Skip to main content

२१ डिसेंबर २०१२

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 24/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी मंडळी शीर्षक पाहून काही लक्षात आले का ? हांग आश्शी मला माहित होतेच तुम्ही मंडळी (माझ्यापेक्षा) हुशार आहात. ;) तर मंडळी, २१ डिसेंबर हा माया कॅलेंडर नुसार शेवटचा दिवस. आता काही जण म्हणतात की २२ तारखेला नवे कॅलेंडर सुरु होणार आणि फार फरक पडणार नाही. काही जण म्हणतात नाही, २१ डिसेंबर २०१२ कॅलेंडरचा शेवटचा दिवस नसून २५ डिसेंबर आहे, किंवा साल वेगळे आहे किंवा अजून काही अजून काही. असो. आपण बहुजनांपैकी म्हणजेच बहुतेक जण ज्यावर विश्वास ठेवतात त्यापैकी असल्याने २१ डिसेंबर हाच कॅलेंडरचा शेवटचा दिवस मानून चालू. पण त्यातही एक मेख आहे. तर ती म्हणजे हाच विश्वाचा शेवटचा दिवस असल्याचे पण अनेक जण मानतात. बाब्बो. हे तर भलतच त्रांगड !! खरं असेल तर तयारीला लागावं. ना ना बांबू सुतळ मडक नाय बाबा.. ते पाहातील उरलेले असलेच कुणीतर ;) आपण ते टेन्शन नाय घ्यायचं. तयारीला म्हणजे मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायच्या... तर मला विचाराल तर माझी एकच ईच्छा आहे ती म्हणजे एखादा सणसणीत ढासू लेख लिहावा आणि तो संपादकांनी उडवू नये ;) अवघड आहे ही विच्छा पूर्ण होणं पण इच्छा असायला काय हरकत आहे ? काय !! :) तर तुमची अशी काही इछ्छा आहे का? असल्यास ती कोणती हे विचारायला हा काथ्या कुटला ! (लेख उडाला नाही तर प्रतिसाद द्या ! ;) )

वाचने 8470
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

ते 'ढासू लेख' हे अगदी 'घासू लेख' या सुरात बसतंय. तेव्हा लिहा. इच्छा पूर्ण होणार तुमची, आणि ती अखेरची ठरणार नाही. ;-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

का नाही? त्यांनी इथंच लिहा असं म्हटलं आहे, पण खासगीत सांगू नका असं म्हटलेलं नाही. जरूर सांगा (त्यांनाच). फक्त व्यनि करू नका म्हणजे मिळवली. ;-)

खाजगी संकेतस्थळावर लेख पाडायची इच्छा आहे.

सणसणीत ढासू लेखाला ढेर सार्या शुभेच्छा...येउदेत लवकर.... ढासू लेख

नाना, ढासू लेख लिहाच तुम्ही. ''जे होईन जे होईन '' हा आमचा ढोसू दोस्तांचा डायलॉग आहे. -दिलीप बिरुटे [मिपा सदस्य]

झाली की तुमची इच्छा पूर्ण! लेख ठेवला शिल्लक. आणखी काय? माझी इच्छा काय आहे ते २२/१२/२०१२ ला सांगेन.

२१ डिसेंबरचे काय म्हाइत नाय... पण साहेबाच्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी म्हणल्याप्रमाणे, ‘Cosmic GDP’ crashes 97% as star formation slumps त्यांचे म्हणणे आहे की आता विश्वात नवीन तारे होण्याची प्रक्रीया मंदावली आहे. मला वाटते त्यांनी हा अभ्यास बॉलीवूड आणि भारतीय (सर्वपक्षिय) राजकीय नेतृत्व असे जर दोन सबसेट घेऊन केला असावा, बाकी तुमच्या इच्छेबद्दलः ढासू लेख अवश्य लिहा.

२१ डिसेंबर ला एवरेस्ट बेस ला असेन त्यामुळे तुम्हाला शेवटच्या शुभेच्छा ! २२ तारखेला कलादालन मध्ये प्रलयाचे फोटो टाकतो 'असाल ' तेव्हा तर प्रतिक्रिया द्यालच ;)

त्याच्या आधी 'लाईफ ऑफ पाय' हा सिनेमा थ्रीडी मधे पहा म्हणजे प्रलयात सुद्धा जिवंत कसे रहायचे त्याचे ट्रेनिंग मिळेल. नाहीतर त्याच्यावरच एक ढासू परीक्षण लिहा. लई भारी पिचकर हाय!

असाच काहीसा धागा भिका पाटील यांनी जानेवारीत काढला होता. आता तो दिसत नाही. मात्र औदुंबर यांचा १ नोव्हेंबर चा दिसतो आहे

तर मंडळी, २१ डिसेंबर हा माया कॅलेंडर नुसार शेवटचा दिवस. आता काही जण म्हणतात की २२ तारखेला नवे कॅलेंडर सुरु होणार तर तुमची अशी काही इछ्छा आहे का? असल्यास ती कोणती? आम्ही प्लेबॉय कॅलेंडरचं मायन व्हर्शन मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत!!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

