Skip to main content

मनातलं जनांसाठी

लेखक समयांत यांनी बुधवार, 19/12/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
एच आर वाले म्हणवणारे सध्या कॉल करुन उमेदवार्‍यांना आशा लावत आपली मक्तेदारी गाजवत आहेत. खरेतर त्यांना सद्य परिस्थिती सांगता का येत नाही, प्लेसमेंटची साठेबाजारी करत मंदीची पळमात्र शंका येऊ न देणारे हे भविष्यातले गुन्हेगार आहेत, पण काय त्यांची आत्ताची रोजीरोटी त्या साठेबाजारीतूनच चालत असते. आज गोजिरवाण्या शहरात राहणारे आणि आपली ख्यालीखुशाली सांभाळणारे दारांत उभ्या माणसांना हलके हसून बोळवण करायलाही विसरले आहेत, इथेच ती मंदी वर डोके काढत आहे. मला जाचणारे बरेच काही आहे, पण इथे लिहावे कि नाही याचा विचार करतो आहे. असो, या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4227
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by लीलाधर

नवकविता आहे असं ``तर्री´´ यांना वाटले, त्यासाठी त्यांनाच विचारा. नक्की काय आहे म्हणजे, मनातले विचार आहेत की हे...

ह्या लेखाचे मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मला सुरुवातीला नको असतांनाही तीन कंपनीच्या एच आर वाल्यांचे कॉल आलेत, म्हणे टेलिफोनिक इंटरव्ह्यू. मग मी कॉलबॅक केला तर ती लोकं पुढचा आठवडा पुढचा आठवडा करत वेळ मारुन नेत आहे. सेल्समन म्हणून काम केले तर, लोक सरळ न बघता निघून जातात, पुढे जाऊन रिक्षावाल्यांशी हुज्जत घालतील पण आम्ही कुणी सजीव प्राणी आहोत यांकडे दुर्लक्ष करतील. असो. इतकं भाषांतर पुरे आहे.

नक्की लिहा. पण जरा मोठं आणि समजेल असं लिहा. सगळे संदर्भ केवळ स्वतःला माहित असल्याने लेख लोकांना कळेल ही अपेक्षा अवाजवी आहे.

In reply to by आदिजोशी

तरी पण अ‍ॅड्या , भावना पोचल्या .. समयांति, हे जे नेक्स्ट कॉल्स आहेत ते ख्रिसमस मुळे येणार्‍या सुट्ट्यांमुळे आहेत. ( एच्चाअर वाल्यांचा दोस्त ;) )

In reply to by सुहास..

ख्रिसमस सर्व ठप्प पाडतोय का? हम्म मी उगाच मंदीच्या नावाने बोभाटा केला. पण मी आय.टी क्षेत्राशी 'निगडी'त नाही. :)

In reply to by समयांत

तुम्ही निगडीत नाही मग कुठे असतात् मला तर सदैव तुमच्यासारख्याचीच चिंता असते

In reply to by श्री गावसेना प्रमुख

चिंता करायला लागलेत म्हणजे तुम्ही एच आर वाले झालेत की. गरज असेल तरंच त्या चिंतेला काही अर्थ आहे, नाही का ;)

काय टेस्ट करुन बघत होतात? अनाकलनीय, संदर्भरहीत असे काही लिहिता येते का ते? ;) पास मग तुम्ही. येते तुम्हाला.

In reply to by अभ्या..

कशात तरी आमची वर्णी लागली, वेळ सत्कारणी लावायला मिपा हवंच मग. :)

जरा नीट आणि मुद्देसूद लिहा. तुमच्या मनातल्या भावना नीट मांडा. हा लेख बहुधा काकू मध्ये जास्त बरा पडला असता. असो. काय वाट्टेल ते करा पण नीट मांडता येत नसेल तर जोवर ते येत नसेल तोवर वाट बघा. तज्ञांची मदत घ्या आणि मग लिहा. हे असले एकोळी, बिनोळी, चारोळी धागे कृपा करुन काढु नका. लोकांचे काय आहे. ते २-३ दा सांगतील मग दुर्लक्ष करतील. लोक नंतर तुम्हाला सिरियसली घेणार नाहित. फक्त रेवडीच उडवतील. उद्या तुमच्या मनातली खळबळ तुम्ही नीट मांडलीत तरी त्याकडे मग काणाडोळा होइल. त्यामुळे विचार करुन लिहा. लिहिण्याची घाई करु नका आणि आपल्या लिखाणावर लोक विचार करतील अश्याप्रकारे लिहा.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय, होय यापुढे मी काळजी घेईन नीट व मुद्देसूद लिहीण्याची, उद्या तुमच्या मनातली खळबळ तुम्ही नीट मांडलीत तरी त्याकडे मग काणाडोळा होइल.नको असं नकोय. मी आणखी दुसरंही लिहेन, जसं माझ्या आवडत्या जाहिराती वगैरे. असो. तज्ञांची मदत घ्या.. मी शोधाशोध करायला लागतो, तज्ञांची आता. धन्यवाद मार्गदर्शनाकरिता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद, पण आयडी मस्त कोणत्या प्रकारे?

जसा झाला तसा य चा म करुन थोडा संयम बाळगा व आकलन होईल असं लीहा...बाकि मिपाकर मदतीला येतीलच

In reply to by दिपक.कुवेत

दिपक हे य चा म काय असतं? मी ध चा मा ऐकलं आहे. माझं नाव समयांत आहे, संयमात नाही ;) मदत खूपजण करत आहेत आणि मी त्यातून शिकतो आहे. धन्यवाद सर्वांना, नव्या गडीला आसरा दिल्याबद्दल.