सडेतोड उत्स्फूर्त आणि व्यंगात्मक असल्या तरी बुद्धी चातुर्याची उत्तम चुणुक दाखवणाऱ्या प्रतिक्रिया.एखाद्या धाग्यावर लेखकाची खेचणाऱ्या प्रतिक्रिया तर एखाद्या धाग्यावर मूळ लेखनात आणखी सखोल भर टाकणाऱ्या प्रतिक्रिया स्तिमित करून गेल्या.किती तरी प्रतिभावंत आहेत इथे.तात्यांसारखा अफाट माणूस इथेच मिळाला.पराशेठ्च्या प्रतिक्रिया तर मजाच आणतात.मग या दोघांना चेपुवर शोधून मित्र विनंती पाठवली. त्यांनी ती मान्य हि केली.त्या दोघांचे व्यक्तिमत्व सारखे वाटल.गारंबीच्या बापूची आठवण देणारे.रोख ठोक.अ.आ.च्या स्म्यायल्या ,फुलांच्या रांगोळ्या.जागु तै च्या पाक्रू . मिपाचे आपले असे शब्द आणि खूप हो. जास्त लांबड लावत नाही.पण एक अजून. ओळख पाळख नसतानाही यकु दुख्खी करून गेला.असो तर आता कधी प्रतिक्रियातून टपल्या मारा,चिमटे काढा,बरे वाटले तर कौतुक करा आता आम्ही मिपाकर आहोत.आमचा हरवलेला मित्र कट्टा मिळाला असे वाटत आहे.तेव्हा समस्त मिपाकार हो आमचा नमस्कार कबुल करावा.
वाचने
3097
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत!
वेल्कम.
In reply to मिपावर स्वागत! by किसन शिंदे
ह्म्म.............झाली
In reply to वेल्कम. by गणपा
या या..
तुम्ही डु आय डी घेउन आलात
जिंदादिल...! सलीssssssssल(हे
झालं... आत्ता सलीलच्या
In reply to जिंदादिल...! सलीssssssssल(हे by अत्रुप्त आत्मा
सलीssssssssल
In reply to जिंदादिल...! सलीssssssssल(हे by अत्रुप्त आत्मा
प्रेषक, सलिल २४
डोकावणे हे क्रियापड
In reply to प्रेषक, सलिल २४ by गणपा
डोकावणे हे क्रियापड
In reply to डोकावणे हे क्रियापड by शैलेन्द्र
स्वागत!
मिपावर स्वागत
शारजाहकर जामखेडकर का?
चुक भूल देणे घेणे.
In reply to शारजाहकर जामखेडकर का? by प्यारे१
स्वागत.
माझ्या देखील भावना काही अशाच आहेत.
लिहायला सुरवात करा
In reply to माझ्या देखील भावना काही अशाच आहेत. by रुस्तम
याच निमित्ताने सर्वच नव