बर्‍याच आहेत. त्यातील एक पूर्ण झाली तरी चालेल. छानशी दारू ढोसता ढोसता पिडां काकांच्या माशावरच्या गप्पा / नंदनच्या कोट्या ऐकाव्यात. नान्याने फोन लावल्यावरती पाच रिंगांच्या आत उचलावा. सहजमामांच्या प्रोफाईलवर त्यांचा फटू दिसावा. अदितीला वटसावित्रीची पूजा करताना पहावे. नीलकांतच्या तोंडून 'आज एकाही मिपाकराचा फोन आला नाही' हे वाक्य ऐकायला मिळावे. प्रा. डॉ. ना शरद पवार आणि भ्रष्टाचार ह्या विषयावरती बोलताना पहावे. टार्‍याला संपादक झालेले पहावे. हळदी कुंकवाच्या जोडीला VAT69 दिसावी. इ.इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहजमामांच्या प्रोफाईलवर त्यांचा फटू दिसावा. अदितीला वटसावित्रीची पूजा करताना पहावे. हळदी कुंकवाच्या जोडीला VAT69 दिसावी. या ३ इच्छांसाठी स्पांडूला संपर्क करावा. तो काहीही दाखवू शकतो. ;)

जगाचा अंत जगाचा अंत होणार अश्या बातम्या इसाई लोक पसरवत असतात..आता २१ डिसेंबर २०१२ ला जगाचा अंत होणार म्हणून एक धागा वाचण्यात आला होताच. मागे पण जगाचा अंत होणार म्हणून कल्ला झाला होता..बायबल..आदी मधल्या ओळीचा हवाला देवून त्यांचे उद्योग चालूच असतात. या वर परवाच प.पु.सदगुरू महाराज यांचेविचार ऐकले व ते येथे देत आहे.. आपल्या वैदिक ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने व अफाट बुद्धिमत्तेने ब्रह्मांड रहस्ये शोधली... मानव हे त्या ब्रह्मांडा तल्या उर्जेचे रुप आहे. मानवी शरीरात १०८ उर्जा केंद्रे असतात..त्या पैकी १०६ हि मानवी शरीरात असतात. व उरलेले २ शक्ती केंद्रे हि बाह्य असतात. व ती म्हणजे चंद्र व सूर्य. चंद्राचा मानवी जीवनावर परिणाम म्हणजे जनन शक्ती..स्त्री या मध्ये जी प्रजोत्पत्ती होती त्या वर चंद्र तत्वाचा प्रभाव असतो.. चंद्र ग्रह दर वर्षी ३२ मिलीमीटर ...१.१/४ इंच पृथ्वीपासून दूर जात आहे. २५ हजार वर्षा नंतर तो पृथ्वीच्या आकर्षण शक्ती दूर जाऊन त्याचा पृथ्वी ग्रहावर काहीच अंमल राहणार नाही.. परीणाम स्वरूप मानव आपली प्रजोत्पादन शक्ती संपवून बसेल व हळूहळू मानव जातीचा क्षय होऊन ती नष्ट होण्याचे संकेत आहेत.. त्या मुळे अजून २५ हजार वर्षे जगाचा अंत होणार नाही असे मानावयास हरकत नाही.. इसाई..माया यांनी ज्या पुड्या सोडल्या त्या खोट्या ठरल्याच आहेत.. आता वैदिक म्हणतात ते खरे कि खोटे हे आपणास २५ हजार वर्षा नंतरच कळेल. तेंव्हा खाओ पिओ...आणी मस्त जीवन जागा असा संदेश आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

बोला, काकाश्री द ग्रेट, यांच्या कथनापुढे आहे काही कुणाचं म्हणणं? आपण म्हणूनच काकाश्रींना जाम मानतो, एकदम्!

In reply to by अविनाशकुलकर्णी

२५ हजार वर्षा नंतर तो पृथ्वीच्या आकर्षण शक्ती दूर जाऊन त्याचा पृथ्वी ग्रहावर काहीच अंमल राहणार नाही.. परीणाम स्वरूप मानव आपली प्रजोत्पादन शक्ती संपवून बसेल व हळूहळू मानव जातीचा क्षय होऊन ती नष्ट होण्याचे संकेत आहेत.. त्या मुळे अजून २५ हजार वर्षे जगाचा अंत होणार नाही असे मानावयास हरकत नाही..
पन गुर्जी येक ग्वोस्ट काय उमजली न्हाई. पपू म्हाराजाना हे आत्ताच कसं कळ्ळं

ढिंगचाक ढिंगचाक ढिंगचाक फक्त सहा तास राहिले... अजुन तरी जिवंत आहे ;) जगलो वाचलो तर उद्या बोलू =))

In reply to by सस्नेह

माया लोकांची खरी तारिख २३ डिसेंबर २०१२ आहे.. असं मीना प्रभुं च्या
मेक्सिको पर्व
या पुस्तकात नमुद केलेल आहे. म्हणजे अजुन एक दिवस आहे..

नवीन भाकित जून २०१३ चे आहे. सूर्यकल्लोळ पृथ्वीवर येण्याचा!

In reply to by समयांत

ह्या स्थिती ला समयांत खुपच समर्पक शब्द आहे,समय अंत बाकी ह्याला सुर्य नाही आपणच जबाबदार असणार आहोत

In reply to by समयांत

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आपण म्हणजे सर्व प्रजा होय् जी की प्रदुषणाने आत्म घाताच्या स्थितीत आहे, तुम्ही एक वावटळ निर्माण नाही करु शकत्,तिथे सौरवादळ तुमच्या आवाक्यात नाही(ह घ्या)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

आपण सर्व प्रदूषणाला पर्यायाने महाप्रलयाला जबाबदार असणार मग तो कधीही येवो, समयाचा अंत हा व्हायचाच!